Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31
होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.
विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे ते जगाने साडी नेसलेय हा
अरे ते जगाने साडी नेसलेय हा काय प्रकार आहे
काल बघितलं थोडं 
हो, जग फार सुन्दर दिसतय
हो, जग फार सुन्दर दिसतय म्हणे.:फिदी: आता बायकोला जग म्हणले तर जगातल्या सगळ्या बायका श्रीबाळाच्या बायका होतील काय?:अओ:
बाय द वे, मला जान्हवी बाळीची ती जाम्भळट साडी भयानक आवडली, नवर्याला म्हणले तशी घे, तर तो चक्क नाही म्हणाला.:राग::अरेरे:
जाम्भळट साडी कधी नेसली होती
जाम्भळट साडी कधी नेसली होती जान्हवी बाळी ??
पिवळी होती ना ती साडी पण साडी छान होती.. त्या मावशीची साडी पण छान होती कधी नव्हे ते सगळ्या बाया (आई आजी सोडून) जरा चांगल्या साड्या नेसल्या होत्या ..
मला आपटे आणि शशीकला बाईंचा
मला आपटे आणि शशीकला बाईंचा डान्स आवडला
उठसुठ श्री बाळाला हल्ली तेल
उठसुठ श्री बाळाला हल्ली तेल का लावतात ?? ..अशाने श्री बाळाचे तेली बाळ होईल ..
आपटे-शशिकला डान्स फुल
आपटे-शशिकला डान्स फुल टाईम्पास होता.
अग श्रद्धा ती पिवळीच साडी
अग श्रद्धा ती पिवळीच साडी होती, ब्लाऊज जाम्भळा होता. विसरलेच मी.
परफॉर्मन्स झाल्यावर
परफॉर्मन्स झाल्यावर जान्हवीच्या साडीचा रंग काळा की नेव्ही ब्ल्यु? साडी मात्र झकास होती बहुदा काश्मिरी वर्क केलेल होत
हि पहा लिंक
https://www.facebook.com/zeemarathiofficial/photos/a.10151319181039307.5...
काही दिवसानी श्री बाळ तेलाचा
काही दिवसानी श्री बाळ तेलाचा घाणा चालवेल.:फिदी:
काही वर्षांनी आखातापेक्षा
काही वर्षांनी आखातापेक्षा अधिक तेल नुसते श्रीबाळाला जगात फिरवून विकता येईल भारताला
त्या एका दीड मिनिटांच्या
त्या एका दीड मिनिटांच्या सीनवर केवढा तो उहापोह.. त्याला मुळात तीन जणींनीच तेल लावल.. ते सुद्धा तेलाच्या वाटीत चार बोट बुडवुन.. उगाच काढायच्या म्हणुन काहीही चुका काढायच्या का?
मुग्धटली रागवु नकोस. या
मुग्धटली रागवु नकोस. या सिरीयलमध्ये आता नक्की काय उद्बोधनपर दाखवतात? एकसारखे ६ ते ७ आयाचे मनोगत, श्री आणी जानुचे लाजणे, जानुचे रडणे-रुसणे-चेहेरा पाडणे-हसणे. सिरीयल पुढे जातीय का?
एवढी मोठी दिवाळी साजरी केली, पण गोखले गृह उद्योग काही कामात गर्क दाखवले नाही. खाण्याचा आणी खिलवण्याचा धन्दा ना यान्चा? मग दिवाळी सारख्या मोठ्या सणामध्ये सुद्धा हे लोक घरी बसुन गप्पा हाणतायत. श्री बाळ ऑफिसमध्ये जातो की नाही? नवीन कन्त्राट घेतो की नाही?
हायला याच्या असल्या वागण्यामुळे मराठी लोक धन्द्यात मागे पडतात. ह्याच्या जागी एखादा गुज्जु/ सिन्धी असता तर घरात बायकोची स्मृती इराणी झाली की एकता कपूर झाली याची पर्वा न करता धन्द्यात लक्ष घातले असते.
ऐन दिवाळीत हे येड बयकोचे विभ्रम बघण्यात वेळ घालवत. मला नाही पटले हे. त्या ऐवजी का रे दुरावा लाख पटीने बरी. निदान ऑफिसमधले वास्तव वातावरण तरी बघायला मिळाले.
बायकोचे विभ्रम >>> वेडसर चाळे
बायकोचे विभ्रम >>> वेडसर चाळे म्हण रश्मी
रश्मी, मालिका असह्य होत चालली
रश्मी, मालिका असह्य होत चालली आहे यात काही वादच नाही.. पण नरकचतुर्दशीच्या दिवशी एका तेल लावण्याच्या सीनमध्ये इतक नाव ठेवण्याइतक काही नव्हत.. आपणही आपल्या नवर्याला, मुलांना बर्यापैकी तेल लावुन मालिश करतो या दिवशी..
रहाता राहीला प्रश्न श्रीने डोक्याला रोज तेल लावुन घेण्याचा प्रसंग.. तर ती एक प्रकारची रिलॅक्सेशन प्रोसेस आहे. दिवसभराच्या दगदगीनंतर हेड मसाज ही तशी नॉर्मल गोष्ट आहे.. यात रिलॅक्सेशनबरोबरच या दिवसभरातील घडामोडी शेअर करण, काही समस्या असतील तर त्यावर चर्चेतुन उपाय शोधुन काढण अश्या गोष्टी शक्य आहेत..
यासगळ्यात श्रीने तेलाचा घाणा चालवणे, त्याला नुसत फिरवुन जगभरात तेल विकणे या प्रकारच्या कमेंट्स पटल्या नाहीत, म्हणुन मी तस लिहील.. मला राग वगैरे आलेला नाही..
आता इथे माझ्यावर यथेच्छ टीका होणार हे नक्की..
असो..
"होनार सून मी या घरची" या
"होनार सून मी या घरची" या कार्यक्रमाला सर्वोत्कृष्ट मालिकेचे पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन.
आणी "झी मराठी" सर्व मायबोलीकरानी दाखवलेल्या उत्साहाबद्दल आणि वेळोवेळी दिलेल्या सुचनेबद्दल आभारी आहे.
हा बाफ असाच वाहत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना...
मुग्धटली, अनेक भागांची
मुग्धटली,
अनेक भागांची मालिका, जी जवळपास अर्धा तास रोज लागते, तिच्यात दृष्ये दाखवायला प्रचंड वाव असतो. आजवर सहा ते सात वेळा श्रीरंगला कोणीतरी तेल लावताना दाखवलेले आहे. हे कल्पनादारिद्र्यच आहे. ह्यापेक्षा अधिक दर्जेदार दृष्ये ह्या मालिकेत सहज दाखवता आली असती. एकच एक दृष्य दाखवणे हे कंटाळवाणे, नीरस, थट्टेस पात्र व सुमार कल्पनाशक्तीचे उदाहरण आहे.
काही पर्याय - चहा पिताना गप्पा होऊ शकतात, बागेत झोपाळ्यावर आईआजीच्या शेजारी बसून गप्पा होऊ शकतात, कधी गच्चीवर उभे राहून गप्पा होऊ शकतात.
सातत्याने ऑईल मसाज दाखवण्यातून काय अभिप्रेत आहे?
त्यात पुन्हा एक उपवादाचा विषय असा, जो मी काढत नाही आहे, पण ह्या स्थळावर अजून काही सदस्यांनी कसा काय काढला नाही ह्याचे नवल वाटत आहे, की सतत स्त्रीने पुरुषाच्या डोक्याला तेल लावून दिलेले दाखवणे हे योग्य नाही. अर्थात, मला त्याबद्दल कोणत्याच बाजूने काहीच म्हणायचे नाही.
सातत्याने ऑईल मसाज
सातत्याने ऑईल मसाज दाखवण्यातून काय अभिप्रेत आहे? >>> हे तो श्रींची इच्छा
दाद्या, ही काडी आहे का?
दाद्या, ही काडी आहे का?

त्यात खटकण्यासारखं किंवा विचार करण्यासारखं काहीही नाही.
पण जर त्यांनी असं दाखवलं असतं की सतत स्त्रीनेच पुरुषाच्या डोक्याला तेल लावून द्यायलाच हवे तर आक्षेप घेता आला असता .
oil मसाजच दाखवायचा असेल तर
oil मसाजच दाखवायचा असेल तर कधीतरी श्रीने पण करावा की आईला, आजीला. त्यांच्या डोक्याला पण गरज असेल ना आणि जानुला पण.
श्री करत असेल तर sorry हा ह्या पोस्टसाठी कारण मी बघत नाही.
श्री ला फक्त आजीच्या हातूनच
श्री ला फक्त आजीच्या हातूनच तेल लावून घ्यायचे असते. घरात इतक्या स्त्रिया असूनही. (या दोघांव्यतिरिक्त कुणीही कुणाला खासकरून स्त्रीने पुरूषाला तेल लावताना दाखवले नाही, दिवाळी सीन वगळता)आता या कामाचा कंटाळा आलाय असंही आजी परवा म्हणाली. जान्हवी त्या खोलीत असताना जास्तीत जास्त वेळ तिथे थांबण्याचा बहाणा एवढंच त्यामागचं कारण दाखवायचं असावं.
अन्जु दिवसभराचा थकवा
अन्जु दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी करतात ऑईल मसाज.. इथे काम काय आहेत या बायकांना श्री, जान्हवी ऑफिसला गेले की?
ओके ओके मुग्धा. बायकांची
ओके ओके मुग्धा.
बायकांची बुध्दी तल्लख होण्यासाठी आणि जानुची स्मृती येण्यासाठी लिहिलं मी.
तेल लावून स्मृती परत येत
तेल लावून स्मृती परत येत नाही.
तेल लावून स्मृती परत येत
तेल लावून स्मृती परत येत नाही.>>>हे पण बघा
वरच्या सर्व चर्चेमध्ये
वरच्या सर्व चर्चेमध्ये निसटलेला मुद्दा:
झी मराठीतर्फे मायबोलीकरांचे आभार मानले गेले आहेत. सातत्यानं होणार्या या चर्चेमधल्या उत्साहाचं कौतुकही केले आहे.
रविकान्त, तुम्ही ऑफिशीयली झीमराठीसोबाआत संलग्न आहात का?
परत कुणी "बिनडोक सीरीयल्स चॅनल्सवाले दाखवतातच का?" असे म्हणत असेल तर त्या चर्चेमध्ये मला हा पॉईन्ट आरामात वापरता येईल. धन्यवाद.
झी मराठीतर्फे मायबोलीकरांचे
झी मराठीतर्फे मायबोलीकरांचे आभार मानले गेले आहेत. सातत्यानं होणार्या या चर्चेमधल्या उत्साहाचं कौतुकही केले आहे.
>>>
हे कुठे?
रविकान्त यांच्यातर्फेच का?
मुग्धटली तुझ्यावर कशाला कोण
मुग्धटली तुझ्यावर कशाला कोण यथेच्छ टीका करेल?:अओ: सिरीयल पाहुन जे वाटले तेच मी आणी बेफिनी लिहीले, ते पण आलेला कन्टाळा घालवायला. वर आशुडीने लिहीलेय तसेच मला वाटले होते की बाकी पुरुष ( श्रीचे बाबा आणी काका ) पण होते की दिवाळीला घरात. मग त्याना तेल लावले की नाही? आणी का नाही लावले?
असो, पुढे वाद नको.:स्मित:
विनीता.:फिदी: त्या साठी कॉड लिव्हर ऑईल कसे वाटेल डोक्याला लावायला? ओमेगा ३ असलेल्या बान्गडा आणी सॉलमन माशाचे तेल बाकी तेलात मिक्स करुन लावायला हवे.:खोखो:
एकदाच नवर्याने सॉलमन घरात आणला,फ्रायपॅनवर टाकला. आणी त्या क्षणी मी हातात येईल ती पर्स घेऊन बाहेर पळत सुटले होते.:हाहा: नवर्याला धमकी दिली की एकतर घरात मी राहीन नाहीतर सॉलमन.:फिदी:
अवान्तराबद्दल सॉरी.
सॉलमन म्हणजे?
सॉलमन म्हणजे?
वरच्या सर्व चर्चेमध्ये
वरच्या सर्व चर्चेमध्ये निसटलेला मुद्दा:
झी मराठीतर्फे मायबोलीकरांचे आभार मानले गेले आहेत. सातत्यानं होणार्या या चर्चेमधल्या उत्साहाचं कौतुकही केले आहे.
रविकान्त, तुम्ही ऑफिशीयली झीमराठीसोबाआत संलग्न आहात का?
>> +१
मीपण हेच नोटिस केलं.
रिया सॉलमन हा मासा ओमेगा ३
रिया सॉलमन हा मासा ओमेगा ३ भरपूर भरलेला असतो. अमेरीका आणी बाकी युरोपीय देशात मिळतो.
http://en.wikipedia.org/wiki/Salmon
पण याचा वास मला तरी भयानक वाटला.:अरेरे: मी शाकाहारी असल्याने मला बान्गडा पापलेट पर्यन्तचेच वास झेपले.
चला बाकी सिरीयल बद्दल बोलु.
रविकान्त तुम्ही झी तर्फे बोलत असाल तर आमच्या अपेक्षा जरुर त्याना कळवा.
Pages