लहान मुलांचे दंतआरोग्य - भाग १

Submitted by वेल on 16 November, 2013 - 13:53

आपण जंक फूड खायला सुरुवात केल्यापासून असं लक्षात आलं आहे की, लहान मुलांना खूप लवकर डेन्टिस्टकडे जावं लागतं. असंही पाहाण्यात आलं आहे की अगदी दोन-सव्वादोन वर्षाच्या मुलांच्या सतरा दातांचं रूट कॅनाल करावं लागलं,

आपल्या मुलांच्या दाताचे असे हाल होऊ नयेत म्हणून हा लेख ...

लहान मुलाचा पहिला दात दिसतो साधारणपणे मूल सहा महिन्याचं होतं तेव्हा. काही मुलांना जन्मतःच दात असू शकतात. काही मुलांना चौदाव्या महिन्यातसुद्धा दात येतात. दात येण्याची वेळ हा जेनेटिक फॅक्टर समजला जातो.

मुलांना आलेल्या पहिल्या दाताच्या सेटला दुधाचे दात म्हणतात (मला माहित आहे सगळ्यांना माहिती आहे, तरी सांगितलं). बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा दुधाच्या दाताचे कोश हाडांमध्ये तयार होत असतात.

जबडयाचे चार क्वाड्रण्ट (मराठी शब्द नाही माहिती) पडतात. लहान मुलांच्या प्रत्येक क्वाड्रण्ट मध्ये पाच दात असतात. सगळे मिळून वीस दात. कोणते दात कोणत्या महिन्यात / वर्षी येतात त्याचे चित्र पाहा - teeth eruption pattern.

दात येण्याच्या सुमारास अनेक मुलांना ताप येतो किंवा लूज मोशन्स येतात. आपल्या़कडे समज आहे की हे एकदम नॉर्मल आहे. परंतु कोणताही त्रास न होता मुलांना दात येऊ शकतात. (माझ्या मुलाला काही त्राअस न होता दात आले.) त्याकरीता आपल्याला काही खास काळजी घ्यावी लागते. मुलांच्या हिरड्या तिसर्‍या - चौथ्या महिन्यापासून शिवशिवू लागतात. दात बाहेर येण्यासाठी त्या स्वतःला तयार करत असतात. आपण मुलांच्या तोंडात निरखून पाहिले तर खालच्या हिरडीला आतील बाजूने थोडासा कडक फुगवटा आलेला दिसतो. ह्या काळात मुलांना जी मिळेल ती वस्तू मुले तोंडात घालतात. मुलांना निसर्गानेच दिलेली ही जाणीव आहे की जिथे दात येणार असतो त्यावर चावले की दात बाहेर येताना कमी त्रास होणार आणि दात विनासायास बाहेर येणार. ह्या काळात मुलांना टीदर देणे खूप चांगले. बाजारात कडक प्लास्टिकचे, (मी-मी ब्रॅण्ड किंवा कोणताही दुसरा ब्रॅण्ड), पाणी किंवा जेल भरलेले, वेगवेगळ्या आकाराचे टीदर्स येतात. ते टीदर्स उकळलेल्या पाण्याने धुवून मुलांना चावायला द्यावेत. टीदर्स आपणच आपल्या हातात पकडावेत. मुले स्वत;च्या हातात टीदर्स एखादे मिनिट पकडतात आणि मग ते पडते आणि त्याला परत धूळ लागते. जर टीदर्स द्यायचे नसतील तर स्वत:चे हात स्वच्छ धुवून, हाताला चालेल इतपत गरम पाण्याने धुवून मुलांच्या तोंडात आपले बोट चावायला द्यावे. मुले आरामात पंधरा - वीस मिनिटं बोट चावत बसतात. आपल्यालाही तेवढा वेळ मुलांसोबत गप्पा मारता येतात. (लहान बाळाशी गप्पा - आम्ही मारतो बुवा). असे दर दोन तासाने करावे ह्यामुळे मुले इतर कोणत्याही वस्तू तोंडात घालून चोखणे कमी होते. ह्याशिवाय मुले स्वतःची मूठ तोंडात घालून चोखत असतात तेही थांबवू नये. वरचेवर स्वच्छ ओल्या कपड्याने मुलाचे हात पुसून घ्यावेत. असे केल्याने, आपले किंवा स्वतःचे कपडे, गोधड्या इत्यादी वस्तू तोंडात घालून चोखत नाहीत आणि त्यामुळे इन्फेक्शन होण्याचे टळते.

आपण मुलांना चार ते सहा महिन्यांचे असताना वरचे खाणे सुरु करतो. साधारण पंधरा दिवस मुलांना बाहेरच्या खाण्याची सवय झाली की थोडे बारिक टेक्स्चरचे मऊ शिजलेले खाणे द्यावे - (गहू किंवा तांदळाच्या तूपात भाजलेल्या रव्याची वीस मिनिटे मऊ शिजलेली खीर). मुलांना दात आले नसले तरीही टेक्स्चरचे मऊ शिजलेले खाणे द्यावे, मुलांच्या हिरड्या हे खाणे खाण्याइतक्या कडक असतात. मुलांना कधीही कोणतेही खाणे मिक्सरमधून बारीक करून देऊ नये. तसे खाणे दिल्यास मुलांना मिक्सरमधून काढलेले टेक्स्चरलेस खाणे खाण्याची सवय लागते आणि अन्न चावताना त्यात लाळ मिसळण्याची प्रक्रिया, या सवयीमुळे होत नाही, ज्यामुळे अन्न पचनास त्रास होऊ शकतो. (आलेले दात किडू शकतात) शिवाय अशा प्रकारे चावून खाण्याची सवय लागल्याने दात येण्याच्या प्रक्रियेला मदत होते. शिवाय पटपट खा लवकर खा असा मुलांच्या मागे घोशा लावू नये. ह्यामुळे मुलांना घास तसाच गिळण्याची सवय लागते. मुलांना मजेत खाऊ द्यावे. हसत खेळत गप्पा मारत, गोष्ट सांगत.. त्यांना मध्ये मध्ये आपण चावून कसे खायचे ह्याचे प्रात्यक्षिक दाखवावे. मुलांना भूक लागली असेल ह्या समजूतीने त्यांनी मागितलेले नसताना त्यांना खायला देऊ नये. अगदी जन्मापासून मुलांना दर दीड ते दोन तासांनीच खायला द्यावे. (अगदी जन्मलेले बाळ फारसे दूध पित नाही, एखाद दुसर्‍या मिनिटात लगेच झोपते, तेव्हा त्याला वीस मिनिटे ते अर्धा तास, झोपेतून उठवून, हलक्या चापट्या मारून, पंख्याखाली उघडे ठेवून, तळपायाला गुदगुल्या करून उठवावे, दूध पिऊन मगच झोपू द्यावे, आणि एका फीडिंगनंतर दोन तास काहीही देऊ नये, मुले भूक लागली की स्वतः उठतात आणि रडतात. मूल रडू लागले की त्याला स्वच्छ करायची वेळ झाली आहे का ते प्रथम पाहावे, त्याला भूक लागली आहे ह्याची खात्री करून मगच दूध पाजावे. साधारण पंधरा - वीस दिवसात मुलांचा दूध पिण्याच्या वेळेचा पॅटर्न तयार होतो आणि तो मग बराच काळ टिकतो. सुरुवातीला आपल्याला खूप संयम ठेवावा लागतो. पण एकदा संयम ठेवला आणि मुलांना दर दोन तासांनीच खायची सवय लागली की मुले व्यवस्थित बाळसे धरतात, त्यांचे पोट अन्न पचनासाठी व्यवस्थित तयार होते - पाचक रस वेळच्या वेळी तयार होतात वगैरे... .पचन व्यवस्थित झाल्याने मुलांचे आरोग्य व्यवस्थित राहाते, इम्युनिटि वाढते. दोन तासाचा पॅटर्न फॉलो न करणारी मुले साधरण्पणे किरकिरी असतात कारण पोटात पाचकरस तयार झालेले नसताना त्यांच्या पोटात अन्न जाते,)

दात येण्यास सुरुवात झाली की दाताची निगा राखणे खूप महत्वाचे आहे. दात दिसायला सुरुवात झाल्यावर रोज सकाळी मूल उठले की आणि त्याचे खाऊन झाले याशिवाय रात्री झोपताना दात ब्रश करावे. बोटात अडकवायचा ब्रश आणून त्याने दात घासायला सुरुवात करायची. तो ब्रश खूप मऊ असतो, त्याने हिरडीला कोणतीही इजा होणार नाही. खाऊन झाल्यावर मुलांना पाणी प्यायची सवय लावावी. रात्री झोपण्यापूर्वी मुलांचे खाऊन झाले, ब्रश करून झाले की त्यानंतर मुलांना काहीही खायला देऊ नये. ते अन्नकण दातावर राहून दात किडायची प्रक्रिया लगेच सुरू होते. रात्री झोपेत मुलांना भूक लागते त्यावेळी फक्त आईचे दूधच द्यावे. ते अगदी अशक्य असल्यास मुलांना गायीचे दूध दयावे परंतु त्यानंतर लगेच ओल्या कापडाने मुलांचे दात पुसून काढावेत आणि थोड्या वेळाने पाणी पिण्यास द्यावे. असे न केल्यास मुलांचे दात नक्की किडतात.

साधारण नऊ महिन्याच्या मुलाला सगळे दात आलेले नसले तरीही दूधात कुस्करलेली पोळी (चपाती) मऊ शिजवलेला आणि मऊ कुस्करून वरणात कालवलेला भात हे व्यवस्थित चावून खाता येते. असे चावून खाल्यामुळे मुलांची दात येण्याची प्रक्रिया सोपी होते. ह्या काळातही मुले तोंडात बोटे घालत असतात. त्यांना रांगता, चालता येऊ लागलेले असते, त्यामुळे त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे. कोणतीही अस्वच्छ वस्तू त्यांच्या हाताला लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. त्यांना सतत काहीतरी - त्यांच्या ओळखीची वस्तू चावायला द्यावी जेणेकरून मुलांना समजते की चावायची इच्छा झाली तर हीच वस्तू चावायची. साधारण सात - आठ महिन्यापसून मुलांचे दात घासताना मुलांसाठीच्या खास पेस्ट्चा वापर करायला सुरुवात करावी. एकतर त्यांची चव मुलांना आवडेल अशी असते आणि त्यात फ्लोराईडचे प्रमाण खूप नगण्य असते. सुरुवातीला अगदी दोन मोहरीच्य दाण्याएवढी पेस्ट दात घासायला घ्यावी. आपण स्वतःचे दात घासताना मुलांसमोर घासावेत जेणेकरून मुलांना समजते की घरातले सर्व दात घासतात. जमल्यास दात घासणे ही एक ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी करावी.

साधारण दोन सव्वादोन वर्षापर्यंत मुलांचे दुधाचे सर्व दात म्हणजे वीस दात येतात.

बरेच पालक मुलांना दात किडतील म्हणून चॉकलेट खायला देत नाहीत. परंतु चॉकलेटपेक्षा मोठा शत्रू आहे बिस्किट्स. एकतर बिस्किट्स मैद्याने बनतात. त्यात इतर धान्ये असली तरी त्यांचा बेस मैदा हाच असतो. त्यात साखर आणि ट्रान्स्फॅट्स असतात आणि हे मिश्रण दातांना लवकर चिकटते. त्यामुळे मुलांना बिस्किट्स शक्यतो देऊच नयेत, परंतु दिल्यास लगेच दातावरून ब्रश फिरवण्यास सांगावे. चॉकलेट किंवा कोणतीही मिठाई किंवा आईसक्रीम खाल्ल्यावरदेखील लगेच दात घासण्यास सांगावे.

मूल सात वर्षाचे होईपर्यंत मुलांचे दात घासून देण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांना स्वतः दात घासायला द्यावे पण ते आपण घासून दिल्यानंतर. याशिवाय वर सांगितल्याप्रमाणे रात्री एकदा दात घासून झाल्यानंतर मुलांना काहीही खाण्यास देऊ नये. तरीही त्यांनी जर काही खाल्ले तर पुन्हा एकदा दात घासायला लावावे.

मूल दात घासण्यास कंटाळा करत असेल तर त्यांना दात खराब होतील काळे पडतील, त्यांना भोकं पडतील आणि ते तुटतील अशी भीती जरूर दाखवावी परंतु तुला डेंटिस्ट्कडे न्यावे लागेल ते तुझे दात काढून टाकतील, तुला इंजेक्षन देतील अशी भीती कधीही दाखवू नये. पुढे कधी मुलांना डेंटिस्ट्कडे न्यावे लागले तर मुलांच्या मनात भीती असणे चांगले नाही. मुले डेंटिस्ट्कडे जाणार नाहीत.

मुलांना दात येऊ लागले की सहा महिन्यातून एकदा त्याला डेण्टिस्ट्कडे नेऊन दात दाखवून आणावेत. त्याकरता लहान मुलांच्या डेण्टिस्टकडेच गेले पाहिजे असे नाही. लहान मुलांच्या दातावर एखादा काळा ठिपका जरी दिसला तरी लगेच दात तपासून घ्यावे. मुलांचे दात खूप लवकर किडतात आणि किड तशीच राहिली तर मुलांनाही मोठ्यासारख्याच रूट कॅनालसारख्या ट्रीट्मेण्ट घ्याव्या लागतात. ज्या करून घेण्यास मुले तयार होत नाहीत आणि मग कॉन्शस सेडेशन सारखा ऑप्शन वापरून मगच ट्रीट्मेण्ट करता येते. ह्यासाठी अ‍ॅनेस्थेटिस्ट डॉक्टर बोलवावे लागतात. पूर्वी लहान मुलांच्या दाताच्या ट्रीट्मेण्ट जनरल अ‍ॅनेस्थेशिया देउन केल्या जात. परंतु हे केवळ हॉस्पिटलमध्ये केले जऊ शकते. ह्या दोन्ही ट्रीटमण्ट्साठी मुलांना सहा ते आठ तास उपाशी ठेवावे लागते.

ह्याशिवाय कीड तशीच राहिली तर दुधाच्या दाताखाली तयार होणार्‍या कायमस्वरूपी दातांनाही त्रास होऊ शकतो, ते दात येण्यापूर्वीच त्यात (डेव्हलपमेण्टल) डीफॉर्मिटी होऊ शकतात. त्यामुळे हे तर दुधाचे दात आहेत, पडून नवे येणार आहेत असे म्हणून लहान मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

दाढांना कीड लागू नये म्हणून एक प्रीव्हेण्टिव ट्रीटमेण्ट करता येते. (भारतात करतात. भारताबाहेर कुठे कुठे करतात माहित नाही). त्यांना सीलण्ट असे म्हणतात. दाढांमध्ये ज्या नैसर्गिक खाचा असतात त्या पाण्यासारखे पातळ प्रवाही औषध वापरून सील करतात. त्यांचा नैसर्गिक आकार बदलत नाही, परंतु त्या खाचा सील होऊन त्यात अन्न अडकत नाही आणि दाढा कीडण्याची प्रक्रिया लांबते. दाढा आल्या आल्या मुलांच्या दाढा सील करून घ्याव्यात. सीलण्ट्स हे दाढा आल्या आल्या आणि किडण्यापूर्वी करता येतात. ज्या दाढा (मोठ्यांमध्ये उपदाढा) किडलेल्या नाहीत, वापरून गुळगुळीत झालेल्या नाहीत, ज्यांचे सुळके खूप जास्त झिजलेले नाहीत अशा दाढांनाच सीलण्ट करता येते.

साधारण साडेपाच सहाव्या वर्षी मुलांना पहिली परमनण्ट दाढ येते, तिच्याकडेही बरेचदा दुर्लक्ष होते - पण परमनण्ट दातांबद्दल पुढच्या भागात...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपाय एकच - बाळाला जागेपणी एक मिनिट देखील एकटे न सोडणे. हे प्रॅक्टिकल नाहीये मला माहित आहे. पण मला तरी हा एवढाच उपाय दिसतोय. बाळाला खेचता येणार नाही अशा प्रकारे गोधड्या, दुपटी घालू शकतो का? बाळ झोपेत असताना बाळाला घट्ट बांधून - हातही बांधून ठेवता येईल का? (काही मुलं त्या बांधण्यातूनही हात सोडवतात म्हणे) जेणे करून बाळ उठताना तरी तोंडात काही घालणार नाही आणि बाळ जागे असताना बाकी वेळ आपण समोर असू शकलो तर उत्तम.

पण खूप काळजी नका करू. डॉ ने सांगितलेले औषध खाणे - पिणे चालू ठेवा. काही होत नाही बाळाला.

Bond - काही जणांचे दात फारसे झिजलेले नसतात ते सीलंट करू शकतात. तुम्ही डेंटीस्टला भेटा, दात तपासल्यानंतरच केवळ ते सांगू शकतात

Hi vel . . Thanx for reply . . . But tyachya pedi ne kaich medi. Nai diley tyala . . Kai garaj nai ase mhantat . . Phakt mith sakhar pani dya mhanale. . . Tar te kiti vela kiti ml deu te kalat nai kay karu ? Ani mul khup chid chid kartat ka ?

चेतन - जर पेडि. म्हणत आहेत काही गरज नाही तर नका देऊ. मूलं चिडचिड करतात. रडत राहतात. साहजिक आहे ना. त्या इवल्याश्या जिवाला किती त्रास होत असतो. मीठ साखर पाणी पेडि ने सांगितल्याप्रमाणे द्या - मला वाटतं ८-१० वेळेला साधारण एक छोटी वाटी. (मी पेडि नाही.) हा प्रश्न संगोपनात डायतेक्ट विचारलात तर योग्य उत्तर मिळतील.

Ok thank vel tumchya uttarani manala khup dilasa milto . Tension palun jate. . Ata ami aturtene vat pahatoy tyachya datachi. . .

माझा मुलगा सव्वा वर्षाचा आहे. १ वर्षाचा झाल्यानंतर त्याला दात यायला सुरूवात झालीय.
आता वर २ आनि खाली २ असे दात दिसताहेत. पन वरच्या २ दातांमध्ये खुपच फट आहे.
दुधाचे दात पडुन नविन दात येताना हि फट अशीच राहील का ?? यावर काही उपाय आहे का ??

सुरुवातीच्या दातांमध्ये फटी असतातच. हळू हळू दात जवळ येतात पण पुन्हा साधारण पाच वर्षाच्या सुमारास फटी दिसू लागतात कारण ज्बडा मोठा झालेला असतो आणि दात त्यामानाने लहान. बाराव्या वर्षानंतर सुद्धा फटी राहिल्या किंवा दात वेडेवाकडे असतील तर मग तारा लावून घ्यायचा विचार करावा. तारा लावणे हे फक्त दात आणि हास्य सुंदर दिसावे म्हणून नसते तर दत योग्य रितीने एकमेकांवर बसून व्ययस्थित चावा व्हावा, दाताची स्वच्छता नीट राखली जावे म्हणून असते.

Hi vel shree la ajn nai g ala dat ata khup divas zale process chalu houn . . . Sadharan kay kalavadhi asto hirdi phugnayapasun te datachi kani disayla? Ani pratyek datala to asebh behave karel ka ?

चेतन - दात यायला वेळ किती लागतो हे प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असते. तुम्ही जर त्याच्या हिरड्यांना मसाज करणे, टीदर चावू देणे. त्याने इतर काहीही चावायचा प्रयत्न केला तर ते काढून हातात टीदर देणे असे केलेत तर ही गोष्ट त्याच्या इवल्याश्या मेंदूत देखील रजिस्टर होईल. मुलाचे प्रत्येक वेळचे वागणे सारखे किंवा वेगळे असू शकते. एकच फूटपट्टी नाही लागत. आपल्यालाही कल्पकता लढवावी लागते.

Hi vel . . . Majya mulala 3 dat alet vinatakrar. . . . . Tyala pan chan vataty ata khup . . . .swatch prayog karat asto datavar. . . Ek shanka hoti to ata 9 mahine purn zala ahe ani ata tyala je 3 dat ale ahet phakt olya kapdane pusayche ki ankhi kay ?

चेतन. - त्रासाशिवाय दात येणं हे खरच सुख असतं. अभिनंदन.

दात आलेत आता तर लहान मुलांची टूथ्पेस्ट आणि फिंगर ब्रश वापरून दात घासायला हरकत नाही. अगदी थोडीशी पेस्ट घ्या दोन तीन मोहरीच्या दाण्याएवढी.

Dat ghasta yetil pan nantar gulnya kasa karnar to ? Mhanje ha maja pramanik prashn ahe br ka ? Ajn tyala te jamnar nai na ?

मस्त लेख वेल!
मोस्ट्ली गोष्टी पाळतोच.
आमच्या बाळाचे रात्रीचे दुध ७-८ महिन्याचा असतानाच बंद केले. रात्री उठला तर फक्त पाणी. ७-८ दिवसात त्याला कळल्यावर आपोआप उठणे बंद आणि दात व आपली झोप सुरक्षित Happy

माझि मुलगी आता ८ महिन्याची आहे. तीला आता दात येत असताना ताप येतोय, तिचा ताप दिवसभर नसतो पन तो रात्रितुनच ९९ ते १०१ च्या दर्म्यान जातो. हे दातामुळे होत असेल का???

अगं गेले २-३ दिवस अर्णवच्या दातांतून रक्त येतेय ब्रश नुसता टच केला तरी. उष्णतेने सुजल्या असाव्यात हा प्राथमिक अंदाज आहे. या आठवड्यात डेंटिस्टची अपॉईंटमेंट मिळत नाहीये. जाईनच तिथे पण प्राथमिक कारण व उपचार सांगू शकशील का? मीरारोड दहीसर परीसरात चांगला पेडी डेंटिस्ट सुचवू शकशील का प्लीज?

मीरारोड दहीसर परीसरात चांगला पेडी डेंटिस्ट सुचवू शकशील का प्लीज?>> कोणीही नाही. बोरिवलीत एक आहे. पण प्लीज तिच्याकडे नको जाऊस अत्यंत उर्मट आणि मुलांसोबत वागायला खूप रफ आहे.

सारिका१ _ सॉरी तुमची पोस्ट मी आज पाहिली. तुमच्या मुलीचा ताप वगैरे गेला असेल ना आता?

chetan82 - बाळ गुळण्या करणारच नाही म्हणूनच पाणी द्यायचं प्यायला. आपण त्याला दाखवत राहायचं ब्रश केल्यावर कसं थुंकायचं ते. आणि लहान मुलांची पेस्ट थोडी पोटात जातेच सुरुवातीला. काही हरकत नाही. म्हणूनच स्पेशल पेस्ट वापरायची.

तुमच्या मुलीचा ताप वगैरे गेला असेल ना आता?>>हो आत्ता बरि आहे ति. तिचा ताप गोवर मुळे होता हे नन्तर समजले. पन तिला आता खालच्या साईडला एकच दात आलाय.एकावेळि दोन दात एकदम येत असतात का?? कि अस काहि नसते??

माझी मुलगी ६ वर्षाची आहे तिला महिन्या भरापूर्वी खालच्या दाताच्या मागे एक दात आला आणि आता त्यापुढचा दात पडला इतक्यात सहसा दात पडत नाहीत काय कारण असेल. त्या दातामुळे चेहऱ्यात फरक तर नाही न पडणार??

दात पडण्याच्या आणि येण्याचा पॅटर्न ठरलेला असला तो तसाच्या तसा फॉलो होत नाही. एक वर्ष पुढे मागे हे नॉर्मल आहे. सर्वसाधारणपणे अशा गोष्टींमुळे चेहर्‍यात फरक पडत नाही. एकाचा दात येणे पडणे आणि दाताची ठेवण ह्यासाठी आई वडिलांपैकी एकाचा पॅटर्न फॉलो होतो. (तुम्ही पुढच्या दाताबद्दल बोलताय मागच्या मोठ्या दाढेबद्दल नाहे असे मी अझ्युम केले आहे. हो ना?)

माझ्या मुलाचा दात मे महिन्यात पडला. दात हलत असतानाच, तो धडपडून पडला आणि दात पडला /तुटला. त्यावेळी डॉक्टरला (पेडी) विचारलं होतं. त्यांनी काळजी करू नका म्हणून सांगितलं होतं. आता जवळपास ६ महिने झालेत तरी अजून नवा दात आला नाहीये. दातांच्या डॉक्टरांची अपाँटमेंट घ्यावी का?
नक्की पडल्यानंतर किती दिवसांनी नवा दात येतो?

Pages