विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मैत्रिनी च्या मुलाच लग्न आहे १७ डिसेंबर ला कुनबी आहेत ते वाडाचे. दोन्ही पार्ट्या निम्मा-निम्मा खर्च करत आहेत.मुलिकडचे सगळा खर्च करायला तयार होते पण हिनीच नाही सांगतले. एकुलता एक मुलगा आहे यु एस ला.
तिच्या बहिनीच्या तिन्ही मुलिंची लग्न ही अशिच झालेली.

माझ्या मुलाने जर मला विचारुन लग्न केले तर मी रजिस्टर ला प्राधान्य देइन व परिचित/नातेवाईकांसाठी रिसेप्शन
ठेवेन.

आमच्या कॉलनी मधे भोवतेक लग्न मी अशिच पाहिलेली आहेत.
मुंबई मधे एवढे सामान देताना घेताना बघितले नाही.

"मागणी तसा पुरवठा" किंवा मागणी म्हणून पुरवठा हे प्रकरण मुळात वधुपक्षाच्या अनिच्छेने नाईलाजाने होतंय! दुर्दैवाने पुरवठाच थाम्बवण्याची धमक पश्चिम महाराष्ट्रात फार कमी ज्ञातीसमाजातील मुलिंमध्ये आहे, >> अजूनही बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच जातींमध्ये "यात गैर नाहीच" तो वरपक्षाचा हक्कच (आणि वधूपक्षाचे कर्तव्यच) आहे असा सूर आळवताना दिसतात! दुर्दैवाने सूर आळवणारे बरेच दोन्ही पक्षांचे ही आहेत. यात परीस्थितीनुसार स्वखुशीने खर्च करणारे, परीस्थिती नसताना मुलीला त्रास होऊ नये म्हणून/सासरच्यांकडून ऐकून घ्यावे लागू नये म्हणून/ समाजाने नावे ठेऊ नये म्हणून कर्ज काढून खर्च करणारेही आहेत तसंच मऊ लागलं म्हणून कोपराने खणणार्‍या वरपक्षाकडून जबरदस्तीने नाडले जाणारेही बरेच आहेत!

यात मेख अशी आहे की "मागणी" करणारे पहील्या बैठकीतच हे सर्व डिस्कस करण्यापेक्षा रीतसर गोष्टी पुढे गेल्या की साखरपुडा वै झाला की हळू हळू अंदाज घेऊन ही पिलावळ सोडतात... मग "लोक काय म्हणतील" हा विचार करणारे अखंड विचार करत राहतात आणि एक एक मागणीचा पुरवठा करत जातात.

पश्चिम महाराष्ट्रात तसंही ठरवून लग्न करताना मुलींना सगळ्या गोष्टींपासून दूरच ठेवलं जाई. माझ्या इंजिनिअरिंगच्या वर्गात अशी एक मुलगी होती जिला लग्नाला उभी राही पर्यंत नवरा मुलगा कोण हेच माहीत नव्हतं!! बघायला आलेल्या घोळक्यात मुलगा, भावंडं, मित्र, आजा, चुलता असा गोतावळा असे... एकमेकांशी बोलणे वै तर लांबच! (अवांतर : ) तसंच तिच्या मोठ्या जावेला मूल होत नव्हतं बरेच वर्ष म्हणून या दोघांवर जबरदस्ती पाळण्याच्या जबाबदारीची! साबाला म्हणे डोळे मिटायच्या आधी नातवंडमुख पाहायचे वेध लागलेले. नवरा मातृभक्त!! बिचारी आठव्या महीन्यापर्यंत यायची लेक्चर्सला. मग सोडून दिलं कॉलेज! महत्वाच्या गोष्टींमध्ये स्वतःचा विचार करायची मुभा नाही... सुदैवाने परीस्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारतेय तिथेही!!

मुलीच्या घरीच पुरूषप्रधान संस्कृती ने बांधून ठेऊ नये! या गोष्टी आपोआप कमी होतील. मुली स्वतःच अश्या गोष्टींना विरोध करायला लागतील! नक्कीच!!

माझ्या मुलाने जर मला विचारुन लग्न केले तर मी रजिस्टर ला प्राधान्य देइन व परिचित/नातेवाईकांसाठी रिसेप्शन
ठेवेन.>> नक्कीच!!
हौसेला मोल नसतेच! पण आपली हौस इतरांवर लादण्यापेक्षा त्याचे मोल दुसर्‍यांची (विशेषतः ज्यांचे लग्न आहे त्यांची) हौस पूर्ण करण्यासाठी कामी येईल! मग भले त्यांना फिरायला जायचे आहे, लग्नानंतर स्वतःचे घर घ्यायचे आहे, उपयुक्त वस्तूंनी घर सजवायचे आहे, भविष्याची तरतूद करायची आहे...
अगदी साध्या पद्धतीने, वैदिक पद्धतीने जरी करायचे असेल तरी बडेजावाला, जेवणवळी-मानपान यांना फाटा देऊन त्या वैदिक पद्धतीमधील सप्तपदी, मंत्र, दोघांची एकमेकांप्रती आणि एकमेकांच्या कुटुंबाप्रति आणि दोन्ही कुटुंबांचीही एकमेकांप्रति असलेली कर्तव्ये यांची जाणीव करून द्यावी. यासाठी हवी तर आधुनिक सप्तपदी/मंत्र लिहून घ्यावेत! हे ही किती जणांना पचेल्/रूचेल कोणास ठाऊक!!

मुंबई मधे एवढे सामान देताना घेताना बघितले नाही. >> तसंही मुंबईमध्ये जागाही नसते एवढे सामान ठेवायला आणि तेवढा मोठा फ्लॅट ही परवडत नाही घेणे! आता फ्लॅटच मागत असतील तर मात्र.....

लग्न कसेही करा दाखवून, ठरवून, प्रेम... भावी वर वधू आणि दोघांच्याही आई वडीलांनी विवाहपूर्व समुपदेशन नक्की करून घ्यावे!! स्वतःच्या चुकीच्या मानसिकता/चालीरिती बदलण्यासाठी! नव्या नात्याची नवी सुरूवात करण्यासाठी!!

साधना, पर्सनली अज्जिबात घेत नाही.
Happy

माझ्या आईबाबांनी मला बारशांच्या वेळीस 'यात रत्नागिरीत दोन लग्ने झाली असती ' असे म्हणून दटावले होते.
आणि तुमच्यामुळे इतरांवर प्रेशर येईल हे पण.

पण होती आम्हाला हौस.
आणि बर्डन केव्हा होतं तर जेव्हा सगळं एखाद्याला मनाविरुद्ध, जबरदस्तीने आणि न परवडता होत असेल किंवा त्यात मानपान, रुसवेफुगवे होत असतील. इथे सगळा खर्चं दोन्हीकडच्यांना करू न देता आम्ही स्वतः केला.

आपल्याकडे बघून गरीब पण असे करतील असे वाटले तर मग ब्रँडॅड कपडे, छानचौकी , चकचकीत घर असं काही करायलाच नको.
आणि गंमत म्हणजे मला जो दणक्यात वगैरे वाटतो तो आमच्या एच के रिजनच्या मानाने कनिष्ठ मध्यमवर्गियांचा खर्चं आहे.
आमच्या कम्युनिटीत इतरांनी याच्या पाचपट तरी खर्चं केलंनी असता. सो, आमच्याकडे बघून इतराना दडपण येईल यालापण या भागात तरी अर्थं नाही.

.

माझ्या मुलीने मला तिच्या लग्नात काही हस्तक्षेप करु दिला तर मी सरळ घरच्याघरी ब्राम्हण आणि माझ्या -तिच्या होणा-या घरची चार डोकी बोलावुन लग्न लावेन. Happy रजिस्टर लग्नालाही माझी ना नाही पण मला लेकीला मुंडावळ्या बांधलेल्या पाहायला आवडेल म्हणुन हा खटाटोप. Happy

बाकी रिसेप्शन वगैरे प्रकात मला आताच अयोग्य वाटतो. घरी हा विषय निघाला की घरचे "आपण लोकांच्या लग्नात जाऊन खाल्लेय, आता आपल्याकडे बोलवायचे नाही का" हा प्रश्न करतात. पण मला कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखे वाट्ते. आपल्याएवढ्याच आर्थिक परिस्थितीत असलेल्या म्हणजेच दोन्ही वेळा भरपेट जेऊ शकणा-या मंडळींना आपण आपल्या खर्चाने एका वेळचे जेवण दिल्याने त्यांना काही फरक पडत नसतो. पण तेच जेवण जर आपण एखाद्या अनाथाश्रमाला किंवा सामाजिक संस्थेला दिले तर त्याना फरक पडु शकतो.

पण रिसेप्शनाच्या निमित्ताने भेटीगाठीही होतात. रिसेप्शनच नाही म्हटले तर आपण आपल्या सगळ्या मित्रवर्गाला एकत्र भेटायच्या आनंदाला मुकू शकतो. काहीतरी मध्यममार्ग शोधुन काढणे आवश्यक आहे ज्यामुळे मित्रपरिवार भेटण्याचा आनंदही मिळेल, योग्य मुखी अन्न पडेल आणि आपल्याला समाधान लाभेल.

माझ्या मुलीने मला तिच्या लग्नात काही हस्तक्षेप करु दिला तर मी सरळ घरच्याघरी ब्राम्हण आणि माझ्या -तिच्या होणा-या घरची चार डोकी बोलावुन लग्न लावेन.>>> ब्राम्हण तरी कशाला हवा? उपस्थित लोकांनी लग्न लागले असे मान्य करायचे आणि विवाह नोंदणी करायची नंतर....

मला हवाय ना... मुंडावळ्यावाले, अंतरपाट्वाले, मंगलाष्टके गाऊन लागणारे लग्न असेल तर ब्राम्हणाची का कमी ठेवावी? पण हे सगळे खयाली पुलाव.. Happy घोडामैदान अजुन थोडे दुर आहे.

>>> शब्दांचे खेळ करून उगाच मुद्दा/ विषय बदलू नका <<<<
मंजुडी, आत्ता पर्यंत या धाग्यात मी दोन ते तिन वेळेस तरी स्त्रीयांचे पुरुषांसोबतच्या दरहजारी प्रमाणावर भाष्य केले आहे... दर हजारि पुरुशांमागे ८००/८५० स्त्रीया म्हणजे १५० स्त्रीया कमी पडत असूनही ही तर्‍हा असेल, तर पुरवठाच बंद व्हायला हवा असे हे धोरण मी व्यक्त करतोय. पण तुम्हाला ते शब्दाचे खेळ वाटत असतील तर तसे वाटून घ्यायलाही माझी ना नाही. मात्र मी पुरवठा हा वरा संदर्भात उपलब्ध वधू या अर्थानेच घेतोय.>>>

बरं, हे ठीक आहे.
तुमच्या मुलाच्या लग्नात लग्नखर्च तुम्ही वधूपक्षाबरोबर अर्धा-अर्धा वाटून घेणार ना?
अर्धा-अर्धा नाहीतरी किमान तुमच्या वर्‍हाडाचा?

>>> यात मेख अशी आहे की "मागणी" करणारे पहील्या बैठकीतच हे सर्व डिस्कस करण्यापेक्षा रीतसर गोष्टी पुढे गेल्या की साखरपुडा वै झाला की हळू हळू अंदाज घेऊन ही पिलावळ सोडतात... <<<<

हो तर... ब्लॅकमेल केल्यागत करतात, अन यातुन लग्न मोडले तर पोरीचीच बदनामी होईल ही भिती असते.
आणि मुलाच्या नातेवाईकात सगळेच हितचिंतक असतात असे नाही तर पिल्लू सोडून गम्मत बघत बसणारेही असतात. (यावर व अशान्ना मी काबूत कसे ठेवतो यावर खरे तर किती किति लिहू असे होतय, पण माझे नावगाव "उघड" व्हर्च्युअली नोन असल्याने मोह टाळतोय - त्या शिन्च्या वाडकर अन काही शिष्ट मंडळीन्नी माझ्यावर ओळख उघड करायची जबरदस्ती केली नस्ती ना.... पण आता काय उपयोग ! )

पण मुलिकडून बैठकीत खमक्या बसला असेल तर इकडे तरी सरळ यादी करुन त्यावर सही घेतली जाते. त्यात नम्तर वाढघट नाही.

>>> लग्न लावायला ब्राम्हणच लागतो ही देखील एक प्रथाच नाही का? कदाचित अनावश्यकही! <<<<
नाही .. अनावश्यक नाही. धर्मशास्त्राप्रमाणे (इंडियन कायद्याप्रमाणे नव्हे) देव, ब्राह्मण व अग्नी यांचे साक्षीनेच लग्न लावले पाहिजे (बाकी हजारो माणसांच्या उपस्थितीची व जेवणावळींची तितकीशी गरज नाही)
पण हां, "प्रेम वा लफड" करताना मात्र तुम्ही म्हणता तशी ब्राह्मणाच्या/अग्नीच्या उपस्थितीची गरज नाही... Proud
देव चराचरात भरलेला असल्याने तो अस्तोच तुमच्या सर्वच बर्‍यावाईट कर्मांच्या साक्षीला... अगदी तुम्ही मनातल्या मनात देखिल जो काही बरावाईट विचार करता तो ही देवाच्याच साक्षीने असे धर्मशास्त्र सांगते Lol

तुमच्या मुलाच्या लग्नात लग्नखर्च तुम्ही वधूपक्षाबरोबर अर्धा-अर्धा वाटून घेणार ना?
अर्धा-अर्धा नाहीतरी किमान तुमच्या वर्‍हाडाचा?>> लिम्बूना हे वाक्य आहे तरी...

अर्धा अर्धा म्हणजे किती हे पण आधीच बघायला हवे!! आमच्या लग्नाच्या वेळी आमची २५-३० माणसे आणि नवर्‍याकडची अख्खं गाव!! Uhoh त्यातही आमच्या पाहुण्यांचा आणण्याचा, २ दिवस राहायचा, साखरपुड्याचा (सगळा - हॉलचा, खाण्याचा, जेवणाचा) खर्च आम्ही केलेला!
आता हे आमच्याकडे लग्न झालं असतं तरी होऊ शकलं असतं, पण असं जर अगदी २५-८०० वर्‍हाड असेल तर निदान खर्च म्हणजे सगळाच खर्च अर्धा अर्धा अपेक्षित आहे का? यापेक्षा तुमची अबक माणसे आमची अबक माणसे असं धरलं तर (थोडं फार इकडे तिकडे होईल... तेव्हा बघायचं कुठल्या पार्टीला झेपतेय!) सर्वांनाच सोयीचं जाईल... अगदी साग्रसंगितच सोहळा पार पाडायचा असल्यास!! नपेक्षा सरळ रजिस्टर मॅरेज ला परवानगी द्यावी!!

बर्‍याच जणांनी नमूद केलेय इथे वारंवार! कोकणात असं असतं कोकणात तसं नसतं... सगळं समजूतीने/ परस्पर सोयीने आणि अर्धा अर्धा (दुसर्‍यावर अतिरिक्त भार न टाकता) सामोपचाराने खर्च करतात म्हणून ही शंका! माझं माहेर कोकणातलंच! आणि सासरही तरी मानसिकतेत जमीन आस्मानाचा फरक जाणवला म्हणून आश्चर्य वाटलं!

आमचे लग्न घाईत झाले. २ दिवसांत ठरले आणि झाले सुद्धा. दोन्हीकडचे फक्त आणि फक्त सख्खे मामा, आत्या, काका, मावश्या आणि त्यांची मुले. माझे नातेवाईक कमी आहेटी नवर्याकडचे सख्खे पण बरेच होते. लग्नाचा खर्च आम्हीच केला. मुलाकडच्यांना तुमचे फक्त सख्खे नातेवाईक बोलवा असे स्पष्टपणे सांगितले होते. (आम्ही देशस्थ ब्राह्नण असलो तरी).
सासरचे क्षत्रिय समाजाचे आहेत. त्यांच्यात काही भागात म्हणे मुलगी सुंदर असली तर(च) लग्नाचा सगळा खर्च मुलाकडचे करतात! म्हणजे मुलगी एखाद्या वस्तुसारखीविकत नेतात थोडक्यात. पण यातही लोकांना अभिमान वाटतो! नात्यात असे लग्न झालेली सुंदर मुलगी आहे. तिला म्हणे नंतर माहेरी एकदाही येऊ दिले नाही! एकाच गावात असूनही. असो. माझ्या मूली भारतात नाहीत आणि लौकिकार्थाने सुंदरही नाहीत म्हणून बरय! अन्यथा आम्हालाही मुलीच्या लग्नाचा खर्च करु दया म्हणून भांडावे लागले असते Wink

प्रथा नष्टच करायचा असतील तर वधुपक्षानेच्च पडते घ्यावे, कुठल्याही कारणाने लग्न मोडले तरी मुलीचीच बदनामी करायची इ.इ. प्रथा आहेत सुरू त्या आधी नष्ट करायला हव्यात. या प्रथा़ंचा भरपुर त्रास होतो. ब्राम्हणाचे काय, लग्न लावण्याच्या कामापुरता त्याचा संबंध. एकदा लग्न लागले की नंतर त्याच्याकडे कोण् बघतंय.

आजकालचे निर्ढावलेले भडजी १०००१+ इतकी दक्षिणा उकळतात, उंची पोषाखही या भडजींला द्यावा लागतो म्हणे .

dreamgirl , कोकणस्थामध्ये बरीच लग्न 50 -50 झालेली पाहिली आहेत ।तुम्हाला आलेला अनुभव सातीनी म्हटल्याप्रमाणे अपवाद असू शकतो की .

dreamgirl , कोकणस्थामध्ये बरीच लग्न 50 -50 झालेली पाहिली आहेत ।तुम्हाला आलेला अनुभव सातीनी म्हटल्याप्रमाणे अपवाद असू शकतो की .

इशान्य भारतातील लग्ने अत्यंत साध्या पद्धतीने होतात, असे अविनाश बिनीवाले यांनी लिहून ठेवले आहे. वधू नटून थटून तिच्या गावातून येते. वर त्याच्या मातापित्यासोबत गावाच्या वेशीपर्यंत जातो. वधू येऊन त्याच्या कुटुंबासोबत उभी राहते... झालं लग्न. ( नंतर आवश्यक वाटलेच तर चर्च मधे जाऊन नोंदवतात. )
नंतर जेवण असते, पण तेही साधेच. नेहमी जेवतात तेच. तसेही ते लोक स्वीट डीश खातच नाहीत.

( संदर्भ : " माझ्या हेन्रीचे लगीन", पुस्तक " पूर्वाचल" )

सत्यमेव जयते च्या एका भागात, आमच्याकडे हुंडा वगैरे नसतो, असे तिथल्या तरुणाने सांगितल्याचे आठवतेय.

कोकणामध्ये बहुतांशी ५०-५० असेच असते. मीही पाहिलेय खुप ठिकाणी. दणक्यात लग्न बिग्न फार क्वचित. मी कायम अशीच लग्ने पाहिल्याने जेव्हा पहिल्यांदा मुलीला गादी, उशी आणि खाटेस्सकट सगळा संसार देणारी लग्ने पाहिली तेव्हा धक्का बसला. घरात येणा-या सुनेला झोपायला अंथरुण पांघरुणही द्यायची ज्यांची ऐपत नाही त्यांच्या घरात आपली मुलगी का देतात हा प्रश्न पडला. घेणा-यांचा संताप आला..

साखरपुड्याची अंगठी वगैरे भानगड गेल्या पन्नास वर्षातील, व ती देखिल मुलाचे वडील स्वहस्ते मुलिच्या बोटात घालायचे>>>
माझ्या साखरपुड्यात ह्या गोष्टीवरून मजा आली होती. मी नवर्याला अंगठी घातली. आता तो मला घालणार तेवढ्यात साबांच्या मामीने मोठ्या दीराला अंगठी घालायला बोलावले. (मला सासरे नाहीत). तो बिचारा घाबरून अहो माझा सापु नाही माझ्या धाकट्या भावाचा आहे असे सांगत होता. (तो unmarried आहे. म्हणून त्याला वाटली मामींचा काही गोंधळ झाला असेल). तेव्हा त्याला सांगण्यात आले की वडीलांनी अंगठी घालायची प्रथा आहे. ते नाहीत म्हणून मोठा भाऊ म्हणून तू घाल.

म्हणजे मी नवर्याला आणि दीराने मला अंगठी घातली. आलेल्या पाहुण्यांपैकी काणाचा तरी आवज ऐकू आला "ए कोणीतरी वेगळ्यानेच अंगठी घातली" Uhoh नवर्याने बिचार्याने फक्त टाळ्या वाजवल्या. तो विडीओमधे इतका मजेशीर दिसला आहे टाळ्या वाजवताना. Proud

ड्रीमगर्ल, सासरच्या बाबतीत माझाही वैयक्तिक अनुभव फारसा चांगला नाहीच, पण त्यांच्या मनात नव्ह्तं म्हणून त्यांनी खुसपटं काढली असं समजून चालायचंच. अपवादानेच तर नियम सिद्ध होतो. (अर्थात, आमच्या लग्नात खर्च अर्धा अर्धा. कुणालाही मांडव आहेर नाही आणि सोनं कुणी किती घालायचं आनी कुठल्या दागिन्यांच्या स्वरूपात हे आधीच ठरवलेलं होतं)

कोकणामध्ये गेली पंचवीस वर्षे राहून (आणि आता कोकणचेच सासर आहे) लक्षात आलेली एक प्रचंड महत्त्वाची बाब म्हणजे, आजवर एकही मुलीचा बाप असा पाहिलेला नाही, ज्याने मुलीच्या लग्नासाठी/हुंड्यासाठी कर्ज काढलंय अथवा घर सोनं गहाण ठेवलंय. परवडत असेल तसे लग्न करून दिले जाते, अगदीच परवडले नाही तर मुलीला साडी आणि नारळ देऊन लग्न करणारे बाप पाहिले आहेत. गावजेवण वगैरे नखरे अगदीच खोत वगैरे असाल तर तेही जेवण साधेच असते. लग्नाच्या कार्यामध्ये अख्खं गाव पडेल ते काम करायला तयार असलेलं मी स्वतः पाहिलंय. एका मित्राच्या गड्याचं लग्न होतं तर या मित्राचा बाप (स्वतःची हजार कलमं असलेला) पंगतीमध्ये वाढायला उभा राहिला होता.

कर्नाटकामध्ये हुंडा द्यावाच लागतो. किती शिकलाय, काय शिकलाय कुठे नोकरी करता त्यानं काही फरक पडत नाही. शिवाय नंतरचे सगळे सणवार करत बसा. एवढं करूनही "समाधान" हा प्रकार क्वचितच असतो. पारत त्यातही काही अपवाद असतातच.

ह्म्म.
आमच्या पश्चिम महाराश्ट्रात त्यातही सांगली, कोल्हापुर, सातारा वै भागात हुंडा फारसा नाही पण सोन्यावरुन बरीच बोलाचाली होते. Sad

आता तर सोनं इतक महाग आहे पण तरिही ह्यात ओढाताणी असतेच.
येवढच द्या वै वै.

बार्शी साइडला पाहिलेल होत की सोन्याच फारसं काही नाही तरि मुलाला अंगठी आणि एखादी चेन तरी असावी.
आणि हुंडा कॅश मध्ये चालतो. त्यातही पाण्याखालची शेती असेल तर मुलाचा भाव चढा.

कोकणातल्या लग्नात नवरीला अंगठी नवरा घालत नाही तर त्याचा वडील भाऊ किंवा वर लिहिल्याप्रमाणे वडील घालतात. या पध्दतीमुळे होणा-या खुप गंमतीजंमती मी पाहिल्यात. ऑफिसमधला एक कलिग तर सापुचे फोटोच दाखवायला तयार नव्हता. खुपच मागे लागल्यावर शेवटी कसेतरी म्हणाला, अंगठीचा फोटो पाहु नका, मी नाहीय त्यात... Happy

पण त्यांच्या मनात नव्ह्तं म्हणून त्यांनी खुसपटं काढली असं समजून चालायचंच. >> Happy

लग्नाच्या कार्यामध्ये अख्खं गाव पडेल ते काम करायला तयार असलेलं मी स्वतः पाहिलंय. एका मित्राच्या गड्याचं लग्न होतं तर या मित्राचा बाप (स्वतःची हजार कलमं असलेला) पंगतीमध्ये वाढायला उभा राहिला होता. >> याला मात्र अनुमोदन!!

लोकहो, मुलीकडून मि़ळालेला संसार कुठे ठेवतात ते लिहा की. मला खरीच शंका आहे. (इबे वर तर पाठवत नसणार!)

माझ्या एका मित्राने टेंपो भरुन आणला सगळा संसार इथे.. आता वापरतोय. त्याचे आणि भावाचे लग्न १५ दिवसांछ्या गॅपने झालेले. मग त्यांनी अगदी हिशोब करुन काय काय पाहिजे ते सासरहुन मागुन घेतले. याला नको झालेले सामान बांधुन ठेवलेय गावीच.

मृदुला, अगं वस्तू भांडी कपडे वापरायला सुरूवात करतात. फर्निचर व्हाईट गूड वगैरे जुन्या असतील तर काढून टाकतात किंवा मुलाच्या खोलीमध्ये वगैरे ठेवतात. मुलगा नोकरीसाठी दुसर्‍या शहरात असेल तर सर्व सामान तिथे देतात.

(एक दोन इंटरेस्टिंग केसेसम्ध्ये वर्षा दोनवर्षामध्ये लग्न होणारी मुलगी घरात असली तर सर्व सामान पॅक करून तिच्या लग्नात (भांडी, शोपिसच्या वस्तू वगैरे) दिलेले पाहिलेच आहे)

किती सहजपणे चर्चा ब्राह्मणांवर घसरली नाही? धर्मनिरपेक्ष, अजातीयवादी असे स्वतःला म्हणवून घेणारे कसे हळूहळू मनातल्या खुपखुपत्या विषयाला हात घालू लागले इथे! अ‍ॅडमीनच्या विपूत रांगोळ्या काढणारे कसे स्वतःचा खरा रंग दाखवू लागले. ही तीन विधाने लिहिताना, लिंबूभाऊ व इतर, मला अतिशय खेद होत आहे. पण कोणीही काहीही लिहिले तरी उगीच गप्प बसणे हे बरोबर नाही म्हणून लिहिले.

>>>धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही<<<

हा डिस्क्लेमर किती सहज दुर्लक्षिला गेला!

वैयक्तीक मत - लग्नासाठीच काय, कोणत्याच धार्मिक विधीसाठी ब्राह्मणाची गरज नाही.

-'बेफिकीर'!

Pages