मोबाईल वरुन हॉटस्पॉट्ने नेटल्यास काही तोटा/दोष आहे का ?

Submitted by नितीनचंद्र on 27 August, 2014 - 02:47

बी.एस.एन.एल चे ब्रॉड बॅड मी गेले ३-४ वर्षे वापरत होतो. सर्व्हीस चांगली होती. पण गेले तीन महिने सर्व्हीस चा प्रॉब्लेम आहे. महिन्यात १५ दिवस सर्व्हीस तुटक असते. किंवा नसते.

तक्रार करुन काही उपयोग नाही. ( खाली लगेच मी लिहले म्हणुन प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत " अच्छे दिन आने वाले है "

पर्याय म्हणुन आयडीया मोबाईल वर नेट पॅक लोड केला ज्याचा अनुभव चांगला आहे.

हॉटस्पॉटवर सुध्दा नेट/ लॅपटॉप चालत आहे. किंचित स्लो आहे पण ठिक आहे.

कायम चालवायला काय हरकत आहे ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी एस एन एल ची फ्रॉडबॅन्ड सेवा मी बरेच वर्षे वापरली. पण गेल्या वर्षी प्रॉब्लेम देउ लागली तुम्ही म्हणता तसे डिस्कनेक्ट व्ह्यायचे . तक्रारी केल्या.माणसे आली.पण प्रॉब्लेम रॉकेट सायन्सच्या दर्जाचा असल्या मुळे बी एस एन ए लच्या भारतभरच्या सर्व इन्जिनीअर च्या बुद्धीपलिकडच असल्याने रिपेर झाला नाही . बील मात्र न चुकता येत होते. मग बी एस एन एल चे विसर्जन करून हॅथ वे आणले. सध्ये व्यवस्थित आहे... Happy

हुडोबा,
बीएसेनेलवाल्या इंजिनेरांना आपण स्वतःच अनेक गोष्टी शिकवाव्या लागतात असा अनुभव आहे. पण त्याला मी फ्रॉडब्यांड अजिब्बात म्हणणार नाही. इतक्या स्वस्तात इतकी मस्त नेट कुणीही देत नाही.
पण तुम्ही हॉटस्पॉट करताच आहात, तर जुना आऊटडेटेड अँड्रॉईड फोन कायम चार्जरला लावून, अन फक्त त्या नेटसाठी एक डेडिकेटेड कार्ड ठेवून मोडेमसारखा वापरणे, हा सेन्सिबल इलाज आहे. हवा तेव्हा गाडीत सोबतही नेता येतो, हा अजून एक फायदा.

नितीणचंद्र,
>>मोबाईल वरुन हॉटस्पॉट्ने नेटल्यास काही तोटा/दोष आहे का ?<<
पत्रिकेत दशमस्थानी उच्चीचा मंगळ, अन लग्नात रोहू असल्यास शेजारपाजारची टारगट पोरे तुमचा हॉटस्पॉट हॅक करून वापरू शकतात, असा दोष तुमच्या कुंडलीवरून दिसतो आहे, तेव्हा हॉटस्पॉट नीट कॉन्फिगर करा.
या तोडग्याबद्दलची दक्षिणा नेटब्यांकींगने ट्रान्स्फर केलीत तरी चालेल.

इ-ब्लिस

बीएसएनएल ची सर्विस बिघडली? मी साधारण वर्षभर वापरली होती. अगदी मस्त होती. टोटल दोनदा बंद पडली. तासाभरात चालूही झाली होती परत.

लग्नात रोहू?
मग कटला, कर्ली, कांटा सुरमयने काय घोडं मारलंय.
त्याना पण पत्रिकेत एक घर द्या.
Happy

नितीनचंद्र, हॉटस्पॉटने काही नुकसान होत नाही.
मोबाईलची बॅटरी लवकर संपते.
आम्ही अ‍ॅपलमध्ये ३जी बी डाटा मंथली भरतो एअरटेलचा ,आणि हॉटस्पॉट वापरून तीन मोबाईलवर नेट घेतो घरात.

बीएसेनेल एक दुभती गाय आहे .चारा एकाने घालायचा आणि दुध इतरांनी काढायचे .सध्या तिच्या चाऱ्यावर कोट्यावधीने खर्च होत आहे .यांचे इंटरनेट चालत नाही परंतू मजा अशी की एमटीएनेल चे कार्ड टाकून त्याच टॉवरवरून भारतभर नेट फास्ट येते .दोन वर्षापूर्वी चालू केलेल्या प्यारी जोडी मोबाईल सेवेचे पंख छाटून एक पीस आणि अर्धी चोच शिल्लक आहे .

बिएसएनएल चा तसा शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. डिपी पासून मॉडेमपर्यंतच केबलिंग अ‍ॅब्सोल्यूट असेल तर शक्यतो ईश्यू नाही. एकदा पोर्टस/जॅक्स ही चेक करा.

बीएसएनएल चं ब्रॉडबॅन्ड पुणे-कलकत्ता दोन्हीकडे गेली १०-१५ वर्षं वापरलं जातंय. उत्तम चालतं असाच अनुभव. माझ्या मोबाईलवर पण बीएसेनेलचंच कनेक्शन आहे. तिथेही नेट उत्तम चालतं. तक्रारनिवारण मात्र पुण्यापेक्षा इथे कलकत्ता स्थानिक ऑफिसमधे फार झपाट्याने आणि कार्यक्षमतेने होते असा अनुभव आहे.

बीएसएनएल चं कनेक्शन बरचसं तुमच्या आणि बीएसएनएलच्या पत्रिका जुळण्यावर आहे, जेंव्हा ग्रहमान चांगले असतिल तेंव्हा बीएसएनएलसारखी स्वस्त आणि मस्त सुविधा जगात कोनतीही नाही, पण एकदा का ग्रहमान फिरले की मग ह्यासारखा मनस्ताप पण दुसर कोणीच देउ शकत नाही. माझं कनेक्शन एक वर्ष खुप छान चाललं नंतर ग्रह बदलले, मग काय त्यांच्या कार्यालयात चकरा सुरु झाल्या ज्या तिन महिन्यांनी कनेक्शन बंद केल्यावर थांबल्या.
बंगळुरू मध्ये भारतीय रेल्वेच ब्रॉडबँड (रेलवायर नावाने) यायच (आता येतं की नाही माहित नाही) एकदम जबरदस्त सर्विस, मोडेम ची गरज नाही, थेट पोर्ट जोडायचा नेट सुरु, बिल पण खुप कमि होतं तेंव्हा.(बीएसएनएल पेक्षाही)
बाकी 'करलो दुनिया मुट्ठी मे' वापरलं थोडे दिवस ती कंपनी चोर आहे हे माहिती असुनही रिस्क घेतली, आणि शेवटही माहिती असल्याप्रमाणे झाला.
त्रिकोणी सर्विस पण वापरुन पाहिली, एकदम स्लो, गुगल सुद्धा उघडायचं नाही. ही सर्व्हिस बंद करणे फार भयानक काम आहे, सर्व्हिस बंद करुनही बरेचदा एक महिन्याची रक्क्म वसुल करतात, कोर्ट केस्ची धमकी वगैरे देतात.
असो फार अवांतर झालं.. Wink

सर्वलोक धन्यवाद,

आजच बी.एस एन एल च्या कार्यालयात सेवा समाप्तीचा अर्ज दाखल करुन आलोय. १ सप्टेंबर ला करा म्हणल तर तिथे घाई. आजच करा म्हणाले. मी म्हणल ठीक आहे.

असो, आता कुठली सेवा घेऊ ? आयडीया, एअरटेल, वोडाफोन, टाटा डोकमो की अन्य काही ?

पुढील महिनाभर आयडीया करुन पहाणार आहे. ज्यांच वायरलेस डाँगलम्~मॉडेम आहे जे लॅप टॉप ला न जोडता देखील वापरता येईल असे पुढे घेईन म्हणतो.

इब्लीस जी प्रथमच आपल्या प्रतिसादाने मनोरंजन झाले. धन्यवाद

नितीन, तुमच्या एरीया मध्ये लोकल ब्रॉडबॅन्ड प्रोवायडर असेल तर ते पहा एकदा. अतिशय स्वस्त अन मस्त सर्वीस असते या लोकांची. मी लोकल वापरतोय गेले ४ वर्षे. एकदम छान अनुभव. राउटर वर असल्यानी झकास वायफाय मिळतं. शक्यतो ही सर्वीस प्रिपेड असते त्यामुळे नाहीच पटलं तर काही वेगळे चार्जेस नाही पडत बंद करायला.
तुलना करण्याकरता मी जो प्लॅन वापरतो तो असा - ९० दिवस | ९० जिबी | १० एमबीपीएस | रूपये २०००/- (महिन्याला ६५०/७०० रूपये)
तीन महिन्याच्या काळात १ ते २ दिवस डाऊन होतं पण शक्यतो लगेचच चालूही होतं. वर त्याचं ऑफिस जवळ असल्यानी जाऊन बोंब मारता येतेच. पण अशी वेळ नाहीच आली कधी.

या लोकांचे प्लॅन्स एरीआ नुसार बदलतात. जवळ नवीमुंबईत तर ४००/- महीना रेंट्लवर १ एमबीपीएस अन्लिमिटेड मिळतं... Uhoh

योकु,

ते तिकोना इ. आमच्या विभागात नाही. हे सर्व पाहुनच मी हा प्रश्न विचारला. कुठे कुठे टि.व्ही केबल सोबत सुध्दा आहे पण आमचा केबल प्रोव्हायडर ते देत नाही.

बीएसएनएल . इतक्या स्वस्तात इतकी मस्त नेट कुणीही देत नाही. +१

लँडलाईन कनेक्शन मध्ये स्पीड चांगला आहे आणि माफक दरात आहे, एवढी मेमरी डऊनलोड करायला इतर कोनाचीही सेवा चक्क लूट करत असते , अगदीच ऑप्शन म्हणून वोडाफोन किंवा आयडीचा मर्यादीत एखादा पॅक ठेवावा.

किरणकुमार,

रुपये ७५०/- + कर = बेक्क्कार सेवा ही लुटच आहे.

डी.जी.एम चिंचवड ला भेटल्यावर सुध्दा काहीही होत नाही. १५०० ला तक्रार नोंदल्यावर, यांना संपर्क करा असा एस एम एस येतो. यात जो फोन नं येतो तो फोन गेले कित्येक वर्ष वापरात नाही.

१९८ ला फोन केल्यावर तक्रार नोंदली जाते. ३-४ तासात प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? असे विचारणारा फोनही येतो.

इब्लुशा, इथे फोनच काय पण माणसेही येऊन तपासून गेलीत मी त्याना सांगतोय फोनची वायर जुनी झालीय तिला पिळे पडलेत आणि तारा टच होत आहेत. पण ते बाजूने पहायलाच तयार नाहीत नुसते मोडेम फिडेम लॅन केबल पाहून जायचे .ही मंडळी ऑटसोअर्स केलेली असतात. बहुदा प्लम्बर , सुतार इंजीनीर न्हणून पाठवीत असावेत. वर कोणी म्हणल्या प्रमाणे जोवर बी एस एन एल चालू असते तोवर त्याच्या सारखी स्वस्त आणि उत्तम सेवा नाहे पण एकदा प्रॉब्लेम आला की सम्प्लेच....

१९८ ला फोन केल्यावर तक्रार नोंदली जाते. ३-४ तासात प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? असे विचारणारा फोनही येतो. पिंपरी चिंचवडला फाट्यावर मारतात ग्राहकांना.

सिलेक्टटेड लोकांना हा हा हा - मुंबई - पुणे ही डेस्टीनेशन्स आहेत. या महामार्गावर एक फाटा आहे. चिंचवड. हे फाट्यावर रहातात म्हणुन फाट्यावर मारायला सोप्पे असतात.

आजच टाटा डोकमो थ्रीजी डाटा अ‍ॅक्टीव्हेट केले आहे. हे हॉट स्पॉट वरुन इतके जबरदस्त चालते आहे की दुसरे काही नकोच अशी भावना आहे.

आजच टाटा डोकमो थ्रीजी डाटा अ‍ॅक्टीव्हेट केले आहे. हे हॉट स्पॉट वरुन इतके जबरदस्त चालते आहे की दुसरे काही नकोच अशी भावना आहे.>>>>>>> बिल आल्यावर बोला, इतकी घाई नको.

अनलिमिटेड प्लॅन नेहमी कॅप केलेले असतात. पूर्वी बीएसेनेलचा एक अनलिमिटेड प्लान होता त्याला ५१२ केबीपीएस स्पीड मिळत असे. त्यामुळे २४ तो ऑनच असे. ट्रायने सक्ती केल्याने आता सगळ्यांचेच अनलिमिटेड प्लान बंद झाले आहेत तथाकथित अनलिमिटेड प्लान्स हे ९००-१००० रु. दरम्यान १५ जीबी डाऊनलोड महिन्यातून देतात. काही कम्पन्या मोठ्या वेगाने त्यांचे लिमिट १५ जीबी सम्पेपर्यन्त देतात आणि मग पुढे महिना सम्पेपर्यन्त ५१२ च्या स्पीडने देतात. प्रिपेडचे सोपे आहे. जेवढा डाटा अ‍ॅडमिसिबल आहे तेवढा एक दिवसात संपवला काय अन पुरवून पुरवून वॅलिडिटी काळापर्यन्त वापरला काय त्याना तेवढेच पैसे आणि त्याबदल्यात तेवढात डाटा !पोस्टपेडला अगदी २४ तास डाऊनलोड केले तरी किती डाटा घेऊ शकतात त्यावर स्पीड कॅप केलेले आहेत. अगदीच अनलिमिटेड प्लान राहिले नाहीत आता. पूर्वी आम्ही ५०-६० जीबी पर्यन्त डाता डाऊनलोड करू शकत असू....

त्यामुळे प्रिपेदचा स्पीड फास्ट असतो यात विशेष काही नाही उलट पेज रिफ्रेश करणे , पाने बॅकवर्ड फॉरवर्ड करणे यात प्रत्येक वेळी पेज डा.लो . होत असल्याने प्लान कधी सम्पतो ते कळतही नाही. आमचे १५ जी बी लगेचच साताठ दिवसात सम्पतात आणि मग सुरु होतो तो ५१२ केबीपीएसचा वायुवेग !!!!

रुपये ७५०/- + कर = बेक्क्कार सेवा ही लुटच आहे.

ते खरे आहे पण मी हा फक्त ऑफीस युजसाठी वापरतो ४ संगनक चालतात रोजचे ८-१० तास नेट लागते साधारण १५०० पर्येंत येते बिल

Pages