लेखन काढले आहे.

Submitted by जर्बेरा on 11 October, 2014 - 12:19

लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे. लेखन काढले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजराला सर्दी पण होऊ शकते, छातीत कफ होतो. आणि त्याच्याबरोबरच ताप. तातडीने व्हेट गाठावा. पोट बिघडणं, उलट्या होणं हेही होऊ शकतं.

खायच्याप्यायच्या बाबतीत खरं सांगायचं तर इतकी काळजी नाही घेतली तरी चालते. तुम्ही जे खाता त्यातलंच - म्हणजे मासे, चिकन चे तुकडे आणि भात, दूधपोळी, दूधब्रेड वगैरे सगळं चालतं. व्हिस्कस सुद्धा थोडं भात-पोळीबरोबर कालवून दिलेलं चालतं. नुसतं दूध तर चालतंच चालतं. शिवाय त्यांच्याही आवडीनिवडी असतात. आमच्याकडचं एक मांजर चीज, वेफर्स आणी अंड्याचे पदार्थ यासाठी अक्षरशः वेडं व्हायचं. पुर्‍या तळल्या की तिथे ठिय्या मारून बसायचं. त्याला न देता खायची सोय नसायची. दुसरं ढुंकूनही बघायचं नाही. पण याला खीर आवडायची आणि केक. तेव्हा परदेशी वेबसाईट्सवर लिहिलेल्या मांजराच्या खाण्यापिण्याच्या गाईडलाईन्स अगदी मनोभावे पाळायची काही गरज नसते. मांजरं ही मुळात प्रीडेटर्स आहेत तेव्हा व्यवस्थित शिकार करून कच्चं मांस, हाडं वगैरे खाऊ शकतात. मीठ देऊ नये हे खरं असलं तरी अगदी खाल्लं की त्याचं आयुष्यमान कमी झालं वगैरे काही नसतं. आपल्याकडे मांजरं सर्रास पाणी पितात, आणि ते कुठल्याही रोगाचं लक्षण नसतं. त्यांचं खाणं पिणं सहसा थर्मोकोलच्या डिस्पोजेबल वाट्यांम्धे पहिल्यापासून करावं. म्हणजे दर काही दिवसांनी धुवाव्या लागत नाहीत, सरळ फेकून द्यायच्या. तसंच पहिल्यापासून त्यात खायची सवय केली तर सहसा मांजरं इतर खाण्यात तोंड घालत नाहीत, चोरी करत नाहीत

सगळ्यात महत्वाचं - मांजरांची सफाई. परदेशात मांजरं सहसा घराबाहेर जात नाहीत, आणि गेली तरी आपल्याएवढी घाण आजूबाजूला नसते. आपली मांजरं बाहेरून भरपूर घाण आणि इन्फेक्शन्स घेऊन येतात आणि जिथे तिथे बसतात. तेव्हा मुळात त्यांच्या ठराविक जागा ठरवून द्याव्यात आणि लहानपणापासूनच इतरत्र कुठेही लोळू देऊ नये. आठवड्यातून एकदा तरी ओलं फडकं घेऊन पुसून काढावं, विशेषतं ढोपरापर्यंतचे पंजे. पिल्लू असल्यापासून सवय केली तर नंतर कटकट करत नाहीत असा अनुभव आहे. अगदी निर्वाणीच्या गरजेच्या वेळेस आंघोळ घालायची असेल तर थोडं कोमट पाणी आणी थोडा शॅम्पू वापरावा. शक्यतो दुपारी घातली तर मग उन्हात वाळतात पटकन. उन्हात वाळ्त घातलेला टॉवेल पुसायला वापरायचा म्हणजे जास्त कम्फर्टेबल होतं. (इति व्हेट). मुख्य म्हणजे पुसायचा टॉवेल आकाराने छोटा ठेवायचा. त्यांच्यापेक्षा मोठा टॉवेल असला तर त्यांना घाबरायला होतं, गुदमरल्यासारखं होतं (हे सगळं स्वानुभवातून मिळालेले धडे आहेत) आंणि मग ओरखाडणं, चावणं असे प्रकार होतात.

जर मांजर चावलं, ओचकारलं तर आपण स्वतः अ‍ॅन्टि रेबीज घेणं अत्यंत जरूरीचं आहे. पाळीव कुत्र्यांपेक्षाही पाळीव मांजरं ही जास्त मोठ्या प्रमाणात रेबीज कॅरिअर्स अस्तात (त्यांच्या बाहेर भटकण्याच्या स्वभावामुळे)

मला स्वतःला आवड नाही, सहज धागा उघडला.
पण आमच्या शेजारच्या घरी फार पुर्वी मांजर पाळली जायची. तिला आहार म्हणून दर दिवसाआड डिनरला चिकन मंचाऊ सूप दिले जायचे Happy

अमेरिकेतील मांजरे बाहेर जात नसल्याने त्यांच्यासाठी लिटर बॉक्स ई असतो. ते काम कंटाळवाणे असते. भारतात काय कॉमन आहे ?

जंताच्या धाग्यावरचे आमचे मांजर आता छान आहे.. दोन वेळा व्याले. चान पोरे झाली.

हिंद धर्मात मांजर आडवे जाणे अशुभ मानतात.

कुराणात मात्र मांजर हे स्वच्छ मिताहारी सुसंस्कारी कुटुंबवत्सल प्रानी अशी प्रशंसा केली आहे. ( म्हणे)

सगळे मोघल राजे मांजरप्रेमे होते.

खुदा सब बिल्लियों को और उनके चाहनेवालों को हमेशा खुश रखे !

Happy

मला मांजरांची माहिती फारशी नाही परंतु कुत्र्यांच्या अनुषंगाने सर्फ करताना बरीच मार्जारमाहिती मिळते. ती इथे शेअर करेन. आम्ही किटी व्हिडीओ प्रेमाने बघतो व जनरली कँंटिन मध्ये वगिरे माउ येउन बसल्यास तिला माझ्यातली चपाती बारीक तुकडे करून चारते. जालावर मांजरप्रेमींची सैन्ये करोडों मध्ये आहेत व आय कॅन हॅज चीजबर्गर ही विनोदी चळवळ मांजरांपासून सुरू होउन मग त्याचे कुत्रेरूप देखील आता स्थिरावले आहे.

मांजरांच्या पिल्लांना विशेष जपावे. मोठी कुत्री, पक्षी वगैरे घेउन जाउ शकतात. शिकारी कुत्र्यांपासून मांजरांस दूर ठेवावे. हा ताजा अनुभव. अमेझॉन .इन वर मांजरांचे सामान उपलब्ध आहे. बाळंतीण मांजरीस देखील जास्त काळजी मुख्य म्हनजे सेफ प्लेस व कोरडी जागा ह्यांची आवश्यकता आहे. तिचे आवडीचे अन्न तिला द्यावे ह्या काळात. कारण ती पिलांना सोडून जास्त वेळ जाउ शकत नाही.

नव्या मांजराच्या सहवासासाठी तुला हार्दिक शुभेच्छा. काय नाव आहे व काय ब्रीड आहे?

मनीमाउ जेवण करायला मांजरपाटावर येउन बसते का?

झरबेरा - अतिशय उत्तम माहिती. तुला मनापासून धन्यवाद.

मांजरापासून माणसाला काय काय संसर्ग होऊ शकतात असा एक यात उपविभाग काढलास तर फार बरे होईल.
उदा. - http://en.wikipedia.org/wiki/Toxoplasmosis
मध्यंतरी एका कुमार वयाच्या मुलीचे डोळे यामुळे अधु झाल्याचे प्रत्यक्ष पहाण्यात आले. लहानपणी ती मांजरांबरोबर खूप खेळत असे - त्याचा हा परिणाम. आता डॉ.नी तिला मांजरांजवळ अजिबात जायचे नाही म्हणून बजावले आहे. (एवढे होऊनही तिचे मांजरांवर अतिशय प्रेम आहे हे विशेषच)

पेट्सकडून माणसाला काय काय व्याधी/ संसर्ग होऊ शकतात याची यादी तयार केली तर आपोआपच आपल्या सर्वांच्यात सजगता (अवेरनेस) निर्माण होईल.
(http://www.health24.com/Medical/Diseases/Diseases-from-cats-Client-20120721 या लिंकवर मांजराकडून माणसाला काय व्याधी होऊ शकतात याची बरीच माहिती आहे).

व्हेटकडून कळलेले अजून एक - पॅरासिटेमॉल, ब्रुफेन मांजरांना चालत नाही.

खूप खूप धन्यवाद ज्यांनी अजून माहिती दिली. हा धागा मी सहज उघडला काल, अजून बरीच माहिती लिहायची आहे मला.

@वरदा, @पुरंदरे शशांक तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलीत. तुमची परवानगी असेल तर तुमचे प्रतिसाद वरती कॉपी केले तर चालेल का?

अमेरिकेतील मांजरे बाहेर जात नसल्याने त्यांच्यासाठी लिटर बॉक्स ई असतो. ते काम कंटाळवाणे असते. भारतात काय कॉमन आहे?
भारतातही लोकं घेतात कि लिटर बॉक्स. आम्ही एस रॉबिन ला जिथून आणले त्यांनी तर लिटर बॉक्स मध्ये लाकडाचा वाया गेलेला भुसा ठेवलेला. दर दिवशी मग बदलायचं.

काय नाव आहे व काय ब्रीड आहे?

एस ज्युनियर (Ace) Happy ब्रीड लोकल इजिप्शियन माऊ. आधीचे दोघंही साधारण असेच होते दिसायला.. आधीचा एस सिनियर आणि रॉबिन होते. त्यांचे फोटो अनुक्रमे इथे पाहता येतील - http://www.maayboli.com/node/36675?page=14 आणि http://www.maayboli.com/node/48236?page=11

मनीमाउ जेवण करायला मांजरपाटावर येउन बसते का?

नाही हो Sad मांजरपाट फारच कॉमन आहे. आमच्या बोक्याला उच्चासनच लागते. जसे कि कठडा, सर्वात उंच कपाटावर किंवा फ्रीज वर Uhoh सोफा रिकामा असेल तर उश्यांवर बसणार. लादी वर सुद्धा लगेचच पुसून झाली असेल तर. नाहीतर नाही.

@वरदा, @पुरंदरे शशांक तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलीत. तुमची परवानगी असेल तर तुमचे प्रतिसाद वरती कॉपी केले तर चालेल का? >>>> कमाल करतेस तू झरबेरा Happy - सर्वांना उपयुक्त अशी माहिती तुझ्या मूळ धाग्यावर जरुर टाकणे. (त्यासाठी परवानगी वगैरेची काही आवश्यकता नाहीये.. Happy )
धन्स.

मांजरापासून माणसाला काय काय संसर्ग होऊ शकतात असा एक यात उपविभाग काढलास तर फार बरे होईल.>>> माझा भाऊ रांगायला लागल्यापासून मजल्यावरच्या गोगट्यांच्या मांजरांशी आणि त्यांच्या पिल्लांशीच खेळायला जायचा, त्यांना अंगाशी प्रेमाने चिवळायचा. कितीही उचलून घरात परत आणून ठेवलं तरी आईची नजर चुकवून जायचाच (गिरगावात दारं सताड उघडी असतात). त्याला मग बाळदमा लागला होता. सगळं बाळसं जाऊन अगदी तोळामासा झाला होता. साधारण १० वर्षांचा होईपर्यंत त्रास झाला खूप. थोडं कमी झाल्यावर आईने सुक्या मेव्याचा खुराक व ब्राह्मण सभेतली व्यायामशाळा लावून दिली. नंतर झपाट्याने तब्बेत सुधारली.

झरबेरा - एका चुकीची दुरुस्ती.

भाटीचं ऑपरेशन करतात त्याला 'स्पे (spay)' करणे म्हणतात, स्प्रे नव्हे Happy

सो क्यूट.

स्पेइन्ग किंवा न्युटरिन्ग चा खर्च ७५०० प्रत्येकी असा कुत्र्यासाठी सांगितला होता.

स्पेइन्ग किंवा न्युटरिन्ग चा खर्च ७५०० प्रत्येकी असा कुत्र्यासाठी सांगितला होता.
आयडीए प्रत्येकी १०००-१५०० पर्यंत करून देतात. आम्ही त्यांच्याकडे विचारलेलं तेव्हा बोललेले ते. परंतु मांजरीचं करायचा असेल तर शक्यतो घर जवळ असलेल्या वेट कडे केलेले बरे. टाके निघाले तर लगेच घेऊन जाता येते. आयडीए स्पेयिंग फक्त देवनारलाच करतात.

माझ्या कडे ३ मान्जर आहे कोनाला पाहिजे का???
१-मान्जर आनि २ बोके आहेत.
कोनितरि जन्ग्लात सोड्ले होते उपाशि मरु नये म्हुनुन घेउन आले.
माझ्या कडे आधिच ५ आहेत. पन खुपच गोड आहेत. आता १ वर्श झाले.
एक्दम ट्रेन्ड झालि आहेत. चान्ग्ल्या सवयि लाग्ल्या आहेत त्याना.

हायला.. आयुष्यात माणसापेक्षा मांजरंन्वर जास्त प्रेम केल.. पण अश्या सांयटीफीकवे न कधी विचार केला नव्हता..
मस्त धागा.. मी पण बरीच माहीती देउ शकते.. जसा वेळ मिळेल तस टाकेन

आमच्या मांजराला जखम झाली आहे . औषध लावला की चाटते आणि खपली धरली की पुन्हा चाटते त्यामुळे ती जखम पुन्हा वाहू लागते ..
डॉक्टर पण वैतागला आहे .

एखादा कडू गोष्ट आहे का जी लावली तर मांजर चाटणार नाही ?

tyanchi saliva pan aushadhi ch aste. jakham chatne hee tyanchi natural instinct aste. tyachya jakhmevar betadine otat raha jewha jamel tewha. Chatala tari thodafar rahatach. upayog hoto asa anubhav ahe

एखादा कडू गोष्ट आहे का जी लावली तर मांजर चाटणार नाही ?
आमच्या वेटने Intas D'mag Spray दिलेला. चाटणे बंद झालेच आणि जखम पण भरून निघाली. आमच्या मांजरीने टाके तर काढलेच स्वताचे वरून चाटून चाटून आतडी काढायचे शिल्लक ठेवलेले. एकदा वेटलाही विचारून पहा या स्प्रे बद्दल.

आमच्या मांजरीने टाके तर काढलेच स्वताचे वरून चाटून चाटून आतडी काढायचे शिल्लक ठेवलेले. >>मला वाटते मांजर आणि कुत्र्यात हा मेजर फरक आहे. कुत्रे चाटून चाटून जखम बरी करतात.
मांजरांचे वेगळे दिसते आहे. किती दुखत असेल त्यांना नाही का असा बाउ झाला तर. बँडे ज ही टिकू देत नाहीत का? आमचे कुत्रे तर कानात औषध घालायचे तर बाटली हातात घेतली कीच दूर पळून जाते. महागाची औषधे पडून वाया जातात.

बादवे, अमेझॉन .इन वर फार मस्त पेट स्ट्फ आहे. मी दोन डॉग बेड घेतले आणि दोन्ही कुत्री त्याक्डे दुर्लक्ष करून फाटक्या पटकुरावर नाहीतर जमिनीवर झोपतात. सध्या गर्मी आहे त्याहून बहुतेक.
पॉ बटर आहे. व अनेक प्रकारच्या लीशेस वगैरे आहे. डॉग शोप.इन वर पण माउचे खूप सामान आहे.

मांजरांचे काही रूटीन असते का? जसे कुत्र्यांना रोज चालायला न्यावेच लागते. व्यायाम करवावाच लागतो. अंघोळ घालावी लागते का?

Pages