होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा त्या वेळेस तो महिलावर्ग खुदुखुदु हसण्याच कारण म्हणजे लक्ष्मीकांतने म्युझिक बंद करुन देखील हे दोघजण टिपर्‍या खेळत होते.... मला त्यावरुन एक जोक आठवला..

लग्नाच्या वरातीच्या वेळी बॅण्डवाला विचारतो

"किती वेळ वाजवायच आहे?"

बॅण्ड अरेंज केलेला म्हणतो

"तुम्ही फक्त सुरुवात करा हो एकदा दारु चढली की आपली पोर जनरेटरच्या आवाजावर पण नाचतील"

डीविनीता... अनुमोदन.... तिच प्रचंड डोक्यात जाणच तिची अभिनय क्षमता दाखवुन देत... यावर्षीचाही खलनायिकेचा पुरस्कार तिलाच मिळालेला दिसतोय... गेल्यावर्षीप्रमाणे

चला मी बघत असलेल्या शिरेलीत आली बाबा त्या नायिकेची स्मृती आठ दिवसांत. नाहीतर मी काळजीत होते की जानुबैंची स्मृती आली नाही किती महिने, आता आमच्या बाईंची कधी येणार.

आशा शेलार अग्निहोत्र मध्ये पण होत्या. नवर्‍याला घाबरून असणार्‍या पण मनात त्याच्या कृष्णकृत्यांबद्दल खदखदता राग असणार्‍या बायकोची व्यक्तीरेखा त्यांनी लाजवाब उभी केली होती.

काल शशिकला बाईंनी त्या उमाकांत आणि अमृतचे फोटो खाली फेकुन दिले तरी बथ्थड श्री आणि आईआज्जी त्यांचंच समर्थन करत आहेत. बास की आता.. अती चांगुलपणाने शिसारी आली आता मला.. Angry

पियु.. प्रचंड अनुमोदन.. काल पहिल्यांदाच जानुबाळाचा अ‍ॅटीट्युड आवडला.. ती सरळ आईला सांगते तु निघुन जा घरातुन आणि मोठी आईसुद्धा पहील्यांदाच मतप्रदर्शन करताना दाखवली आहे...

त्या श्री बाळाला उद्या कोणी बेदम मारला तरी हा बाब्या म्हणेल...
त्यांची काही चूक नव्हती....संतापाच्या भरात माणसाला भान राहत नाही. या भावनिक आंदोलनात ते असताना नेमके आपण त्यांच्या समोर आलो ही परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे....मी पाहिजे तर सगळ्यांच्या वतीने त्यांची माफी मागतो.

च्यायला...ती जानूपण म्हणाली तुमच्या चांगुलपणाचा त्रास होतोय म्हणून...
मालिकतले सगळ्यात आवडलेले वाक्य

सकारात्मक घटना:

जान्हवीच्या आईचे सुपर अ‍ॅक्टिंग!

नकारात्मक घटना:

उर्वरीत सर्व!

अत्युच्च डोक्यात जाणारी घटना:

सलग दोन भागांत श्रीबाळाच्या डोक्याला आईआजीने तेल लावत बसणे!

त्या श्रीबाळाला निम्मे संवाद तेल लावून घेतानाच बोलायचे आहेत. एकुणच सिरियल तेलकट आणि तूपकट होण्यामागे ह्या तेल लावण्याचा मोठा हातभार असावा. काय वाट्टेल ते झाले तरी श्रीबाळ चिडत का नाही ह्याचे उत्तर आपल्याला ह्या क्रियेतून मिळते. आई आजीचे लक्ष नसताना तिच्या हाताखालून एका चिमट्याने तेलकट्ट झालेल्या श्रीबाळाला दूर करून दुसर्‍या चिमट्याने अस्वस्थ फ्रस्ट्रेटेड बेबीला आई आजीच्या हाताखाली सारले पाहिजे.

>>सलग दोन भागांत श्रीबाळाच्या डोक्याला आईआजीने तेल लावत बसणे! <<

अहो, केस गळत असतील बिचार्‍याचे? आनि तुम्ही कशाला जळताय त्याला तेलाचा मसाज मिळतोय तर. Proud

(ह. घ्या.)

अजून हि सिरियल चालू असेल वाटले न्हवते.

झंपे, आत्ताशी तर जान्हवीला परत श्री वर प्रेम झालंय.
अजुन त्यांना मुल बाळं होणं बाकी आहे.
काल ती आई म्हणत होती त्याची की लग्न झालं ना मग मुलं होणारच Uhoh

श्रीला काल सातवी आई मिळाली >>> Lol ....... हळूहळू आयांची संख्या वाढत चालली आहे ...मालिका संपेपर्यंत किती होईल कोणास ठाऊक..

Pages