Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 July, 2014 - 23:47
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ
दैनिक सकाळ बातमी
आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समजा प्लँचेटच्या आधारे
समजा प्लँचेटच्या आधारे दाभोळकरांचे खुनी सापडले तर अंनिस ची काय मजा येईल राव !
एकी कडे दाभोळकरांचे खुनी मिळाल्याचा आनंद तर दुसरीकडे चमत्कार दाखवा अन ५ लाख मिळवा ह्या त्यांच्या घोषणे मुळे ५ लाख रुपये द्यावे लागतील प्लॅन्चेट करणार्यांना !
घाटपांडे काका , तुम्हाला प्रश्न कुंडलीच्या आधारे भविष्य सांगता येते का हो ?
तसे असल्यास तुमीच सांगा की दाभोळकरांचा खुनी कधी सापडेल ते ? सध्याची वेळ : १४ जुलै २०१४ दुपारचे १२ वाजुन ३३ मिनिट . नंवर हवा असल्यास १७१ .
प्रगो, अरे घापां काकांना असे
प्रगो, अरे घापां काकांना असे पेचात नको टाकूस बुवा!
घाटपांडे साहेब, तुमचं बरंचसं
घाटपांडे साहेब, तुमचं बरंचसं म्हणणं पटलं..संतुलित वाटले विचार!
इथे केपी वाले आहेत ना? ते
इथे केपी वाले आहेत ना? ते सांगतिल ना नंबर व प्रश्नकुंडली वरुन . कुणाना कुणाच बरोबर येणारच. बाकी समजा
१) तपास पथकातल्या कुणी व्यक्तिने खुनी लवकर सापडावेत म्हणुन पांडुरंगाला वा आपापल्या देवाला साकडे घातले असेल तर?
२) ज्योतिषाला कुणी प्रश्न विचारला असेल तर?
तपास तर शास्त्रीय पद्धतीने चाललाच आहे सोबत हे बी करुन पघू, एखाद्या गंभीर रुग्णाला आधुनिक उपचार चालूच आहेत सोबत अंगारा असलेला बरा! वाईट तर काही होत नाही ना! हा विचार असतो तसे!
वा सही ! घाटपांडे काका , ज्या
वा सही ! घाटपांडे काका , ज्या कुशतेने तुम्ही प्रश्न टाळलात ते पाहुन "तुम्ही नक्कीच यशस्वी ज्योतिषी झाला असतात " असे एक अनुमान काढत आहे !
प्रगो, घापांकाका मूळचे पोलिस
प्रगो, घापांकाका मूळचे पोलिस आहेत आणि मग ज्योतिषी...आणि आता अंनिसवालेही....त्यामुळे ते तीन्ही दृष्टीकोनातून विचार करू शकतात...
घाटपांडे मूळचे पोलीस?
घाटपांडे मूळचे पोलीस?
अहो आम्ही आता स्वेच्छा
अहो आम्ही आता स्वेच्छा निवृत्त बिनतारी ( बिनविषारी) पोलिस. पहा आमचा ब्लॉग बिनतारी जगत
अंनिसतूनही निवृत्त.आता हितचिंतक
अरेच्या खरंच की
अरेच्या खरंच की
घाटपांडेसाहेब, आपल्या नविन
घाटपांडेसाहेब,
आपल्या नविन ओळखीबद्दल धन्यवाद.
माझ्या वाचनातुन राहुन गेला असेल तर आपण अनिस का सोडली याची कारणमिमांसा करणारा लेख लिहला असेल तर त्याची लि़ंक द्यावी.
नसेलच लिहला तर कारणे जाहिर करावीत असा आग्रह बिलकुल नाही.
(No subject)
(No subject)
प्लँच करायला कमीतकमी किती
प्लँच करायला कमीतकमी किती व्यक्ती लागतात्?पोलिस डिपार्टमेंट्च्या बर्याच जागा रिकाम्या आहेत आणि त्या कधी भरल्याही जात नाहीत.आहे तेवढी फोर्स बास होईल का?
की पोलिस भरती चालू करायला सांगयचं.
प्रकाश घाटपांडे, तुम्ही स्वत:
प्रकाश घाटपांडे,
तुम्ही स्वत: पोलिसांत होतात तरी हा प्रश्न विचारता याचं नवल वाटलं. माझ्या मते प्लांचेट वगैरे प्रकार पोलिसांच्या अपयशावरून लक्ष दुसरीकडे वळवायची युक्ती आहे. आबाबाबा यांचे सरकार असेपर्यंत तड लागणार नाही. नंतरच खरा तपास सुरू होईल. हां, जर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) प्रकरण सोपवलं तर तपास लागू शकतो. कारण तो विभाग केंद्र शासनाच्या (=मोदींच्या) ताब्यात आहे. मोदींनी लक्ष घातलं तर या लोकांचं काही खरं नाही. कोणास ठाऊक कदाचित आतल्याआत काही तोडपाणी झालेलंही असेल.
आ.न.,
-गा.पै.
नितिन चंद्र मी अंनिस सोडली
नितिन चंद्र
मी अंनिस सोडली वगैरे अस नाही फक्त माझा २० वर्षे सहभाग जरा अॅक्टिव्ह होता तो गेली चार पाच वर्षे कमी केला आहे आता हितचिंतक असा मर्यादित सहभाग आहे एवढेच. कंटाळा येतो सारख्या त्याच त्याच गोष्टींचा. असो. अधिक माहितीसाठी माझा फलज्योतिष चिकित्सा मंडळ हा ब्लॉग पहावा.
गा पै. अहो मी बिनतारी या तांत्रिक साईड ब्रांचला होतो. खात्याची रुट लेव्हलची मानसिकतेशी माझा परिचय आहेच. खात्याचा सरासरी IQ, EQ कमी असतो.
घाटपांडे साहेब, तुम्ही अनिसचे
घाटपांडे साहेब,
तुम्ही अनिसचे कार्यकर्ते होतात आणि आता भविष्य ही वर्तवता. हे कस काय ? माननीय नरेंद्र दाभोळकर यांनी मला असे लिहले होते की फलज्योतिषावर माझा विश्वास नाही. यामुळे मी भविष्याचा अभ्यास केला कारण माझे आजोबा फक्त भविष्यकथन करुन घर चालवत होते. लोकांना अनुभव यायचा म्हणुन लोक त्यांचेकडे पुन्हा यायचे.
प्रघा तुम्ही अंनिसचं काम करत
प्रघा
तुम्ही अंनिसचं काम करत होता आणि आता सक्रीय नाहीत असं म्हणताहात. तुमच्या पोस्ट्स, तुमचे सध्याचे कार्य आणि अंनिसची ध्येयधोरणं याचा कुठेच मेळ बसत नाही. मग तुम्ही स्वतःला अंनिसचे (माजी कि आजी) कार्यकर्ते का म्हणवून घेत आहात ?
जर तुम्ही अंनिस सोडलेली नाही तर तुम्हाला पडलेला प्रश्न अंनिस ला विचारून त्यांची भूमिका काय आहे हे का सांगितलेले नाही लेखात ? अंनिसकडे विचारणा करणे तुम्हाला शक्य असेल ना ? की काही प्रॉब्लेम आहे ? त्याउलट संदिग्ध सुरुवात करून तुम्हाला काय वाटतं असं अंनिसेतरांना विचारण्यामागे काय भूमिका आहे ?
अंनिसची अशी मागणी करण्यामागे काही न काही (चूक अथवा बरोबर) बाजू असेल असं तुम्हाला वाटतं का ? अजूनही तुमचा आणि अंनिसचा संवाद असेल तर त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी का केली आहे हे त्यांना विचारून त्यांची बाजू मांडू शकाल काय ?
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधकांची भूमिका
http://srjmahajans.blogspot.in/2009/07/blog-post.html
https://www.facebook.com/rajivdixit.official/posts/405729649533267
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका
https://www.facebook.com/rajivdixit.official/posts/405729649533267
@प्रघा - तुम्ही फलज्योतिषी असून अंनिसचे कार्य करता हे तर तुमच्याकडून खालील प्रश्नांची उत्तरे अपेक्षित आहेत. ( टकरा मारणारे एडके या सदरात टाकले तरी चालेल)
१.प्लँचेट हे सायन्स आहे का ?
२. प्लँचेटच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही गुन्ह्याचा तपास करू शकता का ?
३. जर वरील प्रश्नांची उत्तरे नाही , अशी असतील तर ती फसवणूक होऊ शकेल का ?
कायदा
http://www.mahans.co.in/index.php?option=com_content&view=category&layou...
फलज्योतिषाबद्दल अंनिसच्या उपक्रमाची माहीती संस्थळावर सापडली. तिथे तुमचं नाव ज्योतिष अभ्यासक म्हणून दिलेले आहे.
http://www.berational.co.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B...
तिथेच खालील पदाधिका-याचे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक दिलेला आहे. आपण त्यांचे सहकारी असल्याने त्यांच्याशी संपर्क साधू शकाल का ?
प्रा. डॉ. नितीन शिंदे
राज्य कार्यवाह – महाराष्ट्र अंनिस
कल्पतरु, कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज समोर, इस्लामपूर, जि. सांगली – ४१५४०९
मोबाईल-९८६०४३८२०८
प्रकाशजी, कमाल आहे, तुम्ही एक
प्रकाशजी, कमाल आहे, तुम्ही एक भारीच कॉम्बिनेशन आहात.

ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आणि अनिस हे गणित काही समजले नाही
त्यांनी त्यांच्या ब्लॉगची
त्यांनी त्यांच्या ब्लॉगची लिंक दिली आहे. ती उघडून वाचण्याचे कष्ट घेतले तर गणित बिणित समजेल.
मयेकर, सुचनेबद्दल धन्यवाद,
मयेकर, सुचनेबद्दल धन्यवाद, ब्लॉग पाहिला उघडून, पण त्यामधे तुम्ही नक्की काय सुचवित आहात ते कळाले नाही.
बरेच लेख आहेत, एवढे सगळे आत्ता वाचणे होणार नाही. हे गणित सोडविण्यासाठी नक्की कोणता लेख उपयुक्त आहे असे तुम्हाला वाटले ?
ब्लॉगचे नाव "फलज्योतिष
ब्लॉगचे नाव "फलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग" पुरेसे आहे.
http://www.abans.org.in/?law/
http://www.abans.org.in/?law/63
यातील ५ (२) ही तरतूद पाहून घाटपांडेंनी स्वतःच या विषयाचं उत्तर द्यावं.
ज्योतिषशास्त्र आणि अनिस या
ज्योतिषशास्त्र आणि अनिस या दोन गोष्टी एकाच ठिकाणी दिसल्याने आश्चर्य वाटले,
कारण अनिसचा मुळात या प्रकाराला केवढा विरोध आहे हे सर्वांनाच माहिती आहे,
अगदी दाभोळकरांनी स्वतःची कुंडली देखील जाहिररित्या जाळली होती.
अनिसने केलेल्या बुवाबाजी
अनिसने केलेल्या बुवाबाजी विरोधातल्या कृती, भानामतीच्या विरोधातल्या, अघोरी पंथ यांच्या विरोधातल्या कृती, खाण्याची भ्रांत असलेल्या केलेल्या लोकांनी केलेले चमत्काराचे दावे या विरोधातली कृती ही सर्व अनिसची बलस्थाने होती.
यातुन एखाद्या शास्त्रशुध्द अभ्यास करणार्या इन्स्टीट्युशन च्या निर्मीती ऐवजी त्याचा पाया जनआंदोलनाचा घातला गेला. जनाअंदोलने तात्कालि़क प्रश्नांवर चालतात. त्यांची यशस्वी होण्याचे प्रमाण हा एक संशोधनाचा विषय आहे.
याउलट पुण्यात अनेक डॉक्टरच्या आणि शास्त्राच्या प्राध्यापकांच्या समोर गोडाबाबाच्या हातातुन स्त्रवणार्या गोड स्त्रावाची सॅपल्स आणि त्याचे रासायनीक प्रयोगशाळेतले निष्कर्ष या सारख्या अनेक प्रयोगात डिस्कव्हरीवर सुपर-मॅन च्या जश्या अधिक चाचण्या होऊन त्यांना सुपरमॅन चा दर्जा दिला जातो तसे न करता गोडाबाबाला हातचलाखी करतो असे ठरविण्याची घाई या सारख्या अनेक गोष्टीत अनिसने आपली विश्वासार्हता गमावली.
प्रसारमाध्यमांच्या मागे लागे लागुन, घाई घाईने खरे सत्य / तत्व न जाणता/ शास्त्राच्या मागे ही एखादे सुक्ष्म शास्त्र असु शकते हे न मानता लोकांच्या पिढ्यान पिढ्या अपरंपार श्रध्दा असलेल्या विषयांना, संस्कृतीला त्याज्य ठरविण्याच्या मानसीकतेमुळे सर्वात जास्त नुकसान अनिसचे झाले आहे.
अनिस मानो अथवा न मानो, अनेक पिढ्यांच्या प्रयत्नांनंतर ज्योतिषासारख्या विषयाचा आज जनमान्यता लाभली आहे. अनेक पिढ्यांच्या मनात या शास्त्राने केलेल्या मार्गदर्शनाचा चांगला अनुभव आहे. हा कुणा एका व्यक्तीच्या " याला कार्य कारण भाव नाही " असे म्हणण्याने हा विश्वास संपत नाही.
सप्तमात सप्तमेश शुक्र असुन जर त्यावर कोणत्याही अशुभ ग्रहाची दृष्टी नसताना निर्भेळ वैवाहीक सुखाची ग्वाही देता येते. हा नियम ७० ट्क्के वेळा सिध्द होत असेल तर प्रोबॅबिलिटीच्या थेअरीवर सुध्दा या नियमाची दखल घ्यायची नाही याला काय बेस आहे ?
३० टक्के वेळेला अलनिनो सारखे काही अननोन फॅक्टर्स काम करत असतील तर ते हवामान खात्याला चालते. पण ज्योतिषाला मात्र अशी संधी न देता ते शास्त्र कसे नाही हे ठरवायला त्याचा प्रचार होत होता.
भारत हा शेती प्रधान देश असताना आणि हवामान खात्यासारखे खाते, नभोवाणी - दुरचित्रवाणी सारखी प्रसार माध्यमे नसताना पंचांगातल्या पावसाची नक्षत्रे आणि त्यांचे वाहन या भरवश्यावर शेतीचे नियोजन होतच होते.
ह्या मॉडेलची विश्वासार्हता कुणी तपासण्याचा प्रयत्न केलाच नाही. याउलट पुणे विद्यापीठात ज्योतिष विषयाला स्थानच मिळु नये यासाठी जी लॉबी तयार करण्यात आली यातुन अनिसच काय तर इतरांचा सुध्दा पुर्वग्रह दुषित असल्याची ग्वाही माझ्या पिढिला मिळते.
तुम्हाला रसायनशात्रात पी एच डी मिळाली. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मान मिळाले म्हणजे तुम्ही आर्किओलॉजीवर ते शास्त्रच नाही अशी टिका करु शकत नाही. ही चुक अनेकांनी ज्योतिष हे शास्त्रच नाही असे बोलुन केली.
दुर्देवाने मागच्या अनेक पिढ्यात अनेक पोटार्थी, अल्पशिक्षीत आणि गांधीहत्येनंतर असहाय झालेल्या समाजाचे अनेक प्रतिनिधी या क्षेत्रात असल्याने कोणीही हाका अश्या अवस्थेला येऊन पोहोचतो की काय असे चित्र दिसु लागले होते.
मी जेव्हा ज्योतिष शिकलो तेव्हा माझ्या सोबत अनेक डॉक्टर्स शिकत होते यातले सर्वच यशस्वी डॉक्टर्स होते हे सांगणे नको.. ज्योतिषशात्राच्या जिज्ञासेबरोबरच या मध्ये केले जाणारे संशोधन आणि नविन नियमांची निर्मीती यात त्यांना रस होता.
ज्योतिष हे अत्यंत पुर्ण आणि अतिसम्रुध्द शास्त्र आहे असा दावा कोणीही करणार नाही पण अनिसने प्रतिमा मलीन करण्याच्या प्रयत्नाला मात्र अपयश आले आहे हे निश्चीत.
<लोकांच्या पिढ्यान पिढ्या
<लोकांच्या पिढ्यान पिढ्या अपरंपार श्रध्दा असलेल्या विषयांना, संस्कृतीला त्याज्य ठरविण्याच्या मानसीकतेमुळे> उदाहरणे देणार का असं काही केल्याची?
देवाधर्माला विरोध नाही.
अनिस मुख्यत: जादूटोणाविषयी
अनिस मुख्यत: जादूटोणाविषयी प्रवादांना आणि घटनांना विरोध करणारी संस्था आहे.ज्योतिष हे डॉ.दाभोळकर किंवा त्यांचे बहुतांश संघटक,सभासद मानत नाहीत याचा अर्थ तो काही थंब रुल आहे असे होत नाही ना? एखाद्या अनिसच्या सभासदाने जादूटॉण्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला,तर ते विरोधाभासात्म होईल्,पण एखाद्याला ज्योतिषाचा अभ्यास करायचा आहे,तो ते करत आहे आणि वरुन अनिसचा सभासद आहे,यात विरोदाभास कसला?
त्यांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे,त्यांनी ते करावं. प्र.घा. हे अनिसचं काम करतात किंवा करत होते हेच महत्वाचं.
अगदी दाभोळकरांनी स्वतःची
अगदी दाभोळकरांनी स्वतःची कुंडली देखील जाहिररित्या जाळली होती.>> ती देखील पकाकाकांनीच बनवलेली होती असा उल्लेख वाचलाय मी.
ते समन्वयक म्हणुन काम बघायचे.
ते जोतिषाला ठोकत नाहीत एकतर्फी की अनिसलाही ठोकत नाहीत एकतर्फी.
मुद्दे घेवुन त्याची चाचणी कशी करता येइल वै वै बरच काही आहे.
त्यांचा ब्लॉग पुर्ण वाचा.
त्यांचा कल अनिस कडे जास्त आहे.
आणि सध्या त्यांनी अॅक्टिव्ह सहभाग थांबवला म्हणजे ते विरोधी नव्हेत हो.
त्यांची तब्येत वै संभाळुन करत असतील की.
लेखकाला व्यक्तीस्वातंत्र्य
लेखकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे हे मान्य. पण जेव्हां ते अंनिसचे कार्यकर्ते आहोत असा उल्लेख करतात तेव्हां(च) प्रत्सुत प्रश्न संघटनेत न विचारता इथे का विचारला गेला आहे हे जाणून घ्यावंसं वाटणं चुकीचं आहे का ?
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संस्थळावर गेलात तर देव आहे कि नाही याला आक्षेप नाही असं जाहीर केलं आहे. १९८९ साली लोणावळा इथे संस्थेच्या मंथनात याबद्दल भूमिका ठरलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हां देवाला विरोध का करत नाही अशी भूमिका का घेत नाही असे विचारणा-यांनी वेगळ्या बॅनरखाली काम करावे असं स्पष्ट शब्दात लिहीले आहे. ही भूमिका मान्य व्हावी. कारण एखाद्या संस्थेशी जोडले जाणे म्हणजे वैयक्तिक आवडी निवडींना बाजूला सारून संघटनेची विचारधारा, कार्यपद्धती पटल्यानेच आपण तिथे आहोत असा त्याचा अर्थ होत असतो. सनातन प्रभात मधे जाऊन मी नास्तिक आहे पण तुमच्या संघटनेचा सदस्य होऊ इच्छितो , माझे विचार हे वेगळेच राहतील असं म्हणणे चालेल का ?
तुम्ही एखाद्या संघटनेचे सदस्य आहेत हे क्लेम करता तेव्हां त्यांनी वेळोवेळी जाहीर केलेली, लिखीत स्वरूपात मांडलेली, संस्थळावर असलेली भूमिका ही अधिकृत आहे असा त्याचा अर्थ होतो. या भूमिकेशी विसंगत भूमिका व्यक्ती म्हणून घ्यायची असेल तर संस्थेत/ संघटनेत ती अंतर्गत रित्या मांडता येते. जर संस्थेला अधिकृत धोरणांशी व्यक्तीगत भूमिका मान्य झाली नाही तर संघटना सोडणे हे देखील व्यक्तीस्वातंत्र्यच आहे की.. कुणी जबरदस्ती करत का ?
समन्वयक म्हणून त्या विशिष्ट आंदोलनासाठी काम करणं निराळं आणि ज्योतिष या शास्त्राविषयी अंनिसने घेतलेल्या भूमिकेशी विसंगत भूमिका संस्थेचा सदस्य म्हणून मांडणे निराळे. त्यामुळे ज्योतिषशास्त्राविषयी अंनिसची जी आजवर अधिकृत म्हणून माहीत असलेली भूमिका (कुणाला पटो वा ना पटो ) बदलली आहे का असा गोंधळ सामान्यांच्या मनात होणे साहजिक आहे.
टीप : अभाअंनिस ही शाम मानवांची संघटना आहे. तिचे उदाहरण वैयक्तिक भूमिका आणि संघटनेची भूमिका यातल्या फरकासाठी दिले आहे.
अरे बापरे बर्याच प्रतिक्रिया
अरे बापरे बर्याच प्रतिक्रिया दिसतात. प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. सर्वांच्याच प्रतिक्रियांना उत्तरे देता येणे शक्य नाही. तसेच त्यांचे समाधान होईल अशी उत्तरे पण देता येणे शक्य नाही. लोकांना इन्स्टंट सोल्यशन वा उत्तरे हवी असतात. ती शक्य नसले तरी त्यासंबंधीत चर्चा कुठे आहे याच्या लिंक देणे शक्य असते म्हणुन मी ब्लॉगची लिंक दिली. खर तर मी ती यापुर्वीही अनेकदा दिली होती.
माझे ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. प्रश्नोत्तरातून सुसंवाद हे पुस्तक साधारण एफ ए क्यू अशा स्वरुपाचे आहे. ते उपक्रमावर लेखमाला स्वरुपात टाकले होते. त्यातून काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मदत होईल.
प्रथम पुस्तकाचे जयंत नारळीकर यांनी लोकसत्ता १३ एप्रिल २००३ मधे लिहिलेले परिक्षण वाचा व मग ठरवा चाळायचे , वाचायचे कि दुर्लक्षायचे?
http://mr.upakram.org/node/1080
आता पुस्तक लेखमाला स्वरुपात वाचण्यासाठी
http://mr.upakram.org/node/1065
पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी
http://www.arvindguptatoys.com/arvindgupta/jyotishakade%20janypurvee.pdf
किंवा
इथे
गरजे नुसार कॉपी पेस्टवण्याचे प्रयत्न करीन
Pages