डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 July, 2014 - 23:47

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ
दैनिक सकाळ बातमी
आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक स्टिन्ग ऑप. - सर्व प्रकारच धक्कादायक आहे. Sad
पत्रकार आशिष खेतान यान्च्या हिमतीला दाद द्यायला हवी, खुप मोठा धोका पत्करुन केलेल्या कार्याला नमस्कार,

https://www.youtube.com/watch?v=_Bz08av5PYk

उउद,

ज्याम विनोदी प्रकार आहे. १२ मिनिटांनी दाभोलकर (=माध्यमामार्गे) बोलतात की सनातन संस्था रजिस्टर नाहीये आणि त्याचा पुरावा त्यांच्याकडे (=दाभोलकरांकडे) आहे.

Rofl

एव्हढ्या छोट्याश्या सनातन संस्थेच्या मागे का लागलेत हे लोकं?

आ.न.,
-गा.पै.

एबीपी माझावर चर्चा पाहिली. मला वाटत की आता या प्रकरणाच राजकारण व्हायला लागल आहे.जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत यावर कारवाई करता येणार नाही याचा शाम मानव यांनी पुनरुच्चार केला आहे.
आशिष खेतान यांनी महत्वाचा मुद्दा मांडला की असे प्रकार हे पहिल्यांदाच होताहेत असे नाही. शिवाय तपास जणुकाही प्लँचेटच्याच आधारे होतो आहे असे चित्र निर्माण होउ लागले आहे ते चुकीचे आहे.
पोलिस हे समाजातीलच घटक असल्याने समाजातील असलेल्या अंधश्रद्धांपासुन ते मुक्त नाही. तशी अपेक्षा करण ही चुकीचे आहे.तपास तर शास्त्रीय/शासकीय पद्धतीने चाललाच आहे सोबत हे पण करुन पाहू, एखाद्या गंभीर रुग्णाला आधुनिक उपचार चालूच आहेत सोबत अंगारा असलेला बरा! वाईट तर काही होत नाही ना! हा विचार असतो तसे! पोलिस खात्यात हे शासकीय जीवन व हे खाजगी जीवन अशी ठळक सीमारेषा नसते. त्याची सरमिसळ झालेली असते. पाउस पडावा म्हणुन मुख्यमंत्री पांडुरंगाला साकड घालतात. पंढरपूरच्या विठोबाची शासकीय पूजा होते. सरकारी खात्यात अशा अनेक पुजा सर्रास होतात. ज्या काही अंधश्रद्धा बाळगायच्या आहेत त्या तुमच्या घरी बाळगा इथे शासकीय आवारात नको अशी भुमिका घेणे अवघड असते.
तपास लागत नाही याचा मानसिक ताण हा पोलिस खात्यातील लोकांवर येतोच. इस्रो चे शास्त्रज्ञ यशस्वी अंतराळ उड्डाणासाठी येणारा ताण घालवण्यासाठी पुजेचा आधार घेतात तर तिथे पोलिस किस झाडकी पत्ती हे वास्तव नाकारता येत नाही. तरी पण समाज ढवळून निघण्यासाठी अशा प्रकारांचा उपयोग नक्कीच होतो. प्रबोधन ही चिरंतन चालणारी प्रक्रिया आहे. पोलिसांच्या ट्रेनिंग मधे अंधश्रद्धा निर्मूलनाचा समावेश केला म्हणजे पोलिस अंधश्रद्धा मुक्त होतील असे अजिबात नाही पण त्यांच्या विचारप्रक्रियेला सुरवात होईल ही बाब विसरुन चालणार नाही.
अंधश्रद्धेचा आधार घेतो म्हणुन कर गुन्हा दाखल असा संदेश या प्रकरणातून जर जात असेल तर चळवळीला घातक आहे. समाजापासून तुटुन पडण्याचा धोका यात निर्माण होतो. अंधश्रद्धेच उगम हा मेंदुत आहे..माणसाची सश्रद्द वा अश्रद्ध असणे ही अवस्था एका जैविक प्रक्रियेचा भाग आहे असे मला वाटतेच. अंधश्रद्धा हा भाग केवळ अज्ञान व अगतिकता यातून आला नसुन तो एक मानवी मेंदुच्या उत्क्रांतीतील अवशेषात्मक भाग आहे. अश्रद्धतेचा वा सश्रद्धतेचा अतिरेक हा मला मनोविकाराचाच भाग वाटतो. अतिरेक शब्दाची व्याप्ती सापेक्ष आहे हे मान्यच.

प्रघा

जर प्लँचेट झालं हे खरं असेल तर...
त्या अधिका-याविरुद्ध खात्यांतर्गत चौकशी होऊन कारवाईचे मार्ग आहेत की..
पोलिसानी तपास करताना कोणती पथ्यं पाळली पाहीजेत हे त्यांना सांगितलेलं नसतं का ?
कारणे द्या नोटीस आतासुद्धा देता येऊ शकते.

ब्रह्मांड आठवले,

>> त्या अधिका-याविरुद्ध खात्यांतर्गत चौकशी होऊन कारवाईचे मार्ग आहेत की..

त्या अधिकाऱ्याचा गुन्हा काय आहे?

आ.न.,
-गा.पै.

>>त्या अधिकाऱ्याचा गुन्हा काय आहे?<<
गुन्हा आहे म्हणुन नव्हे तर खरोखरच त्यांनी प्लँचेटचा आधार घेतला कि नाही हे समजण्यासाठी म्हणुन चौकशी.ती सुद्धा एवढा गदारोळ चालला आहे म्हणुन. त्यांनी जाहीर रित्या पांडुरंगाला साकडं घातल असत तर एवढा गदारोळ झाला नसता.जरी ती अंधश्रद्धा असली तरी.मूळात पोलिसांनी प्लँचेट चा आधार घेतला तो दाभोलकरांच्या खुनाचा तपास लागावा म्हणुन नव्हे तर आपण कुठे प्रयत्नात कमी पडलो नाही याचे मानसिक समाधान मिळावे म्हणुन.तपास नाही लागला म्हणुन त्यांना कुणी नोकरीवरुन काढू शकत नाही कि पगार कमी करु शकत नाही.
आता अंधश्रद्धा हा समाजकारणाचा विषय राहिला नसून तो राजकारणाचा विषय झाला आहे. असो....

प्रकाश घाटपांडे,

जर गुन्हा नसेल तर चौकशी कशाला? प्लांचेटमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे थोडीच?

आ.न.,
-गा.पै.

जर गुन्हा नसेल तर चौकशी कशाला? प्लांचेटमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे थोडीच?

>>> गपै ... अहो प्लॅन्चेट ने चुकुन खुनी सापडले तर त्यांच्या अस्ख्ख्या संस्थेचा पायाच कोलमडाणार आहे म्हणुन ते आधी पासुन प्रीकॉजन घेत आहेत Proud

>>प्लँचेटमधील माहिती ने खुनी सापडले तर तो योगायोग असेल.
अहो पण मग आत्म्यांनाच नेमावे लागेल सगळीकडे,
तसेही अनेक संशयात्मे आधीच आहेत म्हणा त्यात यांची भर. Happy

प्लँचेटमधील माहिती ने खुनी सापडले तर तो योगायोग असेल.

>>>

पण साक्षात नरेंद्र दाभोळकरांसारख्या नास्तिक माणसाबाबत इतका सुंदर योगायोग जुळुन येणे हे कित्ती च्छान असेल नै !

देव करो अन लवकरात लवकर त्यांचे खुनी सापडोत Happy

>>पण साक्षात नरेंद्र दाभोळकरांसारख्या नास्तिक माणसाबाबत इतका सुंदर योगायोग जुळुन येणे हे कित्ती च्छान असेल नै ! Sad

नक्की कोणत्या रोखाने लिहिले आहे ? Uhoh

नक्की कोणत्या रोखाने लिहिले आहे

>>>

कसं आहे की आम्ही ना अंनिसवाल्यांचे ना टनाटन प्रभात वाल्यांचे ...

आम्ही बिचारे कॉमन मॅन ...आम आदमी ...मॅन्गो पीपल.... आम्ही साधीविधाने करुन जात असतो ...रोख बिख तुमचा तुम्ही ठरवा Proud

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/planchet-murder-...

असे कधी काही वाचायला मिळेल असे वाटले नव्हते ... कि आमचेच कन्सेप्ट चुकिचे बनुन राहिलेत. आता झाडुन एक एक शास्त्रज्ञ लोकांच्या मुलाखती घेवुन, त्यांना नेमके काय वाटते याचा एक अहवाल सादर करुन, एक प्लँचेट इन्स्टीट्युट स्थापन केले गेले पाहिजे. जेणे करुन शास्त्रिय बैठक मिळाल्यामुळे होण्यार्‍या चुका टाळता येतील ( errors not mistakes ) आणि समस्त कॉमन मॅनला याचा फायदा घेता येइल. जे लोक भित भित लोकांना टाळुन भोंदुबाबांकडॅ जातात त्यांना ही उजळ माथ्याने त्यांच्य कडे जाता येइल. सगळच कसं प्रोफेशनल होउन जाइल.

म्हातारी मेल्याचे दुखः नाहेय, पण काळ सोकावतो.....

निवांत पाटील , अग्निबाण उडवणारे शास्त्र्ज्ञ देखील पूजा करतात. बेसिकचे वांधा दुसरे काय.

डॉ भटकर काय म्हणतात कि जरी प्लँचेटला वैज्ञानिक आधार नसला तरी शक्यतेचा विचार व्हायला हवा. मी कार्यक्रमाला उपस्थित होतो. पुर्वी होनी अनहोनी कार्यक्रमाच्या वेळी जस अंनिस ने म्हटल होत की हा अंधश्रद्धा पसरवणारा कार्यक्रम आहे तसच या पुस्तकाबाबत वा डॉ मेधा खासगीवाले यांच्या प्रयोगाबाबत म्हणता येईल. अशा विषयांना कधी पुर्णविराम नसतो. ते बा़की काही असो आपले मनोरंजन झाले बुवा!

डॉ भटकर काय म्हणतात कि जरी प्लँचेटला वैज्ञानिक आधार नसला तरी शक्यतेचा विचार व्हायला हवा. हा प्रयोगशील दृष्टीकोन आहे. यात मनोरंजन होण्यासारखे काय आहे ?

लास्ट बर्थ रिग्रेशन ही थेअरी अमेरिकेतल्या साय्कॉलोजिस्टने शोधलेली आहे. मग डॉ मेधा खाजगीवाले यांचा प्रयोग अंधश्र्ध्दा कस म्हणता येईल ?

डॉ. भटकर यांनी मी मराठीला दिलेली प्रतिक्रिया पाहिली. अतिद्रीय शक्तींचा गुन्हेगारी शोधासाठी परदेशात वापर होतो. या बाबत त्यांनी युरोप आणि रशिया या देशांची नावे घेतली. अस असताना भारतात असा प्रयोग झाला तर गैर नाही अस माझ वैयक्तीक मत आहे.

डॉ मेधा खाजगीवाले यांच्या पुनर्जन्म या विषयावरच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते.

आता टोकाचे मायबोलीकर डॉ भटकरांना सुध्दा ठोकरतील. पण त्यांनी वैयक्तीक मते व्यक्त करायचे धाडस दाखवले ही घटना माझ्या मते अंधश्र्ध्दा - अंधश्रध्दा म्हणुन भुई धोपटणार्‍या जात्यांधांच्या डोळ्यात अंजन आहे.

>>पण त्यांनी वैयक्तीक मते व्यक्त करायचे धाडस दाखवले ही घटना माझ्या मते अंधश्र्ध्दा - अंधश्रध्दा म्हणुन भुई धोपटणार्‍या जात्यांधांच्या डोळ्यात अंजन आहे.<<
मला भटकरांचे कौतुक वाटते. भटकर हे धाडस नेहमीच करतात. त्यांच्या मताचा आदर आहे. त्यांना मत व्यक्त करायचे स्वातंत्र्यही आहे. सहमत असणे वा नसणे हा भाग वेगळा.

निवांत पाटील,

>> जे लोक भित भित लोकांना टाळुन भोंदुबाबांकडॅ जातात त्यांना ही उजळ माथ्याने त्यांच्य कडे जाता येइल.

आता कसं बोललात! भोंदूबाबांकडे जायला भ्यायचं कारणच काय मुळातून? सर्व लोक खुल्लेआम जातात. फक्त अनिसवालेच भीत भीत भोंदूबाबांकडे जात असणार. त्यांची चांगली सोय होईल, नाही? Lol

आ.न.,
-गा.पै.

>>हा प्रयोगशील दृष्टीकोन आहे. यात मनोरंजन होण्यासारखे काय आहे ?<<
प्रयोगशीलतेत मनोरंजन होउ शकते. गूढ गोष्टींबाबतच्या चर्चा, प्रयोग किस्से मनोरंजकच असतात. हे पुस्तक वाचताना विचित्र विश्व वाचल्यासारखे वाटते.

कमाल आहे घाटपांडे साहेब, नाटकाचा / सिनेमाचा प्रयोग व विज्ञान तत्व प्रस्थापित करण्यासाठी केले जाणारे प्रयोग यात फरक तुम्हाला चांगलाच माहित आहे.

Pages