सुख !!

Submitted by पुरंदरे शशांक on 22 August, 2014 - 00:24

सुख !!

अंगणात किलबिल
उठे झुळुक मनात
कोण वेडा गातो गीत
अशा एकट्या बागेत

चाक खुर्ची हळु नेत
हले आशा काळजात
असेल का अजून तो
जरा थोडा बागडत

एक उनाड पाखरु
फुलासवे झोंबू पाहे
त्याला पाहता पाहता
तिचे नेत्र भरु वाहे

कितीतरी वरुषात
कोणी आले अवचित
रखरख मिटे सारी
आज सुख बरसत...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे !! एकाकीपणावर भाष्य करणारी कविता !
छान आहे असे बोलवतही नाही.
वाचताना मन हेलावले मात्र.
एकट्या बागेत, चाक खुर्ची ..... हे शब्द चपखल बसलेत.