विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,

>> उगाच सारवासारव करू नका. ही पोस्ट देखिल अतिशय दयनीय आहे. जमल्यास विचार सुधारा.

तुम्ही पहिली पोष्ट अशी टाकली की जणू भंकस मुलं अस्तित्वात नसतातच! ठान्क्यू हां! Proud

स्वतःच्या लग्नासाठी मुलं बघायला मी काय 'पुरोगामी' आहे? Lol

२.
>> शिकूनही हीच मेंटॅलिटी आहे का?

मॅकॉलेछाप शिक्षण आहेच मुळी तसं! ते घेऊन काही लोकं होतातही पुरोगामी. आपल्याच्यानं नायबुवा जमायचं. Rofl

३.
>> तुम्हाला त्या भावी जीवनसाथी म्हणून पसंत नसतील म्हणून लगेच कोणत्याही मुलीला भंकस बोलण्याचा
>> अधिकार तुम्हाला कोणी दिला?

त्यांनी (वा त्यांच्या घरच्यांनी) भंकसपणा केला म्हणून.

४.
>> तुमच्या या विधानावरून तुम्ही माणूस म्हणून किती भंकस आहात हे दिसतंय.

I like to call a spade a spade.

आ.न.,
-गा.पै.

जे शिक्षण घेतले त्याला मॅकॉलेछाप शिक्षण बोलणे आणि त्याच मॅकॉलेच्या देशात जाउन मॅकॉलेछाप लोकांची चाकरी करणे यालाच म्हणतात नशिबाची थट्टा Biggrin

लोकांना असे बोलावुन मग घोळात घेउन दान करायला लावणे चुकीचे आहे. भीडे पाई लोकांना देणग्या द्याव्या लागल्या असतील.
त्यापेक्षा स्वागत सभारंभ न करता ते पैसे गपचुप "मैत्री" ला दिले असते तर १ लाख २० हजार सहज देवु शकले असते. पण तसे केले असते तर त्यांच्या सामाजिक जाणीवांचे प्रदर्शन करता आले नसते.

टोचा, मामी
हे घोळात घेऊन केले नव्हते तर आमंत्रितांना पुर्व कल्पना देऊन सांगण्यात आले होते की आहेर म्हणून जे काही द्याल ते 'मैत्री' ला जाणार आहे.

'सामाजिक जाणीवांचे प्रदर्शन' हा मुद्दा घेतला तर असे नवे चांगले पायंडे पाडायचे असतील, लोकांपर्यंत पोहोच्वायचे असतील् तर अजून काय बरे करायला हवे.

तसेच ह्या योगे स्वागत समारंभाची हौस आणि सामाजिक जाणीवांचे भान असा सुवर्णमध्य खूप चांगल्या रितीने साधला गेला आहे असे नाही का वाटत.

लोकांनी देणगी तर दिलीच शिवाय मेळघाटातील समस्या आणि तेथे मैत्रीच्या माध्यमातून चालणारे कामही त्यांना समजले , ही बाबच आमच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे.

हे लग्न म्हणजे, कोषात रहाणार्‍या माणसांपर्यंत मेळघाट, कुपोषण, अनारोग्य, दळणवळणाच्या साधनांच्या कमतरतेमुळे काही माणसे माणसे किती अभावग्रस्त जीवन जगतात हे सर्व पोहव्चवण्याचा एक अभिनव मार्ग / व्यासपीठ होऊ ठरू शकले ना!

लोक लोकानाच काय देवाला अन स्वतःलाही फसवतात !

१. आहेराचा स्वीकार केला म्हणजे तुम्ही आहेर घेतला... आता ते तुम्ही दान करताय की बारमध्ये उधळताय यावरुन तो आहेर घेणं सात्विक वगैरे ठरत नाही.. आहेर घेण्याची प्रक्रिया झालेली आहे.

२. घेतलेला आहेर स्वतःच्या खिशात आणवुन मग तो दान केलेला आहे. दानच करायची इच्छा होती तर लग्नाच्या आफ्हीच्या महिन्यात जो पगार होता त्यातुनही दान करता येऊ शकतो की.

३. स्वतःच्या उत्पन्नासमोर आहेर नगण्य असल्यानेच हे केले गेलेले आहे हे तर उघडच आहे.

काउ > चांगल्या गोष्टीं लोकांपर्यंत पोहोचवणं यात आक्षेपार्ह काय आहे ? फसवणूक तर नाहीच नाही. उलट अतिशय स्तुत्य आहे . त्यात सक्ती कुठेही नाही.

>>हे लग्न म्हणजे, कोषात रहाणार्‍या माणसांपर्यंत मेळघाट, कुपोषण, अनारोग्य, दळणवळणाच्या साधनांच्या कमतरतेमुळे काही माणसे माणसे किती अभावग्रस्त जीवन जगतात हे सर्व पोहव्चवण्याचा एक अभिनव मार्ग / व्यासपीठ होऊ ठरू शकले ना!>> +१
इथे असे फ्युनरलच्या बाबतीत केले जाते. शोक व्यक्त करायला फुले आणण्याऐवजी मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ निवड केलेल्या नॉन प्रॉफिटला दान करण्याचे आवाहन केले जाते. यातून कॅन्सर, पार्किन्सन यासारख्या आजारावर संशोधन करण्यासाठी, हॉस्पिटल्सना मदत म्हणून पैसे उभे केले जातात.

स्वाती२ + १ ,
कोणतीही मदत वाया जात नाही कीतीही लहान स्वरुपाची असेना का. त्यासाठी हर्पेन यांनी केवळ अशीही सुरवात होउ शकते ,असं सुचवलय. असच करा! हे आपापले मत असु शकते. बाकीच्यांनी अशा संस्थांना गुप्त मदत केली तर तीही चांगलीच Happy पण ह्यात मलातरी काही वावगे दिसत नाही.

आजच लग्नाविषयीचे कायदे शोधत होते कायद्याच्या धाग्यासाठी तेव्हा हे सापडले.
http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8#.E0.A4... . कुणाला वाचायचे असल्यास.

कुणी वकील असल्यास इथे http://www.maayboli.com/node/51663 माहीती ची गरज आहे

पुढील पोस्ट या बाफवरच्या कोणा एकाला अथवा एका विशिष्ट लग्नाला उद्देशून नाही -

अगदी जवळच्या ओळखीतल्या किमान तीन लग्नांमध्ये 'आम्हांला अहेर न देता अमूक एका संस्थेला देणगी द्या, आम्हीही लग्नाचा खर्च टाळून पैसे त्या संस्थेला देणार आहोत' असं जाहीर केलं गेलं. लोकांनी पैसे दिलेही. या तीनही लग्नांनंतर दोनतीन दिवसांनी पुन्हा दणक्यात रिसेप्शनचं जेवण देण्यात आलं. 'लग्नात खर्च न करता पैसे सामाजिक कार्याला दिले' ही बातमी मात्र वर्तमानपत्रांत व्यवस्थित छापून आली. यांतल्या एका नवर्‍यानं त्याबद्दल लेख लिहून कुठल्याश्या स्पर्धेत बक्षीसही मिळवलं. लेखात पाचसातशे माणसांना एका महागड्या लॉनवर दिलेल्या जेवणाचा उल्लेख कुठेही नव्हता. या तिनांपैकी एका लग्नातली सामाजिक संस्था ओळखीची होती. 'या लग्नात अमूक एक पैसे जमले व ते संस्थेला दिले' असं जाहीर केलं गेलं होतं. प्रत्यक्षात त्याच्या निम्मीच रक्कम संस्थेपर्यंत पोहोचली, हे संस्थाचालकांकडून मला नंतर कळलं.

अजून एका लग्नात नवरानवरीने वृक्षारोपण केलं. 'खर्च टाळला, पारंपरिक विधींना फाटा दिला' इत्यादी मजकूर वर्तमानपत्रात छापून आला. या लग्नाचं जेवणही बातमी छापून आल्याच्या संध्याकाळीच दणक्यात दिलं गेलं.

सामाजिक संस्थांबद्दल लोकांना माहिती द्यायची असेल, देणगी द्यायची असेल, तर ते जरूर करा. पण नंतर बातमी छापून आणून पुन्हा 'घरच्यांचा आग्रह मोडवला नाही, घरातलं पहिलंच कार्य होतं' असल्या सबबी देऊ नका. लग्नात भरपूर खर्च करायचा असेल तर करा. तुमचा पैसा, तुमचं लग्न. तुम्ही खर्च केलेल्या पैशावर अजून दहा घरं चालतात. संस्थेला पैसे द्यायचे असतील, तर जमवलेले पूर्ण पैसे द्या. आणि बातमीत छापून आणल्याप्रमाणे खरंच साधेपणानं लग्न करा. बातमी छापायची आणि पुन्हा सगळ्या डामडौलात स्टेजवर हारतुरे स्वीकारायचे, या दांभिकपणाची चीड येते.

हार्पेन, सामाजिक संस्थेला देणगी देणे हा उपक्रम योग्यच आहे. पण ती आपली आपण द्यावी असं मला वाटतं.

'आमच्याकडे लग्नकार्य आहे पण आम्ही आहेर न घेता तो देणगी म्हणून देत आहोत' हे जाहीर करून मग इतरांना ती देणगी द्यायला लावून आपण काहीतरी वेगळं करून दाखवलं अशी भावना उगाचच निर्माण का करायची? संस्थांना देणगी इतर अनेक पद्धतींनीही ती देता येऊ शकते. संस्थांना देणगी देण्यास इतरांना उद्युक्त करण्याचेही इतर मार्ग असू शकतात. हे जरा आयजीच्या जीवावर बायजी उदार सारखं वाटलं. त्यां

चा हेतू वाईट नसावा याबद्दल खात्री आहे पण त्याच घटनेचा हा दुसरा पैलूही लक्षात घेतला जावा.

चिनूक्स .... खरंय.

चिनूक्स ,
+१.
मात्रं असं न करता म्हणजेच वेगळे रिसेप्शन न देताकेवळ सामाजिक संस्थाना मदत केलेल्यांचे कौतुक व्हायला हवे.

जेव्हा सगळ्यानाच लिमिटेड सोर्सेस ऑफ इनकम होते तेव्हा अमूक खर्चं वाचवून तमुक केलं असं म्हणण्याला अर्थं आहे असं वाटतं.
आता किमान बर्यापैकी पगार असणार्या दोघांचे एका महिन्याचे उत्पन्न ६०-७० हजार तरी होईल. असे एक दोन महिन्यांचे उत्पन्न एखाद्या सामाजिक संस्थेला देणे एखाद्या सुस्थित दांपत्याला अवघड नाही.

संस्थेला पैसे द्यायचे असतील, तर जमवलेले पूर्ण पैसे द्या. आणि बातमीत छापून आणल्याप्रमाणे खरंच साधेपणानं लग्न करा. +१०० (टाळ्या)
बातमी छापायची आणि पुन्हा सगळ्या डामडौलात स्टेजवर हारतुरे स्वीकारायचे, या दांभिकपणाची चीड येते.>>याअश्या दांभिक लोकांचा पर्दाफाश करण्यासाठीच तर खरी गरज आहे तुमच्या सारख्या योग्य व्यक्तींची. Happy

हम्म! असा दांभिकपणा केलातर मलाही चीडच येइल. मी तरी त्याबद्दल जाहीररीत्या नापसंतीही व्यक्त करीन.

सुरेख ,शो ऑफ करायला नाही का मिळत, लोकांसमोर शेखी मिरवायला मिळते दान केल्याची व सामाजिक भान जे त्यांना नसते ते दाखवल्याबद्दल. हा फायदा. Happy

देणगी बिणगी काय द्यायचीय ते स्वतःच्या खिशातुन द्या की. इतरांना का भरीस पाडता??

काही वर्षांपुर्वीपर्यंत एखादी नैसर्गिक आपत्ती आली की त्याला मदत म्हणुन क्रिकेटर क्रिकेटचा सामना लावायचे, सिनेनट्/गायक एखादा ऑर्केस्ट्रा ठेवायचे. लोक आपल्या खिशातले पैसे घालुन ते पाहायला जायचे आणि असा गोळा झालेला पैसा मग आपत्तीनिवारणार्थ असलेल्या फंडाला दिला जायचा. मुळात किती पैसे गोळा झाले याचा हिशोब नाही आणि जाहिर झालेल्यापैकी किती पैसे फंडाला दिले गेले याचाही पत्ता नाही, खिशात हात घालणार सामान्य जनता पण नाव मात्र त्या क्रिकेटरचे किंवा सिनेनट/गायकाचे. की अमुकतमुकाने फुकट कार्यक्रम करुन इतके पैसे मिळवुन दिले म्हणुन. वरचे वाचुन या जुन्या प्रकाराची आठवण झाली.

>>>मुंबईचा समुद्र अहमदाबादेस हलवावा, अशी मागणी आता होणार आहे म्हणे!<<<

असले काहीही झालेले नाही आहे.

दांभिकपणाच्या व्याख्या बदला आता!

अवांतर प्रतिसाद.
*
सर्वात आधी, चिनुक्स यांच्या प्रतिसादातील अनुभवाशी व भावनेशी सहमत.

आता नंतर.

१.
कुणाकडे पार्टीला जाताना आपण रिकाम्या हातांनी जात नाही. एकादी वाईनची बाटली, किंवा डेझर्ट्साठी केक किंवा तत्सम काहीतरी नेले जाते. हे झाले 'पाश्चात्यांचे अंधानुकरण'
"आपल्यात", कुणाकडे पाहुणे जाऊन पाहुणचार स्वीकारल्यानंतर निघताना त्या घरातल्या लहानग्यांच्या हातात 'खाऊचे पैसे' देण्याचा प्रघात आहे.

या सगळ्याला 'आहेर' असे म्हणता येईल, असे मला वाटते. कुण्या लग्नात जाऊन जेवण करणार असेन, तर सहकुटुंब जेवणाच्या खर्चाचे पाएकशे रुपये 'वाजवायला' लाज वाटू नये. (रच्याकने. ते लाऊडस्पिकरवर 'संभाजी तुकाजी अहेर यांचेकडून वधूला पाच रुपयेऽ' अशी अनाउन्समेंट असते, तिला आहेर 'वाजवणे' असे म्हणतात. पूर्वी या अनाऊन्समेंटला लाऊडस्पीकर नसे, पण सोबत दवंडीवाल्यासारखे डफ वगैरे वाजवले जात.)

२.
'त्यांनी' जाहिरात करून मेळघाटात देणगी म्हणून लग्नाचा आहेर दिला. याचा अर्थ म्हणजे स्वतःच्या खिशातून दान दिलेच नसेल असा होतो का?

या असल्या कुशंकाग्रस्त टोच्या पोस्टींचा परिणाम म्हणजे, खर्‍या समाजसेवकांनी आवाहन केले तरी दात्यांनी हात आखडता घेण्यासारखे होते. वानगीदाखल, इथे मिळालेला उदंड प्रतिसाद पहा Happy

तेव्हा आपण शंकेचे बोट कोणत्या कार्याला उद्देशून उभारतो आहोत याचे थोडे तारतम्य बाळगता येणार नाहिये का?

३.
एकाद्या संपन्न संघटनेच्य (उदा. रोटरी, आयएमए इ.) सदस्यांना अमुक कामासाठी प्रत्येकी १००० रुपये देणगी द्या, असे आवाहन केल्यास फारच फालतू अमाऊंट जमा होते असा अनुभव गाठीशी आहे. हेच अमुक फडतूस सार्वजनिक कार्यक्रम (उदा आयुष्यावर बोलू.. इ.) अ‍ॅरेंज केल्यास 'चॅरिटी शो'ची तिकिटे खरीदताना, इतरांसमोर माझे स्टेटस कसे दिसेल, हा विचार करून अहमहमिकेने जास्त देणगी दिली जाते, व कलाकारांचे रेग्युलर मानधन वजा जाऊनही एक मजबूत रक्कम जमा होऊ शकते. हे लॉजिक या चॅरिटी शोजपाठी आहे. व हा माझा अनुभव आहे.

अर्थात, इंड्यन मेंट्यालिटीने त्याचाही धंदा करणारे लोक व 'संस्था' अस्तित्वात आहेत, अन त्यामुळेच इथेही शंकेचे बोट उगारलेले दिसते...

काहीही!

>>>सामाजिक संस्थांबद्दल लोकांना माहिती द्यायची असेल, देणगी द्यायची असेल, तर ते जरूर करा. पण नंतर बातमी छापून आणून पुन्हा 'घरच्यांचा आग्रह मोडवला नाही, घरातलं पहिलंच कार्य होतं' असल्या सबबी देऊ नका. लग्नात भरपूर खर्च करायचा असेल तर करा. तुमचा पैसा, तुमचं लग्न. तुम्ही खर्च केलेल्या पैशावर अजून दहा घरं चालतात. संस्थेला पैसे द्यायचे असतील, तर जमवलेले पूर्ण पैसे द्या. आणि बातमीत छापून आणल्याप्रमाणे खरंच साधेपणानं लग्न करा. बातमी छापायची आणि पुन्हा सगळ्या डामडौलात स्टेजवर हारतुरे स्वीकारायचे, या दांभिकपणाची चीड येते<<<

चिनूक्स,

समजा एखाद्याकडे दहा लाख आहेरातून जमले आणि त्याने आधीच जाहीर केलेले असले की आहेरातील पैसे (/+त्याचे स्वतःचे काही) हे तो कोणा संस्थेला देणार आहे आणि त्यानंतर त्याने स्वतःचे इतर पैसे रिसेप्शनवर खर्च केले आणि पुन्हा संस्थेला दिलेल्या पैश्यांची बातमी छापून आणली तर त्या पैश्यांचा संस्थेला फायदा नाही का? स्वतःची एन्जॉयमेन्ट करूनही दुसर्‍याला मदत करता येणे शक्य नाही का? मी शंभर भिकार्‍यांना जेवण दिले, त्याची व्यवस्थित जाहिरात केली आणि ज्या निमित्ताने ते जेवण दिले त्याच निमित्ताने स्टेजवर उभे राहून हारतुरेही स्वीकारले तर मदत झालीच नाही हे कशावरून? हा दांभिकपणा कशावरून?

मी कोणालातरी मदत करणार आहे म्हणजे माझे लग्न मी साधेपणाने केले पाहिजे हे नक्की कोणाचे म्हणणे आहे? तुमचे?

आणि तुमचे म्हणणे जर असे असेल की बातमीत 'लग्न साधेपणाने साजरे झाले' असे लिहिले असेल तर ते साधेपणानेच साजरे करायला हवे, तर ह्या दांभिकपणामार्फत झालेली 'ती' छोटीशी चांगली गोष्ट कोणाच्या खाती जमा करणार?

त्यांनी' जाहिरात करून मेळघाटात देणगी म्हणून लग्नाचा आहेर दिला. याचा अर्थ म्हणजे स्वतःच्या खिशातून दान दिलेच नसेल असा होतो का?>>>> अगदी अगदी!

तर ह्या दांभिकपणामार्फत झालेली 'ती' छोटीशी चांगली गोष्ट कोणाच्या खाती जमा करणार?>>>>+१

Happy
'आहेर' असे म्हणता येईल, असे मला वाटते. कुण्या लग्नात जाऊन जेवण करणार असेन, तर सहकुटुंब जेवणाच्या खर्चाचे पाएकशे रुपये 'वाजवायला' लाज वाटू नये. (रच्याकने. ते लाऊडस्पिकरवर 'संभाजी तुकाजी अहेर यांचेकडून वधूला पाच रुपयेऽ' अशी अनाउन्समेंट असते, तिला आहेर 'वाजवणे' असे म्हणतात.>> मी ऐकलेत लहाणपणी असे आहेर वाजवणे .धमाल असते त्यातपण Proud आता फक्त लिहुन घेतात आहेर आणि नावे पुकारतात. मस्त पोस्ट तुमची.

>>>> लिम्बुभाऊचा एक गिऱ्हाईक कमी झाला. <<<
गिर्‍हाईकाच जाऊदे, पण तुझ्या नातेवाईकान्ना तूच ओळखुन तूच "हॅन्डल" करू शकला नाहीस याचे खापर विधीन्वर का काढावे समजत नाही.
असो. ज्याचे त्याचे मत/विचार्/कृती स्वातंत्र्य म्हणून सोडून देतो.
माझ्या मते, असे प्रकार होतात कारण नवर्‍यामुलांना कधी एकदा ठरलेल्या वधूबरोबर "लग्न होतय" इतकाच "इंटरेस्ट" असतो. स्वतःच्या लग्नात काय होतय्/काय करायचय याबाबत नवर्‍यामुलानेच स्वतः लीड घेण्याची गरज केव्हा पासूनच आहे.
पण झाल ते वाईट झाल बर का, एकचालकानुवर्तित्व नसेल, व सगळेच पुढारी टाईप लिडर असतील, तर सगळीकडे असेच होते, अगदि माझ्याकडेही असेच होईल, जर कुणा एकाचा ठाम भुमिकेचा "वचकच" नसेल.

माझ्या लग्नावेळी, मला लग्नविधी माहित नव्हते, तर माझ्या तेव्हाच्या कंपनीतील भिक्षुक मित्राकडून साग्रसंगित लिहून घेतले होते, व लग्न होताना तो कागद माझेसमोर उघडलेला होता.
मुलिचे लग्नावेळी मी सर्व बाबीन्चे वेळापत्रक आधीच तयार केले होते, व ते वरपक्षाकडेही दिले होते. त्याव्यतिरिक्तही वेळेचा थोडाफार घोळ व्हायचा तो झालाच, पण परिस्थिती केव्हाही हाताबाहेर गेली नाही.
एन्ड रिझल्ट , प्रत्येक कृतीचा एन्ड रिझल्ट काय घडवायचा हे आधीच माहित असल्याने मला हे अवघड गेले नाही. भरपुर होमवर्क केलेले. मात्र एरवी वरवधुपक्षाकडील लोकान्ना लग्नात किती विविध "एन्डरिझल्ट्स" एका वेळेस यशस्वीपणे नियोजनपूर्वक घडवुन आणायचे असतात याबद्दल फारशी फिकीर नसते, व होईल हो.... एकदा सुरु केल की होत आपोआप, या पद्धतीचे नियोजन असते.
मी चक्क प्लॅन ए, तो फसला तर प्लॅन बी, तो ही फसला तर प्लेन सी, अन प्लॅन सी देखिल फसला तर क्विट, इतकी मानसिक्/शारिरीक्/आर्थिक तयारी व नियोजन करूनच अशा इव्हेण्टस ना हात घालतो, मग ते स्वतःचे लग्न असो की पोरीचे वा मित्राचे. या तयारीबद्दल नंतर वेळ मिळाल्यावर लिहीन, की किती बारीकसारीक विचार करावा लागतो.
मात्र एक आहे सुनटुन्या, या करता तुम्ही कोणत्याही भुमिकेत असा, म्हणजे नवरामुलगा/जावई/ मुलाचा काका/मामा/वडील्/मित्र, व्हाट्टेवर, पण सूत्रसंचालनाचे सर्वाधिकार तुम्ही हातात घेणे अत्यावश्यक असते, व असे अधिकार कुणी सहजासहजी देत नसतात, ते जो काय चांगला एन्ड रिझल्ट घडवायचा आहे ते घडविण्याच्या आत्यंतिक आंतरिक स्वइच्छेतून हिसकावुन घ्यायचे असतात. त्यात वाईटपणाही येऊ शकतो.

Pages