शीर्षकावरुन असे वाटू शकेल कुणालाही की एकतर मी वाकून नमस्कार करण्याचे समर्थन करतोय वा वाकुन नमस्कारास जाच समजणार्यान्ची खिल्ली उडविणारे किन्वा जाचक प्रथान्ना विरोध करणारे!
पण यातले मला काहीच करायचे नाहीये.
माझ्या नजरेसमोर वेगळीच बाब येत्ये. ज्यान्ना वाकून नमस्कार करणे हा जाच वाटतो, तर तो का वाटत असावा, याची माझ्या नजरेतून (अन अर्थातच एकान्गी) कारणमिमान्सा सुरवातीस करतो. मग त्यानन्तर विषयानुरुप ज्यान्नीत्यान्नी त्यान्चि मते मान्डली तरी चालतील! असो
बर्याच ठिकाणी, लग्न मुन्ज इत्यादी कार्यक्रम, देवळात भटजीसमोर, घरच्याघरी वडीलधारे पाहुणे आले असता, हल्ली हल्ली तर टीव्हीवरील रिअॅलिटी शोमधे देखिल, अनेक "ज्युनिअर" त्यान्च्या सिनियर्सना वाकून नमस्कार करताना दिसतात.
ते तसे वाकून नमस्कार करत अस्ताना, ज्यान्ना ते तो नमस्कार करतात, त्या व्यक्तिन्चे वागणे व्यक्तिनुरुप इतके तर्हेवाईक असते की माझ्या सारख्याला वाटेल "XX मारली अन यान्ना नमस्कार केला". काय कारण असे वाटण्याचे?
तर एखाद्याने वाकून नमस्कार केल्यानन्तर, त्याचे दुनियेला ऐकु जाईल इतक्या खणखणीत आवाजात अगदी जरी नसले, तरी नमस्कार करणार्या व्यक्तिला ऐकु जाईल इतपत मोठ्याने "अभिष्टचिन्तनात्मक आशिर्वचन" उच्चारण्याची अक्कल्/कुवत ज्यान्ची नाही, त्यान्नी दुसर्यास वाकवुन नमस्कार तरी का करवुन घ्यावा? नै का?
यावर अधिक विचार करता माझ्या असेही लक्षात आले की, दुसर्यास नमस्कार करावा, उभारुन वा वाकून वगैरे शिकवले जाते, पण दुसर्याच्या नमस्काराप्रित्यर्थ, त्या बदल्यात त्या व्यक्तिचे वयानुरुप ज्येष्ठतेस धरुन कसे अभिष्टचिन्तन करावे हेच शिकवले जात नाही. येऊन जाऊन गेल्या शतकभरात लोक "थ्यान्क्यु" येवढेच शिकलेत असे केवळ वाटत नाही तर अनुभवलय!
साला मी नमस्कार केला वाकून, तर समोरील व्यक्ती म्हणते "थ्यान्क्यू"
अन मी आशिर्वाद दिला तरी तेच... थ्यान्क्यू!
आता या तर्हेला काय म्हणाव?
वाकुन नमस्कार घेताना, कुणी नुस्त कैतरी पुटपुटतं, कुणी हात उन्चावल्यासारख करत पण हात कोपरातुन मोडल्याप्रमाणे हालचाल होते, कुणाचे तिकडे लक्षच नस्ते, एकतर दुसर्याकुणाशी बोलत असतात किन्वा फोटोग्राफरकडे बघताना काही बोलायचे विसरुनच जातात, कुणी अहन्कार सुखावल्याप्रमाणे महा आढ्यतेखोरीने वाकलेल्या बकर्यान्कडे अन जमलेल्या गर्दीकडे बघत असतात.
काही निवडक सोवळे, स्वतःचेच पाय मागे ओढत नको नको करत नमस्कार घेण्याचे टाळतात.
याला अपवाद भटजी देखिल नस्तात (हे दुर्दैव).
लिम्बीचे बाबा वगळता, खणखणीत आवाजात सु:स्पष्टपणे आशिर्वाद देणारी व्यक्ती अजुनही माझ्या पहाण्यात आलेली नाही!
हे कशाचे द्योतक?
खिशातली फुटकी कवडी देखिल दुसर्यांस न देण्याची व्रुत्ती आशिर्वाद देण्यापासून परावृत्त करते?
की आशिर्वचने व ती यथायोग्य पणे देण्याची पद्धतच शिकवली जात नाही?
अर्थात मुद्दामहून शिकवणी लावुन शिकण्यासारखी ही गोष्त नाहीच, पण एखाद्या व्यक्तीला केलेल्या नमस्काराबद्दल उत्कृष्ट आशिर्वादाचा कधी अनुभवच आलेला नसेल तर ती व्यक्ती अनुभवातुन तरी शिकणार काय? अन काहीच शिकायला, निदान आशिर्वचन ऐकायला मिळणार नसेल, तर नमस्कार करणार्यास तो "जाचच" वाटला तर विशेष ते काय?
आपल्याला काय वाटते?
(क्रुपया थोताण्डपन्थियान्नी इकडे लिहीण्याची तसदी घेऊ नये ही णम्र विणन्ती)
[आज हा विषय डोक्यात आला, कारण काल अन आज tonaga मला नमो नमः म्हणतोय, तर तत्काल मी आशिर्वचने टाईप केली, अन त्यावरुन वरील रामायण लक्षात आले]
नहीं नही, हमारे यहा बेटिया
नहीं नही, हमारे यहा बेटिया पैर नहीं छुती
--- काही हिंदी भाषिक समाजा मधे मुलींना परमेश्वराचे रुप (किंवा खुप आदराचे) मानतात. उलट मोठी माणसेच लहान मुलींच्या पाया पडतात (देवी चे रुप आहे असे मानुन), कधिही मुलगी कुणाच्याही पाया पडत नसते, जर लहान मुलगी पायाच पडायला लागली तर अंगावर विज पडते आहे असे मोठ्याने किंचाळतील... ते मान्यच नाही.
माझे काही राजस्थानी मित्र
माझे काही राजस्थानी मित्र आहेत (राजस्थानातच रहाणारे) ते असं म्हणतात.
आमच्या नात्यातल्या एक अगदी
आमच्या नात्यातल्या एक अगदी वयस्कर बाई होत्या. त्यांचा मुलगा नॉर्थकडे रहायचा. त्यामुळे मुलाकडे सगळे हिंदी बोलायचे. तर या बाई कुणी (इथे महाराष्ट्रात) नमस्कार केला की "जीते रहो बेटे" म्हणायच्या. अरे.आपल्या मराठीत काय आशिर्वाद नाहीत का?
एक असंच नात्यातलं जोडपं होतं. अगदी सत्तरीतलं. त्यातल्या आजोबांना कुणी नमस्कार करायला गेलं की पटकन बाजूला व्हायचे. म्हणायचे " ए, अरे मला नका नमस्कार करत जाऊ ...मला नाही आवडत. " इथपर्यंत मी समजू शकते. पुढे पहा, " माझ्या ऐवजी हिला दोनदा करा." अरे हे काय ? हिला म्हणजे बायकोला. म्हणजे स्वता: तर मोठेपणा घ्यायचा नाही आणि वर 'हिला' दोनदा करा हे काय?
माझ्या ऐवजी हिला दोनदा
माझ्या ऐवजी हिला दोनदा करा."
---- कांदे नाही बटाटे चालतील कां?
माझ्या माम्या आम्हाला पाया
माझ्या माम्या आम्हाला पाया पडू देत नाहीत. त्याच आमच्या (भाचेमंडळीच्या) पाया पडतात. फार ऑकवर्ड वाटतं अशावेळी अन घरात कुणीही मुलींकडून पाया पडून घेत नाहीत. लेकीकडून पाया पडून घेणं म्हणजे पाप समजतात.
माझ्या चुलत सासुबाई पण अगदी
माझ्या चुलत सासुबाई पण अगदी मनापासुन ''सगळे तुझ्या मनासारखे होऊ दे" असा आशिर्वाद देतात. अजुन एक सासुबाई "शुभ-आशिर्वाद" असे म्हणतात (पण ते मनापासुन नसते). काहि लोक नमस्कार केल्यावर नुसतेच डोक्यावर किंवा पाठीवर हात ठेवतात पण त्यांच्या स्पर्शातुन, डोळ्यातुन आपल्यासाठी असलेल्या चांगल्या भावना स्पश्ट दिसतात........आशिर्वाद काय दिला यापेक्षा किती मनापासुन दिला हे महत्वाचे नाही का???
कुणाच्यातरी आग्रहामुळे "लायकी नसलेल्या" व्यक्तिला नमस्कार करायची वेळ आलिच तर "चरणस्पर्श" न करता "धरणीस्पर्श" करावा
एकदम वेगळा आणि चांगला विषय
एकदम वेगळा आणि चांगला विषय आहे चर्चेचा. इतकी विवीध मत मतांतरे वाचण्यात पण गंमत आली. मला स्वतःला ज्या व्यक्ती विषयी मनापासून आदर वाटतो त्यालाच वाकून नमस्कार करावासा वाटतो. माझे सासर कर्नाटक मधले आहे. तिकडे खेडेगावात अंधश्रद्धेचं प्रमाण बरंच आहे. तिकडे कोणी न कोणी बाई ही काहीतरी दइवी गुण वाली असते. ती आली की वयोव्रुद्ध माणसांपासून सगळे तिच्या पायावर डोकं ठेवतात. एरवी चारचउघानसारख्या वागणार्या व्यक्तीच्या पाया पडणं मला तरी पटत नाही आणि मी पडतही नाही. थोडं स्वतःलाच अवघड वाटतं जेव्हा अगदी सासू-सासरे पण पाया पडत असतात तेव्हा. पण आपणही अनुकरण करणं म्हणजे चुकीच्या व्रुत्तीला प्रोत्साहन देण्यासारखं वाटतं.
ह्यातलाच अजुन एक प्रकार
ह्यातलाच अजुन एक प्रकार म्हणजे माझी मावस नणंद ही ५ भावंडांमधे एकटीच मुलगी. तर ती घरची लक्ष्मी म्हणून सगळ्यानी तीच्या पाया पडायचं. लग्नानंतर पहिल्यांदाच गावी गेले तेव्हा साबांनी तिच्या पाया पडायला सांगितलं. मला कळेचना की माझ्यापेक्शा १० वर्षांनी लहान असलेल्या मुलीच्या पाया का पडायचं. तिलाही ते कसंसच वाटलं म्हणून तिनेही पडून नाही घेतलं हे माझं नशीब :). आमचं हे गाव अगदीच खेडेगाव आहे आणि मी तिथली पहिलीच मुंबईची सुन त्यातून त्यांच्यात आवडीने रहाणारी म्हणून ह्या गोष्टी कोणी मनावर घेत नाही हि गोष्टं अलाहिदा
बाकी माझ्या सासरी गुढग्यांवर बसुन खाली झुकून दोन्ही पायांचे अंगठे धरुन त्यावर डोकं ठेऊन नमस्कार करायची सवय आहे, ती मला खुप कौतुकास्पद वाटते. माझ्या माहेरीही मझ्या नवर्याचं कौतुक होतं ह्या गोष्टीसाठी. नमस्कार नुसता उरकल्यासारखा वाटत नाही (मी तेच करते कारण मनात कितीही आदर असला तरी एवढं खाली बसुन, वाकून उठेपर्यन्त कमरेचे आटे ढिले व्हायचे)
वाकून नमस्कार करणे "जाचक" का
वाकून नमस्कार करणे "जाचक" का वाटू लागले असावे? >>>>
सर्व प्रतिक्रिया वाचल्यावर असे वाटते कि शिर्षक "वाकून नमस्कार करणे "जाचक" वाटते का ? " असे हवे होते
असो. अजुन एक पोस्ट येउद्या . म्हणजे शतक होइल.
शतकी पोस्ट, मला चित्रपटातले
शतकी पोस्ट,
मला चित्रपटातले एक उदाहरण आठवले, चित्रपट आलाप, अमिताभ बच्चन आणि रेखाचा. त्यात एका रागमालिकेत होळीचा प्रसंग आहे. सगळे रंगत असताना अमिताभ, त्याच्या गुरुच्या अंगावर रंग टाकायला जातो. ती बहुतेक विधवा, रंग टाकू नकोस अशी विनवणी डोळ्यात. मग तो झुकून तिच्या पावलांवर रंग टाकतो, ती केवळ डोळ्यांनीच आशिर्वाद देते. सुंदर आहे हा प्रसंग.
मला वाटते आशिर्वाद उच्चारायलाच हवा असे नाही. पण तो मनापासून असावा.
लिम्ब्याची वाकून वाकून पाठ
लिम्ब्याची वाकून वाकून पाठ दुखत असल्याने तो आज नाही...
>>>> नहीं नही, हमारे यहा
>>>> नहीं नही, हमारे यहा बेटिया पैर नहीं छुती
(नेमके कोणते सण/धार्मिक कृत्ये ते लिम्बीला विचारुन सान्गतो)
तस पहाता ही प्रथा, सर्व हिन्दुस्थानात या ना त्या रुपात बघायला मिळेल
आपल्याकडे महाराष्ट्रातही विशिष्ट सणान्ना केवळ कुमारिकान्ना बोलावतात, व त्यान्ना नमस्कारही करतात
मात्र आपल्याकडे एरवी लहानमुलीन्नी मोठ्यान्च्या पाया पडणे "अवैध" मानले जात नाही
"पाया पडणे" हा शब्दप्रयोग बोलीभाषेतील आहे, पायी माथा टेकवतो या अर्थी, पायी घसरुन पडतो या अर्थी नव्हे! असो, जाणकार खुलासा करतीलच
tonagyaa, दोन दिवस लिम्बीच्या शेतावर मरमरेस्तोवर कामे उरकलीहेत, आज खरोखरच कम्बरड मोडल्याप्रमाणे दुखतयं
>>>> असे वाटते कि शिर्षक "वाकून नमस्कार करणे "जाचक" वाटते का ? " असे हवे होते
गणू, तसे शिर्षक दिले अस्ते तर इथे कुरुक्षेत्र तयार झाले असते, असे नाही वाटत?
प्रतिसाचान्बद्दल सर्वान्चे आभार
गणू, तसे शिर्षक दिले अस्ते तर
गणू, तसे शिर्षक दिले अस्ते तर इथे कुरुक्षेत्र तयार झाले असते, असे नाही वाटत? >>>

अनुमोदन
पाया पडण्याएवजी पाय धरुन, खेचुन, आपटवले गेले असते.
'माझ्या ऐवजी हिला दोनदा करा.'
'माझ्या ऐवजी हिला दोनदा करा.' हे म्हण्जे ...माझा उपास आहे म्हणुन बायकोला double द्या.
खरे मला तसा तुझा नमस्कार हवाय पण मोठ्ठेपणा कोण दाखवणार?
असेही लोक असतात ज्यांना सारखे वाटते कि सगळ्यांनी (येता जाता) मला नमस्कार करावा. असले लोक काहीतरी कारणे पण शोधुन काढतात. ते मात्र जाचक(च) वाटते.
माझे काका सगळ्यांना 'मनोकामनापूर्णवान भवं' असा आशिर्वाद द्यायचे. साबा 'all the best' म्हणतात.
आशिर्वाद द्यायला कंजुसपणा कसला? मग समोरच्याने मनातुनच नमस्कार केलेला चालेल का?
आता तुम्ही आशिर्वाद loud द्या किंवा स्पर्शातुन / डोळ्यातुन द्या पण कमीतकमी द्या नक्कि.
हे मात्र खरे..आप्ल्याकडे फक्त नमस्कार करायला शिकवतात म्हणुन आशिर्वाद द्यायला शब्द सुचत नसावे.
लिंबुजी आपल्याला माझा
लिंबुजी आपल्याला माझा नमस्कार. प्रत्यक्ष भेटल्यावर पुन्हा एकदा करेनच. मला आवडते नमस्कार करायला.
लिंब्या, वाकुन (अगदी थोडसं
लिंब्या,
वाकुन (अगदी थोडसं वाकुन) नमस्कार करणे मला पण आवडते, पण ते पायाला हाथ लावणे वगैर नाही पटत बुवा.
त्या पेक्षा शेक हँड किंवा जवळच्या व्यक्तिला हग करणे बरे पडते.
आपले भूतपूर्व पन्तप्रधान आय
आपले भूतपूर्व पन्तप्रधान आय के गुजराल (आठवते का?) याना 'हग' ण्याची (Hug)सवय होती . ती त्यांची सिग्नेचरच होती . एकदा एका मुलाखतीत त्यानी त्याचे कारणही सांगितले होते. पेन्डसे गुरुजीना शिरसाष्टांग नमस्कार आवडे. तो जाचक वाटे.
'हग' ण्याची (Hug)सवय होती
'हग' ण्याची (Hug)सवय होती
मीआण्णाहजारे यांनी जुने धागे
मीआण्णाहजारे यांनी जुने धागे सजीव करण्याचा सपाटा लावलेला दिसतो आहे आज.
वाकून नमस्कर करावा/न करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. फक्त, समोरच्य माणसाच्या पायास हात लावणे, हे मला हायजिनिकली बरोबर वाटत नाही.
बाकी तीर्थ वगैरे घ्यायचे असेल त्यांनी घ्यावे. मी घेणार नाही.
वाकून नमस्कार करणे ही एक
वाकून नमस्कार करणे ही एक चांगली परंपरा आहे आणि ती फक्त आपल्याच धर्मात आहे.
खिशातली फुटकी कवडी देखिल
खिशातली फुटकी कवडी देखिल दुसर्यांस न देण्याची व्रुत्ती आशिर्वाद देण्यापासून परावृत्त करते?>>>> यजमान किती देतो त्यावर आशिर्वाद अबलंबुन असतो ११, २१, ५१, १०१, ५०१ यात चढत्याक्रमाणे भटजी प्रसन्नपणे आशिर्वाद देतात...
खरे म्हणजे माणूस केवळ वयाने
खरे म्हणजे माणूस केवळ वयाने मोठा म्हणून त्याला वाकूनच काय, साधा सुद्धा नमस्कार करायला इथल्या काही भांडखोर बायकांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून काही मायबोलीकरांचे जन्मभरासाठी वैर उत्पन्न आहे.
तसेच अनेक महिने त्या भांडणातले शब्द वापरून अनेकांना अनेकदा हसवण्यात व चिडवण्यात आले आहे. ,
अर्थात काही लोक इथे नुसते भांडत बसायलाच येतात, नि इतर काही मुद्दाम त्यांना डिवचतात! मग मायबोलीवर पोष्टींची संख्या वाढते.
आताशा मात्र भांडणांनी अत्यंत हिंस्र स्वरूप घेतले आहे, मजा गेली.
आताशा मात्र भांडणांनी अत्यंत
आताशा मात्र भांडणांनी अत्यंत हिंस्र स्वरूप घेतले आहे, मजा गेली.>>> +१.
@झक्की, @नंदिनी, एकदम पटले.
@झक्की, @नंदिनी,
एकदम पटले. त्यामुळे अभ्यासपूर्ण चर्चा करणारे बरेच चांगले सभासद भाग घ्यायचे टाळतात. माबोच्या मूळ हेतूलाच त्यामुळे धक्का लागतोय असे वाटते. असो.
मला वाकून नमस्कार करणे तसेच
मला वाकून नमस्कार करणे तसेच नमस्कार करवून घेणे हे आवडत नाही. कदाचित लहानपणी मोठ्यांना वाकून नमस्कार करणे हे कंपल्शन होते त्यामुळे मोठे झाल्यावर बंडखोरीचा भाग म्हणुनही हे असेल . मनातुन उस्फुर्तपणे असे वाकून नमस्कार कुणाला करावास वाटत नाही. प्रचंड आदर असणार्या व्यकिंविषयी देखील आदराचे प्रतिक म्हणुन असा नमस्कार करावासा वाटला नाही. परंतु उभ्यानेच हात जोडून नमस्कार करण्यात काही गैर वाटत नाही. मी तो नम्रपणे करतो देखील. मृतदेहाला मात्र वाकून नमस्कार करतो श्रद्धांजली वाहण्यासाठी. अंनिस शी संपर्क आल्यानंतर जेव्हा गाडगेबाबांच चरित्र वाचल तेव्हापासून हे बदल झाले. योग्य कि अयोग्य हे माहित नाही. पण कधी कधी या बाबत दोन मनांचा संघर्ष होतो हे मात्र खरं!
'तुझा मनाप्रमाणे होउदेत' हा
'तुझा मनाप्रमाणे होउदेत' हा सगळ्यात उत्तम आशिर्वाद आहे अस मला वाटते...कारण कस आहे ना (मंजिरिपणा बद्दल माफि असावि), काहि लोकाना आशिर्वाद नाहि आवडत.उदाहण - एखादि आजिबाइ एखाद्या नवविवाहितेला म्हणालि ' लवकर मूल होऊदेत' तर लगेच ती इतकि चिडेल,अर्थात, उगाच ते तिचावर एक प्रकाराच दडपणच निर्माण करत.त्यात काहि बायका तरि 'मुलगा' होउदेत अस म्हणतात,आगदि निर्लज्ज पणे...अशा वेळेला तर माझा हि पारा चढतो....अणि माझा नवर्या चा हि..... मि थोडिशि नाराजि व्यक्त जरि केलि तरि....."एक मुलगा पाहिजेच हो,मुलगि आहेच कि..हि हि हि हि हि...." असे फिदि फिदि हसायचे
आसो, उगाच विशायांतर नको.....माझि एक मामि म्ह्णते 'गॉड ब्लेस्स यु'... हे मला खूप आवडत
पण त्या त्या आदरणीय
पण त्या त्या आदरणीय व्यक्तिन्ना जरा "तोन्डभरुन आशिर्वाद" द्यायला काय धाड भरते का, हा माझा प्रश्न आहे! स्मित>> हे वाक्य परफेक्ट बोललात.
>>>>> अंनिस शी संपर्क
>>>>> अंनिस शी संपर्क आल्यानंतर जेव्हा गाडगेबाबांच चरित्र वाचल तेव्हापासून हे बदल झाले. योग्य कि अयोग्य हे माहित नाही. पण कधी कधी या बाबत दोन मनांचा संघर्ष होतो हे मात्र खरं! <<<<<
अहो घाटपांडे साहेब, अंनिसवाले "देवालाच" नमस्कार करण्याच्या विरुद्ध आहेत, इतकेच नव्हे तर देवच मानत नाहीत, तिथे पामर मर्त्य मानवांन्ना करावयाच्या नमस्काराची काय कथा?
तुमच्या मनाचा संघर्ष होतो तो इतक्यामुळेच की अन्निसवाल्यान्नी अजुन "मानवांस नमस्कार करणे, व त्या मानवाने नमस्कार करणार्यांस आशिर्वाद देणे" या "अंधश्रद्धा" म्हणून घोषित केल्याचे अजुन तरी माझ्या बघण्यात/ऐकण्यात आलेले नाही (आधीच करुन ठेवले असेल तर माहित नाही बोवा) !
तर एकदा का त्यांनी ते घोषित केले की बहुधा तुमच्या दोन मनांचा संघर्ष सम्पेलही!
धागा वरती काढल्याबद्दल धन्यवाद
(मी विसरूनच गेलो होतो या धाग्याबद्दल)
लिं.टिं माझे म्हणणे असे की
लिं.टिं
माझे म्हणणे असे की जेष्ठ व आदरणीय व्यक्तींना आदर व्यक्त करण्यासाठी वाकूनच नमस्कार केला पाहिजे असे नाही. उभ्या उभ्या हात जोडून केला तरी तो आदरच आहे ना! पण तसा तो केला नाही तर लोक म्हणतात की हा जास्त शिष्ट आहे.स्वतःला जास्त शहाणा समजतो. मोडेन पण वाकणार नाही असा बाणा दिसतो याचा.खर तर ते तस नसतं. मी स्वतः कट्टर धार्मिक व सनातनी परंपरेत ग्रामीण भागात वाढलो. पदोपदी व प्रतिक्षिप्त पणे वाकून नमस्कार केले आहेत. खर तर वाकून नमस्कार केल्याने काही फार मोठी तत्वच्युती होते असे नाही. पण बंडखोर मन तयार होत नाही.आता वाकून नमस्कार केला नाही तर जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होत असेल तर गोष्ट वेगळी आहे. एक किस्सा सांगतो अंनिस तला एक 'कट्टर' मित्राला विचारले की समजा तुला एखाद्या परिस्थितीत आदिवासींनी पकडल व सांगितल कि त्यांच्या एका देवाला (म्हणजे दगडाला/झाडाला) नमस्कार कर नाही तर तुला खलास करतो. तर तू काय करशील? तो म्हणला," जीव गेला तरी चालेल पण मी नमस्कार करणार नाही." मग मी त्याला म्हणालो सर्व्हावल इज ट्रूथ. तू जगलास तरच तू तुझ्या विचारांचा प्रसार करु शकणार आहे. अशा वेळी केलेली तडजोड ही काय मुर्खपणा आहे काय? मग तू व इतर धर्मांध/ अंधश्रद्ध कट्टर यांच्यात काय फरक राहिला. नमस्कार केल्याने तू काय लगेच अस्तिक होतो काय? आपण तर लई वेळा करु ब्वॉ! शिर सलामत तो पगडी पचास.
पुण्यातील कामशेतपासून उकसान
पुण्यातील कामशेतपासून उकसान हे गाव १५ ते १६ किलोमीटरवर आहे. वडिलांमुळे मी ही तेथे अनेकवेळा गेलो आहे. गोकुळष्टमीला येथे मोठा उत्सव असतो. गळ्यात टाळ घेऊन अखंड सप्ताह २४ तास देवासमोर पहारा देण्याचा कार्यक्रम असतो. यात गळ्यात टाळ घेऊन ती हळूहळू वाजवायची असते. खाली ठेवायची नसते. टाळकरी दमल्यास त्याच्या जागी दुसरा टाळकरी जागा घेतो. हे करत असताना मग तो लहान असो वा मोठा व्यक्ती वाकून टाळ देणाºयाच्या पाया पडतो. मी ही गळ्यात टाळ घेऊन जप करत पाच पाच तास पहारा दिलेला आहे. हे करत असताना आपल्या पेक्षा वयाने मोठा व्यक्ती आपल्या पाया पडते. पहारा देणाºयाच्या शरीरात जणू काही देवच असतो. अशी भाबडी समजूत असेलही पण खरेच लहान असो वा मोठा देवापुढे सर्व समान आहेत. हे पाहून मी सुद्धा लहानपणापासून वडिलधाºयांच्या पाया पडतो.
आजकाल पाया पडणे म्हणजे कमी पणाचे वाटत आहे.
Pages