होणार सून मी या घरची - २

Submitted by मंजूडी on 27 February, 2014 - 02:31

होणार सून मी या घरची आणि होणार सून मी या घरची-१ या दोन धाग्यांनी २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने मालिकेवरील चर्चेसाठी हा नवा धागा.

विशेष सूचना - इथे केवळ मालिकेबद्दल आणि 'होणार सून मी या घरची' याच मालिकेबद्दल चर्चा करावी.
आणि फक्त मालिकेबद्दलच चर्चा करावी, त्यात पाककृती लिहू नयेत. पाककृती लिहिण्यासाठी आहारशास्त्र आणि पाककृती ग्रूपाचा वापर करावा.
आणि इतर आयडींच्या नाव, गाव, फळ, फुलाची चौकशीही या बाफवर करू नये. त्यासाठी विचारपूस किंवा संपर्क सुविधेचा वापर करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो आणि ते हसणे म्हणजे नेहेमी प्रमाणे ऑहॉहॉ असे हळुच नसुन ह्यॅह्यॅह्यॅ असे होते.....ओव्हर अ‍ॅक्टिंग चे पैसे मिळाले असावेत कदाचीत

हल्ली ती जानू अ‍ॅक्टिंग बरे करते. डोक्यावर पडलेल्याचे बेअरिंग चांगले जमले आहे>>>>> नताशा तीला मुळात या टाईपच्या अ‍ॅक्टिंग साठी फार काही करावे लागत नसेल....

ती जान्हवी कसली भयाण हसत होती>>> त्यांच्या लग्नाआधी असं हसुन दाखवलं असतं तर त्या हिरोने सिरियलदेखील सोडली असती. Lol

लीना भागवत गोड आहे.

हा एवढा पकाव आणि तिने त्याला पकवलं
शाब्बास तेजश्री >> +१ Lol
जानीचे उधळलेल्या घोड्यासारख खिदळण बघून त्या निलेशने पण तस हसण्याचा प्रयत्न केला पण नाही जमले बिचार्‍याला Sad

हि सिरियल अजून चालू आहे? बापरे, कमाल आहे चालवणार्‍याची...

कुठल्या तरी मुलाखतीत तीच ती लाडकी जानु, साडी घातलीय म्हणाली. आणि डोकं सटकलं माझं Proud

अरे.. हा बाफ एवढा रिकामा??
बरच काही चालू आहे मालिकेमधे...कोणीच बघत नाही आहे?

मला जान्हवीच्या आईचे काम खूप आवडत आहे...कसला स्कोप आहे तिच्या रोलला अॅक्टिंग दाखवायचा...
काहीही हं विनिता.... असे म्हणु नका प्लीज Lol

होसूमीयाघ मालिकेतील नवीन ट्विस्ट!!!!!
जाह्नवीला कळाली आई आजीची तरुणपणातील कुकृत्ये !!!!

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
18rohini-hattangady5.jpg

अन्जु मला वाटतय की मंदार देवस्थळीचा स्मृतीभ्रंश झालाय आणि जान्हवीची स्मृती गेलीय हेच तो विसरलाय... तिथे तिची स्मृती परत यावी यासाठी कोणीही का ही ही करत नाहीये.. मध्ये एक तो पासिंग द पासरचा गेम सोडला तर...

:D, आता त्या सिरीयलची स्मृती जाण्याची कॉपी दुसरी सिरीयल करतेय. ह्याच्यात अजून आली नाही तर त्या सिरीयलमध्ये आताशी स्मृती गेलीय म्हणजे कधी येणार हा आनंदीआनंद आहे. बघायची बंद केली पाहिजे.

सध्या अख्खी सिरियल आपटेच्या वाईटपणावर अवलंबून आहे. तो जर चुकून माकून चांगला झाला तर बंदच पडायची वेळ येईल ही सिरियल.

सध्या आचारसंहिता लागू असल्याने थीम मधे काहीही बदल करता येत नाही लेखकाला किमान १४ ऑक्टो पर्यंत!!

आपटे मतदानासाठी ८ दिवस सुटीवर गेले आहेत

कुठे नेऊन ठेवली आहे ही मालिका…. ! Happy माझी नक्कीच नाही म्हणणार मी! Happy

काय चाललंय सध्या या मालिकेत? कोणी सांगेल का मला? एएलतिगो संपल्यानंतर मी झी मराठीला रामराम केला.
आत्ता एकदम इतक्या प्रतिक्रिया वाचुन हि मालिका अचानक! बंद होते आहे का अशी माझ्या मनात शंका आली.
अजूनही हि मालिका संपण्याची काहिही चिन्हे दिसत नाही आहेत हे बघुन हायसेही वाटले. बाकी चालू द्या. Happy

मालिकेत खूप काही होत आहे सध्या!

पिंट्याची आई नीट वागू शकत नाही आहे. श्रीबाळाला अ‍ॅक्टिंग जमत नाही आहे. पिंट्याला नोकरी टिकवता येत नाही आहे. पिंट्याच्या वडिलांना लंगडल्याशिवाय चालता येत नाही आहे. जान्हवीला दिवस जात नाही आहेत. बेबी आत्या श्री बाळाच्या खोलीत झोपत आहे. जान्हवी जिथे टीचभर जागा मिळेल तिथे लवंडत आहे. श्रीबाळ हॉलमध्ये झोपत आहे. पिंट्याला आपण का आहोत हे समजत नाही आहे.

चला मला आज एकच वाटलं, आता बेफीजी ओळखायला लागले पिंट्याला. नाहीतर पुर्वी पिंट्या कोण, कुठे हे प्रश्न पडायचे त्यांना.

परवा पाहिले तर विसर भोळी आई व तिचा नवरा बेडरुमात टिपर्‍या खेळत होते. ते ही त्या स्टुपिडला नीट येत नव्हते. मग एक दिवस पाहिले तर सर्व महिला वर्ग खुदुखुदू हसतो आहे आणि श्री व जानू टिपर्‍या खेळत होते.

हा अमानवीय आणि वेडगळ छळवाद अजून थांबला नाही का?

शेमडेपणाचा अर्क असलेले हिरो-हिरॉईन्स, कसलाही शेंडाबुडखा नसलेल्या त्या सहा म्हातार्‍या आणि रिटायरमेंट प्लानवाली रोहीणी हट्टंगड्डी, तैमुरलंगाचा अवतार असणारे ते बाबा आणि ललिता पवार असल्याचा आव आणणारी ती आई... सगळ्यांना एक विमानात घाला आणि करा क्रॅश....आवरा!

Pages