विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 16:33

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.

विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?

१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्‍याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?

माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.

अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.

असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्‍या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हालवणे ना?

हलवा म्हणजे गाजर हलवा वगैरे तसे असते ना?

ते पहार्‍यावर सडेतोडांनी मयेकरांना काहीतरी हालवायला सांगितले आहे मुक्ताफळात तिथे रॉबीनहूड का शांत राहिले?

कंपूबाज कुठले!

मोदी म्हणतात महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही.
त्याच दिवशी जावडेकर म्हणतात स्वतंत्र विदर्भाबाबत भाजपची भूमिका बदललेली नाही; म्हणजे स्वतंत्र विदर्भ हवाच आहे.

प्रचारात याबद्दल काही बोललं जाणार नाही असं ज्यांना वाटतं त्यांच्यासाठी

vidarbha.jpg

वेगळ्या विदर्भाबद्दल मोदींच्या स्टेटमेंटवर कोणीही भरोसा ठेवू नये. मयेकरांनी तर आता पुरावाच दिलाय.

तसंही मोदींसारखेच दुसरे गुजरातसुपुत्र महात्मा गांधी फाळणीबद्दल म्हणाले होते फाळणीआधी माझ्या देहाचे तुकडे होतील वगैरे. आणि मग फाळणीला तयार झाले. तेव्हापासून महाराष्ट्र गुजरात सुपुत्रांच्या असल्या आश्वासनांवर ईश्वास ठेवत न्हाय - काय समजलेत!

हो आणि त्यानंतर रा. स्व. सोंगाच्या नथुरामाने गांधीजींच्या देहाची फाळणी केली.

मग हे रा स्व सों आता मोदींचीही फाळणी करेल काय ?

वेगळ्या विदर्भाबद्दल मोदींच्या स्टेटमेंटवर कोणीही भरोसा ठेवू नये. मयेकरांनी तर आता पुरावाच दिलाय.

>> त्या पुराव्याचे काय घेऊन बसलात . उद्या भाजप डिस्क्लेमर देईल हा आमचा कार्यकर्ताच नाही म्हणून. असला तरी त्याला पक्षातून काढून टाकतील . काढला तरी निवडणुकीनन्तर परत घेतील हाकानाका. कोणत्याही बाजारबुण ग्या कार्यकर्त्यावर थोडेच ठरते. मोठ्या नेत्यांचे स्टेटमेन्ट लागते त्याले भाऊ....मंग त्याले पॉलिसी मंतेत.

बाबरी मशीदी नन्तर नाही का ते म्हणाले होते की आमचा याच्याशी संबंध नाही. ( तेव्हा फक्त बाळासाहेबच म्हणाले होते की मला त्याबद्दल माझ्या शिवसैनिकांचा अभिमान आहे. राईट ऑर राँग !)

जे रथी-महारथी मांडवली बादशहांना नाही जमले ते भाजपा करून दाखवणार का?
विकासाबद्दल नाही बोलत आहे हो...
तर राज-उद्द्धव / सेना-मनसे एकत्र येणार का ? का का का ???

सेना-मनसेच कां, सर्वच पक्षांचं सध्यां - " महाराष्ट्राच्या प्रगतिसाठीं कांहींही ! !!! Wink

फक्त सत्ता आणि ती पण महाराष्ट्रात.. सगळे भाषणं ठोकयाला आणि एकमेकांना ठोकयाला इथेच.. हरयानात पण निवड्णुका आहेत हे विसरले.. मनसे/शिवसेना/रा. कॉग्रेस ठिक आहे ओ.. तिथे इथलेच आहेत.. पन भाजप/कॉग्रेस पण.. बडे बडे थेंडे इथेच.. बाकि देश ओस पडला.. जोक आहे ना आणि विचारतात कुठे आहे महाराष्ट्र माझा...

युती तोडून शिवसेनेनी उगाच शहाणपणा केलाय. लोकसभेत अनेक लोकांनी "मोदी सरकार" हवे म्हणून शिवसेनेला मते दिली.. यात शिवसेनेचे कट्टर विरोधक, अगदी भय्ये, बिहारी पब्लिक पण होते. हे यश शिवसेनेचं नसून "मोदी सरकार" च्या आशेचं होतं.
आता बघायचं काय होतं ते.. माझ्यामते निवडणुकीनंतर पुन्हा करतील युती. तेव्हा सर्व "दूध का दूध.." झालेलं असेलच.

वेगळा विदर्भ हा मुद्दा खुद वैदर्भियांसाठी फार महत्वाचा किंवा भावनिक प्रश्न नाहिये.. पण झालाच तर चांगलं असं वाटतं. विदर्भातल्या वीजेवर प.महाराष्ट्रातले सेझ अन साखर कारखाने चालतात अन हिरव्या उसात झुळ्झुळ पाणी वाहते. विदर्भात ना शेतीला पाणी ना उद्योगधंद्यांना चालना. बारामतीकरांना महाराष्ट्र म्हणजे प. महाराष्ट्र एवढंच माहिती.
वेगळा विदर्भ हे त्याचं उत्तर नाही पण वैदर्भियांना माहित्येय की प. महाराष्ट्रातल्या नेत्यांकडून काहीही मिळण्याचे चान्सेस नाहीत, म्हणून वेगळा विदर्भाच आकर्षण.

पवारांएवजी गडकरी-फडणवीस नक्कीच चालतील.

विदर्भातील वीज म्हनजे? ती वीजकेन्द्रे उभारायला उर्वरित महाराष्ट्रातील पैसे खर्च नाही झाले वाटते?द्विदर्भातील प्रजा काम न करनार्‍या , कुरकुरनार्‍या व सतत वेगळे मागणार्‍या शेन्डेफळ भावासारखी आहे. एकदा वेगळे होउ द्याच त्याना म्हनजे स्वबळ कळेल. स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे

<<युती तोडून शिवसेनेनी उगाच शहाणपणा केलाय. >>

आय थिंक शिवसेनेला बीजेपीने 'टाकून' दिलं..शिवसेनेला युती हवी होती. बीजेपीला अर्थात गरज नाहीये शिवसेनेची.

१९९५-९९ बीजेपी होतीच की राज्यात सत्तेत. शिवाय २००४ पर्यंत केंद्रात. तेव्हा का नाही केला विदर्भाचा विकास? गडकरींनी तेव्हा विदर्भांच्या अपेक्षांची 'पूर्ती' केली का Wink

पैसे खर्च झाले तर वीजही मिळाली ना वर्शानुवर्षे? विदर्भाला मिळाली का ती?
कोळसा खाणी विदर्भातल्या, वीजकेन्द्रे विदर्भातली, लेबर विदर्भातलं अन वीज शुगर बेल्टमध्ये!
अजुनही ८ तास लोड शेडिंग अस्तं, त्यात विदर्भातली गरमी. प. महा. तल्या नेत्यांना जरा हिवाळी अधिवेशन सोडून उन्हाळी अधिवेशनात बोलवायला पाहिजे. विथ ८ तास लोडशेडिंग. सगळी मजा कळेल मग. Proud

वेगळा विदर्भ करायच्या आधी जनमत घ्यावे. काही मुठभर नेत्यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या अपेक्षेतुन आलेले स्वप्न म्हणजे विदर्भ वेगळा. विदर्भ म्हणजे झारखंड या तेलंगणा सारखा प्रदेश नाही आहे. (नैसर्गिक संपत्ती समृध्द)
स्कॉटलँड कडे खनिज तेलाचा साठा असुन देखील त्यांनी ब्रिटन मधुन वेगळे होण्यास नकार दिला. त्यामागची कारणे दुरदृष्टीचीच आहे. परंतु इथल्या काही नेत्यांना दुरदृष्टीचा अभाव असल्याने आणि त्यांच्या दृष्टीत मुख्यमंत्रीची खुर्चीच असल्याने ही मागणी सातत्याने होत आहे.
एकदा वेगळा विचार करुन टॅक्सेस, निधीचा ओघ, सगळ्या प्रदेशातील व्यवसाय आणि तिथुन गोळा होणारा निधी . यावर नक्कीच सखोल विचार करावा

अजुनही ८ तास लोड शेडिंग अस्तं....
हे काय फक्त विदर्भातच आहे का? सगळ्याच खेड्या पाड्यात आहे कमीत कमी ६ तास.
नताशा तुमच्या माहीती साठी साखर कारखाने स्वतः वीज निर्मिती करतात त्याला को जनरेशन प्लांट म्हणतात. साखर कारखाने त्यावरच चालतात.ते बाहेरची वीज खुपच कमी वापरतात.

स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे. ह्या एकाच मुद्द्यावर मी भाजपला मत द्यायला तयार आहे अन्यथा नाही... विदर्भापासून उर्वरित महाराष्त्राला मुक्ती मिळालीच पाहिजे

विदर्भापासून उर्वरित महाराष्त्राला मुक्ती मिळालीच पाहिजे>>>>>प. महाराष्ट्रा बद्दल तिट्कारा वाटेल अशा विधाना मुळे..नको please.

मग सध्या काय प्रेमाचे झरे वाहताहेत की काय विदर्भातून अगदी राम हेडाऊ, टी जी देशमुख, मुत्तेमवार, इत्यादींची मुक्ताफळे ऐकली नाहीत काय? प्रत्येक वेळी ब्लॅकमेलिंग आम्ही जातो आम्ही जातो ... तरी १५ वर्षे व ३ मुख्यमंत्री त्याचेच होते... स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे . त्याला स्वतःचा विकास करण्याची संधी दिलीच पाहिजे ...

ही निवडणूक पंचरंगी आहे, सगळ्यांच पक्षांना झोपेतून ऊठल्यासारखी महाराष्ट्राची मेलबोर्न टाईप प्रगती करायची अतीव घाई आणि ईच्छा झाली आहे तर महाराष्ट्राचे

विदर्भ (नागपूर, भंडारा वगैरे)
मराठवाडा (औरंगाबाद, नांदेड वगैरे)
खानदेश (जळगाव, धुळे वगैरे)
पश्चिम महाराष्ट्र (सातारा, कोल्हापूर ,पुणे सोडून)
ऊर्वरित महाराष्ट्र (पुणे, नगर, नाशिक वगैरे)
मुंबई

असे सहा विभाग (तुकडे नव्हेत) करा, मुंबई केंद्रशासित करून बाकी पाच राज्ये लॉटरी पद्ध्तीने पाच पक्षांना वाटून द्या. मग करा म्हणावं तुम्हाला किती प्रगती करायची ते. दोन वर्षानंतर (भारताच्या क्रिकेट टीमसाठी विदेशी कोच आणतात तसे) बाहेरच्या देशातून ऑडिटर्स आणा (अमेरिकास्थित मायबोलीकरांना तसेही काम नसते आणि त्यांचे देशाशी देणेघेणेही काही नसते असे एकमत आहे तर माझ्यामते असे मायबोलीकर अनबायस्ड ऑडिटिंग करू शकतील). बघा कुठल्या पक्षाने सगळ्यात जास्त लोकविकासाची कामे केली आहेत आणि मग निवडणूक न घेता पूर्ण सत्ता देऊन टाका प्रगती करणार्‍या पक्षाला. निदान सत्तेच्या हव्यासापाई दोन वर्षात तरी वीस वर्षात झाली नाही अशी प्रगती करतील.

पण या दोन वर्षात केंद्रशासित असलेल्या मुंबईनेच फक्त प्रगती केली तर मग निवडणूक नं घेता केंद्रालाच सगळी सत्ता देऊन टाकायची का? Wink

Pages