ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इब्लिस | 1 August, 2014 - 12:03
असा प्राणी तुमच्या ताटात जेवणे, बिछान्यात सोबत झोपणे, हे हायजिनिक कसे, ते समजवून सांगा हे विचरतोय.>>
इब्लिस, वादायोग्य मुद्दे संपले का? जी लोकं कुत्रे (बाकी पाळीव प्राणी) पाळतात त्यांना हे हायजीन, आरोग्य याबद्दल काही माहीत असणारच नाही आणि वरचं सगळं ते करतच असतील असं गृहित धरून चालताय. बरं करत असतील तरी करेनात त्यांच्या घरी. आमचा कुत्रा तुमच्या घरी काही दिवस सांभाळा म्हणून कुणी गळ घालत आलं तर तुम्हांलाही नाही म्हणता येतंच ना?
पण हा या बाफचा विषय नाहीच.

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का? >>>>

तिथे एक बोर्ड लावून पहा " इथे एकावेळी फ़क्त श्वानांनी अथवा फ़क्त माणसां नी बसावे"

सायो,
तो वाद मी अन बाबु यांच्यात सुरू होता, बेस्ड ऑन चॉईस वर्ड्स यूज्ड बाय हिम.
आय डोन्ट टेक सच वर्ड्स. नॉट फ्रॉम हिम, नॉट फ्रॉम एनिबडी एल्स Happy
आणी ते उत्तर एका प्रश्नाचे होते. विदाऊट काँटेक्स्ट क्वोट करू नका प्लीज.

प्लस, कोण कुणाच्या घरी काय करते, हा या बाफचा विषय आहे का??? नक्की काय सांगताय तुम्ही? श्वानप्रेमाची एक्स्ट्रीम्स नेटवरच सापडतील. पण मला त्याच्याशी काडीचंही घेणं नाही. मी एक सेन्सिबल मेडिकल फॅक्ट सांगितली, त्याबद्दल बोलणं सोडून जे काय झालंय वरती ते दिसलं नाही की काय?

शिवाय,
वादायोग्य / अयोग्य हा प्रकार इथे असतो??

>>कोण कुणाच्या घरी काय करते, हा या बाफचा विषय आहे का??? >> नाहीये ना, तेच तर लिहिलंय वर. वाचा की जरा.तुम्ही जी मेडिकल फॅक्ट सांगताय त्याबद्दलच कुत्रे मालकांना माहित नसावं हे गृहित धरताय का? असं मी म्हटलंय वरच्याच पोस्टीत. Happy

बागुलबुवा,
मी अतिशय सामान्य व्यक्ती आहे व मी कोणी भारी आहे असा माझा मुळीच दावा नाही परंतु खासकरून माणसांच्या सोयीसाठी बनवलेल्या...(अमूक अमूक च्या निधितून व्गैरे वगैरे) बाकांवर माणसांनी बसावे हे मला बरोबर वाटले. कुत्र्याच्या मालकाने स्वतःच्या घरात त्याला कितीही आपुलकीने वागवले व ताटात जेवयला घातले तरी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या माणसांसाठीच्या मुळातच लिमिटेड असलेल्या सोयींत त्याला बरोबरीचा दर्जा देण्यासाठी माणसांना वंचित करणे पटले नाहे. त्या ठिकाणी कोणी इमिजिएट गव्हर्नींग बॉडी नसावी. तक्रारीसाठी नगरसेवकांनाच भेटावे लागले असते म्हणून तक्रार केली नाहे. तुम्हाला ह्याच प्रश्नाचे उत्तर हवे होते ना?

तसेच कुत्र्याच्या शेजारी बसणे मला भितीदायक व गलिच्छ वाटले. तुम्ही विचारले त्याप्रमाणे त्या ठिकाणी कोणी कुष्ठरोगी मानव असता तर मी माझ्या प्रेफरन्सची अपेक्षा मुळीच केली नसती.

बाबौ! सहाशेचा टप्पा ओलान्डतो काय हा धागा? बर्याच जणाना इथे बहुतेक वाटतय की कुत्र्या मान्जराना लक्स/ डव्ह्/लाईफबॉय्/डेटॉल वापरुन आन्घोळ घातली की ते घरात उन्डारायला / रहायला बरे.

वर इब्लिस यानी सान्गीतलेले खरे आहे. कुत्र्या-मान्ज्राच्या केसाने सुद्धा दम्या/ श्वसनाचे रोग होऊ शकतात. आणी हे माझे नाही तर बर्याच डॉक्टरान्चे मत आहे. यावर सन्शोधन झालेले आहे.

आणी सन्शोधक डॉक्टर एवढे वेडे तर नक्कीच नाहीत किन्वा त्यान्ची प्राणी पालकान्शी काही वैयक्तीक दुष्मनी असावे असेही नाही. आणी तरीही यावर शन्का असेल तर फारीन रिटर्न किन्वा फारीनच्याच डॉकना या सम्बन्धीत विचारायला हरकत नसावी.

लहानपणी मला कुत्र्या मन्जराच्या पिल्लान्शी खेळायचे वेड होते, पण मर्यादीतच. तशी मी त्याना फारशी घाबरत नाही. पण २००० साली टिव्हीवर एक घटना पाहिली आणी कुत्र्यान्पासुन मी १० कोस दूर रहायला लागले.

साऊथ अफ्रिकेत ४-५ गोर्या पोलीस ऑफिसर्सनी २-३ कृष्णवर्णीय तरुण अफ्रिकन्सना काही आरोपाखाली पकडले. पण या नरश्रेष्ठानी त्या मुलाना जेलमध्ये किन्वा चौकशीकरता नेण्या ऐवजी त्यान्च्या अन्गावर ५ ते ७ मोठाले लान्डग्यासारखी दिसणारे कुत्रे सोडले. त्या कुत्र्यानी भुन्कत भुन्कत त्या मुलान्वर भयानक हल्ला चढवला
ते त्या मुलाना सारखे चावा घेत होते आणी ती तरुण मुले बिचारी त्या पोलीसान्समोर हात पाय पडुन ओरडत रडत होती. आणी ते पोलीस मात्र जोराने खिदळत होते. ते पाहुन माझे हात पाय थरथरायला लागले, रडायला यायला लागले. माझे आई बाबा तर सुन्न होऊन ती घटना बघत होते.

या मुर्ख पोलीसानी त्याचे व्हिडीओ शुटीन्ग करुन ते न्युज चॅनेलना पाठवले होते बहुतेक. पण ते पहाताच जगभरात सन्तापाची लाट उसळली, जाम प्रक्षोभ झाला. त्या पोलीसाना निलम्बीत केले की अजून काही शिक्षा दिली ते आठवत नाही. पण ते पाहील्यावर मला शान पिक्चरची आठवण झाली, ज्यात तो कुलभुषण खरबन्दा, सुनील दत्तच्या मागे १०० -१५० कुत्री मारायला सोडतो.

मध्ये घडलेली सातारची घटना, जी मी या बाफाच्या मध्ये लिहीली आहे. असे सर्व पाहील्या वाचल्या मुळे माझी कुत्र्यान्बद्दलची सहानूभूतीच नष्ट झाली. भटक्या कुत्र्यान्चे निर्बीजीकरण करावेच. जे याला विरोध करत आहेत, त्यानी त्याना पाळावे अथवा अशा शेल्टर मध्ये पाठवावे.

माणसाना त्यान्ची मुले म्हातारपणात साम्भाळत नाहीत, मग या भटक्याना त्यान्ची पिल्ले साम्भाळणार आहेत का?

परक्या देशातल्या फॅशन्स, सवयी उचलायच्या, त्यान्ची कौतुके करायची, मग त्यान्ची शिस्त आणी सामाजीक जबाबदारी पाळायची सवय का नाही आपल्या अन्गी बाणवायची? ते सोयीस्कर रित्या का डावलले जाते?

याचा सर्वकष विचार करा आणी मग पाळा कुत्री, मान्जरी, हत्ती, घोडे, उन्ट, शहामृग, कान्गारु, , ,कॅपीबारा वगैरे वगैरे वगैरे......

तुम्ही जी मेडिकल फॅक्ट सांगताय त्याबद्दलच कुत्रे मालकांना माहित नसावं हे गृहित धरताय का?
<<
ऑफ कोर्स. अजिब्बात माहिती नसतं बहुतेकांना.
अन माहिती असलं तरी काणाडोळा केला जातो.
सांगितलं, तर किती लोकांना जंत झाले अशा स्टाईलची आकडेवारीही विचारतात.

वरची चर्चा वाचली नाहिये का? की वाचून मग मुद्दाम असले प्रश्न करीत आहात?

अहो वाचलीय की. ती वाचुनच जरा चिमणी/ पणती/ कन्दिल ( जे काही म्हणाल ते) घेऊन आलेय. म्हणल थोडी तिरीप येतीय का ते बघाव.:फिदी:

साती मला नाय खेळायची कुस्ती, जा. मला खोखोच खेळायचा हाय.:खोखो: जरा उठाबशा काढु देत की सफाईगाराना.

अरे! इब्लिस बहुतेक ते तुम्ही माझे पोस्ट पाहुन लिहीलेत असे मला वाटले, सॉरी.

ती अफ्रिकेतली घटना अजूनही डोळ्या समोर दिसतेय.:अरेरे:

उदयन भारी.:फिदी:

>>वरची चर्चा वाचली नाहिये का? की वाचून मग मुद्दाम असले प्रश्न करीत आहात?>> इब्लिस, मी वाचलंय. पण तुम्हांला वेड पांघरून पेडगावला जायचं असेल तर जा खुश्शाल.

तुमच्या गावाला राहत अन जातही नाही आम्ही. Light 1

इतके हुशार, अभ्यासू, ज्ञानी, अन सभ्य सगळेच कुत्री मालक असते, तर इन द फर्स्ट प्लेस हा धागाच सुरू झाला नसता. नाही का? Proud

सिव्हिल हॉस्पिटलला आठवड्यातून एकदा अडिच तासांसाठी जाते तेव्हा तेवढ्या वेळात २-३ तरी डॉग बाईटचे पेशंट्स ओपीडीमध्ये येतातच. मला आजपर्यंत वाटत असे की भटके कुत्रेच चावत असतील लोकांना. पण आज तिथे इन्जेक्शनसाठी आलेल्या एका टीनएजर मुलीला विचारलं, "भटका कुत्रा चावला का?". तर म्हणाली, "नाही, आमचाच पॉमेरियन चावला. त्या॑ला इन्जक्शन द्यायला व्हेटकडे नेलं होतं तेव्हा डॉक्टरांनी कुत्र्याला धरायला सांगितलं तेव्हा चावला. गेली २ वर्षं इन्जेक्शन दिलंच नव्हतं कारण आमचा कुत्रा आकाराने छोटा, १४ वर्षांचा आहे आणि त्या कुत्र्याला दुसरा दांडगा कुत्रा चावल्यावर तो बाहेर एकटा जात नाही." तो कुत्रा तिच्या घरातल्या इतरांना काही करत नाही पण त्या मुलीला नखं मारतो. नख मारलं की ही मुलगी जाऊन धनुर्वाताचं इन्जेक्शन घेते.

तिचा हात पाहिला तर सुजला होता. तरी तिने शुक्रवारी रात्री कुत्रा चावल्यावर शनिवारी पहिलं इन्जेक्शन घेतलं होतं. आणि आज दुसरं इन्जेक्शन घ्यायला आली होती. आज तिला डॉक ने हाताचा एक्स रे काढायला पाठवलं. ती त्यांच्याकडलाच कुत्रा चावल्यामुळे कूल होती आणि हसत हसत हे सगळं सांगत होती. पण दुसरे लोक कुत्रा चावला किंवा ओरबाडलं तर भिऊ शकतात आणि कुत्र्यांची दहशत बसू शकते.

डॉ.व्हॅस्कन चॉलास्की हे प्रसिद्ध श्वान अभ्यासक आहेत, त्यांची या विषयावर अनेक पुस्तके आहेत.

साती | 2 August, 2014 - 22:57 नवीन

ड्यु श्वानांबद्दल ' ते बेफिकीर आहेत' असे म्हणावे असे ते म्हणतात.
<<<

Lol

<< मी अतिशय सामान्य व्यक्ती आहे व मी कोणी भारी आहे असा माझा मुळीच दावा नाही परंतु खासकरून माणसांच्या सोयीसाठी बनवलेल्या...(अमूक अमूक च्या निधितून व्गैरे वगैरे) बाकांवर माणसांनी बसावे हे मला बरोबर वाटले. >> वाटले नाही म्हणायचय बहुत्येक तुम्हाला. ऑथॉरीटीजची मदत घेऊन पहा. अश्या बाकांवर कुत्र्यांनी बसणे अलाऊड नसावे मोस्टली.

<<कुत्र्याच्या मालकाने स्वतःच्या घरात त्याला कितीही आपुलकीने वागवले व ताटात जेवयला घातले तरी सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध असलेल्या माणसांसाठीच्या मुळातच लिमिटेड असलेल्या सोयींत त्याला बरोबरीचा दर्जा देण्यासाठी माणसांना वंचित करणे पटले नाहे. त्या ठिकाणी कोणी इमिजिएट गव्हर्नींग बॉडी नसावी. तक्रारीसाठी नगरसेवकांनाच भेटावे लागले असते म्हणून तक्रार केली नाहे. तुम्हाला ह्याच प्रश्नाचे उत्तर हवे होते ना? >> उत्तर असे नाही, मुळात मला अश्या वाटण्यामागची कारणमिमांसा जाणून घ्यायची होती. माझा अंदाज बरोबर निघाला. इमिजेट गव्हर्निंग बॉडी नसली तरी, नगरसेवक किंवा म्युनिसिपालीटीला पत्र पाठवू शकता.

<<तसेच कुत्र्याच्या शेजारी बसणे मला भितीदायक व गलिच्छ वाटले. >> हाच अंदाज होता माझा.

<< तुम्ही विचारले त्याप्रमाणे त्या ठिकाणी कोणी कुष्ठरोगी मानव असता तर मी माझ्या प्रेफरन्सची अपेक्षा मुळीच केली नसती. >> आय अंडरस्टॅन्ड ...

सो इट्स बेसिकली, ह्यूमन ईज अबाव्ह डॉग्ज कनसेप्ट.... वरती उपाय सांगितलेले आहेतच. पण एक कुत्राप्रेमी म्हणून काही मदत करु शकत असल्यास जरूर सांगा.

समाधान होऊ शकले नाही अमित!

हे आणि हेच मुद्दे तुम्हाला म्हणायचे असले तर मयेकरांचे 'दोघे समान असले तर माणूस कुत्रा का पाळतोय' हे विधान पुरेसे ठरू शकते. Happy

श्वान आणि श्वानप्रेमी, माणसांसाठी असलेल्या बाकावर बसलेले असल्यास-

मोबाइलवर फोटो घेऊन 'Two dogs sitting on a bench' असं क्याप्शन देऊन फेसबुकवर अपलोड करावे. यथावकाश ते त्या श्वानप्रेमीपर्यंत पोहोचेलच. (जग फार लहान आहे)

माझ्या सोसायटीजवळ अजून दोन भटकी कुत्री आली आहेत, साले रोज माझ्या गाडीवर आणि मग माझ्यावर भूंकतात (अर्थात लांबूनच). मी जवळ गेलो तर पळून जातात. आता यांचा बंदोबस्त कसा करावा याच्या विचारात आहे. अशा काही गोळ्या किंवा औषधे मेडीकलमध्ये मिळतील का जी ब्रेडमध्ये किंवा बिस्किटात टाकून यांना खायला घातल्यास यांचे तोंड बंद होईल. कोणास माहिती असल्यास मला व्ययक्तिक लिहा नाहीतर तुम्हीही श्वानव्देष्टे व्हाल.
(टीप : मी मानसिक रुग्ण नाही , कुत्रा माझ्यावर भूंकला किंवा धावला तर मी त्याला आणि त्याच्या मालकाला अद्दल घडविल्याशिवाय स्वस्थ बसत नाही एवढच)

<< हे आणि हेच मुद्दे तुम्हाला म्हणायचे असले तर मयेकरांचे 'दोघे समान असले तर माणूस कुत्रा का पाळतोय' हे विधान पुरेसे ठरू शकते.>>

समान म्हणजे पृथ्वीवर सारखाच हक्क असलेले.

नाहितर कुत्र्याला शेपूट असते हे ही विधान पुरेसे ठरले असते. Proud

भारतातील श्वानप्रेमींची वृत्ती बदलली तर शीर्षक जरूर बदलले जाईल. इतकेच काय, मग या धाग्याचीही गरज राहणार नाही.

समान म्हणजे पृथ्वीवर सारखाच हक्क असलेले. >> वाघ, डास, वायरस, अमीबा, खेकडे, कोंबड्या सगळ्यांचाच पृथ्वीवर समान हक्क आहे, मग त्यांचं काय करायचं? जगबुडी येईल म्हणून नोआसारखं नाव बांधण्यासाठीचं कंत्राट घ्यायचं आहे का देवाकडून?

बागुलबुवा,
वरच्या घटनेमध्ये (बागेत श्वानाला बाकावर घेऊन बसणारे) समजा तुम्ही असता आणि सुमेधा बसायच्या ऊद्देशाने बागेतल्या त्या बाकाजवळ आल्या असता (जिथे सूचना देणारा कोणताही फलक नाहीये) तर तुम्ही काय केले असते?
(मी काय केले असते हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असं जर तुम्हाला म्हणायचं असेल सुमेधांना 'बाकावर बसायचा तुमचा हक्क श्वानाच्या हक्कापेक्षा मोठा आहे असं तुम्हाला का वाटतं' असं विचारण्याचा हक्क तुम्हाला आजिबात नाहीये असं मला वाटतं. तुम्ही जर बिहेविअरल प्रश्न विचारणार असाल तर तसल्याच प्रशांची ऊत्तरं देण्यास तुम्ही देखील बांधील आहात.)

Pages