शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
बर्याच ठिकाणी, लग्न मुन्ज इत्यादी कार्यक्रम, देवळात भटजीसमोर, घरच्याघरी वडीलधारे पाहुणे आले असता, हल्ली हल्ली तर टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधे देखिल, अनेक "ज्युनिअर" त्यान्च्या सिनियर्सना वाकून नमस्कार करताना दिसतात.
ते तसे वाकून नमस्कार करत अस्ताना, ज्यान्ना ते तो नमस्कार करतात, त्या व्यक्तिन्चे वागणे व्यक्तिनुरुप इतके तर्हेवाईक असते की माझ्या सारख्याला वाटेल "XX मारली अन यान्ना नमस्कार केला". काय कारण असे वाटण्याचे?
तर एखाद्याने वाकून नमस्कार केल्यानन्तर, त्याचे दुनियेला ऐकु जाईल इतक्या खणखणीत आवाजात अगदी जरी नसले, तरी नमस्कार करणार्या व्यक्तिला ऐकु जाईल इतपत मोठ्याने "अभिष्टचिन्तनात्मक आशिर्वचन" उच्चारण्याची अक्कल्/कुवत ज्यान्ची नाही, त्यान्नी दुसर्यास वाकवुन नमस्कार तरी का करवुन घ्यावा? नै का?
यावर अधिक विचार करता माझ्या असेही लक्षात आले की, दुसर्यास नमस्कार करावा, उभारुन वा वाकून वगैरे शिकवले जाते, पण दुसर्याच्या नमस्काराप्रित्यर्थ, त्या बदल्यात त्या व्यक्तिचे वयानुरुप ज्येष्ठतेस धरुन कसे अभिष्टचिन्तन करावे हेच शिकवले जात नाही. येऊन जाऊन गेल्या शतकभरात लोक "थ्यान्क्यु" येवढेच शिकलेत असे केवळ वाटत नाही तर अनुभवलय!
साला मी नमस्कार केला वाकून, तर समोरील व्यक्ती म्हणते "थ्यान्क्यू"
अन मी आशिर्वाद दिला तरी तेच... थ्यान्क्यू!
आता या तर्हेला काय म्हणाव?
वाकुन नमस्कार घेताना, कुणी नुस्त कैतरी पुटपुटतं, कुणी हात उन्चावल्यासारख करत पण हात कोपरातुन मोडल्याप्रमाणे हालचाल होते, कुणाचे तिकडे लक्षच नस्ते, एकतर दुसर्याकुणाशी बोलत असतात किन्वा फोटोग्राफरकडे बघताना काही बोलायचे विसरुनच जातात, कुणी अहन्कार सुखावल्याप्रमाणे महा आढ्यतेखोरीने वाकलेल्या बकर्यान्कडे अन जमलेल्या गर्दीकडे बघत असतात.
काही निवडक सोवळे, स्वतःचेच पाय मागे ओढत नको नको करत नमस्कार घेण्याचे टाळतात.
याला अपवाद भटजी देखिल नस्तात (हे दुर्दैव).
लिम्बीचे बाबा वगळता, खणखणीत आवाजात सु:स्पष्टपणे आशिर्वाद देणारी व्यक्ती अजुनही माझ्या पहाण्यात आलेली नाही!
हे कशाचे द्योतक?
खिशातली फुटकी कवडी देखिल दुसर्यांस न देण्याची व्रुत्ती आशिर्वाद देण्यापासून परावृत्त करते?
की आशिर्वचने व ती यथायोग्य पणे देण्याची पद्धतच शिकवली जात नाही?
अर्थात मुद्दामहून शिकवणी लावुन शिकण्यासारखी ही गोष्त नाहीच, पण एखाद्या व्यक्तीला केलेल्या नमस्काराबद्दल उत्कृष्ट आशिर्वादाचा कधी अनुभवच आलेला नसेल तर ती व्यक्ती अनुभवातुन तरी शिकणार काय? अन काहीच शिकायला, निदान आशिर्वचन ऐकायला मिळणार नसेल, तर नमस्कार करणार्यास तो "जाचच" वाटला तर विशेष ते काय?
आपल्याला काय वाटते?
(क्रुपया थोताण्डपन्थियान्नी इकडे लिहीण्याची तसदी घेऊ नये ही णम्र विणन्ती)
[आज हा विषय डोक्यात आला, कारण काल अन आज tonaga मला नमो नमः म्हणतोय, तर तत्काल मी आशिर्वचने टाईप केली, अन त्यावरुन वरील रामायण लक्षात आले]
पोटुशी असलेल्या एका बाईला
पोटुशी असलेल्या एका बाईला लग्नसमारंभात सर्व ज्येष्ठांच्या पाया पडायला एका बिनडोक नव-याने भाग पाडले. रात्री पोटात दुखायला लागले. दुस-या दिवशी जवळपास दवाखाना नाही न काही नाही. बाई आणि बाळ दोन्ही गेलं.
पोटुशी असलेल्या एका बाईला
पोटुशी असलेल्या एका बाईला लग्नसमारंभात सर्व ज्येष्ठांच्या पाया पडायला एका बिनडोक नव-याने भाग पाडले. रात्री पोटात दुखायला लागले. दुस-या दिवशी जवळपास दवाखाना नाही न काही नाही. बाई आणि बाळ दोन्ही गेलं.
----- येथे नवराच नाही तर नमस्कार घेणारी प्रत्येक जेष्ठ व्यक्ती पण तेव्हढीच बेजबाबदार आहे....
बाकी लेखाबद्दल नो कमेंट ,
बाकी लेखाबद्दल नो कमेंट , शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ,
पोटुशी असलेल्या एका बाईला लग्नसमारंभात सर्व ज्येष्ठांच्या पाया पडायला एका बिनडोक नव-याने भाग पाडले. रात्री पोटात दुखायला लागले. दुस-या दिवशी जवळपास दवाखाना नाही न काही नाही. बाई आणि बाळ दोन्ही गेलं. >>> यात बिनडोक नव-याने हे महत्वाचे .
उगाच कुठूनही कुठेही जायचे
नमस्कार फुकाचा घ्यायचा नसतो
नमस्कार फुकाचा घ्यायचा नसतो त्या व्यक्तीला उलटा नमस्कार करायचा असतो असे म्हणतात . तसेच माणसातला उद्धटपणा, अहंकार मागे टाकून लीन होणे शिकावे ह्यासाठी पूर्वीची नमस्काराची पद्धत असावी का असे वाटते .
गाडगेबाबांना पाया पडलेले आवडत
गाडगेबाबांना पाया पडलेले आवडत नसे. म्हणजे स्वतःला इतरांकडून पाया पडवून घेणे अशा अर्थाने. असे त्यांच्या वरील असलेल्या पुस्तकात वाचले होते.त्या विचाराचा माझ्यावर कुठतरी परिणाम आहे. कधी कधी नात्यातील मुले वयाने कनिष्ठ लोक धार्मिक सणा प्रसंगी माझ्या पाया पडतात. तेव्हा मी अरे नको! असू असू दे असे म्हणून दूर व्हायचा क्षीण प्रयत्न करतो पण तोपर्यंत त्यांचे पाया पडून झालेले असते. त व्यक्ती पाया पडल्यावर आपण त्याच्या आदरास पात्र राहू ना? अशी शंका / भय देखील वाटते.
आपण त्याच्या आदरास पात्र राहू
आपण त्याच्या आदरास पात्र राहू ना? अशी शंका / भय देखील वाटते.
>> मलाही हे नेहमीच वाटते. शिवाय "आपण पाया पडणार्यापेक्षा फक्त वयाने मोठे आहोत यात पाया पडुन घेण्याइतके काय कर्तुत्व?" असंही वाटतं.
>>>>> पोटुशी असलेल्या एका
>>>>> पोटुशी असलेल्या एका बाईला लग्नसमारंभात सर्व ज्येष्ठांच्या पाया पडायला एका बिनडोक नव-याने भाग पाडले. रात्री पोटात दुखायला लागले. दुस-या दिवशी जवळपास दवाखाना नाही न काही नाही. बाई आणि बाळ दोन्ही गेलं.<<<<<
>>>> उगाच कुठूनही कुठेही जायचे अरेरे <<<
केदार, बरोबर, अनुमोदन.
बिनडोक नवरा/नातेवाईक्/लोक हे महत्वाचे दोषी, आपल्या बायकोची अवस्था लक्षात न घेता कोणी पोटूशी बायकोला वाकून नमस्कार करायला लावत असेल तर त्यास धर्मशास्त्र किन्वा नमस्कार करण्याची पद्धत कशी काय दोषी?
धर्मशास्त्राप्रमाणे पोटुशीबाईला विशिष्ट महिने झाल्यावर धर्मकार्यात सहभाग घेण्यास टाळण्यासच सांगितले आहे, अनेकजण ही प्रथा पाळतात.
<<माणसातला उद्धटपणा, अहंकार
<<माणसातला उद्धटपणा, अहंकार मागे टाकून लीन होणे शिकावे ह्यासाठी पूर्वीची नमस्काराची पद्धत असावी का असे वाटते >> नक्कीच. पण केवळ नमस्कार केल्याने कोणी उद्धटपणा सोडत नसतं.
नमस्काराच्या पद्धतीमागे काही तरी शास्त्र आहे म्हणे - एनर्जी ट्रान्सफर असे. खरे खोटे एनर्जीच जाणे.
मुळात कोणाला नमस्कार करा हे फोर्स करायला नाही लागलं पाहिजे. हे ज्याच्या त्याच्या मनातून आलं पाहिजे. जिथे भाव असतो तिथेच देव असतो ह्या प्रमाणे जर तशा भावना असतील तर आतूनच वाटतं वाकून नमस्कार कराव आणि केला जातो. समोरचा कोणी मोठा आहे ह्या कारणाकरता तर तो भाव येत नाही ना? आणि भाव मुलात नसेलच तर तो उगाच दाखवायचा कशाला?
माझ्या पाच वर्षाच्या मुलाला मी अजून तरी वाकून नमस्कार करायला शिकवलं नाही. तो जेव्हा आम्हाला / इतर कोणाला पाहिल तेव्हा आपसूकच प्रश्न विचारेल आनी त्यातून त्याला जो बोध घ्यायचा तो घेईल.
कोणी कोणाला वाकून नमस्कार करत नाही म्हणून उद्धट नाही ठरत ना
टाईट कपड्यांची फॅशन येऊन गेली
टाईट कपड्यांची फॅशन येऊन गेली होती मध्यंतरी. त्याचा सो फाईन इफेक्ट असेल.
मला सगळ्या मोठ्या माणसाना
मला सगळ्या मोठ्या माणसाना वाकून वगैरे नमस्कार करायची सवय होती. एकदा असच कुण्या लाबच्या ओळ्ख असलेल्या आजोबाना वाकून मी नमस्कार केल्यावर त्याना काय वाट्ल कुणास ठाउक(बहुदा मुलगी फार शालीन वाट्ली असेल) त्यानी माझ्या लग्नासाठी एक स्थळ्च सान्गितल..आणि मागच लागले...मी तेव्हा जस्ट college जोइन केल होत......... असला शॉक बसला ना त्याचा तेव्हा पासून पाया पड्णे एकदम बन्द ............फारच वाट्ल तर कधीतरी घ्ररच्याच्या पाया पड्ते ......त्यानापण बर वाट्त

संस्कारांवर अवलंबून आहे हे
संस्कारांवर अवलंबून आहे हे पुर्णपणे.
मी नोकरीनिमित्त तसा घराबाहेरच असतो. पण घरी असलो की देवपूजा केल्यावर न चुकता आई-बाबांच्या पाया पडतो.
आजकाल बर्याच लोकांन कंबरदुखी
आजकाल बर्याच लोकांन कंबरदुखी असते.
झंपी माते, वाकुन नमस्कार
झंपी माते, वाकुन नमस्कार केल्याने कमरेचा व्यायामही होतो.
ज्यांना कंबरदुखी त्यांनी तर आवर्जून वाकुन नमस्कार करावा.
कंबरदुखीचा त्रास कमी होईल.
उभ्याचा परस्परां 'नमस्कार' हा
उभ्याचा परस्परां 'नमस्कार' हा समतावादी शिष्टाचार आहे.
'वाकून एकांगी नमस्कार' हा करणाऱ्या/रीचा विनय/क्लीव्हेज दर्शवितो.
तर ज्या/जिला 'वाकून नमस्कार' केला जातो त्यांचेविषयी आदरभावना.
पण ज्या/जिला 'वाकून नमस्कार' केला जातो त्यांची जेष्ठता, श्रेष्ठता किवा लायकी संदिग्ध असेल
तर "XX मारली अन यान्ना नमस्कार केला" असा कलह मनात निर्माण होतो.
ज्या/जिला 'वाकून नमस्कार' केला जातो त्यांनी जेष्ठता, श्रेष्ठता किवा लायकी असलीनसली तरी
ऐकू जाईल इतका स्पष्ट स्वीकार करून "शुभम्" इतका तरी आशीर्वाद द्यावा हाही शिष्टाचार आहे.
काही जण उलट वाकून 'समतावादी नमस्कार' करतात!
शेवटी आदर ही 'कमवायची' चीज आहे, बळेबळें 'नमवायची' नव्हे!
इति.
कल्याणम अस्तु !
कल्याणम अस्तु !
'वाकून एकांगी नमस्कार' हा
'वाकून एकांगी नमस्कार' हा करणाऱ्या/रीचा विनय/क्लीव्हेज दर्शवितो.>>
उत्तम विचार, बाकी नमस्कार स्विकारणारा जर (वाट) सरड्या प्रमाणे 'क्लिव्हेज' पाहणारा असेल तर नमस्कार न केलेलाच बरा.
म्हणून यवन बांधवात वाकून
म्हणून यवन बांधवात वाकून नमस्कार करण्याची पद्धत नाही. घेनार्याची लायकी नसते. प्रभूच्या लेकरातही नाही>>>
सहमत . माता , पिता , सद्गुरु आणि ईश्वर सोडून उगीच कुणाच्या पाया पडू नये . आणि कोणाला आपल्याही पडून देवू नये . केवळ वय हि गोष्ट माणसाची लायकी ठरवत नसते . वयाने मोठे असलेले लोक मनाने , बुद्धीने , विचारांनी मोठे असतीलच असं नाही .
मोहिनि३३३ | 23 September,
मोहिनि३३३ | 23 September, 2014 - 12:20
>> अगदी हजारो अनुमोदन.
बर्याचदा पाया पडणे ही
बर्याचदा पाया पडणे ही यांत्रिक पद्धतीने उरकण्याची गोष्ट असते. पाया पडणार्या व पाया पडून घेणार्या माणसांचे एकमेकांशी भावनिक नाते कसे आहे यावर बरच काही अवलंबून आहे. पाया न पडताही आदराची भावना असू शकते. राजकीय पटलांवर काही उद्दाम लोक जनभावना आपल्याला अनुकूल करुन घेण्यासाठी सुद्धा पाया पडतात. याचा अर्थ ते विनम्र असतात असा होत नाही.
http://www.fakingnews.firstpo
http://www.fakingnews.firstpost.com/2015/05/girl-loses-5-kilos-after-tou...
वाकून नमस्कार करण्याची प्रथा
वाकून नमस्कार करण्याची प्रथा जगात अन्यत्र कोठे आहे? जाणकारांनी खुलासा करावा
bow prayer असा सर्च मारा
bow prayer असा सर्च मारा गुगलवर
https://www.google.co.in/search?q=different+methods+of+prayer&espv=2&biw...
http://www.alamy.com/stock-photo-men-on-their-knees-bow-their-heads-towa...
https://www.google.co.in/search?q=different+methods+of+prayer&espv=2&biw...
https://www.google.co.in/search?q=different+methods+of+prayer&espv=2&biw...
हो पण माणसाने माणसाला आदर
हो पण माणसाने माणसाला आदर व्यक्त करण्यासाठी असलेली वाकून नमस्कार करण्याची प्रथा कुठे यात आहे. ते देवाला नमस्कार करताहेत.
>>> हो पण माणसाने माणसाला आदर
>>> हो पण माणसाने माणसाला आदर व्यक्त करण्यासाठी असलेली वाकून नमस्कार करण्याची प्रथा कुठे यात आहे. ते देवाला नमस्कार करताहेत. <<<
(परत परत तेच तेच सांगावे लागते....)
केवळ अन केवळ हिंदू धर्मच, सर्व चराचरात सजीवात निर्जिवात सर्वत्र इश्वर आहे असे मानतो , अन त्यामुळेच जितक्या सहजपणे शेंदुर फासलेल्या दगडाला नमस्कार केला जाऊ शकतो तितक्याच श्रद्धेने "माणसातील ईश्वरालाही" नमस्कार करण्याची पद्धत आहे. याकरता वारकरी सम्प्रदायात जाऊन बघावे.
याव्यतिरिक्त (वयाने)ज्येष्ठ व (कर्तुत्वाने) श्रेष्ठ अशा व्यक्तिंनाही नमस्कार करण्याचि पद्धत आहे.
याशिवाय गुरुस्थानी असलेल्या व्यक्तिस नमस्कार करण्याची पद्धत आहे. (फॉर एक्झांपल, मी ज्या जिमला जातो, तेथिल सावंत आडनावाचे माझे इंस्ट्रक्टर माझ्या पेक्षा वयाने कितीतरी लहान आहेत, पण गुरुपौर्णिमेच्यादिवशी त्यांचे हातात गुरुदक्षिणेचे पाकीट देताना मी त्यांना वाकूनच नमस्कार केला होता, कारणे दोन, एकतर व्यायामाच्या क्षेत्रात ते मला गुरुस्थानी आहेत, अन दुसरे कारण म्हणजे ज्या (व्यायामाच्या) क्षेत्रात ते आहेत त्यात त्यांनी मजपेक्षा कितीतरी पटींनी अधिक प्राविण्य संपादन केले आहे. )
या प्रथा व असे विचार्/तत्त्वे जगाच्या अन्य धर्म /प्रांतात असतीलच असे नाही, तशा त्या दिसल्या नाहीत म्हणजे हिंदू काहीतरी अंधश्रद्ध मूर्खपणाची कृती करताहेत असे समजण्याच्या गेल्या शतकातील रिवाज नाहीसा होऊ लागला आहे, व या उलट, इतर ठिकाणी या तत्वचिंतनातील काहीच नाही म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ असे परत एकदा मानले जाऊ लागले आहे.
असो.
मी परदेशप्रवास केला नसल्याने परकीय रिवाजांबाबतचे माझे ज्ञान तोकडे आहे. सबब जरा अधिक जाणकारांकडून माहिती मिळण्याची वाट बघणे हे उत्तम.
Absurd statements
Absurd statements
त्यातुनही प्रकाशराव, bowing
त्यातुनही प्रकाशराव, bowing for humans असा सर्च मारुन बघाल का?
https://www.google.co.in/search?q=bowing+for+humans&espv=2&biw=1024&bih=...
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcS8tf1KCwYovUdmPT96...
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcT6yE4dKbicyMBbbtYX...
https://encrypted-tbn1.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRdE5NNvkt1ZS3oN9qv...
https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcSm_TeKUBJfixLTD46_...
https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQCqjix9aF46VJokgdo...
http://snooperreport.com/storage/bullshit/bowing%20in%20japan.jpg?__SQUA...
http://www.rioleo.org/images/static/emperor2.jpg
ज्या भारतीयांनी इंग्रजांच्या
ज्या भारतीयांनी इंग्रजांच्या बुटाच्या लाथा खाल्ल्या, मुसलमानांचे पाशवी अत्याचार सहन केले त्यांना एकाएकी वाकून नमस्कार करण्यात अपमान वाटतो? का कष्ट होतात> नसेल करायचा नमस्कार तर नका करू, पण मी कुणि मोठा आहे अशी तुम्ही स्वतःची समजूत करून घेतली म्हणून इतरहि तसेच समजतील असे नाही.
एखादा दुराचारी, व्यसनी गुंड जर तुम्हाला गलिच्छ शिव्या देऊन लाथा मारेल, बदडून काढेल नि पैसे घेऊन पळून जाईल, तेंव्हा तुम्हाला समजेल जगात तुमची काय किंमत आहे.
होती अशी एक भारतीयांची जुनी परंपरा. नसेल चालू ठेवायची तर नका ठेवू. पण उगाच श्याणपणा करून एकदम नावे ठेवू नका. जगात इतरत्र अश्या अनेक खुळ्या परंपरा आहेत, लोक पाळतात किंवा नाही, पण उगीच कुणि नावे ठेवत नाहीत, अटीतटीने परंपरा मोडायलाच हवी असले दावे करत नाहीत.
कदाचित तुमचा सगळा श्याणपणा फक्त काहीतरी करून कशाला तरी नावे ठेवायची यातच असेल.
Runmesh ch Kay mat yawar?
Runmesh ch Kay mat yawar?
सिंधी लोकांच्यात पुरुष
सिंधी लोकांच्यात पुरुष स्त्रीयांकडुन नमस्कार करुन घेत नाहीत.
आमचे सर बोल्ले.
मॅ तेंव्हापासून मुलीकडुन नमस्कार करुन घेत नाही.
लिंब्याचे ते चराचर वगैरे वाचुन हासू आल्व. जर खरोखरच अशी वृत्ती असती तर कुणाला तरी अस्पर्श्य मानणे , पाणी न देणे वगैरे व्हायला नको होते या देशात
अचे, यांना यांच्या बोलण्यातला
अचे,
यांना यांच्या बोलण्यातला खोटारडेपणा कितींदाही सिद्ध करून दाखवला, तरी पुनःपुन्हा तितक्याच निधडेपणाने हे खोटे रेटतच राहतात.
आपण त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडत रहावा, हेच खरे.
Pages