आता कशाला शिजायची बात- पौर्णिमा- हाय फाईव्ह!

Submitted by पूनम on 3 September, 2014 - 02:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१) सुके खोबरे- २ वाट्या
२) खारिक पूड- पाऊण वाटी
३) खडीसाखर- थोडी खलून- अर्धी वाटी (ओबडधोबड लागली पाहिजे)
४) बिया काढून चिरलेला खजूर- एक वाटी
५) खसखस- पाव वाटी
६) पातळ केलेले साजूक तूप- पाव वाटी

वाटी- नेहेमीची आमटीची. साधारण माप १२५ ग्रॅम्स

क्रमवार पाककृती: 

गणपती बाप्पाचाच नाही तर सर्वांच्याच आवडीचा आणि दर वर्षी उकडीच्या मोदकांप्रमाणे साधारणपणे एकदाच केलेला पारंपरिक नैवेद्य म्हणजे 'पंचखाद्य'. या पंचखाद्याचे घटक म्हणजे खोबरं, खारीक, खसखस, खडीसाखर आणि खिसमिस.
या घटकांमधून खिसमिस वगळून त्याऐवजी त्यात अजून एका 'ख'ची भर घातली- ती म्हणजे खजूर.

वर दिलेले सर्व पदार्थ एकत्र करायचे आणि पातळ केलेले तूप ओतत (!), मिश्रण एकत्र करत लाडू वळायचे! Happy लाडू रव्या-बेसनाच्या लाडवांपेक्षा जरा छोटेच बांधायचे.

या लाडूंमधले सर्व घटक पौष्टिक आहेत आणि तत्काळ ऊर्जा देणारेही आहेत. म्हणून यांचं नाव- 'हाय फाईव्ह'

माझ्या लेकाने त्यांचं नामकरण 'ख-लाडू' असेही केले आहे Happy

kha ladu.jpg

वाढणी/प्रमाण: 
१५ छोटे लाडू
अधिक टिपा: 

१) तूप अंदाजे घालायचे आहे. लाडू वळताना सुक्या खोबर्‍याला तेल सुटत जाते, त्यामुळे कमी-जास्त लागू शकते.

२) सुगरण लेव्हल तीन आणि त्यापुढे असाल, तर लाडू वळताना मध्ये एक खडीसाखरेचा खडा ठेवून मग लाडू बांधावा. लाडू खाताना ही सर्प्राईज खडीसाखर लाडूचा गोडवा वाढवते आणि खवय्यांचा आनंदही.

माहितीचा स्रोत: 
सासूबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुगरण लेव्हल तीन हा फंडाच भारी आहे.. पण सोप्पी कृती असूनही लेव्हल थ्री म्हणजे जास्त नाही का वाटत???

>>>पण सोप्पी कृती असूनही लेव्हल थ्री म्हणजे जास्त नाही का वाटत
टोटल किती लेव्हल डीफाईन केल्या आहेत ते कुठे माहितेय Happy

सुगरणीच्या लायनीतच नाही मी , त्यामुळे खडीसाखरे ची आयडीया क्ञान्सल. पण बाकी हाय फाइव्ह ,गर्दीतल्या लोकाना जमणेबल आहे. Happy
खेळून आल्याबर द्यायला छान आहे.

पण गर्दीत का करायचे लाडू इन्ना? Proud
आपण सुगरण लेवल वजा 3 म्हणून खडीसाखर नाकातल्या चमकीसारखी वर टोचून लावणार.

हिम्या, लाडू सोपे आहेत, पण खडीसाखर बरोब्बर मध्ये आली पाहिजे, ह्यासाठी सुगरण लेव्हल तीन अ‍ॅन्ड अप! Proud

येस, इन्ना, भूकलाडू कॅटॅगरी आहेत हे लाडू.
हर्पेन- तुमच्यासारख्या हाय इन्टेन्सिटी व्यायाम करणार्‍यांसाठी तर हे लाडू एकदम योग्य होतील. एकदा चाखून बघाच.

धन्यवाद लोकहो! Happy

या लाडूचे अजून एक नामकरण- राकेश रोशन लाडू Lol कारण ओळखेल काय कोणी?

वा वा ! जबरी फोटो . तोंपासू अगदी

या लाडूचे अजून एक नामकरण- राकेश रोशन लाडू . कारण ओळखेल काय कोणी? >>>>>>> त्याला असलेल्या ट्कलासारखे गोल आणि चकच़कीत दिसत आहेत म्ह्णुन काय ?

(ऊत्तर बरोबर असल्यास त्यातले दोन लाडू बक्षीस म्हणून देणे हि णम्र विनंती Wink )

त्याला असलेल्या ट्कलासारखे गोल आणि चकच़कीत दिसत आहेत म्ह्णुन काय ? >>> Rofl Rofl
नहीऽऽऽऽ!!!!!!!!!!!! Lol

तरीही या उत्तराबद्दल तुला बक्षिस देईन मी जाई! Wink

थाक्यू पौ तै.

अजून एक प्रयत्न ;- रा रा च्या चित्रपटात हाय फाईव्ह शब्द वापरला गेलेला आहे काय ? मे बि कहो ना प्यार है मध्ये ?

हाय फाईव्ह बरंच कॉमन आहे जाई. रा रोचा कॉपीराईट नाही त्यावर Happy

एकदम सोपं आहे खरंतर.
उत्तर उद्या याच वेळी याच ठिकाणी देण्यात येईल Proud

<<< उत्तर उद्या याच वेळी याच ठिकाणी देण्यात येईल फिदीफिदी

ह्याला म्हणतात आपल्या रेसिपीचा टीआरपी वाढवणे Wink Proud

ऑन सीरियस नोट राकेश रोशनचे सिनेमे "क" ने सुरू होतात तसे ह्यातले घटक "ख" ने असा बादरायण संबंध ;).

घरी लगेच्च लाडू बनवण्यास सांगण्यात आले आहे व उद्या लडाखला जाताना बरोबर घेऊन जाणार आहे. अगदी योग्य वेळेवर ही पाककृती इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

Mast! Ekadam healthy Happy

Ladoola khali pop stick laun mulana ladoo-pops mhanun dyayache Happy aani jara naughty addition - melted chocolate madhe dip karayache Wink

Pages