शेजवान बिट्टे

Submitted by काउ on 18 November, 2014 - 04:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कणीक , पाणी व तेल गरजेनुसार

क्रमवार पाककृती: 

साहित्य :

१ बिट्टे करण्यासाठी : १ वाटी कणीक , पाणी , तेल किंवा तूप
साहित्य :

१ बिट्टे करण्यासाठी : १ वाटी कणीक , पाणी , तेल किंवा तूप

२ बाजारात मिळणारी शेजवान चटणी

३ दही : अर्धी वाटी.

चपातीसाठी मळतो तशी कणीक मळुन घ्यावी.

त्याचा गोळा करुन पोळपाटावर एक चपाती लाटावी.

त्याला तेल किंवा तुप लावावे आणि बाकरवडीला करतात तसा रोल करावा. रॉल थोडा दाबुन करावा म्हणजे त्याचे थर सुटणार नाहीत.

अशा प्रकारे रोल करावेत. माणशी दोन रोल पुरतात. चाकूने त्याच्या बाकरवड्या कापाव्यात.

मग प्यानमध्ये दोन चमचे तुप गरम करावे आणि हे बिट्टे शॅलो फ्राय करावेत. थोडा रंग बदलला की झाकण लावुन ठेवावे. गरम करावे. मध्येच उघडुन हलवुन पुन्हा गरम करावे.

व्यवस्थीत शिजले की ताटात घ्यावेत. त्यावर गरजेनुसार दही , शेजवान चटणी व मीठ घालुन कालवावे व खावे.

याबरोबर तिखट आमटी , पातळ पालक भाजी वगैरे गोष्टी छान लागतात

वाढणी/प्रमाण: 
गरजेनुसार
अधिक टिपा: 

मायबोलीवरील याच नावाच्या पाककृतीचे चायना व्हर्जन

माहितीचा स्रोत: 
मायबोली
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीवर दिले आहे त्यआप्रमाणे वाफवुन केलेले बिट्टे व पालक भआजी.
bitte3.jpg

पण मला वरच्या पद्धतीने कच्चे शॅलो फ्राय करुन जास्त आवडले.

मला शेजवान चटणीबद्दल जराही माहिती नाही.

मस्त आहे ही रेसेपी. दोनदा केली का? कारण एकदा एका ताटामधे भेंडीची भाजी आणि दुसर्‍या ताटामधे डाळपालक दिसतो आहे Happy

दुसर्‍या ताटामधे शेजवान चटणी नाही भुरभुरली Happy