ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्वानद्वेष्टे नका हो म्हणू त्यांना........ उद्दाम, माजलेल्या, गलिच्छ श्वानप्रेमींच्या बेजबाबदार वर्तनाने त्रस्त झालेले, अत्यंत जबाबदार व सुजाण नागरीक आहेत ते.

कायदेशीर बाबींचा तपास केला असता असे आढळून आले की कोर्टाच्या निर्णयानुसार

१. कुत्र्याला फिरवताना त्याचे तोंड बांधून फिरवणे हे क्रूरपणाचे असून असे करण्यास भाग पाडण्यासाठी कायद्यात दंडाची तरतूद आहे....

२. सोसायटी कुत्रेमालकाना व कुत्र्याना लिफ्टचा वापर करण्यापासून रोखू शकत नाही. सोसायटीला तसा अधिकार नाही तसेच हे ही प्राण्यांना क्रूरपणे वागवणे ह्या सदराखाली येते व अश्या दोन केसेस मध्ये कोर्टाच्या निर्णयानुसार सोसायटीला ५०००/- चा दंड भरावा लागला आहे.

३. पाळीव कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याबाबत, कायदा थुंकणे, कचरा टाकणे हाच लागू होतो. शिक्षा / दंड मालकास भरावा लागतो, कुत्र्यास नाही.

प्राणी पाळणार्‍यांस कोणी त्रास दिल्यास जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवता येऊ शकते. सेक्शन ११९-२२-५१ अंतर्गत शिक्षेची तरतूद आहे.

येस्स....... Proud

आमच्या सोसायटीतील अर्ध्या भागाचा चेअरमन पण टोकाचा श्वानद्वेषी आहे. त्याने एका पपीला मारले आहे व
जनरली उखडून असतो. त्याचा संपर्क होउ नये म्हणून मी त्याच्या बाहेर फिरण्याच्या वेळा चुकवून कुत्रे फिरवून आणते. पूर्वी वॉचमन्सशी हॅलो हाय विश करणे इत्यादी क रत असे पण आम्हाला नीट वागवल्यास किंवा थोडीशी देखील सवलत दिल्यास ( जसे एक कचर्‍या सारखा भाग आहे तिथे कुत्र्यांना जाउ देणे इत्यादि) तर तो चेअरमन त्यांना रागवतो. म्हणजे शि व्याच देतो. } म्हणून वॉचमन्स शी संपर्क बंद केला आहे. अगदी कामा पुरतेच बोलते. चेअरमन लिफ्ट घे णार असल्यास बाजूला थांबते किंवा तो असल्यास काही तरी स्तोत्र डोळे मि टून म्हणते. तो वस्स करून अंगावर आला नाही म्हणजे जिंकली असे आमचे डॉग वॉकचे पॅरामिटर आहे. डॉग्स आर ब्लिस फुली अन अवेर ऑफ ऑल धिस. Happy

आमची व्हेट फार स्मार्ट आत्मविश्वास असलेली अशी आहे तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की सोसायटी प्रिमायसेस मध्ये तुम चे कुत्रे लीश वर पाहिजेत, लीश तुमच्या हातात पाहिजे व त्यांची इंजेक्षने व्यवस्थित दिलीली असली पाहिजेत . ते पाळते. आता यीअरली शॉट्स चे एकच इंजेक्षन असते.

अमा, व्हेट फक्त हायजिनविषयी अधिकारवाणीने बोलू शकतात. बाकी ज्ञान शून्य असते बहुत्येक वेळा त्यान्चे. चेअरमनने काहिही त्रास दिल्यास सांगा. आता मी ह्या क्षेत्रात काम करणार्‍या वकिलांचे कॉन्टॅक्ट्स जमवत आहे.

समजुतदारपणा न दाखवणार्‍या मनुष्यप्राण्यास कायद्याची वेसण घालण्याची जास्त गरज आहे.

>>>सोसायटी कुत्रेमालकाना व कुत्र्याना लिफ्टचा वापर करण्यापासून रोखू शकत नाही. सोसायटीला तसा अधिकार नाही तसेच हे ही प्राण्यांना क्रूरपणे वागवणे ह्या सदराखाली येते व अश्या दोन केसेस मध्ये कोर्टाच्या निर्णयानुसार सोसायटीला ५०००/- चा दंड भरावा लागला आहे.<<<

अमित,

तुम्ही कायदेशीर बाबी शोधून त्या येथे दिल्यात ह्याचे आभार! मात्र शेवटी 'येस्स - फिदी' असे का लिहिले आहेत ते समजले नाही. मूळ वाद 'ह्या कायदेशीर बाबी अस्तित्त्वात आहेत की नाहीत' ह्यावर किंवा 'हे कायदे चुकीचे की बरोबर' ह्यावर नाहीच आहे. कुत्रेमालकांचे बेजबाबदार वर्तन हा मूळ मुद्दा आहे.

आता वर कोट केलेल्या परिच्छेदाबाबतः

लिफ्टमधून जाणार्‍या कुत्र्याने तेथे मलमूत्रविसर्जन केले तर कदाचित सोसायटी कुत्रेमालकाकडून दंड व स्वच्छता अपेक्षित करू शकत असेल, पण नंतरही काही काळ राहिलेली दुर्गंधी, ह्या लिफ्टमध्ये असे काही होऊ शकते ही किळसवाणी भावना मनात ठेवून लिफ्टमधून जायला लागणे हे इतरांनी का सोसावे?

दुसरा मुद्दा! माझ्या माहितीनुसार कुत्रे (कुत्रे व इतर अनेक प्राणी) ह्यांचे मसल्स खूपच अधिक ताकदवान असतात. पाच मजले चढायला एका सत्तर किलोच्या माणसाला दरवेळी जमेल असे नाही, पण कुत्रा अगदी आरामात (व बहुधा अजिबात दुखावला वगैरे न जाता) तो जिना चढू शकेल. ते क्रौर्य का ठरावे? कुत्र्यासोबत कुत्रेमालकालाही जिना चढावा लागत असेल व ते त्या मालकाला कष्टदायक वाटत असेल तर निराळे!

Pages