डॉ दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लँचेट चा वापर केला म्हणुन अंनिसने गुन्हा दाखल करणे योग्य कि अयोग्य?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 11 July, 2014 - 23:47

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात "प्लॅंचेट‘चे माध्यम वापरल्याची चौकशी व्हावी व असे कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसतर्फे शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा पहा संदर्भ
दैनिक सकाळ बातमी
आपल्याला या अंनिसच्या भुमिकेबद्दल काय वाटते?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रघा

१. अंनिसला तुमचे ज्योतिषशास्त्र मान्य आहे का ?
२. तुम्ही अंनिसचे सदस्य असून तुम्हाला गुन्हा नोंदवणे योग्य कि अयोग्य हा प्रश्न का पडला ? संघटनेची भूमिका तुम्हाला माहीत /मान्य नाही का ? असल्यास ती इथे देणार का ?

@ब्रह्मांड आठवले व इतर मंडळी
मी कुणीही अ.भा अंनिस वा महाराष्ट्र अंनिस चा अधिकृत प्रवक्ता वा पदाधिकारी नाही.मला शक्य असलेले काम फलज्योतिष चिकित्सा मंडळ या बॅनर खाली अनेकांच्या सहभागातुन वा समन्वयातून करतो. लोक पटेल ते घेतील बाकीचे सोडून देतील.
मी प्रतिमांमधे अडकत नाही. उद्या माझी भुमिका वेगळी असू शकते. वर मी एका ठिकाणी लिहिले आहेच. बरेच लोक कृष्ण धवल द्वैतात अडकतात. राम किंवा रावण, विरोधक किंवा समर्थक, पाप किंवा पुण्य, चांगले किंवा वाईट. if you are not with us, you are with them असे काहीसे गणित असते
मी बहुरंगी दृष्टीने पहातो. किमान तसा प्रयत्न असतो.

मी कुणीही अ.भा अंनिस वा महाराष्ट्र अंनिस चा अधिकृत प्रवक्ता वा पदाधिकारी नाही. >>>

धन्यवाद.

प्रकाशजी, एक साधा प्रश्न पडला आहे, केवळ टोकायचे म्हणुन विचारतो आहे असे नाही.
अनिसमधे जे सर्वसाधारण कार्यकर्ते असतात त्यांनी देव, ज्योतिष या प्रकारावर विश्वास ठेवू नये, अभ्यास करू नये अशा काही अगदी प्राथमिक अपेक्षा आहेत का ?

महेश
अशा अपेक्षा अजिबात नसतात. कारण अंनिस त येताना तो कुतुहल म्हणुन येतो. बहुतेक सगळेच धार्मिक पारंपारिक अशा कुटुंबातुनच आलेले असतात. मिटिंग, कार्यक्रम,चर्चा,शिबिर यातून तो हळू हळू घडत जातो. समितीच्या बहुसंख्य गोष्टी ज्याला पटतात, जो त्या विचारांचा वाहक म्हणुन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष काम करतो तो कार्यकर्ता. तो प्रत्येक वेळी थेट अंनिस शी संबंधीतच असतो असे नाही. समविचारी लोक या प्रकारात देखील तो असतो. अंनिस च्या मिटिंग सर्वांना खुल्या असतात. लोक येतात, ऐकतात, पहातात कधी थांबतात कधी निघुन जातात. कार्यकर्ता अस काही औपचारिक पद नसते. काही लोक फक्त अंधश्रद्धा निर्मुलन समिती चे वार्तापत्र नावाचे मासिक असते त्याचे वर्गणीदार व वाचक असतात. आपल्याला पटेल त्या उपक्रमात सहभागी होतात. बाकीच्यात नाही होत. अंनिस ही स्वतःला विवेकी विचारांची चळवळ मानते. पुर्वी रॅशनल शब्दाला बुद्धीप्रामाण्यवादी असा अर्थ होता. पण कुणाची बुद्धी प्रमाण मानायची? त्यापेक्षा विवेकी असा अर्थ लावला तर तो माणसांना जोडणारा आहे. चळवळीत सुरवातील अस्तिक असणारा माणुस हळ्हळू नास्तिकते कडे झुकू लागतो. थोडक्यात तो स्वत:च स्वतः मधे बदल करु लागतो.

Congratulations for the entering into the १०० club.
What is the concln?

>>>> थोडक्यात इतर कल्ट सारखं ब्रेनवॉशिंग केलं जातं असं मत बनले आहे. <<<<
इतकेच काय घेऊन बसलात विचारवन्त तुम्ही?....
अहो कित्येक जण असाही प्रचार करु लागलेत की "पोरोबाळान्वर" संस्काराच्या नावाखाली त्यान्चे ब्रेनवॉशिन्ग करणारे आईबापही "कल्टचाच" एक भाग आहेत. तेव्हा "आईबाप" ही संकल्पनाच नष्ट करा.......
आता बनवा मत यावरही तुमचे... Wink

अमीबा , जीव्सृष्टीतला आद्य प्राणी , त्याच्या एका पेशीचे विभाजन होऊन दोन पेशी होऊन पुनरुत्पत्ती होते व दोन अमीबे तयार होतात व ही 'मुले' लगेच स्वतंत्र जगू लागतात . त्यात कुठे आई बाप ही संकल्पना र्हाते भौ? आन कशाले पायजे ती आणखी ? उगीच भविष्य , स्तोत्रे , मंत्र काय बाय शिकवीत र्हातेत आन माईन्ड पॉल्युशन कर्तेत ना बाप्पा ...

अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनी प्लॅंचेटचा वापर केल्याची चर्चा आहे. सरकारने याबाबत कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. अशा बाबींवर कारवाई करण्यापेक्षा शास्त्रीय आधारावर तपास करण्याची मनोवृत्ती पोलिस दलात रुजेल यासाठी शासनाने प्रयत्न करायची गरज आहे. कारवाईपेक्षा त्यासाठी निर्धाराची गरज आहे.
असे सांगणारा सुरेश खोपडे यांचा कारवाई पेक्षा निर्धार हवा हा सप्तरंग मधील लेख

प्रकाश घाटपांडे,

वरील लेखाबद्दल धन्यवाद. रंजक इतिहास सांगितला आहे.

भारतीयांच्या (विशेषत: हिंदूंच्या) मनोवृत्तीवर टिप्पणी करतांना मा. सुरेश खोपडे एक गोष्ट साफ विसरलेत. ती म्हणजे राजकारण्यांचा पोलिसी तपासात होत असणारा हस्तक्षेप. त्यामुळे पोलीस दलात निराशेची भावना वाढीस लागते. आपला कोणीही वाली नाही ही समजूत प्रबळ होते.

दाभोलकरांच्या तपासात एका विशिष्ट शहरात तपास करू नये असे (तोंडी) आदेश दिल्याचे माबोवर वाचले आहे. (बरोबर ना 'ब्रह्मांड आठवले'?) मांत्रिकाची मदत घेणे वगैरे प्रकार धूळफेक करून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आहे.

आ.न.,
-गा.पै.

दाभोलकरांच्या तपासात एका विशिष्ट शहरात तपास करू नये असे (तोंडी) आदेश दिल्याचे माबोवर वाचले आहे. >>

कळालं नाही. कुणी आदेश दिले ? लिंक वगैरे द्या. मला तरी माहीती नाही आणि सुरुवातीला जी उत्सुकता होती ती कधीच संपलेली आहे.

गा पै
तुम्ही ब्रह्मांड आठवले हे नाव लिंकांकित करताना पत्ता माझ्या प्रोफाईलचा दिलेला आहे. तुम्हाला मसुरी या शहराचे नाव अपेक्षित आहे का ?
मसुरीचा आणि या प्रकरणाचा काही संबंध असल्यास उजेड पाडावा ही नम्र विनंती.

ब्र.आ.,

ज्या कुठल्या शहरात तपास करू नये असे ऐकले (म्हणजे माबोवर वाचले) त्या शहराचं नाव माहीत नाही. बहुतेक तुमच्याकडून हे ऐकलं होतं. नसल्यास कृपया माफी असावी. Happy याव्यतिरिक्त मला काहीही माहिती नाही.

आ.न.,
-गा.पै.

ते कशाला लिंक देतील? सुरुंगाला संशयाची काडी लावून देऊन पळून जाणे आणि व्हिस्परिंग कॅम्पेनमधून अफवा व मते पसरवणे यात ते माहीर आहेत....

रॉबीनहूड,

तुम्ही माझ्यावर केलेल्या आरोपांच्या पुष्ट्यर्थ एखादा पुरावा देता येईल का? नसल्यास हेच आरोप तुम्हालाही लागू पडू शकतात.

आ.न.,
-गा.पै.

रॉबीनहूड,

>> तुम्हाला आरोप करायची कोणी मनाई केली आहे ब्वा?

आजिबात नाही. पण मला तुच्यावर आरोप करण्याऐवजी माझ्यावरील आरोप पुसण्यात जास्त रस आहे. कृपया माझ्यावरील आरोपांचा पुरावा द्यावा. Happy

आ.न.,
-गा.पै.

तक्रार दाखल करायला काय हरकत आहे?
कोर्ट काय ते करेल ना त्या तक्रारीचे, आपण का लोड घ्यावा?
तरीही मी न्यायाधीश असतो तर प्लांचेटसारखा बंडल प्रकार जर खरेच पोलिसांनी आपल्या अधिकारात आणि ड्यूटीवर असताना वापरला असेल तर नक्कीच त्याची दखल घेतली असती, गुन्हा दाखल करून घेतला असता.

आउटलुक वर शंभर कोटीचा दावा दाखल करणार
असे गृहीत धरु कि आउटलुक ने चटपटीत वृत्तांत छापला. पण त्यात काहीच तथ्य नाही असे म्हणायचे आहे का?

धन्यवाद ब्रह्मांड
होउन जाउ द्या दूध का दूध और पानी का पानी! गुलाबराव शांत बसले असते तर प्रकरण वाढल नसतं. उगीचच मुळ तपासापासून डायवर्शन झाल.

Pages