ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समान म्हणजे पृथ्वीवर सारखाच हक्क असलेले. >> वाघ, डास, वायरस, अमीबा, खेकडे, कोंबड्या सगळ्यांचाच पृथ्वीवर समान हक्क आहे, मग त्यांचं काय करायचं? जगबुडी येईल म्हणून नोआसारखं नाव बांधण्यासाठीचं कंत्राट घ्यायचं आहे का देवाकडून?
<<
लॉजिकमधले लूपहोल्स पहायची इच्छा नसते लोकांना @ चमन.

यांचे म्हणणे =बागेतला बाक, हा पृथ्वीसारखाच इश्वरदत्त आहे, सबब, त्याच्यावर माणूस व कुत्रा यांचा समान हक्क आहे.

हे जर मान्य करायचे, तर - बाग, बाक या दोन्ही गोष्टींच्या क्रिएशनमधे कुत्रं अन माणूस यांचा इक्वल सहभाग आहे, असे गृहितक आहे.

बरोबर ना?

इन द फर्स्ट प्लेस, त्या जंगली प्राण्याला "माणसाळवून" तुम्ही त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले आहेत हेच मान्य करायला आपण तयार नाही आहोत.

आभाळात स्वच्छंद उडणार्‍या पक्षाला पिंजर्‍यात कोंडणे हा अत्याचार असेल, तर मुळात जंगली असलेल्या कोल्ह्या / कुत्र्या / माशांना घरात डांबून 'पाळीव' म्हणायचे हे कोणत्या प्रकारचे प्रेम?

याला म्हणतात बेसिक मे राडा. बी एम आर.

बैल, घोडा, कुत्रा अन कोणताही 'पाळीव' प्राणी, अगदी शेती करून पेरलेला गहू हे देखिल मानवाने त्या-त्या सजीवाच्या निसर्गदत्त समान अधिकारावर केलेले अतीक्रमण आहे. हे जर उमजेल, तर मऽऽऽऽऽग "माणसाचा हक्क त्या बाकावर जास्त कसा आहे?" या प्रश्नाचे उत्तर डोक्यात येईल.

तोपर्यंत हा उजेड पडणे कठीण.

दर्म्यान, उजेडासाठी हे दिवे घ्या: Light 1 Light 1 Light 1

इब्लिस,

तुमचा प्रतिसाद पटला, पण ह्या प्रतिसादानुसार विचार ठेवायचे म्हंटले तर उत्क्रांती अनावश्यक ठरते असे मला वाटते.

Happy

उत्क्रांती अनावश्यक कशी ठरते?
हे सगळे माणसाची गुलामी करण्यासाठी उत्क्रांत झाले, अन पाळीव बनले, असं सुचवायचं आहे का तुम्हाला?
असंच जर सुचवायचं असेल, तर त्या लॉजिकचं एक्स्टेन्शन कुठे जातं ते ठाउक आहे ना?

अगदी शेती करून पेरलेला गहू हे देखिल मानवाने त्या-त्या सजीवाच्या निसर्गदत्त समान अधिकारावर केलेले अतीक्रमण आहे.<<<

नख्या, शिंगे, सुळे, नेक मसल्स, जाड कातडी, तुफान अ‍ॅक्सीलरेशनने धावू शकण्याची क्षमता!

ह्यातले काहीही माणसाकडे नाही.

त्यामुळे तो जमीनीतून हवे ते पीक काढायला जातो.

नख्या, शिंगे, सुळे, नेक मसल्स, जाड कातडी, तुफान अ‍ॅक्सीलरेशनने धावू शकण्याची क्षमता!

ह्यातले काहीही माणसाकडे नाही.

त्यामुळे तो जमीनीतून हवे ते पीक काढायला जातो.

>>>>

ह्या धाग्याचा विषय नाही पण राहवले नाही म्हणुन. आपण जमिनीतून पिक काढू लागल्यावर बर्‍याच गोष्टी गळून पडल्या, कमी झाल्या. शिकार, सामुहिक शिकार, पळत मागावर लागून शिकार (आपण धावता धावता श्वास घेउ शकतो, घामावाटे उष्णता बाहेर टाकतो. इतर प्राण्यांना एकतर पळता येते किंवा थांबून गार व्हावे लागते), शेती अश्या अनेक टप्प्यांबरोबर आपल्या शरीराची रचनादेखील बदलली.

>>>आपण जमिनीतून पिक काढू लागल्यावर बर्‍याच गोष्टी गळून पडल्या, कमी झाल्या. शिकार, सामुहिक शिकार, पळत मागावर लागून शिकार<<<

ओल्ड मंक लार्ज ऑन द रॉक्स ह्या कादंबरीवर त्यातील काही गोष्टी तरीही दिसून आल्या होत्या. ते अलाहिदा!

हिम्मत नसली की हिम्मत लागत नाही ती कामे सजीव करतो हा निसर्ग आहे टण्या!

>>> अदिति | 5 August, 2014 - 23:26

माणसाने बनवला आहे म्हणुन गळ्यात कुत्र्याचा पट्टा घातलेला इब्लिस माणुस डोळ्यासमोर आला. दिवा घ्या
<<<

Lol

मी कुत्रीप्रेमी नाही तेव्हा पट्टा स्वतःच्या गळ्यात घालणे शक्यच नाही.
तुम्हाला स्वतःची इमेज दिसतेय का?
श्वानप्रेमाची एक्स्ट्रीम्स गूगललीत तर सापडतील. तसलं काही दिवे देऊन डोळ्यासमोर आणू का?

कुत्र्यावर ६००..................... आता कुत्र्याचे अभिनंदन करावे लागेल. Happy

किकु - भटक्या कुत्र्याने गाडीवर काही करू नये अशी इच्छा असणे साहजिक आहे. मलाही राग येतो आणि भटक्यांची भीती सुद्धा वाटते खूप खूप खूप. पण त्यांना काही खायला घालून ... हे जरा जास्त होतय हो. आपण कशाला कोणाला मारायचं पाप आप्ल्या माथी घ्यायचं.

वेल , तू म्हणतेस ते पटतय माझ्या सौ चे पन अगदी हेच मत आहे, पण नंतर मनात विचार येतो कधी जाता येता भटक्या कुत्र्याने आपल्यावरच हल्ला केला तर काय करायचे, प्रत्येक वेळी काठी किंवा तशी एखादी वस्तू बाळगणे शक्य नाही. सध्या तरी कुत्रे फक्त गाड्यावर भूंकतात पण ज्या मार्गावर हे कुत्रे आहेत तेथून अनेक लहान मुले ( ८ ते १५ वयोगटातली) शाळेसाठी येजा करत असतात. त्यातल्या बहुतेकांनी त्या दोन कुत्र्यांचा धसका घेतला आहे म्हणून त्यांच्या पालकांना घेवून तेवढा भाग ओलांडतात. या कुत्र्यांबात संबंधीत भटकी कुत्रे पकडणा-या यंत्रणेशी संपर्क साधला तर हा भाग आमच्या अखत्यारित येत नाही असे धडधडीत उत्तर मिळाले आहे. आता त्या त्रस्त मुलांच्या पालकांच्या मदतीनेच या कुत्र्यांचा बंदोबस्त करयचे ठरविले आहे. त्यांना तेथून उचलून दुसरीकडे नेऊन सोडणे म्हणजे आपला त्रास दुस-या कोणाच्या गळ्यात मारण्यासारखा आहे जे योग्य नाही. Sad

हं... काही दुसरा उपाय असू शकतो का? कारण तुम्ही असे काही विचार करताय हे पेटावाल्यांना कळलं तर मग खूप त्रास होईल तुम्हालाच. सो काहीही करण्यापूर्वी पूर्ण माहिती शोधा. प्राण्यांच्या हॉस्पिटलवाल्यांना वगैरे कॉण्टॅक्ट करून पाहा

किकु,

गो अहेड बाय ऑल मीन्स.

दया तेचि नाव । भूतांचे पालन ॥
आणिक निर्दालन । कंटकांचे ॥

आ.न.,
-गा.पै.

चमन, बिहेवियरल आणि लॉजिकल यात गोंधळ झालाय तुमचा. आणि ते कंत्राट वगैरे जबराटच Proud एकूणच तुमची लोजिकल लेव्हल एक्सप्लेन करतय ते. लगे रहो.

एकूण विचारांचा हाच प्रवास... माणूस श्रेष्ठ, अमूक जात, तमूक वंश, अमका धर्म आंणि तमका प्रांत अश्या वळणाने जात जात हिटलरशाही पर्यंत पोहोचतो.

माझ्याकडे बघून तुझा कुत्रा भुंकला, माझ्या गाडीला तू हॉर्न मारलास मग तर मला तुला अद्दल घडवावीच लागेल..... ऑनर किलिंग सारख्या प्रश्नाच मूळ उत्तर देखील ह्या प्रश्नातच आहे.

माझ्याकडे बघून तुझा कुत्रा भुंकला, माझ्या गाडीला तू हॉर्न मारलास मग तर मला तुला अद्दल घडवावीच लागेल..... ऑनर किलिंग सारख्या प्रश्नाच मूळ उत्तर देखील ह्या प्रश्नातच आहे.

>>> आणि स्वतःचा कुत्रा / स्वतःची कुत्र्याची आवड इतरांवर लादण्यात बलात्काराचे मूळ आहे.

डास , झुरळे , कोळी , पाली यांच्या प्राणीअधिकाराबद्दल मंडळाचे काय मत आहे?

>> आपला धर्म सोडून ते कुत्रेजातीत कन्व्हर्ट झाले तरच त्यांना अधिकार मिळतील नाहीतर त्यांना नेहमी प्रमाणेच मारण्यात येईल. Proud

अरे ते राहु द्या आता तो बाकच मुळी कुत्र्यासाठी होता माणुस अनावधनाने तिथे बसला . असल्याने तिकडे न जाणो कुत्र्यांनी ह्या माणाचे काय करायचे असा धागा काढला असेल त्यांचे वेब्साईटवर

Pages