देहास जाळण्याला मी ही अधीर नाही..

Submitted by दुसरबीडकर on 4 October, 2014 - 08:40

देहास जाळण्याला,मी ही अधीर नाही..
अग्नीस जोर यावा,ऎसा समीर नाही..!!

आता तरी कळू दे,इजहार काळजाचे..
इन्कार ऎकण्याचा,कानास धीर नाही..!!

माझे मलाच कोडे,श्रावण कसा छळेना..
आता कळून आले,नयनात नीर नाही..!!

दैवास दोष नाही,असलो जरी उपाशी..
ग्रीष्मातल्या झळांचे,कारण शिशीर नाही..!!

प्रेमात मी झुरावे,वाटे जरी मनाला.
पण कुंडलीत त्याने,लिहिलीच हीर नाही..!!

रचल्यात कैक गझला,कोणास याद नाही..
नंतर कळून आले,मी फैझ-मीर नाही..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या ब्बात डाॅक्टरसाहेब ..तसही छानचं की...आवडलाय बदल.. मूळ वहीत नोंद करतोय..मनपुर्वक आभार..