विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 16:33

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.

विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?

१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्‍याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?

माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.

अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.

असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्‍या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राणेंनी कोकणचा कॅलिफोर्निया करून ठेवलाय ना आधीच? नाही का?
नसेल तर मग तुम्ही काढा पक्ष (स्वतंत्र बरंका, युती नाही), तुम्हाला देऊन टाकू की मग कोकण! हाय काय आणि नाय काय.

बहुजन हिताय बहुजन सुखाय.

भाजपामुळे वेगळा विदर्भ होण्याऐवजी इथल्या तिखट प्रतिक्रियांनीं दुखावल्यामुळे ती मागणी खरंच जोर धरेल अशी भिती मला आतां वाटायला लागलीय ! Wink
खरं तर झोपेत असताना माझ्या तोंडावर कुणी पाणी उडवलें तर " कोकणावर अन्याय, कोंकणावर अन्याय !!" ओरडतच उठणारा मीं. पण कामानिमित्त विदर्भात फिरण्याची संधी मिळाल्यावर तिथली लोकमानसातली अन्यायाची भावना समजूं शकलों मीं. विषय खूपच मोठा आहे. पण नेत्यांच्या स्वार्थी अचरटपणाचा राग त्या भावनेची टर उडवून व्यक्त होवूं नये इतकं मनापासून वाटतं. [ महाराष्ट्राची ८०% टक्के वीज विदर्भातून अत्युच्च दाबाच्या तारांमधून मुख्यतः मुंबई व पश्चिम विभागात वापरण्यासाठी आणली जाते, यांत फार अतिशयोक्ती नाहीय. ]

सध्याच्या परिस्थितीत वेगळा विदर्भ नको कारणः

१. मराठी माणूस जरी आम्ही देशाचा विचार करतो म्हणाला तरी इतर लोक आधी आपापल्या भाषेचाच विचार करतात. त्या लोकांच्या मनात भारतीयत्वाचा कन्सेप्ट रुजेपर्यंत तरी मराठी माणसांना स्वतःचे हितसंबंध स्वतःच जपायला हवेत. आणि त्यासाठी एकी हवी. दोन वेगळी राज्ये करुन तुमची ताकद कमी करुन उपयोग नाही.
२. विकास विदर्भ-प.महाराष्ट्र दोन्हीचा झाला नाहीये. त्यासाठी राज्यकर्त्यांची नियत चांगली हवी तसे नेतेच कमी आहेत. प.महाराष्ट्रात लिव्हिंग कंडिशन्स थोडया बेटर असतील पण त्यामुळे देशभरचे लोंढे येऊन बसलेत आणि पुण्यामुंबईत वगैरे रिसोर्सेसवर प्रचंड ताण आहे. मुंबई विकसित असेल पण तिथला मराठी माणूस कोपर्‍यात ढकलला जातोय. म्हणजे नुसता विकास नको त्याची फळं कोणाला मिळतात ते बघायला हवं. त्याअर्थी प. महा.तल्या नेत्यांवर प.महा.मधले लोकही चिडलेलेच आहेत.
३. एकंदरित सगळेच पक्ष चोर अशी परिस्थिती असताना प्रादेशिक पक्षांना टिकवायला हवं नाहीतर राष्ट्रीय पक्षात तुमच्या राज्यातल्या लोकांचा कंट्रोल हवा. सध्या बीजेपीवर मोदी-शहांचा कंट्रोल आहे. ते पहिला गुजरात्यांचाच विचार करतात. प्रादेशिक पक्ष मजबूत हवे असतील तर राज्याचे दोन तुकडे होऊन कसं चालेल?
४. नुसता विदर्भ वेगळा होऊन हे नक्की थांबणार नाही. यातून मग अनेक छोटे छोटे तुकडे होतील. नुकसान त्या प्रत्येक तुकडयात राहणार्‍या मराठी माणसांचंच होईल.
५. प. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी काही केलं नाही म्हणणारे लोक विदर्भातले तीन मुख्यमंत्री आणि गडकरींसारखे नेते स्वतःकडे सत्ता असताना काय करत होते याचा विचार करतील का?

चमन च्या पोस्ट ने खरचं कोकणावर अन्याय झालाय.. चमन ते मुंबई खोडुन कोकण करावे. कारण मुंबई , ठाणे, रायगड, रत्नागीरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्हांच्या समुहाला कोकण म्हणतात.
त्यामुळे सगळे वेगळे झाले तर कोकण हे राज्य होइल.. मुबई नाहि
Dolo.gifDolo.gifDolo.gif

चला आता सर्व वेगळी राज्ये झाली तर मुंबइ कोणाची या वादाला तोंड फुटले.. lol.gif

<< ५. प. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी काही केलं नाही म्हणणारे लोक विदर्भातले तीन मुख्यमंत्री आणि गडकरींसारखे नेते स्वतःकडे सत्ता असताना काय करत होते याचा विचार करतील का?>> मुद्दा हाच आहे कीं केवळ एखाद्या भागातला मुख्यमंत्री असणं याचा त्या भागाची प्रगति होणं याच्याशीं संबंध जोडणंच चूकीचं असावं. विदर्भाचंच कशाला, अगदीं शंकरराव चव्हाणांसारख्या कार्यक्षम व खंबीर मुख्यमंत्र्यापासून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण हे मु.मंत्री मराठवाड्यातले व तसंच अंतुले, राणे हे कोकणातले; त्यामुळें काय सोनं झालं या दोन विभागांचं ? केवळ 'वेगळं राज्य होणं' हाही अर्थात प्रगतिसाठी तितकाच निष्फळ उपाय असावा. राज्याच्या प्रत्येक विभागाचीं कांहीं खरीखुरी गार्‍हाणी असलीं तर तीं दूर करण्याला खरंखुरं प्राधान्य देणं, हें महत्वाचं व नेमकं हेंच होताना दिसत नाही. त्या विभागातला मुख्यमंत्री करणं, विभागीय 'बॅकलॉग'साठी समिती नेमणं इ. फसव्या मलमपट्ट्या लावण्याचंच काम होतंय असं वाटतं. [विभागीय 'बॅकलॉग'वर केलेल्या अहवालांचाच एक मोठा 'बॅकलॉग' तयार झाला असावा ! ]
नाईलाजाने कराव्या लागलेल्या विषयांतराबद्दल क्षमस्व.

मतदानाच्या आदल्या दिवशीचा अंदाज

भाजपा = ९५-१००
शिवसेना = ६०-६५

सत्ता = शिवसेना-भाजपा युती
मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री - ????

फक्त दोन्ही पक्षांनी अक्कल आपल्या जागी आणि अहंकार आपल्या जागी ठेवायची गरज.
भाजपाने मध्यंतरी मोदींच्या भाषणांच्या जीवावर मुसंडी मारलीय खरी, पण तरी महाराष्ट्रात स्वबळावर ते पुर्ण बहुमत नाही मिळवू शकणार, बाजारात भाजपा १३०+ दाखवणारे काही फेक पोल फिरत आहेत त्यावर जाऊ नका.
तरीही युती तोडल्यानंतर ते शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळवून युतीमध्ये क्रमांक एकचे स्थान पटकावण्यात यशस्वी होतील, आणि यातच समाधान मानतील असे चित्र सध्या तरी दिसतेय.

राव हसण्यापेक्षा आपला अंदाज मांडा की .. क्रिकेट असो वा राजकारण वा बॉक्स ऑफिस माझे ८०-८५ टक्के अंदाज बरोबरच येतात.

<< फक्त दोन्ही पक्षांनी अक्कल आपल्या जागी आणि अहंकार आपल्या जागी ठेवायची गरज.>>
प्रचारात भाजपाने शिवसेनेबाबत बोलताना बराच संयम पाळला असला तरीही सेनेच्या नेतृत्वाने मात्र भाजपाबाबत 'पाठीत खंजीर खुपसला', 'अफझलखान' इ.इ. भडक वक्तव्यं सर्रास वापरलीं आहेत [ तीं समर्थनीय आहेत किंवा नाहीत हा मुद्दा वेगळा]. त्यामुळे, निवडणूकीनंतर युति पुन्हा होईल ही शक्यता भाजपा जोपासत असली तरी शिवसेना मात्र आतां दोर कायमचे तुटले यावर ठाम दिसते आहे. शिवाय, मुख्यमंत्रीपद हाच खरा कळीचा मुद्दा युति व आघाडी तुटण्यामागे होता, हें अधिकाअधिक स्पष्ट होत असताना नविन युति/आघाडी घडणं व न घडणंही त्याच मुद्द्यावर बव्हंशीं अवलंबून राहील असं वाटतंय. पण...निवडणूकीचे निकाल अनपेक्षित असूं शकतात व राजकारणातल्या कोलांट्या उड्यांमुळें कांहींही घडूं शकतं, हें आहेच !

माझे खालील प्रश्न आहेत कृपया एका वाक्यात उतर दया
1) आज तुम्ही दोघे मराठीच्या नावावर निवडणु क लढताय मग मराठी माणसा साठी एकत्र येउन का लढत नाहीत ?
2) आज तुमची 40 वर्ष सता आहे मग तुम्ही मुंबई मधल्या मराठी माणसा साठी काय केलत ते पण तुम्ही निवडणु कित का सांगत नाही?
3) तुम्ही सारखे महाराज चे दाखला देता मग महाराज साठी तुम्ही काय केलात त्यांचे किल्ले बुरुज टिकून ठेवण्याकरीता तुमच्या पार्टी ने काय केल?
3) आज 40 वर्षंा पासून मुंबई मधे तुमची सता आहे का तुम्ही चांगले रस्ते का देऊ शकला नाही, 24 तास पाणी का देऊ शकला नाहीत? मराठी तरुणांना रोजगार का देऊ शकला नाही? बाहेरचे लोंडढे थांबवू शकला का नाही झोपडपाट्टया कमी करू शकला का अशी सेम कंडीशन कल्याण डोम्बिवली मधे आहे आता म्हणल की ही काम स्टेट सरकारची आहे मग तुमची काम काय होती ती पण जनतेला सांगा?
4) आज जो मराठी माणुस संकटाला तुमच्या मागे उभा राहताे, त्याला त्याची स्वताची मुंबई असून सुद्धा घर घेता येत नाही मग त्यांच्या साठी तुम्ही काय केल ते पण सांगा?
5) हिंदुत्वावरुन तुम्ही मोदिन्वर टिका करता तुम्ही स्वता बाळासाहेब गेल्यावर हिदूं साठी काय केलत?
६) राज ठाकरे तुम्ही स्वता मोठे बिल्डर अहाता का नाही तुम्ही बोलत की मी bulding बांधेन तिथे फक्त मराठी लोक रहातील ?
७) आज उद्धव साहेब तुम्हाला बाळा साहेबान कडून वारसा आला आहे ठीक आहे मग तुम्ही अदित्यलाच का युवाचे अध्यक्षपद दिलत? आज तुमचा पार्टीसाठी स्वतःचे जीव देणारे कार्यकर्त आहेत त्यंा चा मधला का नाही कोण दिसला तुम्हाला?
7) तुम्ही भावनिक अावाहन करुन का निवडणु क लड्वत आहात तुम्ही विकासाच्या मुद्यावर का लढ्वत नाही?
8) तुम्ही स्वताला शिवाजी महाराजांचे वंशज समजता मग स्वता का नाही निवडणुक लढवत ?
9) राज साहेब मोदिवर टिका करता पण तुम्ही नाशिक मधे अडीच वर्ष झाली तुम्हाला काय काय केलात ते पण सांगा?
10) मागच्या निवडणुकित तुम्ही छगन भुजबल ची नकल करीत होत ती आता का नाही करत?
11) मागच्या इतक्या वर्ष त तुम्ही दोघांनी मराठी साठी किती अान्दोलन केलीत आणि त्यातली कीती यशस्वी झाली ?
12) राज साहेब तुम्ही भाजप ला युति तुटल्या वरुन आरोप करता मग तुम्ही स्वता का बाळा साहेबाना साेडलत?
13) मागच्या निवडणुकित तुम्ही उतर भारतीयांना लक्ष्य केल होतत मग आता गुजराती ना केलत का मुंबई मधले उतर भरतीय संपले का?
कृपया सर्व प्रश्नांची उतरे लिहिणे अनिर्वाय आहे

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

काँग्रेस-राष्ट्रवादी हा मरून पडलेला साप आहे. त्या सापापासून धोका नाही. त्यामुळे आमच्या एकेकाळच्या मित्राचे ढोंग जनतेसमोर आणणे हेच राज्याच्या हिताचे आहे, असं सांगून भाजपच आपला 'खरा शत्रू' असल्याचं शिवसेनेनं आज स्पष्ट केलं आहे.

मला इंडिया शायनिंग आणि फील गुडची आठ्वण येते आहे. तेव्हाही भाजपचे नेते असेच तोर्‍यात होते व प्रचंड माज करत होते जो जनतेने बरोबर उतरवला होता. आताही अमित शाह व मोदींना जाणीव करुन दयायची गरज आहे की महाराष्ट्र एक स्वतंत्र राज्य आहे व तुमच्या गुजरातचं मांडलिक राज्य नाही.

आळशी विदर्भातल्या लोकांना वेगळे च काढा. त्यांचा भार वाहुन फार त्रास झाला बाकीच्यांना इतकी वर्ष. राहुंदे झोपुन त्यांना.

त्या मराठवाड्याला पण वेगळे काढा. पाहीजे तर तेलंगणाला जोडा. कीती गलिछछ आहे.

<<काँग्रेस-राष्ट्रवादी हा मरून पडलेला साप आहे.

....

मग सेना भाजप हे जिवंत साप आहेत की काय ?>>

मेलेला काय.. आणि जिवंत काय शेवटी सापच ते..कसाही असला तरी डसनारच.. Dolo.gif

मला वाटते भाजप मधील चांगली लोक निवडुन येतील पण बाजी मात्र शिवसेना मनसे यांपैकी मारतील .माझ्या भागात चांगले काम करणारा निवडुन यावा असे मनापासुन वाटते.मग तो कुठल्याही पक्षाचा असावा .पण मुंबईकर असल्यामुळे व निवडनुकीनंतर दोघे भाउ एकत्र येउन चांगला विकास करतील असं वाटतं.नकळ्त्या वयात प्लॅस्टिकचा धनुष्यबाण ड्रेसवर चिकटवून फिरल्याचा परिणाम असावा.
महाराष्ट्रात मात्र कोणाची सत्ता येणार माहीत नाही.

बाकी << जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्‍या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल>>>> मलापण ,फक्त मी घरच्यांना इम्प्रेस करण्याचा हेतु आहे.
सर्वांनी आज मतदान नक्की करा.

हे पुढारि लोक लोकांसाठी कामे करत्तात म्हणजे काय करतात ? स्वतःच्या पैशातून करतात काय? लोकांच्याच पैशातून य्त्यांच्यासाठी आपले कमिशन काढून घेउन कामे करणे यात काय टिमकी वाजवायची? हे तर व्यापारी ही करतात...

सिनि, प्रामाणिक पोस्ट
दिवसाच्या अखेरीस, तुमच्या आमच्यासारखे लोकच ठरवणार आहेत महाराष्ट्राचे भवितव्य Happy

नकळ्त्या वयात प्लॅस्टिकचा धनुष्यबाण ड्रेसवर चिकटवून फिरल्याचा परिणाम असावा.
>>>>
हे वाक्य मात्र भूतकाळात घेऊन गेले Happy

एक्झिट पोल चे निकाल अनपेक्षीत ....
भाजप+== १२०-१५१
सेना ==५५ - ७७
भा रा. काँ. ==२३ - ३६
रा.काँ ==२७-३६
म नसे = ५ - १२
इतर ३==१२
शत प्रतिशत नसला तरी भाजप शिवाय सरकर बनवण्याची कोणाची ही संख्या दिसत नाही.

हे एक्झिट पोल ३ वाजेपर्यन्तच्या मतदानावर आधारित आहेत आणि ३ नन्तर बरेच मतदान झाले आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष राहील एवढेच त्यात तूर्त ग्राह्य धरण्यासारखे आहे...

भाजप पूर्ण बहूमताने वा अपक्ष किंवा मनसेच्या साथीने सत्तेवर आल्यास आणि शिवसेना दुसरी मोठी पार्टी म्हणून निवडून आल्यास

१) मुख्यमंत्री बनण्याच्या अति महत्त्वाकांक्षेपायीच ऊद्धव ठाकरेंनी जास्तीच्या जागांसाठी युती तोडली. लोकसभा निवडणुकातला मोदी फॅक्टर पूर्ण अंडर एस्टिमेट केला आणि तयारी नसतांना ऐनवेळी मोठा घास घेण्यास सेनेला भाग पाडून शिवसैनिकांवर पराभव थोपला, असे म्हणत भाजप ठाकरेंना शिवसैनिकांच्याच नजरेत पराभवाचे धनी ठरविल का?

सत्तेवर आल्यानंतर प्रादेशिक भाजपनेते, पक्षावर आणि विशेषतः मोदींवर शिवसेनेकडून आणि सामनातून शेवटच्या काही दिवसात झालेल्या टीकेचे येनेकेन प्रकारे रिटॅलिएशन करतील(च) हा एक होरा.

२) १५ दिवसांपूर्वी सत्ता युतीचीच म्हणत प्रचंड आत्मविश्वासाने आणि ऊत्साहाने प्रचार करणारे शिवसैनिक आता भाषणांचा ओघ संपल्यावर सत्य परिस्थितीचा धक्का कसा पचवतील? सेनेचे पक्षश्रेष्ठी ही परिस्थिती कशी हाताळतील?

३) 'आता मीच शिवसेनेच्या बहुमताने येणार्‍या सरकारचा मुख्यमंत्री ' म्हणत दंड थोपटणारे ऊद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याच्या बाकावर बसतील का?

मीही कॉग्रेसचं तण नष्टं होऊन सेना-भाजपचे सरकार येणार ह्याच आनंदात होतो पण मागच्या काही दिवसातली सेनेची एकंदर रणनीती बघता, भाजपला सेनेशी किंवा कुणाशीही पुन्हा युती करायला न लागून पूर्ण बहूमत मिळावे अशीच अपेक्षा आहे.

वृत्तवाहिन्या काल उद्धव ठाकरेंचं कौतुक करत होत्या. या पहिल्याच निवडणुका ज्या त्यांनी स्वतःच्या नावावर लढवल्या. आधी बाळासाहेब होते, लोकसभेला मोदी होते. त्यामुळे जर त्यांनी एक्झिट पोलमध्ये वर्तवल्यानुसार ७५-८० जागा जिंकल्या तर ही शिवसेनेची आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी असेल.

बाकी, जनतेने दोनपैकी एका सेनेच्या हाती नारळ दिला तर बरे होईल.

Pages