विधानसभेत भाजपा विरुद्ध शिवसेना झाल्यास कोण मारेल बाजी?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 August, 2014 - 16:33

सर्वप्रथम नमूद करू इच्छितो, राजकारणासंबंधी एक्स्पर्ट कॉमेंट देणे हा माझा प्रांत नाही तर उगाच उसना आव आणायचा नाहीये. सध्या आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर दोन गटात (खरे तर तीन गटात) पेटलेल्या चर्चेला इथे घेऊन आलोय.

विषय आहे - जर भाजपा आणि शिवसेनेत बिनसले आणि निवडणूकपूर्वी युती तुटली तर निकालात बाजी कोण मारेल?

१) मोदींच्या पुण्याईवर (कर्तुत्वावरही बोलू शकतो) भाजपा सरस ठरेल?
२) बाळासाहेबांच्या महाराष्ट्रात मराठी माणूस आजही शिवसेनेच्या बरोबर उभा राहील?
३) दोघांत भांडण तिसर्‍याचा लाभ, (ज्याची शक्यता फारच कमी दिसतेय सध्या) ?

माझे मत - मी लोकसभेत मोदींना बघून भाजपाच्या पारड्यात टाकले असले तरी विधानसभेत मराठी माणसांचा (म्हणवणारा) प्रादेशिक पक्ष शिवसेनेलाच प्राधान्य देईन. माझ्यामते बहुतांश मराठी माणूस उघडपणे कबूल करो वा न करो ऐनवेळी धनुष्यबाणावरच शिक्का मारून येईल. यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालानंतर पुन्हा युती होऊन ते भाजपाच्या सपोर्टवर सरकार स्थापतील. जेणेकरून केंद्रातील भाजपा सरकारशीही सूत जुळून राहील आणि महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा येणार नाही.

अर्थात, बाळासाहेबांनतर शिवसेनेने जनतेचा विश्वास बरेपैकी गमावला असूनही दोघांमधील एक पर्याय निवडताना जनता आपले मत शिवसेनेच्या पारड्यात टाकेल. त्यामुळे मोदी यांच्या नावाची कितीही हवा झाली असली तरी भाजपा केवळ दबावतंत्र अवलंबवेल मात्र युती तोडायची हिम्मत ते शेवटपर्यंत दाखवणार नाहीत.

असो, याउपर युती फुटल्यास इतर मित्रपक्ष तसेच मनसे वगैरे काय कोणाशी युती करतील आणि काय नवीन गणिते बनतील यावर जाणकारांनी आपली मते मांडली तर त्यातील काही मुद्दे मला आमच्या ग्रूपवर टाकून राजकीय चर्चेत कच्चा लिंबू समजल्या जाणार्‍या माझ्या स्वताचा भाव वधारता येईल.

आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>निजामशहा, अदिलशहा काय तोडांला येईल ते बरळत सुटलेत. म्हणे दिल्लीवरुन अफजल खान महाराष्ट्र जिंकायला आलाय,<<< + १
<<
<<
बेफीजी तुम्हालाही असेच वाटतेय की दिल्लीवरुन अफजल खान महाराष्ट्र जिंकायला आलाय?
तुम्ही +१ दिलाय म्हणुन विचारतोय. Happy

मी फक्त टोपी फेकली आहे.
मी मर्द आहे. मावळे माझी भवानी तलवार आहेत. मला आता टोपी नको आहे. आता आई भवानी चा प्रसाद म्हणून मी पगड़ी घालणार.......उद्धव ठाकरे.
<<
<<

या उद्धव ठाकरेंना, प्रत्येक जाहीरसभेत 'मी मर्द आहे' हे का सांगावे लागतेय?

गेल्या आठवड्यात ठाकरे बोल्ले होते भाजपा और्ङ्गजेब आहे.

आता अफजलखान !

यांच्या या उपमांमुळे आता खुद्द. महाराजांबद्दलच शंका वाटु लागेल

म्वी मर्द आहे ..

...

औरत निवडणुक जिंकु शकत नाही का ?

या मर्द च्या परमपुज्य पिताजीनी १ ९७८ साली एका औरत बरोबर युती केली होती. तिच्या म्हणजे इंदिराबैंच्या जिवावर सेना लोकसभेला जिंकली होती ( आणि नंतर आयुष्यभर हे त्याच औरतला शिव्या घालत होते ! आज मर्दराव भाजपाबाबतीत हेच करत आहेत. )

या मर्द च्या परमपुज्य पिताजीनी १ ९७८ साली एका औरत बरोबर युती केली होती. तिच्या म्हणजे इंदिराबैंच्या जिवावर सेना लोकसभेला जिंकली होती
<<
<<
तुडतुडकर साहेब तुमच्या माहीतीमध्ये काहीतरी लोच्या आहे. १९७८च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेजशी युती करुनही शिवसेनेला एकही खासदार निवडुन आणता आला नाही.

माझी माहिती चुकीची असेल तर त्यात दुरुस्ती करा.

http://www.livemint.com/Politics/VbrxNc2FSZuGroknO7I97M/The-anatomy-of-a...

काँग्रेस , इंदिराबै , मुस्लिम लीग , पवार ... भाजपा , रिपब्लिक .... सेना सवाष्ण जेवणाला सगळीकडे जाऊन आली आहे !

तुडतुडकर साहेब तुमच्या माहीतीमध्ये काहीतरी लोच्या आहे. १९७८च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेजशी युती करुनही शिवसेनेला एकही खासदार निवडुन आणता आला नाही.
<<
<<
१९७८ ऐवजी १९८० असे वाचावे.

धन्यवाद मयेकर.

सगळे पक्ष सगळीकडे युती करतात.
भाजपाने न की आता ५०-५५ काँग्रेस-राष्टृवादी उमेदवार आयात केलेत, तर ते लोकसभेच्या वेळी सुद्धा शरद पवार यांना घेण्यास उत्सुक होते, ज्याला शिवसेना आणि इतर मित्रपक्षांनी विरोध केल्याने ते बारगळले.

अर्थात आताही भाजपा युती तोडून स्पष्ट बहुमत मिळवू शकणार नाहीच, जास्तीत जास्त ९५-१०० जागा!
तर ते युती पुन्हा सेनेशी करतील की राष्ट्रवादीशी हे बघणे रोचक !

सेना + राष्ट्रवादी यायची शक्यता वाटतेय. लोकलाईट व्हर्सेस नॅशनलाईट्स Wink
आदित्य ठाकरे मुमं बनायच्या वयात आलेत की नाहीत अजून?

विजय आंग्रे, आपल्या दिलेल्या लिंकवर एक पोल आहे त्यानुसार

शिवसेना - १६९३ मते
भाजपा - १०७९ मते
मनसे - ६३९ मते Uhoh
राष्टृवादी - १५७ मते
काँग्रेस - १०७ मते
ईतर - ३६ मते

मुंबईचे माजी पोलीस कमिशनर कालच्या सभेत उत्तर भारतीय मतदारांना राजीव गांधींच्या मुलाचे नाव काय? असे विचारत होते. त्यांना राहूल हे नाव नको होते.

सुसंस्कृतपणा आणि असंस्कृतपणाबद्दल यांची काही ठाम मते आहेत म्हणे.

संघाने महाराष्ट्र प्रचारातून अंग काढून घेतलंय म्हणे!

संघाने आपली सगळी यंत्रणा राबवून मोदींना जिंकून दिलंय पण आता मोदीच संघाला डोईजड झालेत. अमित शाह बीजेपी अध्यक्ष व्हायला संघाला नको होता. पीएम आणि पार्टी प्रेसिडंट दोघे एकाच राज्यातून-गुजरातमधून नकोत म्हणून. शिवाय अमित शाह संघाच्या हातातलं बाहुलं बनून राहणार नाही म्हणून.

आता संघ जर प्रचारात उतरला नाही तर बीजेपीचं कठीण आहे.

संघाने महाराष्ट्र प्रचारातून अंग काढून घेतलंय म्हणे!
<<
<<
अस काही नसतय हो वेदिकाजी, ब्रेकींग न्युजवाल्यां पत्रकारांच्या करामती असतात, ह्या असल्या बातम्या.

प्रत्येक जाहीरसभेत 'मी मर्द आहे' हे का सांगावे लागतेय? >>> ५६" छातीचा उल्लेख पण मर्दांंनेच केला होता नां??

पप्पु अजुनही झोपेत आहे बहुतेक, लोकसभेतल्या दारूण पराभवानंतरही राहुल गांधीला आपण विरोधी पक्षात आहोत असं अजूनही वाटत नाहीये.

कारण आजच्या महाडच्या सभेत बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव न घेता विरोधी पक्षनेते 60 वर्षात काहीच प्रगती झाली नाही असं म्हणातात. अशी टीका केली. तसंच विरोधी पक्ष काँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा करतोय असंही त्यांनी मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन सांगितलं.

Pages