सुपरगर्ल सोलापुरची साक्षी मोरे ? व आणखी एक मुलगा ( ५/१२/२०१४ )

Submitted by नितीनचंद्र on 14 November, 2014 - 09:49

१४ नोव्हेंबर २०१४ रात्रीचे ८ वाजले आहेत. समोर मराठी टी व्ही ९ चॅनल सुरु आहे. मी पहात आहे सोलापुरच्या साक्षी मोरे हिची तिच्या वडीलासमवेत आणि मानसओपचार तज्ञ डॉ राजेद्र बर्वे यांच्या समोर टेस्ट चालु आहे.

साक्षी मोरे दोन्ही डोळे बांधुन पुस्तक वाचु शकते. रंग ओळखु शकते. ५२ पत्यातला एक समोरचा पत्ता अचुक ओळखु शकते.

टि व्ही ९ या चॅनलच्या टेस्ट हिने पार केल्या.

ही शक्ती जन्मजात नव्हती. तिच्या वडीलांनी १२ हजार फी देऊन काही महिन्यांपुर्वी मीड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन नावाचा कोर्स केल्यानंतर ही कला अवगत झाली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

त्या वर्गात कोर्स केलेल्यापैकी सर्वांनाच ही कला पुढे साक्षी इतकी प्रगत करता आली आहे का ?

यामुळे साक्षीच्या शरीरावर मनावर काही वाईट परिणाम होतील का ?

या अभ्यासाची पुढची पायरी काय आहे?

सर्वांनाच हा अभ्यास करणे शक्य आहे कोर्स देणारे लहान ( वय ६ ते १२-१४ ) यांनाच हा कोर्स देतात ?

हे वाचल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न येतील.

पुढील काही दिवसात यु ट्युब वर हे सर्व येईल. आपण पहा आणि हे शक्य कसे होते यावर शास्त्रीय चर्चा करु या.

आज ५ डिसेंबर २०१४ रोजी आणखी एक मुलगा तेज चॅनलवर दाखवला गेला ज्याने वरील सर्व टेस्ट पार केल्या.

यात नविन माहिती पुढे आली की मिड ब्रेन वयाच्या १२ वर्षांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याची पॉवर ट्रेनींगद्वारे वापरता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा वापर सुरु केला म्हणजे मुलांची एकाग्रता आणि आकलन शक्ती कमालिची वाढुन त्याचा फायदा शैक्षणीक विषयात नक्कीच होतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आइग्ग्ग भारीच... उद्याचा सेन्सेक्स कळत असेल तर हम १२.५ लाख पण द्यायला पण तयार आहोत. Wink

अंधश्रद्धा विरोधी कायद्या खाली त्या सर्वांना अटक केली पाहीजे.

तुमचा कसा विश्वास बसला हो डोळे झाकुन कोणी वाचू शकेल ह्याच्यावर?

झी टिव्ही आणि काल न्युज नेशन वर लाईव्ह दाखवत होते,

आठ ते दहा मुले ब्लांईड फोल्डेड मुल त्यांच्या समोर असलेले कार्डस, पुस्तके इतकेच नाही तर घड्याळ सुद्धा वाचत होते. हा प्रोग्राम ५० -६० प्रेक्षकांच्या समोर झाला.

कस ते त्यांचे शिक्षक पुढे समजावणार होते, ते मात्र बघितल नाही !!

दक्षिणा +१. ब्लाईंडफोल्ड करुन घड्याळातली वेळ सांगून काय परिक्षेत उपयोग होणार आहे का? की अभ्यासात?
Lol
पोरांना काय सरकशीत नोकरीला पाठवायचय का? क्लास काढणारे एक मैंटल (की भामटे?) अन असले क्लास लावणार्‍यांना तर मिडब्रेन आहे की नाही ह्याचीच शंका. Lol

ब्लाईंडफोल्ड करुन पुस्तक वाचणे याचा काय उपयोग? दृष्टीहीन व्यक्ती वाचू शकते का? > +१००
अंधांना शिकवावे ना मग ते तंत्र , डोळसांना शिकवून काय उपयोग

कैच्याकै हो तुम्च.
फॉक्स टीव्हीवर फ्रिंज सायन्स दाखवलं तर ते चालतं पण झीवर नाय! होय... हा भारतीय बुवाबाजीविरुद्ध केलाला कट आहे, बुवाबाजी आमचीच मक्तेदारी आहे.... Proud

मला मिड्ब्रेन अ‍ॅक्टिवेशनविषयी वाचल्यापासुन भिंतीच्या पलिकडचं दिसायला लागलयं .

श्री - अगदी अगदी मला पण...
(पण एकच अट आहे..तिकडे खिडकी असली पाहिजे बुवा) Happy

विकु आपने तो मेरे कॅरेक्टरकी भज्जीया उडा दी और मस्त तेल मे फ्राय भी कर दी...
श्या श्या शक्ती कपुर कधी चुकुनही खिडकीच्या बाहेर दिसला तर कायमस्वरूपी पोलादी पत्रा बसवण्यात येईल त्या जागी.....

या प्रकरणाबद्दल माहिती नाही. पण मागे एकदा 'इंडियाज गॉट टयालेंट' वर एक मुलगी डोळ्यावर पट्टी बांधून वाचू शकत होती. तिला म्हणे भारत सरकार कडून त्याचे प्रशस्ती (?) पत्रक सुद्धा मिळाले होते. पण सगळेच थोडेसे संशयास्पद वाटत होते.

http://www.youtube.com/watch?v=asahXKzAU-A

Rofl आज थोडं लो वाटत होतं तर इकडे मज्जा सुरू आहे.

मामी, तुमच्या "त्या" तिकडे ही पण लिंक टाका.

मला वाचनावरून आमचं धाकलं आठवलं. एक दिवस त्याचा दादा रिडिंग (खरं वालं) करताना कुठला तरी शब्द अडखळला आणि याच्या डे केअरला त्या पुस्तकाची आवर्तनं झाली असावीत. तो जिथे खेळत होता त्या कारवरचं लक्ष जराही न हलवता पुढचं अक्षर काय उरलेलं सगळं पुस्तक धाड धाड बोलून पार. दादुटल्याच्या डोळ्यातलं पाणी तिकडे खळेना. आणि "हे फेअर नाही" वरचा परिसंवाद आमच्या वाट्याला. ब्लाइंड फोल्ड काय आम्हाला पुस्तक नसलं तरी वाचता येतं Wink

याचा उपयोग काय नि वगैरे राहू द्या,
पण ज्यांनी हे पाहिले आहे त्यांनी यामागे नक्की काय लबाडी वा चलाखी असू शकेल हे तर सांगा.
कि नुसते फसवेगिरी आहे, अंधश्रद्धा आहे बोल्ले की झाले.
देवाला तरी कोणी पाहिलेय, तरी पण ती तेवढी मग श्रद्धा म्हणायचे आणि मंदिरात जायचे. त्याचाही काय उपयोग होतो.

देवाला तरी कोणी पाहिलेय, तरी पण ती तेवढी मग श्रद्धा म्हणायचे आणि मंदिरात जायचे. >>>> च्च च्च !! लो कल्लो बात !! अजून काहीच कळले नाही माबोवर असे म्हणायला हवं !!

Pages