डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 July, 2014 - 23:47

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ
दैनिक सकाळ बातमी
आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व लोक खुल्लेआम जातात.>>> याची काही मला कल्पना नाही बाबा. मी जे लोक बघितले त्यात अगदी नवर्‍याच्या देखिल अपरोक्ष बायको, किंवा आपण या महाराजाकडे जातो हे एखाद्या शेजार्‍याला देखिल कळु नये याची खबरदारी घेणारे लोक... एवढाच डाटा बेस आहे. अनिस वाले कसे जातात ते काही मला माहित नाही.
माझे मॉरल ऑफ द स्टोरी फक्त म्हातारी मेल्याचे दुखः नाहेय, पण काळ सोकावतो..... येवढेच आहे

निवांत पाटील,

जरी शास्त्रीय बैठक मिळाली तरी तुम्ही म्हणताय ते लोक लपतछपतच जाणार ! Lol मात्र तुमचं ष्टोरीमॉरल मान्य !

आ.न.,
-गा.पै.

१. प्लँचेट किंवा अतींद्रिय शक्तींचा वापर करून केलेला तपास कोर्टाला कसा पटवून देणार ?
२. कोर्ट अशा प्रकारच्या तपासाला फटकारणार नाही का ?
३. तपासाची साधनं, दिशा याबाबत पोलिसांच्या प्रशिक्षणामधे शिकवलं जात असेल. त्यांच्या मॅन्युअल मधे, डूज अ‍ॅण्ड डोण्ट मधे पथ्य देत असतील. त्यात कुठेही अशा शक्तिंची मदत घेण्याला परवानगी आहे का ?
४. या प्रकारात मांत्रिक सांगेल ते प्रमाण असेल तर फॉरेन्सिक लॅब्ज चा रिपोर्ट, परिस्थितीजन्य पुरावे अशा गोष्टींना काय अर्थ राहणार आहे ? अशा अनेक गोष्टी आहेत. हे चार मुद्दे फक्त आता सुचले म्हणून.

गृहमंत्र्यांनी ही गोष्ट खरी असेल (प्लँचेटचा आधार घेतल्याची) तर पोळसाहेबांची खातेनिहाय चौकशी होईल असं जाहीर केलं आहे. या विषयावर इतकी चर्चा व्हायलाच नको होती. आता या चर्चेवर पडदा पडायला हवा.

बॉजा,

तपासाचे साधन आणि पुरावा यांच्यात तुमची गल्लत झालेली दिसते. कुत्र्याचे हुंगणे हे गुन्हेगारापर्यंत पोहोचायचे साधन आहे. तो न्यायालयी टिकणारा पुरावा नव्हे. तसेच प्लांचेट हेही साधन आहे. पुरावा नाही. Happy

आ.न.,
-गा.पै.

कुत्र्याने वास ओळखला हे न्यायालयाला मान्य नसते?
एलेल्बीची डिग्री विकत घेत्ली की काय पैल्वान?

डॉ. दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासाकरता प्लॅचेटचा वापर ही घटना मिडीयाने इतकी संवेदनाशील का ठरवली याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. जगभरातल्या पोलीस व्यवस्थांचा आणि अतिंद्रीय शक्ती असलेल्या व्यक्तीचा संवेदनाशील गुन्ह्यांच्या तपासातला सहभाग याचा विकिपिडीया वर शोध घेतला असता यावर बरच काही सापडत आहे.

गमतीचा भाग असा की विकसनशील देशांपेक्शाही ज्या विकसीत देशातुन विविध तपासपध्दतीचा वापर केला जातो त्यात ही पध्दत अनेक वर्षे प्रचलीत आहे हे वाचुन आश्चर्य वाटले आणि गुन्हेगारी तपास प्रक्रियेत आपण अजुनही प्रयोगशील नाही याची जाणीव होते.

या लिंक वर या विषयाची मुलभुत माहिती http://en.wikipedia.org/wiki/Psychic_detective

तर विस्त्रुत माहिती http://en.wikipedia.org/wiki/Committee_for_the_Scientific_Investigation_...

या लिंकवर आहे. या शिवाय याही लिंकवर आहे. http://en.wikipedia.org/wiki/Skeptical_Inquirer

केवळ अतिंद्रिय शक्ती अनिस ने अंधश्रध्दा ठरवली म्हणजे तो गुन्हा आहे असे होत नाही. जगभरात या विषयी कमालीचे औत्सुख्य असताना आणि त्याचा वापर विधायक कार्यासाठी होत असताना गुलाबराव पोळसाहेबांची खातेनिहाय चौकशी करणे म्हणजे तोंड दाबुन बुक्यांचा मार आहे.

तपासकामात मोकळीक देणे, वारंवार हस्तक्शेप न करणे इतकी साधी गोष्ट राजकारणी लोकांनी आणि तथाकथीत समाजसुधारकांनी लक्शात न घेता वारंवार या तपासात आडथळे आणणे ही गोष्ट पोलीस खात्याचे मनोधैर्य खच्ची करणारी आहे.

थापा मारू नका , कृपया.
१ Australian police, officially, in general have said that they do
accept assistance from psychics.
२ An unnamed Australian federal police officer was suspended following his seeking the aid of a clairvoyant in regards to death threats made against Prime Minister John Howard. A federal police spokesman said they do "not condone the use of psychics in security matters
३ New Zealand police have said "spiritual communications were not considered a creditable foundation for investigation."[
४ n 2006, 28 British police forces responded to a query from the Association for Rational Inquiry to say that they did not and have never used psychics, one force saying "We are unaware of any inquiries significantly progressed solely by information provided by a psychic medium
५ A 1993 survey of police departments in the 50 largest cities in the United States revealed that a third of them had accepted predictions from psychic detectives in the past, although only seven departments treated such information any differently from information from an ordinary source. No police department reported any instances of a psychic investigator providing information that was more helpful than other information received during the course of a case, since any information has to be proved, only information matching other evidence could be used

हे सगळं त्याच विकीच्या त्याच पानावरून.

भरत मयेकर,
अभ्यासू प्रतिसादाबद्दल अभिनंदन.

जगभरातली उदाहरणं बाजूला ठेवूयात.
उद्या कुणीही उठून मांत्रिक असल्याचे दावे करून कुणाचेही नाव घेईल. देव करि नि असे न होवो, पण गापै किंवा निचं यांचे नाव घेतले तरी ते प्लँचेटची बाजू घेतील का ? कुत्र्याला वास येतो हा निसर्गनियम आहे तसा प्लँचेटवर आत्मा येतो हा सिद्ध झालेला नियम आहे कि काय ?

गुन्ह्याच्या तपासासाठी अशा गोष्टींची मदत घेणा-या पोलीस अधिका-याची मानसिकता निष्पक्ष तपासाला अडथळा ठरू शकते. त्यापेक्षा नाही लागला शोध पण प्रयत्न प्रामाणिक असतील तरी चालेल. चौकटीच्या बाहेर जायला तुम्ही काही सुपरहिरो नाही आहात.

या चर्चेने दाभोळकरांची रोज हत्या होतेच आहे पण त्यांच्या विचारांचीही हत्या होतेय. मारेक-यांना जे हवं तेच यातून साध्य होतंय.

bobby jasoos,

१.
>> पण गापै किंवा निचं यांचे नाव घेतले तरी ते प्लँचेटची बाजू घेतील का ?

अतींद्रिय शक्तींची मदत तपासाची दिशा ठरवण्यासाठी घ्यायची असते. तपासाचं लक्ष्य ठरवयला नाही.

उद्या माझं वा नितीनचंद्राचं वा निष्पाप माणसाचं गुन्हेगार म्हणून कोणी नाव घेतलं तर त्यातून काय निष्पन्न होणार आहे? लोकं मूर्खात काढणार ना अशाला? प्राथमिक पुरावा तरी नको का? शिवाय असे विमर्शन (कन्सल्टेशन) फारतर गुन्हेगारापर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. ते काही पुरावा नाही. पोलीस अक्कल बाजूस सारून तपास करतात असं का बरं वाटतं तुम्हाला?

२.
>> चौकटीच्या बाहेर जायला तुम्ही काही सुपरहिरो नाही आहात.

माझ्या माहीतीनुसार तपास कसाही केलेला चालतो. लोकांना त्रास होऊ नये इतपत माफक निर्बंध असतात. तुम्ही म्हणता ती चौकट अतिशय शिथिल आहे.

आ.न.,
-गा.पै.

LOL

पोलिसांनी प्लँचेटचा आधार घेतला ही बाब अयोग्य असली तरी बेकायदेशीर नाही.तपास होण्याकडे शक्ती खर्च केली पाहिजे असे मत माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांनी साम टिव्हीवर व्यक्त केली.

भरतजी,

प्रयोगच करायचा नाही आणि त्या पध्दतीला गुन्हा मानायचा ह्या मानसीकतेबद्दल मी लिहले आहे. या प्रयोगांच्या विश्वासहर्तेबद्दल नाही.

प्रत्येक प्रयोगाची जो पर्यत इंजिनियरींग ( पुन्हा पुन्हा सिध्द होणे ) या स्टेज पर्यत तांत्रिकता पोहोचत नाही तो पर्यंत चुकीचे निष्कर्ष निघणे स्वाभावीक आहे.

मी इंजिनीयरींगला असताना आमचे प्रोफेसर म्हणायचे - प्रयोगशाळेत लोखंडापासुन सोने बनवणे शक्य आहे पण कदाचित १० ग्रॅम सोन्याला ह्या कामी १० लाख रुपये लागतील. इंजिनियरींग ही विज्ञानाची प्रगत शाखा आहे ज्यात या प्र्योगाचे व्यावसायईकीकरण करण करणे अपेक्षीत आहे.

माझा मुद्दा समजला असावा. मी थापा मारत नाही.

बेबी जासूस अहो इथे लोकशाहीचीच हत्या चालली आहे तिथे दाभोलकरांच्या विचारांची ह्त्येचे काय घेउन बसलात. इथे लोकशाही चे मारेकरीच उजळ माथ्याने फिरत आहेत त्यावर कोणी कारवाई करत नाहीत.

विकीपिडियावरची माइती (जी मी आधीच्या पोस्टमध्ये डकवलीय) आणि त्यासंदर्भातली तुमची पुढली विधाने यांचा ताळमेळ बसत नाही. त्यादृष्टीने त्या थापाच.

<जगभरातल्या पोलीस व्यवस्थांचा आणि अतिंद्रीय शक्ती असलेल्या व्यक्तीचा संवेदनाशील गुन्ह्यांच्या तपासातला सहभाग याचा विकिपिडीया वर शोध घेतला असता यावर बरच काही सापडत आहे.

गमतीचा भाग असा की विकसनशील देशांपेक्शाही ज्या विकसीत देशातुन विविध तपासपध्दतीचा वापर केला जातो त्यात ही पध्दत अनेक वर्षे प्रचलीत आहे हे वाचुन आश्चर्य वाटले>

<इंजिनीयरींगला असताना आमचे प्रोफेसर म्हणायचे - प्रयोगशाळेत लोखंडापासुन सोने बनवणे शक्य आहे पण कदाचित १० ग्रॅम सोन्याला ह्या कामी १० लाख रुपये लागतील. > १० लाख रुपये अजिबात फार नाहीत. पण शाळेत शिकलेल्या मूलद्रव्यांचं काय करायचं?

डॉ मेधा खाजगीवाले यांचे आत्म्याचा प्रवास व मृत्यूपश्चात जीवन हे पुस्तक बुकगंगावर उपलब्ध दिसते आहे. पहा त्याबद्दल http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5659910648640752278...
साम टीव्ही च्या कार्यक्रमात त्यांनी आपण प्लँचेट केले वा पाहिले नसल्याचे म्हटले आहे.

अहो इथे लोकशाहीचीच हत्या चालली आहे तिथे दाभोलकरांच्या विचारांची ह्त्येचे काय घेउन बसलात. इथे लोकशाही चे मारेकरीच उजळ माथ्याने फिरत आहेत त्यावर कोणी कारवाई करत नाहीत. >>>

प्रघा
दाभोळकरांचा प्लँचेटला पाठिंबा नव्हता हे तुम्हाला ठाऊक नाही का ? तुम्ही दिलेलं हे स्टेटमेण्ट कुणीही दाभोळकरांविषयी आदर असणारा व्यक्ती करू शकणार नाही. प्लँचेटविषयी प्रेम, आदर असणा-या व्यक्तीला दाभोळकरांच्या विचारांची हत्या झालीये याबद्दल आस्था नसणे समजू शकते. सुरुवातीला तुम्हाला काय म्हणायचंय हे समजलं नाही, पण वाचकांचा पत्रव्यवहार प्लँचेटच्या समर्थनार्थ आणल्याने थोडंसं स्पष्ट झालं.

इथे लोकशाही चे मारेकरीच उजळ माथ्याने फिरत आहेत त्यावर कोणी कारवाई करत नाहीत.
आताच हा मुद्दा घ्यावासा का वाटला ? याबद्दल तुम्ही कधी कुठे लिहीलंय का यापूर्वी ? कोण आहेत ते मारेकरी ? वेगळा बाफ काढाल का प्लीज ?

>>दाभोळकरांचा प्लँचेटला पाठिंबा नव्हता हे तुम्हाला ठाऊक नाही का ? तुम्ही दिलेलं हे स्टेटमेण्ट कुणीही दाभोळकरांविषयी आदर असणारा व्यक्ती करू शकणार नाही<<
नम्रपणे एवढेच सांगु इच्छितो कि अभ्यास वाढवा.

>>केवळ अतिंद्रिय शक्ती अनिस ने अंधश्रध्दा ठरवली म्हणजे तो गुन्हा आहे असे होत नाही. जगभरात या विषयी कमालीचे औत्सुख्य असताना आणि त्याचा वापर विधायक कार्यासाठी होत असताना गुलाबराव पोळसाहेबांची खातेनिहाय चौकशी करणे म्हणजे तोंड दाबुन बुक्यांचा मार आहे.<<
नितिनचंद्र जी आपल्या आशयाशी सहमत आहे. परंतु प्लँचेट सारख्या तद्दन अशास्त्रीय गोष्टींचा आधार हा पोलिसांना का घ्यावासा वाटते हे मी वर विशद केले आहे.या कृती मागचा हेतु विधायकच आहे हे मान्य. दाभोलकरांच्या हत्येचा तपास लागावा असे वाटणे हेही त्यामागे आहेच. उद्या प्लँचेट ला वैज्ञानिक आधार मिळाला तर तो त्यावेळी मान्य होईलच.

स्वर्णसुंदरी आपल्याला काय म्हणायचे आहे नेमके? आपण कृपया संपूर्ण धागा व प्रतिक्रिया व्यवस्थित वाचा.

प्रघा
माझे म्हणणे या पानावर मी व्यवस्थित आणि सुस्पष्टरित्या मांडले आहे. तुम्हाला विचारलेले प्रश्न हे तुमचे म्हणणे समजत नसल्याने विचारलेले आहेत. तुमचे म्हणणे मोघम असल्याने तुम्हीच स्पष्ट करावे ही नम्र विनंती. इच्छा नसल्यास आग्रह नाही. पुन्हा पुन्हा तेच काय लिहीणार ? तरी पण दोन प्रश्नांची थोडक्यात उत्तरे अपेक्षित आहेत.

१. तुम्ही इथे प्लॅंचेटबद्दलचा पत्रव्यवहार चिकटवण्याचे कारण काय ?
२. दाभोळकरांचा प्लॅंचेटला विरोध होता हे आपल्याला मान्य आहे का ?

१. तुम्ही इथे प्लॅंचेटबद्दलचा पत्रव्यवहार चिकटवण्याचे कारण काय ?
इतरांचेही विचार वाचकांना समजावेत.
२. दाभोळकरांचा प्लॅंचेटला विरोध होता हे आपल्याला मान्य आहे का ?
अर्थातच होय. आपल्या सदस्यत्वाचा कालावधी ३ आठवडे असल्यान आपण हा प्रश्न मला विचारला आहे हे मी जाणतो.

सदस्यत्वाच्या कालावधीवरून मुद्दे बदलणार नाहीत असा माझा विश्वास आहे.

इथली संपूर्ण चर्चा वाचून काढली आहे. तुमचा दाभोलकरांच्या भूमिकेला पाठिंबा आहे कि नाही हे त्यातून समजत नाही. दाभोळकर स्वत: जिवंत असते आणि इतर कुठल्या केस मधे हा मुद्दा समोर आला असता तर त्यांनी कुठली भूमिका घेतली असती हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून ही कृती आणि त्यानंतर सुरू झालेली चर्चा ही त्यांच्या विचारांची हत्या आहे असं मी म्हटलं होतं. त्यावर तुमचा जो प्रतिसाद (लोकशाहीची हत्या) होता त्यातून तुमचा विरोध आहे कि पाठिंबा हे काही समजलं नाही (असंबद्ध वाटला). नंतरच्या प्रतिसादातून संभ्रम वाढल्याने विचारणा कराविशी वाटली.

तुम्हाला प्लॅंचेट करणे गैर आहे हे पटत नाही एव्हढे समजले आणि तुमच्या या विचारांचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे याबद्दल शंका नाही.

.>> त्यावर तुमचा जो प्रतिसाद (लोकशाहीची हत्या) होता त्यातून तुमचा विरोध आहे कि पाठिंबा हे काही समजलं नाही (असंबद्ध वाटला).<<
कृष्ण - धवल द्वैतात अडकले कि असे होते. चांगल किंवा वाईट, राम किंवा रावण, विरोध किंवा पाठिंबा. if you are not with us you are with them. अशी ती मानसिकता. एखाद्या गोष्टीला फक्त दोनच बाजू नसतात. विविधांगाने तसेच विविधरंगी विचार असू शकतो. असो. सर्वांनाच समजावून देण्याची क्षमता व ताकद माझ्यात नाही.माझ्या त्या मर्यादा आहेत हे मान्य.

>>कृष्ण - धवल द्वैतात अडकले कि असे होते. चांगल किंवा वाईट, राम किंवा रावण, विरोध किंवा पाठिंबा. if you are not with us you are with them. अशी ती मानसिकता. एखाद्या गोष्टीला फक्त दोनच बाजू नसतात. विविधांगाने तसेच विविधरंगी विचार असू शकतो. असो. सर्वांनाच समजावून देण्याची क्षमता व ताकद माझ्यात नाही.माझ्या त्या मर्यादा आहेत हे मान्य.

उभे राहून जोरदार टाळ्या !!! _/\_ Happy
इकडे (म्हणजे माबोवर, केवळ या धाग्यावर नव्हे), अनेकांना हे कळतच नाही, किंवा कळत असले तरी वळत नाही. आणि मग जोरदार शाब्दिक लढाया चालू करतात. Angry

ओके. तुम्ही दाभोळकरांच्या भूमिकेला पाठिंबा आहे का या प्रश्नाला कृष्ण धवल च्या पलिकडे असं पुन्हा मोघम उत्तर दिलं आहे. म्हणजे तुमची भूमिका थोडीशी वेगळी आहे हे तर मान्य ना ? माझं म्हणणं इतकंच की स्पष्ट भूमिका घेतल्यास बरं राहील.

प्लॅंचेट अस्तित्वात आहे किंवा प्लॅंचेट अस्तित्वात नाही याशिवाय आणखी एखादी शक्यता सांगता येऊ शकेल का ?

( अवांतर : मी इथे थांबणार आहे).

Latest update :
https://m.facebook.com/story.php?story_fbid=10154449500590271&id=1797250...

Pages