ह्या श्वानप्रेमींचं काय करायचं ?

Submitted by मेधावि on 22 May, 2014 - 01:16

सकाळी फिरायला गेल्यावर रस्त्याच्या बाजूने विश्रांती/विरंगुळ्यासाठी जे बाक असतात त्यावर माणसांऐवजी श्वानप्रेमी त्यांच्या श्वानासकट बसतात. एका श्वानप्रेमीला श्वानास उठवायची विनंती केली असता बाक तुमच्या मालकीचे आहे का असे ऐकावे लागले. आपल्या मालकीचे बाक नसले तर श्वानापेक्षा जास्त प्राधान्य माणसास मिळवावे ह्यासाठी काही नियम वगैरे असतात का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूषण, सर्वप्रथाम, चांगल्या उत्तराबद्दल धन्यवाद.

<<१. बाक हा निसर्गात आपोआप निर्माण झालेला नसून माणसाने माणसाला बसता यावे म्हणून निर्माण केलेला आहे. >> अ‍ॅग्रीड, पण त्या बाकावर पाळीव प्राण्याना बसवू नये असा कायदा (किंवा बोर्ड) आहे का ? तसं नसल्यास ऑब्जेक्शन काय ग्राऊंडवर घेणार ?

<<२. तो बाक अश्या ठिकाणी माणसाने प्लेस केलेला आहे जेथे माणसांना बसावयाला तश्या बाकांशिवाय इतर जागा योग्य नाही. (मातीत बसलात तर काय बिघडले वगैरे प्रश्न आपण विचारायचा नाहीत ही खात्री आहेच)>> अ‍ॅग्रीड, पण माणसाने बसू नये असं कुठे म्हंटलय कोणी ?

<<३. कुत्रे (पाळीव असले तरी) ते बाकावर नाही बसले तरी इतरत्र बसू शकेल (प्रोव्हायडेड त्याच्या मालकाला हरकत नसेल तर). >> एक्झॅक्टली. मालकाला व कुत्र्यालाही.

<<म्हणजे मालक जर कुत्र्याला बाकावरच बसायची जबरदस्ती करत असेल तर तो कुत्र्याला निसर्गापासून दूर नेत आहे. निसर्गाने कुत्र्यांसाठी असे बाक जगात कुठेही बनवलेले नाहीत. >> नैसर्गिक बाक आहेत की भरपूर, रादर कुठल्याही शिकार करणार्‍या प्राण्याला उंचावर बसायचे असते.

<<४. वर टण्या म्हणाले आहेत त्याप्रमाणे मानवनिर्मीत वा इतर संसाधनांवर मनुष्याचा प्रथम हक्क असणे बरोबर आहे >> डिसअ‍ॅग्री, मी ईथे माणूस व ईतर प्राणी समान आहेत ह्या दृष्टीकोनातून बोलतो आहे.

<<कारण 'बळी तो कान पिळी' ह्या अत्यंत नैसर्गीक न्यायानुसार माणूस सर्वाधिक बुद्धीवान प्राणी आहे.>> मग त्याच बळाने कुत्र्याला बेन्चवरुन लाथ मारुन उठवायचे आणि परीणामांना सामोरे जायचे Wink

<<५. कुत्र्याशेजारी बसणे सुमेधा ह्यांना भीतीदायक वाटलेले असू शकत असल्यामुळे त्याला उठवूनच त्यांना बसायचे असावे.>> सहमत. भीती वाटणे समजू शकते आणि त्यासाठी शेजारी न बसणे ही.

<<६. नीधप ह्यांनी विचारलेले ते सर्व प्रश्न त्या विशिष्ट अडेलतट्टू कुत्रेमालकाला मात्र चपखलपणे लागू होताना दिसत आहेत.>> सुटले वाचनातून.

मी विचारलेला प्रश्न काही कारणाने विचारले आहेत. बघू कधी खरे उत्तर मिळते.

<< बाफचा एकंदरीत सूर कुत्रेद्वेषी आहे << लेबले अम्या....
अजिबात मान्य नाही हे. >>

एक दिवस, फुरसत मध्ये शोधून शोधून चिकटवेन हो पुरावे Happy

नोटीशीवर आणि कायद्यावर फारच भर बुवा तुमचा?
माझ्या खांद्यावर तुमचे पाय ठेऊ नयेत, माझ्या अंगावर लाळ गाळू नये, माझ्या गालांची पापी घेऊ नये, माझ्या मांडीवर येवून बसू नये, मला चाटू नये अश्या नोटीशी लाऊन फिरता का तुम्ही?
मग रस्त्यावर चालणार्‍या कुत्र्याने सोडा तुमच्यासारख्या माणूसप्राणी असणार्‍या, रोज लाईफबॉय लाऊन आंघोळ करणार्‍या एखाद्या भिकार्‍याने 'नोटीस कुठाय दाखव' म्हणत वरचे सगळे ऊपद्व्याप केले तर तुमची भूतदया ऊफाळून येईल की राग? सिरियसली विचारतोय.

अनाथ बालकाने ह्या देशाचा नागरिक म्हणून बाकावर बसण्याचा हक्क जन्मत:च मिळवला आहे एवढे बेसिक सामान्यज्ञान तुम्ही आंधळ्या श्वानप्रेमापायी नजरेआड करता आहात. कायद्याने कुत्र्यांना दिलेल्या हक्कांची यादी द्या बरं पाहू ईथे.

तरीही, मानवी जीव प्राण्यांपेक्षा जास्त महत्वाचा आहे, असा कायदा आहे ? >> लोकसंख्या जास्त झाली आणि लोकं एकमेकांना मारू लागली म्हणून बाजारात जाणार्‍या लोकांना पकडून ट्रक मध्ये भरून सरकारी लोक त्यांची बळजबरीने नसबंदी करतायेत असं चित्र डोळ्यांसमोर ऊभं राहिलं हो एकदम. Proud

अवांतर @ टण्या Wink

तुम्ही हे असे लटकण्याचे कारण खाली तुमचे लाडके भुभु उभे होते काय ? Proud

(१-२ दिवे नाहीत तर अक्खे दिव्याचे दुकान घ्यावे ही विनंती)

ही तुमची खालील दोन विधाने:

>>>पण त्या बाकावर पाळीव प्राण्याना बसवू नये असा कायदा (किंवा बोर्ड) आहे का ? तसं नसल्यास ऑब्जेक्शन काय ग्राऊंडवर घेणार ?<<<

>>>पण माणसाने बसू नये असं कुठे म्हंटलय कोणी ?<<<

ही विधाने वाचून जे मनात आले ते असे:

१. सूचना लिहिलेली नसणे ह्याचा सोयीस्कर अर्थ काढून तो प्रत्यक्षात उतरवण्याचा एक प्रकारचा हेकटपणा त्या कुत्रेमालकाच्या ठायी आहे जो हेकटपणा इतर माणसांसाठी त्रासदायक व फक्त त्याच्या कुत्र्यासाठी सुविधेचा आहे.

२. अशी सूचना असती तरीही त्याने सुमेधा ह्यांच्या म्हणण्यानुसार कुत्र्याला उठवलेच असते किंवा मुळात बसवलेच नसते हे गृहीतक कुत्रेमालकांचे एकुण अनुभव आठवता फारसे पटत नाही. अर्थात, हे जर तरचे झाले!

३. पाळीव कुत्रे बसू शकते तर आपण का नाही अश्या विचाराने भटके कुत्रे, एखादे डुक्कर, बोकड, म्हैस असे प्राणी बाकावर बसू लागले तर पुढे अवस्था वाईट होऊ शकेल. मी हे विनोदाने म्हणत नाही आहे. सार्वजनिक बागेत अचानक असा एखादा प्राणी येणे अगदीच अशक्य नसते.

<<<४. वर टण्या म्हणाले आहेत त्याप्रमाणे मानवनिर्मीत वा इतर संसाधनांवर मनुष्याचा प्रथम हक्क असणे बरोबर आहे >> डिसअ‍ॅग्री, मी ईथे माणूस व ईतर प्राणी समान आहेत ह्या दृष्टीकोनातून बोलतो आहे. : समान आहेत अर माणूस कुत्र्याला का पाळतोय?

<<कारण 'बळी तो कान पिळी' ह्या अत्यंत नैसर्गीक न्यायानुसार माणूस सर्वाधिक बुद्धीवान प्राणी आहे.>> मग त्याच बळाने कुत्र्याला बेन्चवरुन लाथ मारुन उठवायचे आणि परीणामांना सामोरे जायचे डोळा मारा : आता पावसाचे दिवस असल्याने भटके बेवारशी कुत्रे इमारतींच्या जिन्यांत कोरडी जागा शोधून पडून असतात. एकच जिन्यावर तीन तीन कुत्रेही असतात. पण तिथे ते पडूनच आहेत अशी सवय झाल्याने , तसंच आता त्यांना दुसरी जागा नाही या जाणिवेने कोणी हाकललेले पाहिले नाही. पण हेच कुत्रे बाकीच्या दिवसांत परिसरात राहणार्‍या लोकांवरही जाता येता भुंकतात. तेव्हा त्यांना घाबरवण्यापुरते दगड्/काठी घेतले जातात. यालाही तुमच्यात कुत्राद्वेष्टेपणाच म्हणत असतील.

चर्चा मुख्यतः पाळीव कुत्र्यांबद्दल चाललीय. भटका/बेवारस कुत्रा असेल तर जो तो स्वतःला हवी /.जमेल ती अ‍ॅक्शन घेईलच. कुत्र्यासोबत त्याचा मालक्/पालक असताना त्याने योग्य ती अ‍ॅक्शन घ्यायला हवी इतकी साधी अपेक्षा आहे. पण त्या मालक/पालकाकडे कुत्र्याबरोबर कॉमनसेन्सही असावा ही अपेक्षा अवाजवी आहे हे सपशेल मान्य करतो.
तुमच्या पहिल्या तीन प्रश्नांच्या उत्तरार्थ कॉमन सेन्स हेच लिहिणार होतो. बरे झाले नाही लिहिले.

बागुलबुवा (अमित) तुझ्या पोस्टीतले मुद्दे 'वेड पांघरून पेडगावला' गेल्यासारखे आहेत. कुत्रे आवडणार्‍यांनी शहरात/लोकवस्तीत राहताना कुत्रे न आवडणार्‍या लोकांबरोबर जबाबदारीने राहणे गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणेदेखील गरजेचे आहे. पाश्चिमात्य व प्रगत देशात या दोन्ही गोष्टी समाजात/कायद्याने घडवून आणलेल्या आहेत. भारतातील कुत्रामालकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.
शहरात / लोकवस्तीत कुत्रा पाळणे ही लक्झरी आहे, मूलभूत हक्क नाही.

कुत्रे आवडत नाही म्हणणे हेच कुत्रेप्रेमीमालकांच्या दृष्टीने कुत्रेद्वेषाचे असते तेव्हा त्यापद्धतीचे कैक पुरावे असतील पण मुळात कुत्रेप्रेमीमालकांना आपली कुत्रेद्वेषाची व्याख्याच चुकीची आहे हे कळत नाहीये त्याचं काय?

बाकी कुत्र्याने चाटू नये, अंगावर येऊ नये, चावू नये अश्या नोटिशी नाहीत म्हणून कुत्र्याने हे सगळे करणे समर्थनीय आहे का?

मी ईथे माणूस व ईतर प्राणी समान आहेत ह्या दृष्टीकोनातून बोलतो आहे.<<<
पण हा तुझा किंवा कुत्रेप्रेमींचा दृष्टीकोन झाला. तो तसाच असणे कंपलसरी आहे का? कुठल्या नोटीस अथवा कायद्याद्वारे?
आपण बहुतेक गोष्टी मानवनिर्मित वापरतो आणि मानवाने त्यातल्या बहुतांश वस्तू मानवाने उपभोग घेण्यासाठी किंवा मानवाच्या सोयीसाठी बनवल्या आहेत. त्यामुळे जनरली मानवनिर्मित वस्तूंवर पहिला अधिकार मानवाचा असतो.
कुत्रे जेव्हा स्वतःसाठी वस्तू बनवू लागतील तेव्हा पहिला अधिकार त्यांचा असेल.

@ चमन, तुम्ही दिलेल उदाहरण हे व्यक्तिगत स्वातंत्र्यावरच अतिक्रमण ठरतय. उदाहरण बदला.

<< १. सूचना लिहिलेली नसणे ह्याचा सोयीस्कर अर्थ काढून तो प्रत्यक्षात उतरवण्याचा एक प्रकारचा हेकटपणा त्या कुत्रेमालकाच्या ठायी आहे जो हेकटपणा इतर माणसांसाठी त्रासदायक व फक्त त्याच्या कुत्र्यासाठी सुविधेचा आहे. >>

सूचना लिहिलेली नाही हे तरी मान्य आहे ना ? झाल तर. हेकटपणा आहे यात वादच नाही.

<<२. अशी सूचना असती तरीही त्याने सुमेधा ह्यांच्या म्हणण्यानुसार कुत्र्याला उठवलेच असते किंवा मुळात बसवलेच नसते हे गृहीतक कुत्रेमालकांचे एकुण अनुभव आठवता फारसे पटत नाही. अर्थात, हे जर तरचे झाले! >> अगदीच.

<<३. पाळीव कुत्रे बसू शकते तर आपण का नाही अश्या विचाराने भटके कुत्रे, एखादे डुक्कर, बोकड, म्हैस असे प्राणी बाकावर बसू लागले तर पुढे अवस्था वाईट होऊ शकेल. मी हे विनोदाने म्हणत नाही आहे. सार्वजनिक बागेत अचानक असा एखादा प्राणी येणे अगदीच अशक्य नसते. >>

अ‍ॅग्रीड

मी पण कुत्राप्रेमी, कट्टर कुत्राप्रेमी. लहानपणे एकदा कडकडुन चावले होते, १४ इं. घेतली तरी फरक पडला नाही. पण मी कु.मालक नाही. मालक झाले नाही कारण फार काळजी घ्यावी लागते कुत्र्यांची. फार जीव लावतात, अतिशय चळवळी असतात, प्रेम द्यावे लागते त्यांना, त्यांच्याशी खेळावे लागते नाहीतर पिसाळायचा चान्स. तर तशी काळजी घेता आली नाही तर त्याच्यावर अन्याय. फक्त आपली वा मुलांची करमणुक म्हणुन कुत्रे आणायचे व त्याच्याकडे नंतर लक्ष द्यायचे नाही हे करायचा मला अधिकार नाही. (मांजरे फार स्वतंत्र, मर्जी नसेल तर आपल्याकडे ढुंकुन पहात नाहीत) Happy

सर्व म्हणताहेत ते कु.मालकांनी त्यांच्या कुत्र्यांना ताब्यात ठेवायला हवे, त्यांचा कोणाला त्रास होता कामा नये, बाहेर फिरायला नेताना दोरी बांधायला हवी, मोकळा सोडायचा नाही ह्याला पुर्ण अनुमोदन. मला कोणत्याही कुत्राची भिती वाटत नाही तरीपण हेच मत आहे. एकदाच अंगावर धाऊन आला होता तेव्हा त्याला इजा न करता घाबरवुन दुर पळवु शकले होते ते केवळ लहानपणापासुन त्यांच्याशी मैत्री करुन सवय होती म्हणुन. सर्वांना ते जमेल असे नाही म्हणुन मालकांनी सावध असायला हवे. तसेच एकदा २ प्रचंड वाघाएवढे डोके असलेले कुत्रे दोन्ही बाजुला येऊन उभे राहिले तेव्हा, रामराम जप सुरु केला होता ते आठवले. पण त्यांनी काहीही केले नाही, भयंकर शिस्तीचे कुत्रे होते.
याचबरोबर, वर अजुन एक मुद्दा आला की मालकांनी कुत्रा पाळल्यावर कुत्राचे आयुष्य पण अवघड तर करुन ठेवले नाही ना हा पण विचार करावा (सतत बांधुन ठेवायचे, त्याला फिरायला न्यायचे नाही इ. ) पिसाळु शकतात.

सोसायटीत मागे लागुन पाळलेल्या कुत्रांचा त्रास इतरांना होऊ नये ह्याबद्दल दोन्ही पार्टीला योग्य असे नियम करावेत हे पण पटले.

बागुलबुवानी लिहिलेले वरचे सार्वजनिक मालमत्तां वापरण्याचा हक्क बजावण्यासाठी संबंधित श्वानाने नियमित टॅक्स भरला होंता कांय महाराजां? >> पण त्या नात्याने अर्थिकदृष्ट्या अत्यंत कमजोर ज्यांना टॅक्स भरणे सोडा पण जगायला दुसर्‍याकडे मागावे लागते त्यांनी पण बसु नये का? Happy लाडके असले तरी इब्लिसांनी लिहिले तसे रोग पसरवु शकणारे आहे म्हणुन कुत्र्यांना बाकावर बसवायचे टाळावे.

अमांनी सिंपथी टुर काढलेली दिसली नाही. एका प्रतिसादात त्यांनी तसे लिहिले. त्याला कोणी १००वेळा अनुमोदन दिलेले पण दिसले नाही. इतरांनीच ते बर्‍याचदा वेळा लिहिले असावे म्हणुन तसे वाटत असेल. Happy ...

रस्त्यावर दिसेल त्या कुत्र्याला गोळी मारावी वाटते हा अतिरेकी विचार आहे. माणसांना आपण करतो ते बरेवाईट आहे हे विचार करायची कुवत तरी असते, कुत्र्यात ती नसते. ते फक्त जातीला जागतात. त्यामुळे मुख्य जबाबदारी मालकांची व आपण मालकांना सतत सांगत सांगत रहावे ही आपली आहे हे मला कळले. भले मालक भांडेनात का. Happy ..

२ विरुद्ध मते दिसली कुत्राप्रेमी नसलेल्यांकडुन. प्रेम करायचे असेल तर घरी ठेवा त्यांना व प्लॅटमधे पाळुन त्यांच्यावर अन्याय करत आहात. यातले एक मत असावे, दोन्ही एकदम नको मग मालकांवरच अन्याय होईल. Happy

शेवटचे सर्वात महत्वाचे, भटक्या कुत्र्यांनी लहानांवर केलेला भयंकर हल्ला. हे भयानक आहे व त्यासाठी पालिकेला काहीतरी कडक उपाय योजावाच लागेल. आपल्याकडे भटक्या कुत्र्यांना कुत्रेगृहात दाखल करण्याच्या सोयी किती आहेत? असतील तर तिथे न्यावे. तशा जागा असायचे शक्यता खुप कमी तेव्हा निदान त्यांची पैदास बेसुमार होऊ नये म्हणुन इंजेक्षन? पिसाळू नयेत म्हणुन लसी. नाहीतर मारावेच लागेल त्यांना. शेवटी माणुस सर्वात हुषार त्यामुळे तो त्याचे जीवनच सुखरुप ठेवायला बघणार त्यामुळे मारावेच लागणार.

अजुन एक प्रश्न पडला. भटक्या कुत्र्यांना खायला घालणे हापण पण प्रॉब्लेम आहे हाही मुद्दा भुतदया सोडला तर तसा योग्यच आहे पण समजा खायला नाही दिले तर काय होईल? त्याने ती मुलांवर हल्ला करणे बंद करणार का? यात समन्वय कसा साधला जाईल? बहुतेक शेवटी पुन्हा पालिका कायकाय करु शकेल हेच येईल. हा प्रश्न सोडवणे अवघड वाटत आहे.

सध्यातरी इतकेच.. तरी बरेच झालय की लिहुन.

<< बागुलबुवा (अमित) तुझ्या पोस्टीतले मुद्दे 'वेड पांघरून पेडगावला' गेल्यासारखे आहेत.>>

आधी समजून घ्या, मग बोला.

<< कुत्रे आवडणार्‍यांनी शहरात/लोकवस्तीत राहताना कुत्रे न आवडणार्‍या लोकांबरोबर जबाबदारीने राहणे गरजेचे आहे.>> अगदी. सगळ्यानीच.

<< भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणेदेखील गरजेचे आहे. पाश्चिमात्य व प्रगत देशात या दोन्ही गोष्टी समाजात/कायद्याने घडवून आणलेल्या आहेत. >> १०००%

<<भारतातील कुत्रामालकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.>> द्विरुक्ती

<<शहरात / लोकवस्तीत कुत्रा पाळणे ही लक्झरी आहे, मूलभूत हक्क नाही. >> हे आपले मत आहे की ह्या विधानाला काही शास्त्रीय आधार आहे ?

<< कुत्रे आवडत नाही म्हणणे हेच कुत्रेप्रेमीमालकांच्या दृष्टीने कुत्रेद्वेषाचे असते तेव्हा त्यापद्धतीचे कैक पुरावे असतील पण मुळात कुत्रेप्रेमीमालकांना आपली कुत्रेद्वेषाची व्याख्याच चुकीची आहे हे कळत नाहीये त्याचं काय? >> ती चूकीची आहे असे तुमचे मत असू शकते, त्याचे नसू शकते.

<<बाकी कुत्र्याने चाटू नये, अंगावर येऊ नये, चावू नये अश्या नोटिशी नाहीत म्हणून कुत्र्याने हे सगळे करणे समर्थनीय आहे का?>> आधी सांगितल्याप्रमाणे, हे व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचे अतिक्रमण आहे, आणि हो, हे कायद्यानेही चूकीचे आहे.

<<मी ईथे माणूस व ईतर प्राणी समान आहेत ह्या दृष्टीकोनातून बोलतो आहे.<<<
पण हा तुझा किंवा कुत्रेप्रेमींचा दृष्टीकोन झाला. तो तसाच असणे कंपलसरी आहे का? कुठल्या नोटीस अथवा कायद्याद्वारे? >> डिड आय सेड दॅट ?

<<आपण बहुतेक गोष्टी मानवनिर्मित वापरतो आणि मानवाने त्यातल्या बहुतांश वस्तू मानवाने उपभोग घेण्यासाठी किंवा मानवाच्या सोयीसाठी बनवल्या आहेत. त्यामुळे जनरली मानवनिर्मित वस्तूंवर पहिला अधिकार मानवाचा असतो. कुत्रे जेव्हा स्वतःसाठी वस्तू बनवू लागतील तेव्हा पहिला अधिकार त्यांचा असेल. >>
कूल, कुत्र्याला पाळीव बनवणे ही ही मानवनिर्मितच आहे की Happy

सुनिधी, अत्यंत बॅलन्सड् पोस्ट ... + इनफिनीटी

इब्लीसची रोगराई पसरवणारी पोस्ट .... उप्स रोगराई पसरवण्याविषयीची पोस्ट नीट वाचून लिहीन त्यावर.

ती चूकीची आहे असे तुमचे मत असू शकते, त्याचे नसू शकते.<<
कुत्रे न आवडणे म्हणजे कुत्रेद्वेष असं म्हणायचंय का म्हणजे?
मग कुत्रे न आवडणे हा ही गुन्हा आहे हे पण कुत्रेप्रेमीमालकांचे मत असेलच.
पण कुत्रेप्रेमीमालकांना वाटते म्हणून आम्ही स्वतःला आमच्यामते चुकीची लेबले का बरे लावून घ्यावीत?

आधी सांगितल्याप्रमाणे, हे व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचे अतिक्रमण आहे, आणि हो, हे कायद्यानेही चूकीचे आहे.<<< पण तरीही अश्या प्रकारे कुत्रा अंगावर आल्यावर, कुत्र्याचा मालक काहीही न करता बघत बसत असेल तर ज्याच्या अंगावर कुत्रा जातो त्याला स्वसंरक्षणाचा तरी अधिकार आहे की नाही कुत्रेप्रेमीमालकांच्या मते? आणि अचानक कुत्रा अंगावर आल्यावर भिऊन जाऊन जे जसे सुचेल तसे रिअ‍ॅक्ट केले जाऊ शकते माणसांकडून त्याला कुत्रेप्रेमीमालक आक्षेप का बरे घेतात?

डिड आय सेड दॅट ?<< अरेच्या कुत्रे आणि माणसे समान आहेत हा तुझा दृष्टिकोन आहे हे तूच तर म्हणालास ना. पण इतरांच्या मते ते समान नसतील तर?

कुत्र्याला पाळीव बनवणे ही ही मानवनिर्मितच आहे की <<< हो पण म्हणजेच ते मानवांच्या सोयीसाठीच असायला हवे की नाही?

कुत्र्यांबद्दल लिहुन लिहुन..... काही पोस्ट वाचताना अगदी वस्सकन अंगावर भुंकल्याचा फील मात्र जरुर आला.
बाकि चालु द्यात.

large.jpg
हा आहे Tibetan Mastiff अतिशय आक्रमक आणि ताकदीचा कुत्रा यांना वाघ देखील घाबरतात अशी दंतकथा आहेत

कुत्र्यांबद्दल लिहुन लिहुन..... काही पोस्ट वाचताना अगदी वस्सकन अंगावर भुंकल्याचा फील मात्र जरुर आला.
बाकि चालु द्यात. >

Lol

हा बाफ वाचून माणासाच्या वागण्यातील एक प्रचंड विसंगती लक्षात आली. काही माणसं कुत्र्यांना माणसासारखे वागवतात आणि काही माणसं कुत्र्यासारखे वस्सकन अंगावर भुंकल्याचा फील देतात.

चमन, तुम्ही दिलेल उदाहरण हे व्यक्तिगत स्वातंत्र्यावरच अतिक्रमण ठरतय. उदाहरण बदला. >>> व्यक्तिगत येस्स! दॅट्स द वर्ड. सुमेधा ह्यांनी बाकावर बसलेल्या व्यक्तीच्या तिथे बसण्याबद्दल आक्षेप घेतलेला नाहीये. आणि जर त्या बाकावर दुसर्‍या व्यक्तीसाठी बसण्यास जागा असतांना तिथे कोणतीही व्यक्ती बसलेली नसतांना जर त्यांना बसता येत नसेल तर ते त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावरचं अतिक्रमण नाही का?

तुमच्या कुत्र्याला कायद्याने काय हक्क दिले आहेत ते सांगा म्हंटलं तर तुमची आळीमिळी.

तुमच्या ह्या अनाठायी भूतदयेबद्दलच्या भ्रमाचा भोपळा फोडण्यासाठी एक छोटी चाचणी सांगतो. विमान, रेल्वे किंवा बसचे दोन तिकिटं रिझर्व करा, एक तुमच्यासाठी आणि दुसरं तुमच्या कुत्र्यासाठी. आणि कंडक्टरला, विमानतळ ऑथोरिटीजना समजावून पहा ह्याने तिकिट काढले आहे आणि तुमच्या बाकावर कुत्रांनी बसू नये असा बोर्ड नाहीये.

उप्स रोगराई पसरवण्याविषयीची पोस्ट नीट वाचून लिहीन त्यावर.
<<
कर्रेक्ट.
तुम्हाला मुद्देसूद सांगितले, तर तुम्ही पळ काढता असा अनुभव आहे @ बागुलबुवा. ईमेलमधून झालेल्या 'त्या' थुंकण्याच्या चर्चेचं उत्तर अजून आलेलं नाहिये मला.
रोगराई सोबत अ‍ॅलर्जीज पण जोडा अन अभ्यास करा.

कुत्र्यांच्या मालकांनी कुत्रे न आवडणारया / कुत्र्याला घाबरानारया लोकांकरता / सार्वजनिक ठिकाणी कोणती पथ्ये पाळावीत?

वरच्या उदाहरणातून बस आणि रेल्वे काढा. बऱ्याच देशांत शहर बस सेवा आणि जवळपासच्या ट्रेन मधून पाळीव प्राण्याना न्यायला परवानगी आहे. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तीसाठी तर कायद्याचे बंधन आहे, कुत्रा त्या व्यक्तीच्या पायाशी बसेल, तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्हाला बस मधून उतरायला लागेल.

विमानसुद्धा काढा, विशिष्ट आकारापेक्षा कमी आकाराची कुत्री - मांजरी विमानातून जवळच्या सीटवर बसवून नेण्यास परवानगी आहे.

टण्या, अमितव
आपण भारतातल्या लोकांबद्दल आणि तिथल्या परिस्थितीबद्दल बोलतोय ना?
सुमेधा लंडनच्या किंवा कोलोरॅडोच्या बागेत फिरत असत्या तर असा धागा काढायची वेळ त्यांच्यावर आली असती का?

कुत्रा त्या व्यक्तीच्या पायाशी बसेल, >> पायाशी. मी बाकावर किंवा सीटवर बसण्याबद्दल बोलतोय, तिथे बसायचा पहिला हक्क कुणाचा? आणि पुन्हा ही स्पेशल केस आणि तीही गाईड डॉग सारख्या पूर्ण ट्रेन्ड आणि वेल मॅनर्ड, वेल ग्रूम्ड डॉग बद्दलची आहे. ऊद्या सगळेच डॉबरमॅन आणि पिटबुल्स बाजूच्या सीटवर बसवू लागले तर ट्रान्स्पोर्ट कंपनीचं दिवाळं नाही वाजणार?

मांजरी विमानातून जवळच्या सीटवर बसवून नेण्यास परवानगी आहे. >> ओपन? विदाऊट केज ऑर बास्केट? हे घ्या नियम.

•Your pet must be small enough to fit comfortably in a kennel without touching or protruding from the sides of the kennel and with the ability to move around.
•The kennel must fit under the seat directly in front of you.
•Maximum carry-on kennel dimensions are determined by your flight. You must contact Delta Reservations to determine the appropriate kennel size.
•Your pet must remain inside the kennel (with door secured) while in a Delta boarding area (during boarding and deplaning), a Delta airport lounge and while onboard the aircraft.
•Your pet must be at least 10 weeks old for Domestic and International travel.
•Your pet counts as one piece of carry-on baggage.Pet in Cabin fees still apply.
•One pet is permitted per kennel with the following exceptions:
*One female cat/dog may travel with her un-weaned litter if the litter is a minimum of 10 weeks old to 6 months of age.
*There is no limit on the number of animals in the litter.

जर हे नियम पाळून कोणी पेट कॅरी करणार असतील तर कोण कश्याला काय तक्रार करायची पाळी येईल?

हे घ्या भारतीय रेल चे नियम

http://www.indianrail.gov.in/luggage_Rule.html

खासकरून हे वाचा

2.A passenger traveling in First Air condition class or first class may take a dog into the compartment only with the concurrence of fellow passengers on payment of charges vide Clause(1) above. The charges are to be prepaid. If fellow passengers subsequently object to the dog remainig in the compartment, it will be removed to the Guard's van, no refund being given.

चमन,

जर हे नियम पाळून कोणी पेट कॅरी करणार असतील तर कोण कश्याला काय तक्रार करायची पाळी येईल? >> पेटीकेट्स पाळत नाहीत, जे पाळले पाहिजेत हे तर मान्यच. पण वरच्या बऱ्याच पोस्ट्स मध्ये कुत्रा-मालकद्वेषा बरोबरच कुत्रा द्वेष दिसला. मी द्वेष म्हणतोय भीती/ नावड नाही. भीती वाटणं, भीतीमुळे केलेली रिफ्लेक्स क्रिया करणं वेगळं आणि त्या क्रियेमध्ये क्रूरता असेल तर तो किस्सा म्हणून चघळून सांगण वेगळं.

कुठून कुठे चाललाय बाफ. बळी तो कान पिळी हे तत्त्व काही मान्य करता येत नाही. उद्या कुणी बळाच्या जोरावर एखाद्याची जमीन, घर, गाडी हडप केली तर शांत बसावं लागेल. माणूस नेहमी आपला स्वार्थ पाहतो. आपल्यावर कुणी बळजबरी केली तर त्याचा युक्तीवाद जो काही असेल तोच युक्तीवाद तो जेव्हां इतरांवर करतो त्या वेळी नसतो. त्याच्या भूमिकेत असलेला विरोधाभास त्यालाही नकळता असतो. पोलीस तपासात कुत्र्याच्या हुंगण्याने गुन्ह्याचा माग काढता येतो. रात्रीचे चोर, दरोडेखोर आलेले समजतात. यात सर्वत्र माणसाचा स्वार्थ सर्वात पहिल्यांदा.

इथली चर्चा मुंबई - पुण्यासारख्या मध्यवस्तीत राहणा-या लोकांसंदर्भात असावी. कुत्रा पाळण्यासंदर्भात ज्यांची मतं कमालीची नकारार्थी आहेत त्यांची मतं परिस्थितीनुसार बदलणारच नाहीत असं आहे का ? काही कारणाने अतिशय दुर्गम ठिकाणी राहण्याची पाळी आली तर कुत्रा पाळणे ही गरज होईल ना ? त्या वेळी हायजिन वगैरे मुद्दे जरा बाजूलाच पडतील. एकेकेट्या लोकांना कुत्र्याची सोबत होते. काही लोक स्वभावतःच माणूसघाणे असतात. एक ना दोन अनेक कारणं असू शकतात.

शहरी जीवनशैलीत माणूस आणि इतर प्राण्यांची वैशिष्ट्ये, मर्यादा लक्षात घेऊन भरत मयेकर म्हणतात तस माणसानेच विवेकाने वागलं पाहीजे. सब भूमी गोपालकी आणि व्यवहार यात नाईलाजाची एक तडजोड आहे. कुत्र्यांबद्दलचं प्रेम हे काही टीकेला कारण असू शकत नाही पण त्याचा त्रास होऊ नये यासाठी सासाविबु प्रत्येकाकडेच आहे. तिचा फक्त वापर करायचा आहे.

संतवृत्तीची, भूतदयावादी माणसं सर्वत्र असतात. पुणे कॅम्पमधल्या प्रसिद्ध कयानी बेकरीच्या मालकांनी अनाथ कुत्र्यांसाठी स्वखर्चाने अनाथाश्रम (मराठीत काय शब्द योजाल कु.अ.ला ) सुरू केलाय. तुम्ही देणगी देऊ शकता किंवा एखादं कुत्रं दत्तक घेऊ शकता. त्यांचा औषधोपचार, देखभाल उत्तम रीतीने करतात. कुत्रा दत्तक देताना नियम आणि देखभाल सांगितले जातात. स्व. डॉ रोशन मास्टर या देखील अशा कार्यात अग्रेसर होत्या.

असे आणखी काही लोक आहेत. योगायोगाने माझ्या माहीतीत फक्त पुणे कॅम्पातलेच लोक आहेत.

(कुणाला ही पोस्ट न आवडल्यास अधांतरी वाक्यांना एकेकटे गाठून त्यांचा कचाकच खून पाडू नये ही नम्र विनंती).

अमितव,
बरोबर आहे तुमचं. क्रूरता असर्थनीयच, पिरियड. पण एखाद्या अग्रेसिव कुत्र्याबद्दल एकदा का कुणाला वाईट अनुभव आला, भंबेरी ऊडून पळता जीव थोडा झाला की तो पुढच्या वेळी कश्याला विषाची परीक्षा घ्यायला जाईल? चार हात लांबच राहिल ना? कोणाची सायकॉलॉजी कशी काम करेल कसं सांगणार. मग असं कायम लांब आणि सुरक्षित रहायला बघणं म्हणजे द्वेष का? द्वेष म्हणजे 'हिटलर ने ज्यूंचा केला' तसं तर कोणी कुत्रे पकडून गॅस चेंबरमध्ये घाला असं करत नाहीये ना. बरेचदा काही प्रसंगी भिती माणसाला क्रूर कृत्य करायला भाग पाडते.

नशीब डॉ पूर्णपात्रेंच्या सोनालीला 'बळी तो कान पिळी' म्हण माहित नव्हती. Proud

(कुणाला ही पोस्ट न आवडल्यास अधांतरी वाक्यांना एकेकटे गाठून त्यांचा कचाकच खून पाडू नये ही नम्र विनंती). >> Happy Happy

झालेत हो पाडुन आधीच. आता दमले सगळे.

Pages