मोबाईल वरुन हॉटस्पॉट्ने नेटल्यास काही तोटा/दोष आहे का ?

Submitted by नितीनचंद्र on 27 August, 2014 - 02:47

बी.एस.एन.एल चे ब्रॉड बॅड मी गेले ३-४ वर्षे वापरत होतो. सर्व्हीस चांगली होती. पण गेले तीन महिने सर्व्हीस चा प्रॉब्लेम आहे. महिन्यात १५ दिवस सर्व्हीस तुटक असते. किंवा नसते.

तक्रार करुन काही उपयोग नाही. ( खाली लगेच मी लिहले म्हणुन प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत " अच्छे दिन आने वाले है "

पर्याय म्हणुन आयडीया मोबाईल वर नेट पॅक लोड केला ज्याचा अनुभव चांगला आहे.

हॉटस्पॉटवर सुध्दा नेट/ लॅपटॉप चालत आहे. किंचित स्लो आहे पण ठिक आहे.

कायम चालवायला काय हरकत आहे ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२ नोव्हेंबरला २ महिने झाले. मोबाईलवरुन ३जी वापरतो. तांत्रीकदृष्ट्या काहीच त्रास नाही. ४९९ रुपयांचा टाटा डोकमो चा प्लॅन घेतला ज्याची व्हॅलिडीटी दोन महिने आहे. यात २जी.बी. इंटरनेट आहे + ४४० रुपयांचा टॉक टाईम आहे. शिल्लक राहिलेला टॉक टाईम वापरुन इंटरनेट चा वाढीव जी. बी रुपांतरीत करण्याची सोय आहे.

दोन महिन्यात साधाअरण ३ जी.बी डेटा वापरुन २०० रुपयांचा टॉक टाईम पण वापरला.

केवळ इंटरनेटला बी एस एन एल ला दर महिना ७५० + कर या पेक्षा कितीतरी किफायतीत हे चालते. काही तोटे आहेत जसे काही सिनेमा डॉउन्लोड करता येत नाही इ. ज्याची फारशी आवश्यकता लागत नाही.

साडेसाती असेल तर हॉट्सपॉट चा पासवर्ड हॅक होण्याचा धोका आहे भरमसाठ बिल येउ शकते. त्यामुळे शनिच्या दिशेने मॉडेम ठेउ नका त्यापेक्षा गुरुस्थानी मॉडेम ठेवावा. अश्यामुळे गुरुचा प्रभाव मॉडेम वर पडुन कमी रेंज असेल तरी तो जास्तितजास्त उर्जा स्वताकडे खेचण्यास सुरुवात करतो आणि आपल्या घरावर सकारात्मक परिणाम होतो.

Pages