सुपरगर्ल सोलापुरची साक्षी मोरे ? व आणखी एक मुलगा ( ५/१२/२०१४ )

Submitted by नितीनचंद्र on 14 November, 2014 - 09:49

१४ नोव्हेंबर २०१४ रात्रीचे ८ वाजले आहेत. समोर मराठी टी व्ही ९ चॅनल सुरु आहे. मी पहात आहे सोलापुरच्या साक्षी मोरे हिची तिच्या वडीलासमवेत आणि मानसओपचार तज्ञ डॉ राजेद्र बर्वे यांच्या समोर टेस्ट चालु आहे.

साक्षी मोरे दोन्ही डोळे बांधुन पुस्तक वाचु शकते. रंग ओळखु शकते. ५२ पत्यातला एक समोरचा पत्ता अचुक ओळखु शकते.

टि व्ही ९ या चॅनलच्या टेस्ट हिने पार केल्या.

ही शक्ती जन्मजात नव्हती. तिच्या वडीलांनी १२ हजार फी देऊन काही महिन्यांपुर्वी मीड ब्रेन अ‍ॅक्टीव्हेशन नावाचा कोर्स केल्यानंतर ही कला अवगत झाली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

त्या वर्गात कोर्स केलेल्यापैकी सर्वांनाच ही कला पुढे साक्षी इतकी प्रगत करता आली आहे का ?

यामुळे साक्षीच्या शरीरावर मनावर काही वाईट परिणाम होतील का ?

या अभ्यासाची पुढची पायरी काय आहे?

सर्वांनाच हा अभ्यास करणे शक्य आहे कोर्स देणारे लहान ( वय ६ ते १२-१४ ) यांनाच हा कोर्स देतात ?

हे वाचल्यानंतर अनेकांच्या मनात अनेक प्रश्न येतील.

पुढील काही दिवसात यु ट्युब वर हे सर्व येईल. आपण पहा आणि हे शक्य कसे होते यावर शास्त्रीय चर्चा करु या.

आज ५ डिसेंबर २०१४ रोजी आणखी एक मुलगा तेज चॅनलवर दाखवला गेला ज्याने वरील सर्व टेस्ट पार केल्या.

यात नविन माहिती पुढे आली की मिड ब्रेन वयाच्या १२ वर्षांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याची पॉवर ट्रेनींगद्वारे वापरता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे याचा वापर सुरु केला म्हणजे मुलांची एकाग्रता आणि आकलन शक्ती कमालिची वाढुन त्याचा फायदा शैक्षणीक विषयात नक्कीच होतो.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळ सकाळी वरचे प्रतिसाद वाचुन एक शंका आली. भिंतीपलिकडचे दिसणार्‍यांना नेमके कुठे पर्यंत दिसते? म्हणजे अ‍ॅटो फोकस वगैरे काही प्रकार आहे का? कि एक्सरे टाइप?

साक्षी मोरे दोन्ही डोळे बांधुन पुस्तक वाचु शकते. रंग ओळखु शकते. ५२ पत्यातला एक समोरचा पत्ता अचुक ओळखु शकते.
------ हे सर्व करताना डोळे बांधुन घेणे आवश्यक नाही आहे.

चलाखी आहे. पुस्तकाची निवड मी करणार. पत्ते माझे स्वतःचे. मग डोळे उघडावे लागणार.... का??

मी मोदींना आवाहन करु इच्छितो की त्यांनी हा मिडब्रेन कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबवुन मुलांचा बौध्दीक विकास करावा आणि खोर्‍याने वैज्ञानिक , सीए, डॉक्टर , अर्थशास्त्रज्ञ, इत्यादी हुशार अतिहुशार मुल शाळेतुनच बाहेर पाडावे. भारताचे भविष्य उज्ज्वल अतिउज्ज्वल प्रचंड आशादायक होईल गल्लोगल्लीत न्युटन आईनस्टाईन सारख्या बुध्दीमत्तेची मुल दिसु लागतील, गोट्या डब्बा आईसपाईस सारखे खेळ खेळता खेळता क्वांटम थिअरी , चाउस थिअरी सारख्या अनेक थिअर्या जन्माला येउ शकतील.
कृपया अश्या सुवर्णसंधीचा लाभ भारतातील सगळ्या मुलांना द्यावा.

अतर्क्य वाटणार्‍या घटनांच्या मागे फक्त अंधश्रध्दाच असते अस कस म्हणता येईल जेव्हा की हा कार्येक्रम एका डॉक्टर असलेल्या व्यक्तीच्या समोर चालु आहे

. हा प्रयोग करणारी व्यक्ती पैसे कमवायला बसलेला भोंदु बाबा नाही. ही मुलगी माझी नातेवाईक नाही. ह्या टी व्ही चॅनल चे शेअर्स माझ्याजवळ नाहीत. मी या चॅनलचा प्रवक्ता/ ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर नाही. मिड ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन असेलच तर तर ते शिकवणारी संस्था माझी नाही.

सबब टोच्या आणि अंधश्रध्दा निर्मौलन समितीचे कार्यकर्ते नुसत्या पिंका टाकु नका. गुन्हा दाखल करुनच दम खा.

ही शक्यता ह्या चॅनलने, डॉ बर्वे यांनी आणि त्या मुलीच्या वडीलांनी गृहीतच धरली असेल. शक्य असेल तर हे मी मायबोलीवर लिहले म्हणुन माझ्यावर पण गुन्हा दाखल करा. .

महाराष्ट्राने अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा करुन पुरोगामीत्व दाखवले आहेच. आता शास्त्रीय परिक्षण करुन एखादी गोष्ट शक्य आहे किंवा नाही यावर थोडा वेळ द्यायला काय हरकत आहे?

असले प्रकार टी व्ही वर येण्यापुर्वी टी व्ही चॅनल्स तरी विचार करतील.

हे खोटे आहे/ अंधश्र्ध्दा आहे/ हातचलाखी आहे हे लेबल लावण्याच्या आधी मायबोलीकरांनी थोडासा विचार करायला काय हरकत आहे ?

ज्या पध्दतीने लोकांनी या धाग्याची वाट लावली आहे हे पाहुन मायबोलीवर बुध्दीवादी असलेच तर ते सध्या वापरत नाहीत असेच म्हणावे लागेल.

काही लोकांनी सेन्सेक्स शोधावा अस सांगीतल पण ही व्यक्ती फक्त कागदावर लिहलेल्या गोष्टी वाचते डोळे बांधलेल्या अवस्थेत वाचते. ह्या व्यक्तीला उद्या काय घडेल ह्याच प्रेडिक्शन करायची कला नाही हे लक्षात घ्याव. ना ही कला श्री यांना वाटत त्या प्रमाणे अद्रुष्य होण्याची आहे. जर प्रयोग करणारे कल्पना विलास करत नाहीत तर मायबोलीकर का करतात ?

विजय कुलकर्णीं आपण माझ्या लेखनावर आपण जे प्रश्न उपस्थित करायचा याचा मी आदर करायचो. आजची आपली प्रतिक्रिया या दर्जाची नाही.

एक महाशय तर इथे मोदींना घेऊन आले ? काय हो काय संबंध इथे मोदींना आणण्याचा

. मला ही न पटणारी ही घटना आहे. मी मला माहित असलेल्या कोणत्याही पुराणाचा संदर्भ न देता काही प्रश्न विचारले आहेत. मला कुणी याच समर्थन कराव हे अपेक्षीत नाही.

या उलट मीड ब्रेन अ‍ॅक्टीवेशन म्हणजे काय यावर प्रश्न आहे.
हे केल्यानंतर एकच मुलगी हे कस करु शकते हा दुसरा प्रश्न आहे.
पुढे तीला काही त्रास होईल का हा तिसरा प्रश्न आहे.
चवथा प्रश्न ह्या कलेचा समाजाला काय उपयोग आहे ?
मलाही पाचवा प्रश्न आहे जो डॉ. बर्वे यांना पडला होता की जे जात्यंध नाहीत त्यांना हे तंत्र शिकवुन किमान रंग ओळखणे, पेपर वाचणे / ब्रेल मधे नसलेली पुस्तके वाचणे शिकवता येईल का ?

असे दहा प्रश्न अजुनही मायबोलीकरांना पडु शकतील ते विचारायला नकोत का ?

डिस्कव्हरी चॅनलवर केरळमधला एक माणुस आपल्या शरीरातुन विद्युत प्रवाह वहात असेल तर कसलाच त्रास होत नाही हे दाखवतो त्या सिरीयलला सुपर ह्युमन असे संबोधले जाते या तत्वावर साक्षी मोरे सुपरह्युमन आहे का ? हा प्रश्न विचारायचा आहे. माझा ती मुलगी सुपर ह्युमन आहे हा दावा बिलकुल नाही.

याच उत्तर शास्त्रीयच असाव अशी अपेक्षा आहे.

नितीनचंद्रला ज्योतिषात गती आहे. प्लॅचेटवर अजुन संशोधन व्हावस वाटत. नितीनचंद्र डॉ. प वि वर्तकांचा चहाता आहे. काही काळ भाजपचा कार्यकर्ता होता आणि मोंदींचा प्रशंसक आहे याचा संबंध जर कोणी उत्तराशी लावत असेल किंवा हा विषयच कुणाला विनोदी वाटत असेल ते शात्रीय नाही. या व्यक्तींनी आपण बुध्दीनिष्ठ आहोत असा दावा अजिबात करु नये.

संशोधन हा विभाग मायबोलीकर प्रशासक बंद करण्याचा विचार करतील अशी आशा आहे. इथे फक्त एकमेकांना शिव्याशाप देणारे, टिंगल टवाळी करणारे आणि विनोद करणारे लोक येतात. सबब संशोधन आणि मायबोली याचा काही संबंध नाही. सायन्स जर्नल लिहुन हे प्रसिध्द करता येत. ज्यांना बुध्दी आहे ते प्रश्न विचारतात आणि त्या थेअरीवर आपला आक्षेपही नोंदवतात. मायबोली यात काही भर घालु शकत नाही. मायबोलीने हे असले काही करु नये.

.

Rofl

ज्यांनी ह्या धाग्यावर अतिरेकी प्रतिक्रीया दिल्यात त्यांच्या साठी !!

प्रतिक्रीया देण्या आधी जर झी टीव्हीवरचा प्रोग्राम बघितला असता तर तुम्हाला अशी प्रतिक्रीया दि ल्या
बद्दल खेद वाटला असता. अजुनही तुम्ही गुगल करुन तो बघु शकाल !!

प्रत्येक ठिकाणी देशाचे मा. पंत प्रधान मोदींना आणण्याची गरज नव्हती. ज्यांनी असे उल्लेख केलेत त्यां ची
किव करावीशी वाटते.

झी टिव्ही वर आणि न्युज नेशन वर लाईव्ह दाखवत होते तेही ६०- ७० प्रेक्षकांच्या समोर,

न्युज नेशन वर तर अँकर हातात भल मोठ घड्याळ घेऊन उभा होता. त्याने पहील्याने ह्या डोळे झाकलेल्या
मुलांना विचारले ह्या घड्याळात किती वाजले ? मुलांनी बरोबर सांगीतल !! मग मुलांकडे पाठ करुन,
प्रक्षकासमोर त्याने वेळ बदलली आणि परत मुलांना विचारल कीती वाजले ? आताही मुलांनी बरोबर वेळ
ओळखली होती. मग त्या पुढे त्या अँकरने घड्याळाची मागची बाजू त्या मुलांसमोर धरली आणि विचारल की
किती वाजले ? ह्याही वेळेला मुलांनी ओळखल की घड्याळाची मागची बाजू दाखवता आहात. त्यावर त्या
अँकरने विचारल की घड्याळाच्या मागच्या बाजूलाघड्याळाच्याकाय दिसतय ? त्यावर त्यां मुलानी सांगीतले की
लाल रंगाची बॅटरी लावलेली आहे.

हे सर्व अतर्क आहे ? पण हा सर्व अंधश्रद्धा नसुन स्पेशल ट्रेनींग चा भाग आहे. ट्रेनींग देऊन मुलांमध्ये अशी
नविन शक्ती जागृत करता येते !!

टी व्ही चॅनल वरचा हा कार्येक्रम न पाहता प्रतिसाद देने चुकिचे वाटते आहे.तरिही एकंदरित हे सगळे वाचुन असे वाटते आहे कि हे जर सगळे खरे असेल तर या मागे नक्किच काहि तरि विज्ञान असनार डिस्कव्हरी चॅनलवर सुपर ह्युमन हि
सिरीयल दाखवतात साक्षी मोरे सुपरह्युमन आहे का ? याचा शोध डिस्कव्हरी चॅनलवरची ही टिमच घेउ शकेल.

<<याच उत्तर शास्त्रीयच असाव अशी अपेक्षा आहे.>>कदाचित याचे शास्त्रीय उत्तर शोधले जाउ शकेल ही आनि जर हि अंधश्रद्धा असेल तर तेहि समजेल.मागे ऐकदा डोळ्यातुन खडे येनार्‍या मुलिचे पितळ उघडे पाडले होते या टिम ने.

मोदींनी अश्या बहूगुणी पध्दतीची त्वरीत दखल घेऊन प्रत्येक शाळेत हे सुरू करावे आणि मुलांची बुध्दिमत्ता वाढवावी जेणे करून भविष्यात अश्या बुध्दीमान मुलांची फळी देशात तयार होईल आणि विकासच विकास होणार. 1200 हजारात इतकी असाधारण शक्ती मिळते तर फि मधे या त्यावर सबसिडी देऊन डिस्काउंट मधे शिक्षण द्यावे

काय करणार पंप्र आहेत ना. त्यांना अश्या उपयोगी गोष्टी नाही सांगणार मग काय ओबामाला सांगणार का ? Uhoh

नितीनचंद्र, आपल्या भावनांशी सहमत
म्हणूनच मी देखील इथे अश्यांना हेच म्हणालो की नुसते अंधश्रद्धा अंधश्रद्धा असे लिहिण्यापेक्षा स्वता काय ते बघून त्यामागे काय चलाखी असू शकेल हे तर सांगा. त्यामुळे इतरांचेही ज्ञान वाढेल.

वैज्ञानिक सिनेमांमधील टाईममशीन वगैरे कल्पना वाह वाह करत बघायचे, पण प्रत्यक्षात कोणी आपण द्वापारयुग फिरून आलो म्हटले तर खरे खोटे करायच्या आधीच हे शक्यच नाही म्हणत त्याची गणती वेड्यात केली जाईल.

मनुष्यस्वभाव असाच आहे, आजवर न दिसलेल्या देवावर त्याची श्रद्धा असते की कोणीतरी चमत्कारी शक्ती आहे म्हणून.... पण तेच कोणा मनुष्याने एखादी शक्ती दाखवली तर ते मात्र ढोंग आणि अंधश्रद्धा..

मी तर म्हणतो की देव जर खरेच असेल आणि त्याने या युगात अकरावा अवतार घेतला, आणि चुकून नेहमीच्या सवयीने एखादा चमत्कार दाखवला, तर त्याच्यावरही भोंदूबाबाचे लेबल लावले जाईल..

जर एखादा हातचलाखीच करत असेल तर त्याची हातचलाखी जोपर्यंत पकडली जात नाही तोपर्यंत त्याला आपल्यापेक्षा चलाख म्हणायला काय हरकत आहे??

यूट्यूबवरचा व्हिडू डालो करून पहाण्यात जे काय अडीच तीन रुपये खर्च होतील तितक्याही पैशांच्या लायकीचा नाही.

आपपल्या राजपुत्र/कन्येला १२ हजार रुपये खर्चून या ट्रेनिंगला जरूर पाठवावे असे सुचवतो. शिवाय, अबॅकस, फ्यूचर मॅपिंग, फोटोजिनिक मेमरी इ. प्रकारचे वर्कशॉप्स दरमहा येतच असतात, त्यांनादेखिल आवर्जून पाठवत जावे.

टीव्हीवर रामदेवबाबाही 'और किस किस का कैंसर कपालभातीसे ठीक हुआ? हाँ बेटा, तुम बताओ?' सारखे विचारतो अन ते गुडघेदुखीवालं औषध जॅकीश्रॉफ विकतो. इथेही अनेक "डॉक्टर" त्या-त्या शो मधे असतातच.

तेव्हा पुन्हा एकदा. हॅप्पी ट्रेनिंग टू युअर चाईल्ड.

मीदेखिल टकलावरील एक नवे पारंपारिक लद्दाखी गुरखैल औषध विकसित करतो आहे. वर्षानुवर्षांच्या निरिक्षणातून प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे, की टक्कलवाले गुरखे फारसे दिसत नाहीत. याचे मूळ दुर्मिळ लद्दाखी वनस्पतींत दडलेले आहे. लौकरच त्या औषधाची इथे जाहिरात देईन.

आपणा सर्वांच्या अशाच भरघोस "शास्त्रीय" पाठिंब्याच्या अपेक्षेत,

डॉ. इब्लिस.

डिविनिता,

हवे असल्यास मागणीनुसार तुमच्यासाठी त्या प्रकारचेही औषध स्पेशल विकसित करण्यात येईल. यात हीरकभस्म व स्वर्णभस्माची मात्रा द्यावी लागते, त्यामुळे खर्च थोडा जास्त येईल. पण तीन महिन्यांत किमान ४०% टक्कल पडण्याची ग्यारंटी, अन्यथा ४०% पैसे परत मिळतील.

असाच पाठिंबा असू द्यावा ही विनंती.

ता.क. टक्कल पडल्यावर जास्तच पा.घ. सारखे दिसायची काळजी करू नये. आधी व नंतरचे पा.घ. लुक्स तसेच राहतात.

राईट ही ऑफर छान आहे, तसेही काही नाही विकसित केलेत तरी चालेल, सध्याची परिस्थिती आपोआप हवा तो इफेक्ट देईलच...

इब्लिस,

तुम्ही परवा एका ठिकाणी लिहिलेला उपाय काल करून पाहिला. गरम पाणी, ब्रँडी, मध वगैरे! ते घेऊन तुम्ही म्हणाला होतात तसा घसा तर सुधारलाच पण सृष्टीच्या निर्मीतीपासूनच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तरही येऊ लागले. पण माझा व्हिडिओ नाही अपलोड केला कोणी यू ट्यूबवर!

अरेरे! बेफि, मग तुम्हाला सुपरगर्ल ट्रेनिंगची नक्कीच आवश्यकता आहे.

त्या रेस्पीने घसा नक्कीच सुधरतो, पण वाणी नाही. वैखरी इतकी विखारी होण्यासाठी परा कशी असायला हवी? शिवाय उत्तरं जास्त येतात म्हणजे ब्र्यांडी जास्त झाली असणारे Wink

ता.क.
यूट्यूबवरचे प्रोफेसरांचे व्हिडू फारच जिव्हारी लागलेत का तुमच्या? फिकर नॉट. गझलगायन सुरू करा. मोबाईलवरचे रेकॉर्डिंग कसे अपलोड करायचे ते व्यनितून शिकवीन. इथे अवांतर पुरे.

पण इब्लिस,

ती 'सृष्टीच्या निर्मीतीपासूनच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायची क्षमता' दोन अडीच तासच टिकली. नंतर मात्र बरेच प्रश्न पडले जे अजूनही अनुत्तरीतच आहेत. उदाहरणार्थ बायको का चिडली होती, बिल कोणी भरले, घरी कसा आलो वगैरे!

असो!

घसा मात्र छान!

- 'सुपरघसा बेफिकीर'!

Pages