डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 July, 2014 - 23:47

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ
दैनिक सकाळ बातमी
आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>युनिव्हर्सिटीतून तरी कुणीतरी हे करायला हवे. विरोधासाठी विरोध काय कामाचा?

तुम्ही प्लँचेट करून एखाद्या वेगळ्या आत्म्याला तर नाही ना बोलावले प्रतिसाद लिहायला तुमच्या वतीने. Wink

डीएनए...हे भानामती वाल्यांच्या शब्दकोषाबाहेर आहे. नायतर त्याच्या शोधाचं नोबल-फिबेल बाबा बंगाल्याला नसतं का मिळालं? आपल्याकडच्या युनिव्ह्र्सिट्या दुसर्‍या देशात काय चालू ए त्याच्या शंभर पावलं मागे आहेत.अहो, आपल्याकडच्या काळ्या जादूपेक्षा आफ्रिकेतली काळि जादू जहाल आहे म्हणतात.म्हणजे धड सायन्स सोडाच जादूटोण्यात बी मागं भारत. Wink

काय बरोबर ना, @ लिंबूभाऊ, नितिनचंद्र अन इतर प्लँचेट समर्थक?

चुक आहे. मी प्लँचेटचा बिलकुल समर्थक नाही. सरकारी कामात तर नाहीच नाही.

जरा पोलीसांच्या भुमीकेत जा म्हणजे मला काय म्हणायच ते समजेल. तपास लागत नसेल तर त्यांनी काय करायच ? कित्येक खुनांचा तपास जेव्हा खुनीच पश्चाताप होऊन पुढे येतो तेव्हाच लागतो. हा इतिहास आहे. पोलीसांना सातत्याने दबावाला, विधानसभेतल्या प्रश्नोत्तराने निर्माण झालेल्या पेच प्रसंगांना तोड द्यावे लागते.

पोलीसांनी काय करावे ? जे काय सी सी टीव्ही कॅमेरे राज्यकर्त्यांनी मागवले ते किती फालतु आहेत हे या निमीत्ताने समजले. थोडक्यात ते फुटेज काही कामाचे ठरले नाही. फोरॅन्सीक रिपोर्ट सुध्दा काही प्रकाश टाकु शकला नाही. जेव्हा लॉजिक चालत नाही तेव्हा खाजगीत ऑफिसच्या कामाचे टेन्शन घेऊन कोणि गेलाच प्लँचेटवाल्याकडे तर काय बिघडल ?

मी प्लँचेटचा समर्थक आहे असा समज कशाला हवा ?

नितिनचंद्र, +१०१ Happy
पोलिसांचे प्रोब्लेम्स खुप आहेत, अन्य एका धाग्यावर पण चर्चेत हा विषय आलेला आहे. त्यांचे कामाचे तास, प्रेशर्स, इ. इ.
पण म्हणुन पोलिसांनी हे असे मार्ग अवलंबावेत असे म्हणणे नाही (निदान माझे तरी)

काय पटले?

रेवडीवाल्याला गंडेरीवाला साक्ष!

अहो,

तुमचेच लॉजिक वापरायचे, तर, उदा. रोजची बायकोची कटकट. संसाराचे प्रेशर्स. आईबापांनी शोधून दिलेली बायको कित्ती कुचकामाची ठरली हे दिसले. तर मग गेलाच कुणी गुत्त्यात तर काय प्रॉब्लेमेय??

यडपट्ट लॉजिक्स लावायचा मक्ता घेतलाय नितीनचंद्र तुम्ही.

तिकडे त्या गांधींच्या धाग्यावरही असलीच मुक्ताफळं आहेत तुमची.

अन हो, संपर्कातून, मेल करुन भांडू नका. जे काय असेल ते इथे बोला Happy

समजा प्लॅन्चेट वापरले असेल, तरी त्यात लाजिरवाणे काय आहे?

------ माझी समस्या अनेक पातळीन्वर आहे.
(अ) ज्या गोष्टीन्ना (बुवाबाजी, भानामती, काळी/ गोरी/ पिवळी/ सावळी जादू) दाभोळकरान्नी सम्पुर्ण आयुष्यात कठोर विरोध केला, असा विरोध करताना त्याना स्वत:चे प्राण गमवावे लागले त्याच दाभोळकरान्च्या खुनाच्या तपासा करता असल्या भम्पक तर्कान्चा आधार घेण्याचे प्रकार होण्याचे आरोप होणे .
(ब) तपास करणारे काही अधिकारी अतिशय नावाजलेले तसेच दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवलेले आहेत. असे मानाचे पदक मिळवणार्‍यान्ची समाजात मोठी विश्वासार्हता असते. अशा लोकान्च्या कृतीवर भोळी, विचार न करणारी जनता पटकन विश्वास ठेवते.
(क) अशा प्रकारचे तपास तन्त्र एका अत्यन्त महत्वाच्या खुनाच्या तपासात वापरले जाणे. आणि अशी घटना देशात सर्वात पुरोगामी म्हणवणार्‍या महाराष्ट्रा सारख्या राज्याच्या शिक्षणाचे आणि विचारवन्तान्चे माहेरघर असणार्‍या पुण्यात घडावी.

माझ्या साठी तिन्ही गोष्टी धक्कादायक आहेत. बातमी खरी - खोटी आहे हे अद्याप सिद्ध झाले नाही, म्हणुन सखोल तपास होणे गरजेचे आहे. गेले वर्षभरात हत्येच्या तपासा मधे झालेली प्रगती बघता दिवसागणित आशा मन्दावते आहे... :अरेरे:.

उद्या देवीला "कौल " नामक विधीची फुले डाव्याउजव्या खान्द्यावर लावली तर ते देखिल लाजिरवाणे का?

क्रिकेटच्या गेम मधे छापकाटा करण्यासाठी नाणे उडविले तर ते देखिल लाजिरवाणे का?
------ तेथे बनवा बनवी नाही आहे.... तुम्हाला नाणेफेकीचे उत्तर काय मिळण्याची शक्यता आहे हे ५० % वेळा छातीठोकपणे सान्गता येते आणि ते १०० %वेळा खरे निघते. येथे थापेबाजी चालत नाही.
आता शोले चित्रपटात जसे नाणे वापरले होते त्याला बनवाबनवी म्हणायचे.

महाराष्ट्र व देशातील राज्य लॉटर्‍यात बक्षिसाकरता तिकिट घेतले तर ते देखिल लाजिरवाणे का? रेसच्या घोड्यान्वर पैसे लावुन खेळले, त्याकरताची "स्टॅटिस्टिकल डाटा(?)" असलेल्या पुस्तिकान्वरुन घोड्याची नावे ठरवुन पैसे लावले तर ते देखिल लाजिरवाणेच ना?
सरते शेवटी लोकसभा/विधानसभा/ झेडप्या/म्युन्सिपालट्या यान्च्या निवडणूकितल्या उमेदवारास ज्याला काळा की गोरा ते देखिल पाहिले नाही अशा कोणाला तरी कोणत्या तरी मशिनचे बटन दाबुन "निवडल्याचे" समाधान मिळविणे देखिल लाजिरवाणेच ठरले पाहिजे ना?
------ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. लॉटरी, निवडणुका असे मुद्दे आणि 'तथाकथित' तपासकामात वापरण्यात आलेले तन्त्र यान्ची सरमिसळ कशासाठी?

ती सरमिसळ अजेंड्यासाठी आहे उदय.

अंनिस ही हिंदूधर्माविरुद्ध आहे असा जावाईशोध नागपुरात लागलेला असावा बहुतेक. मग अंनिसला असा आक्रस्ताळा विरोध होत रहाणारच. अन यांच्या लॉ़जिकमधली भोकं दाखवली, की रेवडिवाले गंडेरीवाल्यांना साक्ष देत उभे रहाणार.

उदा.
तिथे केजरीवाल चांगला असा शोध लागला, तर त्याला डोक्यावर धरणार्‍या पोस्टी अन धागे येतात.
तिकडे नागपुरात कोलांटीउडी पडली की उलट अर्थाच्या पोस्टी.
पाताळयंत्री हा शब्द ऐकलाय का?

नवीन एक्स्प्रेस हायवेला लोणावळ्याच्या अलिकडे जादूटोणा, काळी जादू, अघोर विद्या यांचं शिक्षण देणारं अभिमत विद्यापीठ आहे. गरजूंनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

दाभोलकरांचा आत्मा आला होता म्हणे प्लॅंचेटमध्ये....हे काही बरोबर नाही केलंत तुम्ही, दाभोलकरसाहेब!

india police.jpg

अहो देव साहेब अत्री जीव नाडी मधे डायरेक्ट ऋषी च उत्तर देतात. प्लँचेट मधे लोक गांधीजी, शिवाजीमहाराज यांच्या आत्म्यांना पाचारण करतात. पुण्यात जोशी अभ्यंकर हत्याकांड झाले त्यावेळी श्री नावाच्या साप्ताहिकात प्लँचेट वर कव्हर स्टोरी आली होती.

>>तुम्हीच शिकवा ना स्वदेशी..... आनन्दाने वापरू. गेलाबाजार उदाहरणे तरी द्या स्वदेशीची...<<
अहो पोपटवाल्या ज्योतिषाला ईचारायच. हाय काय नाय काय?

प्रमोद देव, भुमिका मांडतो बरं.( भविष्यात माझ्यात बदल झाला तर म्हणजे माझ्या मेंदुत काही जैवरासायनिक बदल झाले तर ही भुमिका बदलू शकते. माणसात शारिरिक, मानसिक, वैचारिक बदल होत असतात.)
मला स्वत:ला चौकशी करावी हे पटते पण अगदी गुन्हा दाखल करावा हे पटत नाही. याठिकाणी प्रबोधनाला प्राधान्य असावे.किंबहुना ही संधी आहे असे मानावे. शिवाय जादूटोणा विरोधी कायद्यात हे प्रकरण बसवता येणार नाही.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही.
वैज्ञानिक दृष्टिकोन असे सांगतो की खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो. खरा शास्त्रज्ञ नकाराज्ञ नसतो याचा मला उमगलेला अर्थ असा कि तो सर्व शक्यतांचा विचार करतो. एखादी गोष्ट आपल्याला आज पटत नसेल तरी ती उद्या पटणारच नाही असा दुराग्रह तो बाळगत नाही. एखाद्या गोष्टीची शक्यता खूप कमी असली तरी ती गोष्ट अशक्यच आहे असे तो मानत नाही. तो कोणत्याही गोष्टी ला कायमस्वरुपी ठामपणे नकार देत नाही. जी गोष्ट माझ्या दृष्टीकोनात बसत नाही तो वैज्ञानिक दृष्टीकोनच नव्हे असे तो मानत नाही. एखादी गोष्ट मला आज पटत नाही म्हणून ती त्याज्य आहे असे तो मानीत नाही. तो विनम्र असतो.
जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. मग पुढे वैज्ञानिक झाला म्हणजे वैज्ञानिक दृष्टी आली असे नव्हे अशी देखील मांडणी होते. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत. काही लोकांच्या उत्साहाचे उन्मादात (खर तर माजात) केव्हा रुपांतर होते हे त्यांचे त्यांना समजत नाही. आपल्याला या जगाचे जणूकाही सर्व आकलन झाले आहे व बाकी लोक हे किती अज्ञानी! बेचारे गंदी नाली के किडे! हे असेच मरणार, त्यांची लायकीच ती. असा कीव युक्त तिरस्कार त्यांच्या मनात उत्पन्न व्हायला लागतो. मनोविकारांचा मागोवा या डॉ श्रीकांत जोशींच्या पुस्तकात अशा मॅनियाक व्यक्तिमत्वांवर 'दुनिया मेरी जेब मे' असे प्रकरण आहे.इतरांना तुच्छ लेखण्यातून आपण ग्रेट असल्याची भावना त्यांना सुखावून नेते.इतरांचा उपहास करण्याची वा तुच्छ लेखण्याची संधी ते सहसा सोडत नाहीत.पहिलवानांना जशी 'रग' जिरवण्यासाठी 'आखाडा' लागतो तशा या बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते.मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात.
वैचारिक वाद प्रतिवादात या गोष्टी घडत असतात कारण भावना नावाचा फॅक्टर अस्तित्वात असतो. तो त्याला स्वस्थ बसू देत नाही.आपल्या विचारांशी सहमत नसणार्‍यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो....

शिवाय जादूटोणा विरोधी कायद्यात हे प्रकरण बसवता येणार नाही. >>> प्रकाश घाटपांडे, मलाही हे वाचल्यापासून हीच शंका आली होती. नक्की काय गुन्हा दाखल होणार याबद्दल? कोणी नेहमीचा पोलिस तपास थांबवून हे केले तर समजू शकतो.

टिंब टींब च्या टिंब टिंब मधे
स्पष्ट लिहा ना.
सुरुवातीला आणखी एक टिंब हवे होते का ?

वरील सर्व उहापोह पाहील्यानंतर ( या चर्चेच्या आधारे) आपण काही निष्कर्ष काढू शकतो (का?).

१. (झालेला प्रकार खरा आहे असं समजल्यास) अत्यंत कार्यक्षम व प्रयोगक्षम अधिकारी पुण्यनगरीस लाभलेले आहेत यात शंका नाही .
२. सरव आर्थर कॉनन डॉयल यांच्या मानसपुत्राने पोलीस तपासास जी आधुनिक दिशा दिली ती अपूर्ण असल्याचे भारतीय पोलीस दलाच्या केव्हांच लक्षात आले होते पण हिंदू धर्मावर सरकारी दडपशाही होत असल्याने आणि ब्रिटीशकाली सेवानियम असल्याने त्यांना उघड बोलता येत नव्हते.
३. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना हे प्रकार मान्य नव्हते आणि त्या विरोधात ते चळवळ चालवत होते.
४. त्यांचीच हत्या झाल्याने आणि मारेकरी सापडत नसल्याने पोलीस तपासाच्या दशा आणि दिशा यावर याच दडपशाही करणा-यांनी तोंडसुख घेतले. याला म्हणतात मुस्कटदाबी.
५. वाघ, म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो मग वाघ्याच का म्हणू नये या विचारातून मग अंधश्रद्धा विरोधात लढणा-या डॉक्टरांच्याच आत्म्याला का बोलावू नये या उदात्त हेतूने प्लँचेट करण्यात आल्याचे दिसून येते.
६. कुठलाही नवा विचार मांडण्यासाठी आधीच्या वैचारीक बैठकीवर प्रहार करणे अत्यंत आवश्यक असते. अंनिसच्या भूमिकेमुळे पोलीस तापासाची जी वैचारीक कोंडी झाली होती ती फोडण्याचे काम या घटनेतून झालेले आहे. याचे अनेक दूरगामी परिणाम भविष्यात दिसून येतील.
७. इथून पुढे फॉरेन्सिक सायन्स, लॅब्स यांच्या आधारे गुन्हे शोधण्यात लागणारा वेळ कमी होईल.
८. न्यायालयात प्लँचेट सायन्सला मान्यता मिळावी म्हणून कायदा करण्यात येईल.
९. एकदा का हा कायदा झाला की जादूटोणा विरोधी कायद्यान्वये आरोपी असलेल्यांचे गुन्हे शोधण्यासाठी प्लँचेटचा वापर करता येईल. मांत्रिकाच्या नादाला लागून कुणाचा मृत्यू झाल्यास प्लँचेटच्या सहाय्याने ते सिद्ध करता येईल.
१०. भविष्यातले क्रांतिकारी तंत्रज्ञान संबंधितांना शेरलॉक होम्सच्या पंक्तीत नेऊन बसवेल याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.

यडपट्ट लॉजिक्स लावायचा मक्ता घेतलाय नितीनचंद्र तुम्ही.

तिकडे त्या गांधींच्या धाग्यावरही असलीच मुक्ताफळं आहेत तुमची.

अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे मला लोकशाहीत. मायबोलीचे अ‍ॅडमीन यावर काय करायच ते करतील.

माझ लॉजीक पटवुन घ्या असा आग्रह मी कुणालाच करत नाही. तुम्ही तुमचे म्हणणे सांगा.

मी कायमच मुळ मुद्यावर लिहतो. आपण मात्र इतरांच्या प्रतिसादावर कायमच त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर न करता मनाला येईल ते लिहता. याने काय साध्य होते ? माझे विचार आणि विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य तर नाही ना घेऊ शकत ?

आपणही "यडपट्ट " "मुक्ताफळे" असले शब्द प्रयोग न करता दुसर्‍याच्या विचारांना आदराने प्रतिवाद करायला हवे.

गांधीजींच्या ही धाग्यावर आधी मी गांधीजींबद्दल आदर व्यक्त करुन जे काय लिहले आहे ते राजकर्त्यांबद्दल लिहले आहे.

मायबोली नावाच्या प्लँचेटवर रोज असंख्य आत्मे येऊन माहिती देतात त्याचे काय ? बहुधा पुराणात प्लँचेट नावाचे पोर्टल असावे. ते नाही का संजय टीव्ही पाहून धृतराष्ट्राला युद्धभूमीच्या प्रसंगाची कॉमेन्टरी करत असे. जसे अतिरेक्यांचा मुम्बई हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानातल्या त्यांच्या प्लॅनरना स्ट्रॅटेजी आखायला सोपे पडावे म्हणून आपल्या मेडियाने आपल्या पोलीस ,सैनिकांचे लोकेशन्स लाईव्ह दाखवले होते. कदाचित या एअरटाईमचाही त्याना हवाला मार्फत पैसाही मिळाला असेल. काय सांगावे.!

प्रकाश घाटपांडे यांच्या मताशी मी सहमत आहे.
घडल्या प्रकाराचा निषेध व्हावा. पण गुन्हा दाखल करण्यात वेळ आणि उर्जा दवडली जाऊ नये. कायद्याची व्याप्ती अंधश्रद्धेच्या माध्यमातून होणारे शोषण रोखण्यापुरती आहे, मुळात एखाद्याने स्वतः अंधश्रद्ध असणे हे त्या व्यक्तीसाठी आणि समाजासाठी हितावह नसले तरी तो कायद्याने गुन्हा नाही.

सबब, निषेध पुरेसा आहे. गुन्हा दाखल केला जाऊ नये.

एडक्या विज्ञानवाद्यांची गोची करण्यात प्रवीण प्रकाशकाकांचा नवा पवित्रा –

Dulhe raja.JPG

दुल्हेराजा सिनेमातील मालक कादरखान, नेक(?) नोकर जॉनी लीवरांच्या विरोधी कृत्यांवर भाष्य करताना जसे म्हणतात, ‘तू मेरी तरफ हो या उसकी?’ तसलाच प्रकार...!!

(ठळक ठशात माझ्या विचारणा)

..मला स्वत:ला चौकशी करावी हे पटते पण अगदी गुन्हा दाखल करावा हे पटत नाही. चौकशी झाली तर गुन्हा नोंद करायची वेळ येणारच... अंनिस तर गुन्हा नोंदवा म्हणून मागे लागलीय,

...जादूटोणा विरोधी कायद्यात हे प्रकरण बसवता येणार नाही... हे अंनिसला माहिती नाही असे म्हणायचे काय?

...दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते...अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे.... अशी पडखाऊ भूमिका होती म्हणत म्हणत गेली 20 वर्षे खपून सध्याचा कायदा कानामात्रेने तयार करणारे दाभो.च होते ना?

...जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात. काही लोक त्याच्या वैज्ञानिक असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. जयंत नारळीकर देखील यातून सुटले नाहीत... हे केंव्हा घडले?

...बुद्धीदांडग्यांना आपली बौद्धिक माज/खुमखुमी जिरवण्यासाठी वैचारिक आखाडे लागतात. दगडाला टक्कर देणारा एडका ज्या जोशात वावरतो त्याच जोशात ही मंडळी वावरतात. जर अचानक या एडक्याचा दगड काढुन घेतला तर तो जसा सैरभैर होतो तशी काही अवस्था यांना 'खाद्य' वा 'टार्गेट' न मिळाल्यावर होते. मग ही मंडळी मिळेल त्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात...
हे आपल्या माहितीतील एडके कोण कोण?

...आपल्या विचारांशी सहमत नसणार्यांचे सहअस्तित्व त्याला खुपू लागते. तो त्यांना शत्रू मानायला लागतो. मग साम दाम दंड भेद वगैरे नीती वापरुन आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी विवेक वैगैरे सगळ्या गोष्टी टिंब टींब च्या टिंब टिंब मधे जाते. असो...

अशा हट्टी विवेकवादी विचारकांची वेळोवेळी शेपटी पकडून ‘हे फार होतय हो!’ असा गळा काढण्यात काय अर्थ आहे. यावर प्रकाश टाकाल काय ...

पुरुष सुक्त हे एक प्राचीन वैदिक स्तोत्र आहे...ते सृष्टीचा पालनकर्ता भगवान विष्णुदेव यांच्या स्तुतीपर लिहिलेले सुक्त आहे...अनेक जण पुरुष सूक्ताबद्दल उलट सुलट आक्षेप घेत असतात...परंतु पुरुष सूक्ताचा सखोल अभ्यास केल्यास ध्यानात येते कि ते सर्व आक्षेप तथ्यहीन आहेत...पुरुष सुक्तावर शंका घेणे म्हणजे भगवद्गीतेवर शंका घेण्यासारखे आहे...कारण पुरुष सूक्तातील अनेक श्लोकातील आशय श्रीमद् भगवद्गीतेच्या तत्वांना अनुसरूनच आहे...पुरुष सुक्त हे जातिव्यवस्थेच्या विरोधात असून कर्मावर आधारित वर्ण व्यवस्थेचा स्विकार करणारे आहे...त्यासाठी गीतेतील कर्मयोग व्यवस्थित समजून घेतला पाहिजे...तसे न केल्यानेच अनेकदा पुरुष सूक्ताबद्दल उलट सुलट विधाने लोक करत असतात...
मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, मांड्यातुन वैश्य तर पायांतुन शुद्र जन्माला आले! असा या ऋचेचा शब्दशः अर्थ काढणे हे अल्प बुद्धीचे लक्षणं आहे...ब्राह्मण मुखातून याचा अर्थ मुखाने करावयाची कामे म्हणजेच अध्ययन अध्यापन करणारे हे ब्राह्मण आहेत...बाहूने करायची कर्मे म्हणजे शस्त्र हातात घेवून पराक्रम करणारे क्षत्रिय...वणिज् म्हणजे व्यापार करणारे वैश्य आणि सेवा करणारे शुद्र हे मला समान प्रिय आहेत...मीच त्यांचा निर्माता व पालन कर्ता आहे. गीता असे सांगते कि कोणतेही कर्म श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नाही...योगः कर्मसु कौशलम्...ते कर्म आपण किती प्रामाणिकपणे करतो ते महत्वाचे...आणि सर्वात महत्वाचे हे वर्ण पण जन्मावर आधारित नसून कर्मावर आधारित आहेत. म्हणजेच एखाद्या ब्राह्मणाचा मुलगा जर व्यापार करत असेल तर त्याचा वर्ण ब्राह्मण नसून वैश्य मनाला पाहिजे असे गीता सांगते. पण हे ध्यानात न घेतल्याने गोंधळ होतो.(पाटणकरासारखा)

हि पुरुष सुक्ताची माहिती एव्हढी शेअर करा कि जे विरोध अज्ञानाने करतात त्याना हि माहिती मीळून ते ज्ञानी होतील व त्यांचा विरोध मावळेल.

फेसबुक, ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइट्सवर सामाजिक तेढ निर्माण करणारा कुठलाही मजकूर आढळून आल्यास त्याची तक्रार ९८२०८१०००७ या क्रमांकावर फोन किंवा एसएमएस द्वारे करता येऊ शकते.

@ उडन खटोला. तुमची जागा चुकली का हो?
@ शशिकांत ओक. अहो हे सर्वसाधारण निरिक्षणावर आधारलेले माझे सर्वसाधारण मत मांडले. एवढी चिरफाड करु नका. तसाही मी कृष्णधवल द्वैतात अडकून बसत नाही.

@ ९८२०८१०००७

(फक्त) शूद्रांनी सेवा करायची असा संदेश देणा-या पुरूषसूक्ताची भलावण करणा-यांची तक्रार करता येईल का ?

प्र.घा. - तुमच्या वरील दीर्घ प्रतिसादामधील खालील वाक्यानंतर जे काही लिहिले आहे (एडके, दगड, टक्कर, इ. इ.) ते माबोवर अनेक ठिकाणी नेहेमीच दिसुन येते अनेकांकडून होताना. Happy

पण तरीदेखील लोक तसे लिहायचे सोडत नाहीत. समंजसपणे प्रतिवाद करणे अनेकांना का जमत नाही देव जाणे, समोरच्याला सतत उपहासाने, टोचून लिहिले म्हणजेच आपले मुद्दे खरे ठरतात असे नाही. पण ये कौन किसको समझायेगा ? Uhoh

>>जो अस्तिक असेल तो खरा वैज्ञानिकच नाही अशी भुमिका प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही जण मांडत असतात.

>>तुमच्या वरील दीर्घ प्रतिसादामधील खालील वाक्यानंतर जे काही लिहिले आहे (एडके, दगड, टक्कर, इ. इ.) ते माबोवर अनेक ठिकाणी नेहेमीच दिसुन येते अनेकांकडून होताना<<
हो हो! मला ते आंतरजालावर व प्रत्यक्षात दिसून आलेले आहे. तो शेवटी मानवी प्रवृत्तीचा भाग आहे.
माझी वरील प्रतिक्रिया ही वेळोवेळी अन्य संकेतस्थळांवर केलेल्या माझ्या प्रतिक्रियांचे संकलन आहे.

Pages