टाकळ्याची भाजी (रान भाजी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 16 July, 2009 - 01:59
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

टाकळ्याच्या ३-४ जुड्या (पाने खुडावीत व धुवुन चिरून घ्यावीत)
२ कांदे चिरुन
२-३ मिरच्या
३-४ लसुण पाकळ्या ठेचुन
पाव चमचा हिंग
पाउण चमचा हळद
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
पाव वाटी खवलेले ओल खोबर
२ मोठे चमचे तेल.

क्रमवार पाककृती: 

तेल गरम करुन त्यात लसूण पाकळ्या व मिरची घालावी. जरा परतवून कांदा घालावा. लगेच हिंग हळद घालून परतवावे व चिरलेला टाकळा घालावा. (हा टाकळा तव्यावर भाजून मग भाजी करण्याची ही पद्धत आहे. पण मी न भाजताच करते) झाकण ठेउन थोडावेळ भाजी शिजू द्यावी. थोड्या वेळाने मिठ व साखर घालावी. जरा परतवून २-३ मिनीटे शिजू द्यावी. नंतर ओल खोबर खालून परतवून गॅस बंद करावा.

वाढणी/प्रमाण: 
४-५ जणांसाठी
अधिक टिपा: 

आंबट आवडत असल्यास थोडा लिंबू पिळावा, तसेच ह्यात डाळीही घालता येतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाकळा
SDC10349.jpg

आमच्या इथे सगळीकडे उगवलाय... तोच खुडुन आणला तर चालेल काय??

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

स्वच्छ जागेवर असेल तर आण.

टाकळ्यालाच आम्ही तरोटा म्हणायचो. जागू, छान असतात तुझ्या सगळ्या रेसीपी.

आमच्याकडे याला तरोट्याची भाजी म्हणतात..

आंम्ही याच्या बियाण्यांच एक्सपोर्ट करतो.. (GUM CASSIA) म्हणुन. पावसात गावी बर्‍याच प्रकारच्या भाज्या येतात त्यापैकी हि.. छान लागते.. पण विदेशात या पावडरीचा उपयोग cattlefield साठी होतो.