मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://www.loksatta.com/desh-videsh-news/cag-raps-gujarat-govt-for-exten...
गुजरातमध्ये आर्थिक साधनांचे गैरव्यवस्थापन झाल्याचा आरोप महा लेखापरीक्षकांनी (कॅग) पाच वेगवेगळय़ा अहवालात केला आहे. एकूण २५ हजार कोटींचा गैरव्यवहार गुजरातमध्ये झाल्याचे कॅगने म्हटले असून, त्यात १५०० कोटी रुपयांचा फायदा रिलायन्स पेट्रोलियम, इस्सार पॉवर व अदानी समूह यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे
सौरऊर्जा धोरणाच्या नावाखाली ग्राहकांवर ४७३.२० कोटींचा बोजा
*आर्थिक नियोजनात अनेक उणिवा.
*कॉलेजात प्राध्यापकांच्या ९० टक्के, प्राचार्याच्या ८१ टक्के जागा रिकाम्या, तर तंत्रनिकेतन प्राचार्याच्या ८५ टक्के जागा रिकाम्या.
*विद्यालक्ष्मी योजनेत पहिलीत व आठवीत प्रवेश घेणाऱ्या मुलींना एक हजार रुपये दिले जातात. यात एकाच मुलीच्या नावाने दोन बंधपत्रे खरेदी. प्रत्यक्ष मुलींना काहीच आर्थिक फायदा नाही.
*रिलायन्सला वसुलीत ६४९.२९ कोटी सूट.
*इस्सारला वसुलीत ८७.७० कोटी सूट.
*अदानी समूहास वसुलीत ११८.१२ कोटी सूट.
गरीबांना गहू, तांदूळ पुरविण्यात अपयश
गुजरात सरकारने २००८-१३ या काळात केंद्राकडून वाटपासाठी देण्यात आलेले धान्य उचलले नाही, त्यामुळे लोकांना अनुदानित गहू व तांदळापासून वंचित रहावे लागले. लाभार्थीना अन्नधान्य न दिल्याने अनुदानात २६५२ कोटी रूपयांचा तोटा झाला, असे ताशेरे महालेखापरीक्षकांनी मारले आहेत.
भारत सरकारने दिलेल्या गहू-तांदळाच्या दिलेल्या कोटय़ापैकी गुजरात सरकारने ३३ टक्के अन्नधान्य कमी उचलले. एपीएल, बीपीएल व अंत्योदय योजनेत गहू ५६ टक्के, ३ टक्के व २ टक्के इतका कमी उचलण्यात आला तर तांदूळ ७७ टक्के, ६ टक्के व ३ टक्के इतका कमी उचलण्यात आला असे कॅगने म्हटले आहे. राज्य विधानसभेत २५ जुलैला कॅगचा अहवाल सादर करण्यात आला.
कमी धान्य उचलल्यामुळे फायदा नाही
राज्य सरकारने कमी धान्य उचलल्याने लाभार्थीना या योजनांचा फायदा पुरेसा झाला नाही त्यामुळे २००८-१३ या काळात अनुदानात २६५१.७९ कोटी रूपये तोटा झाला. अन्न ब्रह्म योजना व अन्नपूर्णा योजनांची अंमलबजावणी अयोग्य पद्धतीने झाली.
अन्नधान्याचे वाटप उद्दिष्ट वार्षिक २२५० क्विंटल होते, त्यात २००९-१०,२०१०-११, २०११-१२ या तीन वर्षांत अनुक्रमे २४१.८० क्विंटल (११ टक्के), ४८७.२० क्विंटल (२२ टक्के) ४८० क्विंटल (२१ टक्के) धान्य अन्न ब्रह्म योजनेत वितरित करण्यात आले. या वर्षांमध्ये अनुक्रमे १९, १३ व ५ जिल्ह्य़ात अन्नधान्य वितरण करण्यात आले नाही.

Pages