विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोकणस्थ + १
माझा नव्हता गापै जीं च्या मुलींच्या विषयीच्या त्या शब्दा बाबत गैरसमज ,कारण मी त्यांनापण ओळखुन आहे.:फिदी: त्यांचा हेतु मुलींना वाईट लेखण्याचा नव्ह्ताच मुळी. हो ना गापैं जी Happy

काहीच न देण्यापेक्षा हे असले थोतांडसुद्धा (काही लोक्स ज्याला थोतांड म्हणत आहेत ती देणगी) परवडले.>> हो बरोबर आहे . आजच्या व्यवहारी जगात दान करण्याच्या भावनेपेक्षा पैशालाच महत्व जास्त आहे. Happy

तरीपण हर्पेन यांच्या पोस्टशी सहमत.

माझ्या नशीबाने सर्व वेळेस समोरील माणसे चांगली भेटली.
बैठकीत, एकरकमी उचल देऊन, कार्यालय,जेवण्/वराती वगैरे जे काय असेल ते तुमचे तुम्ही बघा असे ठरल्यामुळे मी तसा "मोकळा"च होतो.
तसेच माझ्याकडून मोजकीच (वधुसहित ३०+ २ भटजी/फोटोग्राफर) माणसे असल्याने, "इकडच्या" नातेवाईकान्च्या 'नाकदुर्या' काढायला व त्यांच्या आहेर वगैरेच्या/जेवणानाष्ट्याच्या काळज्या करायला लागण्याची शक्यताही नव्हती.
मी स्वतःच भिक्षुक असल्याने, व वर पक्षाला त्यांचेकडून भटजी ठरवता न आल्याने शेवटी मीच पुण्यातले एक छान गुरुजी बोलावले.
लग्नविधीबाबत "अमकेच हवे/आम्च्याकडे तमकेच असते" वगैरे बयादी निर्माण होणार नाहीत याची पुरेपुर दक्षता आधिच घेतलेली होती.
त्यामुळे अक्षरषः, केवळ अन केवळ लग्नाचे धार्मिक विधींवरच आम्ही उभयतान्ना लक्ष केंद्रीत करता आले व त्याचा पुरेपुर फायदा दोन्ही पक्षांन्ना झाला, व सर्व विधीसहीत साग्रसंगीत असा तोंडात बोटे घालायला लावेल असा सोहळा पार पडला, इतका की वरपक्षाकडचे अजुनही चांगली आठवण काढतात.
त्यातिल निवडक बाबींची पूर्वतयारी व झालेले फायदे सांगू पहातो. (माबोवर फोटो टाकणे फेबु/whatsapp इतके सोपे नाही, नैतर प्रत्येक बाबीचे फोटो टाकले अस्ते.... आता शब्दांवरच भागवतो)

वर आदल्या दिवशी येतो तेव्हा त्यास कार्यालयाचे दारात ओवाळण्यात येते. तर आमचे "कीट" मधे, ओवाळण्याच्या तबकासोबतच, निरांजनासभोवती रहातील असे काचेचे दंडगोल होते, ज्यामुळे उघड्यावर वार्‍यातही निरांजने छान तेवत होती, तर वरपक्षाकडची पुन्हा पुन्हा लावावी लागली होती. आमच्या कीटमधेच, काडेपेटी व लायटर असे दोनही होते, शिवाय माझ्या खिशातही, तर यातिलच घेऊन, त्यांचेकडील निरांजने तेवत ठेवत होतो.

वरास फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या घालण्याचे योजिले होते, व त्याप्रमाणे विसेक फूट अंतराची पाकळ्यांची रांगोळी अन्य मुलामुलिंच्या मदतीने ऐनवेळेस काढावी लागली, कारण मुळात ज्या व्यक्तिकडे ही जबाबदारी दिली होती ती व्यक्ती वर यायच्या वेळेस रीक्षातून उतरत होती.

सहसा, लग्नविधीमधे कितीही भारी कार्यालय वगैरे ठरवले असेल, तरी विधीन्च्या तिथे गाद्या/त्यावर असल्यास पान्ढरे धोप बेडशीट वगैरे असते. मी फुल्ल टू तयारीत असल्याने माझ्याकडचे दोन व सासर्‍यांकडचा एक असे राखीव गालिचे बरोबर होते. चौरंग, पाट, विधीची भांडी, होमकुम्ड वगैरे जणु काही मी एखादे लग्न भिक्षुक म्हणून "उक्ते" लावायला घेतले आहे, तर किती प्रोफेशनल तयारी असेल, तसे होते. खरे तर, पॅकिन्ग वगैरेच्या तयारी पंधरावीस दिवस आधीपासूनच करताना, ज्या तिघींजणींकडे खोलीतील जबाबदारी द्यायची होती, त्यांचे उपस्थितीत व त्यांना नीटपणे समजावुन सांगुन पॅकिन्ग केल्यामुळे, वर्षानुवर्शे स्वयंपाकघरात एखादी बाइ जितक्या सराइतपणे वावरेल अन वस्तु काढेल, तितक्याच सराइतपणे त्या अपरिचित खोलित मांडलेल्या ट्रंका/पेटारे/खोकी यातून नेमक्या वेळेस हवे ते सामान बरोब्बर काढुन मिलत होते. आख्ख्या लग्नात मला वा लिम्बीला एकदाही खोलीत जाऊन शोधमोहिम/उचकापाचक करावी लागली नाही. यापैकी एक वधुचि मैत्रीण, एक लिम्बीची मैत्रीण व एक वधुचि मामी असे होते.

होमकुंडाला चकचकीत अल्युमिनियम फॉईल (रॅपिन्ग पेपर) लावला होता. भरपुर फुले, हार, हळदीकुंकू/गंध तबके अत्तरदाणी/गुलाबदाणी, सगळे कसे जय्यत होते व नेमक्या पद्धतीने पॅक केलेले असल्याने नेमके वेळेस सापडत होते, नाहीतर शोधाशोध हा प्रकार नित्याचा असतो.
मागे कधीतरी माबोवरच पायधुण्यावर मी बरेच काही खरडले होते, ते शोधत होतो पण सापडले नाही, तरी आशय लक्षात होता, तेव्हा अगदी निघता निघता ही बादली/तांब्या / छान घमेले वगैरे घेतले होते. हवे असल्यास गरम पाण्याचीही तयारी ठेवली होती.

लिंबु मस्तच.. त्या तयारीवर एक लेख पाडा आता म्हणजे इतरांना काय तयारी करायची हे लक्षात येईल. खरेतर प्रत्येकाला आपली सगळी तयारी झालीय असेच वाटत असते पण प्रत्यक्ष वेळ येताच ती किती तोकडी आहे हे लक्षात येते.

लिम्बूजी, लई झ्याक नियोजन! आता एक ओपन सोर्स विवाहसमारंभ डॉक्युमेंट करूया! Proud
आ.न.,
-गा.पै.

सिनि,

>> त्यांचा हेतु मुलींना वाईट लेखण्याचा नव्ह्ताच मुळी. हो ना गापैं जी स्मित

बरोबर! तसा असता तर लग्न कशाला केलं असतं! Wink

आ.न.,
-गा.पै.

लग्न कशाला केलं असतं(?)!
<<

छेछे! चॅरिटिदेखिल करायची असते की पुरुषाने!! पुरुषार्थांपैकी एक आहे तो. काम तं करायालेच लागते नं भौ?
आन पोर्‍याने काडी नै लावली तं मोक्ष कसा भेटेन बरं?
लगीन तर करायालेच मांगते ना?
कैबी सवाल पूचून र्‍हायले बा तुम्ही लोके.

लोकहो,

श्री इब्लीस यांनी एक रोचक विधान केले आहे :

>> आन पोर्‍याने काडी नै लावली तं मोक्ष कसा भेटेन बरं?

जिवंतपणी सायुज्य मुक्ती मिळवण्यातला पुरुषार्थ या महाशयांना ठाऊक नाही. स्वत:चं आकलन मर्यादित असतांना उगीच बडबड करण्यात यांचा हात धरणारा कोणी नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

तुका म्हणे ऐशा नरा
मोजुनि माराव्या पैजारा....

हे विधान मी गाम्यालाच उद्देशून केलेले आहे इतर कुणालाही ते स्वतःवर ओढवून घेण्याची परवानगी नाही.....

रॉबिनहूड,

खुशाल पैजारा मारा. फक्त अगोदर अपराध काय आहे ते तेव्हढं सांगा. अन्यथा त्याच पैजारा तुमच्याच गळ्यात पडतील. Wink खास तुमच्यासाठी चपलाहार निर्माण होईल! Lol (श्लेष अभिप्रेत)

आ.न.,
-गा.पै.

धाग्यावरील अवांतर, भांदकुदळ, विषयाला सोडून असलेल्या पोस्ट्स उडवायची सोय / नियम नाही आहे का अ‍ॅडमिन टिम साठी?

(पिंजून काढावी लागेल माबो खरं तर!) - हताश बाहुली

@ limbutimbu -- फक्त ३५ माणसे ?? खरे आहे का?

म्हणजे पुण्यातील माझा येक देशमुख मित्र म्हणाला ते खरे असावे की " आपल्या वाढदिवसाला पण यांच्या लग्ना पेक्षा जास्त गर्दी असते .." १५-२० मित्र तर माझ्या गहरी तीमेपास ला यायचे.

५-२० मित्र तर माझ्या गहरी तीमेपास ला यायचे.
>>

काय काय विचार केला मी. बार मित्झ्वा, मुंज अशासारखा हा 'गहरी तिमेपास' नावाचा कुठला प्रकार, रिच्युअल, सण असेल?
कुठल्या राज्यात, संस्कृतीत असेल.
Sad

तर जळ्ळं लक्षण, ते 'घरी टाईमपास' निघालं.
Wink

माफ करा . ते घरी टाईमपास च आहे.

पण खरेच हे मी आर्थिक परीस्थिती ला हसत नाही. पुण्यात एका विशिष्ट समुहा बद्दल मी हे आईक्ले होते. .
अर्थात घरी जेव्हा पाणी सुद्धा विचारले जात नाही , आणि त्याचा पर्यावरण स्नेही म्हणून अभिमान बाळगला जातो तेवा हे शक्य आहे .

१९९२ ला अभियांत्रिकीत असताना ( मला आठवते कारण दुसर्या दिशी बाबरी पडली होती) माझ्या वाढदिवसाला जवळ जवळ ३० लोक आले होते .. आई ने घरीच वडा पाव आणि इडल्या बनवल्या होत्या आणि आई पपा बाहेर गेले होते. पैसे कमी असतील पण पार्टी spirit भरपूर होते.

तसेच येकदा मित्राच्या मित्राचा गच्ची वाला मोठा flat खाली होता म्हणून असेच मित्र , मित्रांचे मित्र मिळून दारू पार्टी केली होती . त्यातही २५ जण सहज असतील . किवा जास्तच . पैसे कमी होते म्हणून आयुष्यात पहिल्यांदा आणि शेवटची bagpiper प्यालो होतो. crazy days !

आणि हि माझ्या येका मित्राने पळून जावून register लग्न केले तेवा registrar office मध्ये १५ -२० जन मुला - मुली कडून होते ( पोरीचा बाप राडा करणार असे वाटत होते .) किबहुना जास्तच .

असो मला क्रिस्ती आणि पारशी लग्ने आवडतात - कारण दारू आणि शिस्त.

आणि धर्मावरून आणि जातीवरून मनात फूट असलेल्यांना चपराक

गोरेगावात माझे शेजारी क्रिस्ती आहेत. त्या माळ्यावरील ६ कुटुंबात १ आम्ही मराठी , १ कारवारी , २ गुजराती , १ जैन आणि १ क्रिस्ती होते. माळ्यावर उत्तम सलोखा होता आणि आहे.( नशिबाने इकडे फारच कमी मराठी लोक आहेत )

माझ्या क्रिस्ती शेजार्याचे लग्न झाले तेवा 6 खाण्याचे counters लागले होते.

१) सर्वात महत्वाचा - दारू - अधार्मिक
२) बीफ - क्रिस्ती आणि मुस्लीम ( आणि खाणारे हिंदू)
३) पोर्क - क्रिस्ती ( आणि खाणारे हिंदू)
४) मांसाहार - मटनआणि कोंबडी - सर्व
५) शाकाहार

आणि कळस म्हणजे

६) जैन

होय आमच्या इमारतील काही जैन येणार म्हणून क्रिस्ती शेजार्यांनी येक छोटासा जैन counter लावला . तसेच काही मुस्लीम स्नेही पण येणार होते.
ते श्रीमंत नवते पण सर्वाना सामावून घेणारे मन मात्र होते . त्या दिवशी मला भरून आले आणि म्हणून मी माझा पेग सुद्धा सतत भरून ठेवला.

मुंबई rocks..

जर पुणे देश असेल तर मुंबई हा ग्रह आहे . - मद्य प्रसारक हेमंत

हेमन्त्,

तुमच्या ख्रिस्ती शेजाऱ्यांनी हिंदू, जैन, मुस्लीम इत्यादि लोकांच्या भावनांचा आदर करून विविध अन्नछत्रे उघडली हे पाहून आनंद वाटला. मात्र धर्म व/वा जातीवरून मनात फूट असलेल्यांना चपराक कशी मिळाली ते कळलं नाही. सर्वांना समान अन्न असतं तर चपराक मिळाली असती असं माझं मत आहे.

आ.न.,
-गा.पै.

तुमच्या ख्रिस्ती शेजाऱ्यांनी हिंदू, जैन, मुस्लीम इत्यादि लोकांच्या भावनांचा आदर करून विविध अन्नछत्रे उघडली हे पाहून आनंद वाटला. मात्र धर्म व/वा जातीवरून मनात फूट असलेल्यांना चपराक कशी मिळाली ते कळलं नाही. सर्वांना समान अन्न असतं तर चपराक मिळाली असती असं माझं मत आहे

एखाद्या गृपमधल्या सगळ्यांना एकसारखी गोष्ट मिळण्यात समानता नाहीय तर ग्रुपमधल्या प्रत्येकाला सोयीची पडेल अशी गोष्ट मिळण्यात समानता आहे. जर त्याने सगळ्यांसाठी केवळ बीफ किंवा कोंबडी ठेवली असती तर त्या गृपमधले काही लोक अन्न उपलब्ध असुनही उपाशी राहिले असते, सगळ्यांसाठी केवळ शाकाहारी जेवण ठेवले असते तर मांसाहार करणारे मनातुन नाराज झाले असते. त्याने गृपमधल्या प्रत्येकाला सोयीचे पडेल असे अन्न उपलब्ध करुन समानता पाहिली. मनात फुट असलेल्यांना खरोखरच चपराक.

गामा_पैलवान_५७४३२ |
मला हि हेच विचारायचय म्हणजे ह्यांनी बीफ चा counter लावला . आणि निर्लज्ज हिंदू खुशाल गप्प बसले . आता ह्यात धर्म व/वा जातीवरून मनात फूट असलेल्यांना चपराक कशी मिळाली ते कळलं नाही

मला हि हेच विचारायचय म्हणजे ह्यांनी बीफ चा counter लावला . आणि निर्लज्ज हिंदू खुशाल गप्प बसले

सारिकाबाई, हिंदु धर्मात अमुक खा आणि तमुक खाऊ नका हे कुठे लिहिलेय? हिंदू असलेले लोकही बीफ खाऊ शकतात आणि खातात. काय खायचे, काय नाही, दिवसातुन कितीदा प्रार्थना करायची, किती वेळा देवळात जायचे ही मायक्रो मॅनेजमेंट हिंदू धर्मात नाही. उगाच हिंदू धर्मात नसलेल्या गोष्टी धर्माला चिकटवु नका. तुम्हाला ज्या गोष्टी पर्सनली पाळायच्या असतील त्या तुम्ही पाळा, इतरांनीही तेच करावे आणि त्यांनी ते केले नाही तर ते निर्लज्ज हे अनुमान काढू नका.

हिंदु धर्मात अमुक खा आणि तमुक खाऊ नका हे कुठे लिहिलेय>>>
तुम्ही काय काय वाचलंय त्याच्यावर अवलंबून आहे ते .
गाईला नुसती लाथ मारली तर काय काय भोगावं लागतं हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे .
गाईचं दुध रोज पिता ना तुम्ही. हिंदूंमध्ये तिला माता मानायची पद्धत आहे . आईचं दुध पिवून तिचं मांस खायची पद्धत हिंदूंमध्ये नाही. ती सैतानी लोकांच्यात आहे . अश्यांना निर्लज्ज नाही तर काय म्हणायचं ?

काय काय विचार केला मी. बार मित्झ्वा, मुंज अशासारखा हा 'गहरी तिमेपास' नावाचा कुठला प्रकार, रिच्युअल, सण असेल?
कुठल्या राज्यात, संस्कृतीत असेल.
अरेरे>>> साती Rofl

सर्वांना दारू होतीच .दारू हे सेकुलर ड्रिंक आहे.

त्यामुळे आम्हालाही मित्रातले पिणारे कोण ते कळले. २-३ ब्राह्मण आणि जैन पण त्यात होते . तसे हि दारू शाकाहारीच असते .

तसेच बीफ मध्ये वाईट काय असते . मला माझे बाबा कदीच बैलासारखे वाटले नाहीत ( म्हणजेच गाय हि माता असते अशा भाकड कथांवर विश्वास नाही ).. फक्त मी फार कमी मांसाहार करतो कारण मला बीफ , डुक्कर आणि मासे यांची चव आजीबात आवडत नाही . मटण आणि कोंबडीची पण फारशी चव नाही . पण इतरांनी खाल्ले तर वाईट काय

( तरी पण मला बर्गर किंग चा भारतातील २ मटण patty चा आणि २ चिकन patty चा बर्गर विलक्षण आवडला. तुम्ही ख्ल्लाय की तो ? .रसदार आणि कसदार !! तसेच मला मटण काबाड ,आणि सौसेजेस फार फार आवडतात))

तर इकडे "जो जे वाचील तो ते लाहो ",असे खाणे होते . बीफ हे क्रिस्ति आनि मुस्लिम लोकन्चे खाद्य आहे . आनि कहि हिन्दु पन ते खातात. तर लाज कसली.

आमच्यात गावाला लग्नाला मटणाचे जेवण असते , पण पूर्वी शाकाहारी लोकांचा फारसा विचारच न केल्याने बकवास मेनू असायचा आणि मी बर्याच लग्नात उपाशी राहिलो आहे.

तसेच मी मुस्लीम लग्नात गेलो नाही. पण मुस्लीम महाविद्यालय मधून अभियांत्रिकी शिकल्याने ३-४ मुस्लीम लग्नाचे आमंत्रण होते . काही कारणाने जाऊ शकलो नाही. जे हिंदू मित्र गेले होते त्यांनी सांगितले कि तिकडे ३ counters होते.. बीफ चा , मटण - कोंबडी चा आणि येक छोटासा शाकाहारी .

तर सर्व धर्माची काळजी इतर धर्मच घेताना दिसले!!

माझ्या एका कलिगच जैन मुलाशी लग्न झाले. मुलाकडच्यांनी आग्रह करुन जैन जेवणाचे स्टॉल संध्याकाळी ६ च्या आधी लावायला भाग पाडले.
आणि साधे जेवण ८ नंतर होते. पन मुलाकडचे सगळे जैन लोक रात्रीचे नॉन जैन जेवणच खात होते.

Pages