मोबाईल कुठला घ्यावा ?

Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43

मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.

1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप

मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?

नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?

यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.

तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ऐकलेला मोटो चा नोन प्रॉब्लेम - कानाला लावून जर फोनवर बोलत असाल तर फोन तापतो चांगल्यापैकी... बाकी काही ईश्यूज नाहीत.

Asus Zenfone 5 A501CG ह्या मोबाईलबद्दल कोणाला काही माहीती आहे का? स्पेक्स चांगले वाटतायत.

लुमिआ ६२० जुना विंडोझ ८ फोन आहे .त्याचे ८.१नुतनीकरण (किचकट)केले आहे का ?एप्रिल नंतर आलेले फोन ८.१चे आहेत. >> हो, केले आहे. आता बहुतेक applications फोन मेमरी वरच इन्स्टाल होतात.

Samsung चा Android फोन भारतात वापरायला घ्यायचाय. S5, S4 महाग वाटतायंत. त्यापेक्षा स्वस्त कोणतं model घेता येईल? वापर calls, internet (mails, websites), whatsapp आणि इतर apps यासाठी होणार आहे.

Note2

३ आठवड्यांपूर्वी फ्लिपकार्टवरुन LG L90 ड्युअल सिम रु.१५६०० ला घेतला. घेण्याआधी अनेक दिवस/महिने अनेक साईट्स धुंडाळून पाहिल्या. मायक्रोमॅक्सचा कॅनवास ४ जवळपास फायनलही केला होता काही महिन्यापूर्वी... असो...

हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत LG L90 मधे . qual core processesor, 1 GB RAM, inbuilt 8 GB - 3.5 GB available, 2540 battery, dual sim, kitkat, 8 mp back and VGA front camera, वजनाला हलका, गोरिला ग्लास. इतके दिवस समसंग चा ace plus वापरत होतो. जास्त वापर वॉट्सअप चा असल्याने वर उदयन ने उल्लेख केलेला मेमरी भरुन जायचाच फक्त प्रोब्लेम होता. पण Ace Plus 2 वर्षापूर्वी ज्या किमतीला घेतला होता, त्याच किमतीत हा आता मिळाला. बॅटरी साधारण ३६ तास चालत आहे. दोन्ही सिम वापरत आहे. इनबिल्ट मेमरी कमी असली तरी वापर कसा करायचा हे आता समजल्यामुळे वेगळं 8GB चं कार्ड टाकलं आहे आणि आतापासूनच शक्य तितक्या गोष्टी त्यात ट्रान्सफर करणे चालू आहे. कॅमेरा अजून फारसा वापरला नाही, असाही त्याचा वापर फारसा करत नाहीच. आतापर्यतचा एकंदर अनुभव खूप चांगला.

माझा मोटो जी परवाच आला, online घेतला. कवरसकट मला १२७००ला पडला. सीम बदलायला लागणार मला त्यामुळे आत्ता फक्त वाय-फायवर whats app चालू केलेय.

धन्यवाद शैलजा आणि उदयन. नोट २ किंवा ३ आकाराने खूप मोठा आहे- यामुळे वापरताना अडचणी येतात का? मी टच स्क्रीन कधीच वापरला नाहीये. आधी नोकिया ईसीरीज आणि मग blackberry असे qwerty वापरले आहेत. पण आता कोणी कंपनी तसे फोन्स बनवतच नाहीये!

इतक्या सगळ्या पोस्ट्स बघूनच दमले. शेवटची काही पाने वाचली.

मला एक फोन घ्यायचा आहे. अगदी बेसिक

गरजेच्या गोष्टी -
ब्लू टूथ
बरासा कॅमेरा (टॉप प्रायॉरिटी नाही)
एमएस ऑफिस (वर्ड, एक्सेल, पीपीटी) आणि अ‍ॅक्रोबॅट रीडर फाईल्स किमान वाचता येणे
व्हॉट्सअ‍ॅप व्यवस्थित चालणे
ईमेल, फेबु, माबो किंवा अशा टेक्स्टबेस्ड वेबसाईट्स सहजगत्या सर्फ करता येणे/वाचता येणे.

माझ्याकडे बीएसएनएलचं कनेक्शन आहे. मायक्रोकार्डस्लॉट चं प्रकरण कसं सांभाळायचं असतं याचाही सल्ला मिळाला तर हवा आहे.

आणि मुख्य म्हणजे मला शक्य तितके कमी पैसे मोबाईलवर घालवायचे आहेत. त्याचं बेसिक फंक्शन - फोन करणे व घेणे हेच सगळ्यात वापरलं जाईल आणि समसच्या जागी व्हॉट्सॅप. बाकी मी खूप अ‍ॅप्स वगैरे वापरत नाही किंवा माझ्या व्यावसायिक कामामधे मोबाईल टेक्नॉलॉजीचा काही संबंध येत नाही.
नेट धुंडाळून बघितल्यावर कार्बन, मायक्रोमॅक्स, लाव्हा असे विविध ब्रॅण्ड्स दिसले. आम्ही नोकिया वाले. काही वर्षांपूर्वी एलजी आणि मोटोरोलाचे अनुभव चांगले आले नाहीत. आताचे काही माहित नाही. त्यामुळे ब्रॅण्ड्सची रिलायेबिलिटी कळत नाहीये

कृपया जाणकार, तज्ज्ञ, अनुभवी मंडळींनी सल्ले द्यावेत

वरदा सेमसम्ग सगल्या कॉस्ट रेन्जमध्ये वरील स्पेसिफिकेशनमध्ये उपलभ्ध आहे....
(ह्या क्रोमच्या तिच्या...)

वरदा ,

आम्ही नोकिया वाले. >>>>>>मी ही नोकिया category .. नाईलाजाने सोनी कड़े वळले . नोकिया स्मार्टफोन मध्ये मागे आहे सध्या .

गरजांची प्रायोरिटी लक्षात घेता तुम्हाला सैमसंग / सोनी / एचटीसी हे ब्रैंड उपयुक्त ठरतील . सैमसंग गैलेक्सी कोर सध्या 11,000 - 12,000 च्या दरम्यान मिळतोय . सोनीच्या xperia मध्येही चांगले पर्याय आहेत. बजेटनुसार ऑप्शन आहेत .

माझा स्वताचा सोनीचा फोन उत्तम रित्या चालतोय

वरदा ,सैमसंग सगळ्या कॉस्ट रेंजमध्ये वरील स्पेसिफिकेशनमध्ये उपलब्ध
आहे.

हे घ्या रॉबिनहुड Happy

अजून एक :- फोन घेताना आसपास त्याच सर्विस सेंटर जवळ आहे ना हे ही पाहा

सगळ्यांना धन्यवाद Happy

मला शक्यतो ६-७ हजारातच बघायचाय. गाणी, इतर मल्टिमीडिया असं काहीही वापरलं नाही तरी चालणारे. पण व्हॉट्सॅप चालावं असा पाहिजे (माझं फोनबिल एकदम कमी झालंय व्हॉट्सॅपमुळे) कारण कामासाठी फोन, समस एवढंच खरं महत्वाचं. अगदीच गरज पडली तर कॅमेरा वापरणे कारण कामासाठी लागणारा कॅमेरा वेगळा आहेच. माझा सध्याचा नोकिया इ-६३ आहे. पण दुसरा इ-५ आहे तो खराब झालाय तो रिप्लेस करायचा आहे.

सॅम्संगचं दुकान आहे जवळ, बघते. पण आणखी पर्याय सुचत असतील तर जरूर सांगा.

ते मायक्रोकार्डस्लॉट काय आहे? ते असेल तर काय करावं लागतं?

वरदा, मीपण ठेवलाय माझा जुना नोकिया इ-६३ अजून. बेस्ट फोन अहे तो! काश त्याची पुढची पिढी नोकियाने आणली असती..

काही वर्षांपूर्वी एलजी आणि
मोटोरोलाचे अनुभव चांगले
आले नाहीत. >>>> यो गे श हे वा च

मायक्रोकार्डस्लॉट काय आहे हे नाही माहीत मला नक्की . पण ते बहुतेक मेमरी कार्ड असावे

वरदा, तुम्हाला सहा सात हजारात सैमसंग / सोनी मिळतील

ते अॅसस वर San Andreas (Video Game) चालतय लय भारी हाय 10 हजारात यतय
2 gb ram
720×1280 screen resolution
8 mp cam
2mp front
8 gb in bult storeg and 64 gb expantion
android 4.3
Dual core, 2000 MHz, Saltwell
PowerVR SGX 544MP2 processor
आवघ्या दहा हजारात
यतय

मायक्रो सिम म्हणजे छोटं असतं साईझला. आताचं कापुन मिळू शकतं. बेस्ट वे , कम्पनीकडून कार्ड बदलून घ्या. कारण कट केलेल चलत नाही अनेकदा.

वरदा यांचा व्हाटसप चा वापर जास्त असल्याने इंटरनल मेमरी जास्त असणाराच फोन घ्यावा... अणि मागे दिल्याप्रमाणे वेळोवेळी मोबाईल कंम्पुटरला जोडुन व्हाट्सप ची मेमरी मोकळी करत रहा... म्हणजे तो जागा कमी वापरेल ...

सॅम्संग आणि मोटो ई असे दोन पर्याय दिसताहेत मला इथे

उदयन, व्हॉट्सॅप पण शक्यतो टेक्स्ट मेसेजेससाठीच वापरलं जातं. शिवाय फोटो आणि इतर मीडीया फाईल्स ऑटोमॅटिक डा.लो होत नाहीत असंच सेटिंग असतं कायम..

इब्लिस - बीएसेनेल मायक्रोकार्ड देतं का हे आधी विचारून घेतलं पाहिजे. कापाकापी नकोच शक्यतो.

वेदिका - इ६३ खरंच बेश्ट फोन आहे. चार वर्षं झाली, मस्त चालतोय. पडोझडो माल वाढो या तत्वाला अनुसरून Wink

टेक्स्ट मेसेजेससाठीच वापरलं जातं. >>> वरदाजी.. टेक्स मेसेज असले तरी तो वारंवार बॅकअप घेत असल्याने त्याची मेमरी वाढते .. त्याला आपण काहीच करु शकत नाही .. मेसेज डिलिट केल्याशिवाय ...

बीएसेनेल मायक्रोकार्ड देतं का हे आधी विचारून घेतलं पाहिजे.
देत.... तासाभरात नविन कार्ड चालु पण होत. तेच सीम साध्या मोबाईलमधे वापरण्यासाठी जॅकपण ५-१० रुपयात मिळुन जाईल...

ओके, उदयन. हे लक्षात आलं नव्हतं. पण इ६३ वर अजून तरी प्रॉब्लेम आलेला नाही

धन्यवाद, सुशांत. मग निवांत मायक्रोएस्डीचे पर्यायही बघू शकते.

मग मायक्रोएस्डी स्लॉट म्हणजे नक्की काय? >>>
ज्या स्लॉटमध्ये मायक्रोएसडी कार्ड (म्हणजेच मेमरीकार्ड) बसतं तो स्लॉट. Happy

ओके. मला वाटलं की मायक्रोएस्डी हा सिमकार्डचा स्लॉट असतो. म्हणलं परत बीसेनेलचे पाय धरणं आलं...

योकु, नाही इतकी टेक्नॉलॉजिकली चॅलेन्ज्ड अजूनतरी नाही. पण सगळ्या हॅण्डसेट्सची फीचर्स कम्पेअर करून बघायला गेलं की मात्र थोड्या वेळाने सगळे सारखेच वाटायला लागतात. त्यातली कितीक फीचर्सशी मला काहीही घेणं देणं नसतं.

म्हणून तर या बाफचे पाय धरले Proud

माझ्यामते मोटो ई तुझ्याकरता छान राहील. स्वस्तात अतिशय मस्त.
नंतर माझं मत एक्स्पिरीआ एम.

तुला विंडोज फोन मधे पहायचं असेल तर लुमिआ ६३०/५३० बेस्ट डिल आहेत. ६३० काही महिने वापरलाही आहे. ९ हजारात टिपीकल साध्या यूजरकरता फिचर्स. ऑफिस डॉक्स आणि पीडिएफ्स मस्त वाचता येतात. बॅटरी लाईफही मस्तच आहे.

फाईल्स वाचता येतात एडिट नाही करता येत बहुधा. त्याकरता वेगळं अ‍ॅप घ्यावं लागेल. जनरली फ्री असतात प्लेस्टोर ला.

मी सीम बदलूनच घेणार आहे.

मीपण नोकियाप्रेमी आणि मला मोटो इच घ्यायचा होता ७०००चा पण भावाने ऐकलं नाही त्याने गिफ्ट दिलाय मला मोटो जी. मोटो ई मध्ये flash नाहीये म्हणून.

(कोणी घेणार असेल तर) नोकिआ X मॉडेल घेणे टाळा लोक्स. मायक्रोसॉफ्ट त्याचा सपोर्ट काही दिवसच देणार आहे.

मोटो ई मधे एमेस ऑफिस चालतं का? >>King's Office नामक अ‍ॅप डाउनलोड करा.

Asus Zenphone चा कुणाला अनुभव आहे का?? मित्राला घ्यायचा आहे. Asusचे PC Components चांगले असतात (Taiwanese company) पण मोबाईलचा अनुभव ऐकायला आवडेल.

मला अ‍ॅसस (Asus) बद्दल नाही फारसं नाही माहीती पण एक फु.स. - झोलो पहायला विसरू नका. एक छान पर्याय आहे. १० हजारात १३ एमपी कॅम, क्वाड्कोर प्रोसेसर अन् २ जीबी रॅम आहे. महत्त्वाचं म्हणजे, प्रोसेसर इंटेल चे आहेत.

Asus Zenphone ची मी पण वाट पहातोय. फ्लिपकार्ट्वर ऑफर होती माघच्या सोमवार मंगळ्वारी.... त्यावेळेस मी मोटो जी आणि आसुस मधे कन्फ्युअज होतो. आता दोन्ही पण अव्हेलेबल नाहीयेत. स्टोअरवाल्यांनी प्राईस वाढवल्यात. १० हजारात झेन फोने ५ चांगल कॉन्फिगरेशन आहे.
उद्या रेड्मी लॉच होतोय.....

मोटो इ ,जी मध्ये जीपीएस लॉकींगचा लोचा आहे .बैटरी काढता येत नाही .
नोकिआ -मायक्रोसॉफ्ट सुधारले आहेत .विंडोज ८ पासूनच्या सर्व लुमिआंना अपग्रेड करणार आहेत .५२५ आणि ६२० साठी अपग्रेड विँडोज८.१ काल चालू केले .या दोन्हीँत कैमरा बटण आहे .जीपीएस ऑफलाईन काम करते .
३०सप्टेंबरला विंडोज ९ येत आहे .आणि नवीन ७३० (विंडोज ८.१)येत आहे .
लुमिआवर ५३० आणि ६३० वरअडोब फ्लैश फ्री डाउनलोड आहे शिवाय मेमरी कार्डवर अॅप्स ठेवता येतात .शिओमि मि ३ च्या धडाकेबाज विक्रीचा परिणाम म्हणजे इतर कंपन्यांचे धाबे दणाणले आहे ।किंमती कोसळताहेत .

आसुसचा कोणताही प्रॉडक्ट घेऊ नका असे तिसर्‍यांदा सांगतोय.... >> रॉहू, आसुससंबधीचि तुमची पोष्ट वाचली आहे. आसुस चे Computing Products खूप चांगले असतात. म्हणुन मी फोनसंबंधी विचारणा केली आहे. सर्विस सेंटरचा प्रॉब्लेम सगळ्याच ब्रांडसना आहे. कालच एका सर्विस सेंटरला गेलो होतो. Blackberry/Moto/Lenovo असे सर्विस सेंंटर होते आणि सगळ्याच मॉडेल्सना काही ना काही प्रॉब्लेम्स होतेच. किमान२० दिवस तरी रीप्लेसमेंट येत नाही असे कळले.

.बैटरी काढता येत नाही . >>>>>>>>> डुप्लिकेट बॅटरीस चा प्रॉब्लेम बराच मोठा झालेला म्हणुन बर्‍याच कंपन्यांनी त्यावर हा उपाय काढलेला आहे......... असे मध्यंतरीत वाचलेले

Pages