आस ही मूर्त झाली

Submitted by पुरंदरे शशांक on 20 July, 2014 - 23:13

आस ही मूर्त झाली

ऋतू आगळा हा ऋतू सावळा हा
ऋतू पावसाळी कसा साजिरा हा
भले थोरले मेघ हे वर्षताती
जळा निर्मळाते बहू ओतताती

घनाकार होता असे अंतराळी
रवीने पहा त्यागिली ते झळाळी
कसा वायु तो शीत कोंडे उराशी
नवा श्वास घेते धरित्री जराशी

नवे थेंबुटे देत संजीवनी का
नवा साज लेती वनी वल्लरी का
मनाला तशी येतसे ही उभारी
नव्या अंकुरे आस ही मूर्त झाली

फुलांनी उरी वाहिली आस सारी
फळांनी तिला गोमटी थोर केली
निसर्गातुनि येक आशा धुमारे
जळातूनि वाही फलद्रूप सारे
-----------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनाला तशी येतसे ही उभारी
नव्या अंकुरे आस ही मूर्त झाली >>> छान ओळी.

आशय चांगला व्यक्त झालाय.
कवितेतील भाषा काहीशी जुन्या काळातील कवितांसारखी वाटली.