गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 July, 2014 - 04:02

मध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का?
एक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
दुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय?

असाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

नवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.
मात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का?

होते काय, एखादी जस्ट फ्रेंड मैत्रीण सकाळी सकाळीच गूड मॊर्निंग करते. हल्ली त्या वॉटस्सपवर निघालेल्या सुंदर सुंदर स्माईलींचा वापरही त्यात (फ्री असल्याने) सढळ हस्ते असतो. असे तिने आपल्या फ्रेंडलिस्टमधील दहा जणांना पाठवून झाल्यावर अकरावा नंबर आपला लावला असतो. पण तरीही आपली "हि" मात्र तिने तुला (च) का गूडमॉर्निंग केले म्हणून आपली तासून काढते. अश्यावेळी उगाच ‘खायापिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा’ अशी स्थिती होते.

बरं हे कधीतरीच नाही, तर वारंवार होते. फक्त समोरची "ती" बदलत राहते. त्या तिलाही अगं बाई असे करू नकोस म्हणून सांगायची सोय नसते, कारण यात पुन्हा आपणच वाईट ठरतो. नुसते वाईटच नाही तर जुनाट बुरसटलेल्या विचारांचे किंवा मैत्रीचा घाणेरडा अर्थ घेणारेही ठरतो. भले हा घाणेरडा(?) अर्थ आपल्या हिने काढला का असेना.

एण्ड ऑफ द डे, यातून चांगले काही घडत तर नाहीच. पण ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ या म्हणीचा अनुभव येतो की काय, अश्या भितीची टांगती तलवार डोक्यावर ठेऊन प्रेमप्रकरण निभवावे लागते.

हे एक उदाहरण झाले, अशी अनेक आणि विविध उदाहरणे देता येतील. स्मार्टफोन, ईंटरनेट, फेसबूक, व्हॉटस्सप वगैरे वापरणार्‍या सर्वांना याची कल्पना न सांगताच येऊ शकेल.

सध्या हेच भोगतोय, अन यावर सुवर्णमध्य शोधतोय. जिस से ‘साप भी बचे और लाठी भी ना तुटे’. जाणकार आणि अनुभवींचे सल्ले अपेक्षित. वैयक्तिक अनुभवांची प्रशंसा करण्यात येईल.

तळटीप - या प्रश्नाला व्हायसे वर्सा देखील करता येईल पण बॉयफ्रेंड हि जमात अश्या जासूसी प्रकारांबाबत पुरेशी निरुत्साही असते (हे.मा.वै.म.) ,, तरीही स्त्री-पुरुष समानता राखायला या अंगानेही भाष्य केल्यास माझी किंवा कोणाचीही काही हरकत नसावी.

आभारी आहे,
ऋन्मेssष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ला कि ना, हा प्रश्न व्यक्तीपरत्वे बदलेल. आणि "ना" असल्यास या "ला" चे त्या "ला" ला ठाऊक नाही असे गृहीत धरूया.
तसेच प्रश्न अविवाहितांसाठीच आहे, विवाहीतांच्या गर्लफ्रेंड म्हणजे विवाहबाह्य संबंध (भानगड) आणि यात आधीच एक पार्टी विवाहीत असल्याने तिच्यावर आणखी कुठे भानगड आहे का याचा संशय घेणे हे हास्यास्पद आहे.

शंका निरसन झाले असल्यास उपाय / सल्ले अपेक्षित.

गर्ल फ्रेण्ड म्हणजे प्रेयसी नाही. फिमेल फ्रेण्ड अलाउड आहे. जेण्डरलेस रिलेशन्स.
आपल्याला बेसिकमधून सुरुवात करायला लागेल.

सकाळ सकाळ तुमच्या गर्लफ्रेंडलाच गुडमॉर्निंग सागुन तुमचं तिच्यावर खुप प्रेम आहे असं रोज ठासवत जा , पहा काही फरक पडतो का ते, मुलींना ते आवडतं पण बर्‍याचदा मुलं त्यांना गृहीत धरतात म्हणुन मुली ईनसिक्युअर फील करतात. माझी मैत्रींण देखील अशीच पिसाटायची.

हल्लीच्या मुली आणि इनसिक्युअर फील ?
सकाळी रस्त्यावर दोन टूव्हीलवर दोन मुली एकमेकींशी (मोठ्याने) बोलत होत्या..
" कोण होता ग तो कारवाला भंगारवाला...त्याची गाडीच ठोकली असती"

गर्ल फ्रेण्ड म्हणजे प्रेयसी नाही. >>
????

गर्लफ्रेंड म्हणजे प्रेयसीच. मैत्रीण म्हणजे फीमेल फ्रेंड. हे झाले बेसिक. आणि ते चुकत असले तरी आता सध्यापुरते हेच गृहीतक पकडा अन्यथा राहूच द्या Happy

कविता
या सल्ल्याबद्दल धन्यवाद, असे केले तर नाही कधी, किंवा जे भरमसाठ प्रमाणात केले होते ते तिचा होकार मिळायच्या आधी केले होते. Wink

आपण एक स्टेज पार करून गेलो की आधीच्या स्टेजमधील काही पायर्‍या गाळतो तसेच हे. यात प्रेम किंवा ओढ कमी झाले असे काही नसते, बस ते सहज घडते. पण मुद्दामहून असुरक्षितता घालवायला किंवा कोणत्याही कारणास्तव जे आतून पटकन येत नाही ते खास लक्षात ठेऊन करणे जरा जड जाते इतकेच.

भितीची टांगती तलवार डोक्यावर ठेऊन प्रेमप्रकरण निभवावे लागते. >>>> भितीची टांगती तलवार डोक्यावर घेउन प्रेम करता येत? मला वाटायच की प्रेमात विश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो...

मग पेयसीच म्हणा ना..
आधी शीर्षकात बदल करा बघू.
चर्चेला सुरुवात करण्या आधी हे फार महत्वाचं

काँटेक्ट लिस्ट मधून गर्लफ्रेंड सोडून इतर मुलीच काढून टाका.
ना रहेगा बास ना बजेगी बासूरी.
पण आज काल मुलाचा फोन आला तरी बॉफ्रें वर संशय घेता यावा अशी एक मानसिकता रुजू घातलेली आहे.
त्याचं काय करावं? Happy
बहुदा एक सिम एक्स्क्लुजिवली गर्लफ्रेंडसाठी घेऊन सगळ्यात भारी मोबाईलात ते घालून फक्तं तोच मोबाईल गफ्रेला दाखवावा.
इतर नेहमीच्या वापराचा मोबाईल गफ्रेला भेट्ताना नेऊ नये किंवा सायलेंट ठेवावा.

मुग्धा, प्रेमात विश्वास महत्वाचा असला तरी असुरक्षिततादेखील बहुतांश वेळा त्याच प्रेमातून येते. Happy

साती, दोन फोनचा उपाय तसा चांगला आहे, फक्त यात तो मोबाईल पकडला जायला नको. ज्याची शक्यता बरेपैकी आहेच. त्या केसमध्ये मग आणखी महाभारत घडायचे.

आणि हो, लिस्ट मधून सर्वच मुली उडवा हा उपाय गंमतीने असेल अशी आशा करतो, कारण ही फारच भयानक कल्पना आहे.
नुकतेच तिने माझ्या वॉस्सप काँटेक्ट लिस्टला बघून एक कॉमेंट केली होती की यात मुलीच जास्त आणि मुले कमी आहेत. जे एकाअर्थी खरेही आहे, पण याचे कारण म्हणजे मुले जास्त असली तरी ग्रूपमध्ये अ‍ॅड आहेत, तर काही मुली स्वतंत्रपणे आहेत म्हणून वरकरणी दिसायला मुलींचा आकडा मोठा दिसतो इतकेच. अर्थात हे कारण तिला किती पटले देवास ठाऊक.

बहुदा एक सिम एक्स्क्लुजिवली गर्लफ्रेंडसाठी घेऊन सगळ्यात भारी मोबाईलात ते घालून फक्तं तोच मोबाईल गफ्रेला दाखवावा.
इतर नेहमीच्या वापराचा मोबाईल गफ्रेला भेट्ताना नेऊ नये किंवा सायलेंट ठेवावा.<<<<< +१. ड्युअल सिम वाला मोबाईल देखील उपयोगी.

आमच्या ओळखीतले एक गृहस्थ यावर कोचींग क्लासेस घेऊ शकतील. त्यांच्या काही खास टिप्स.

इतर मैत्रीणींची नावे स्टोअर करताना मुलांच्या नावाने स्टोअर करावीत. उदा: प्रियाच्या एवजी प्रियेश, इशाच्या ऐवजी इश्वर इत्यादि. कुणाचं नाव काय म्हणून सेव्ह केलंय ते आपल्याच मेमरीमध्ये फिक्स ठेवावं. चुकून भलताच अश्लील जोक भलत्याच सभ्य मुलीला जायचा.

"एक्स गर्लफ्रेण्डची नावे" हीरवीणींच्या नावाने सेव्ह करावीत. ते काय कधी कॉल करणार नाहीतच. आपण चुकून माकून ड्रंक कॉल केला असेल तर "असाच एका मित्राने करीना कपूरचा नंबर दिला होता. खोटा आहे" असं म्हणून वेळ मारून नेता येते.

मोबाईलला पासवर्ड अवश्य ठेवावा, पासवर्ड काय आहे ते गर्लफ्रेण्डला सांगायचं आणी मग पासवर्ड एकाच अक्षराने बदलून ठेवाय्चा. उदा. तिला सांगताना "followurdreams" असा पासवर्ड आहे हे सांगायचंं, प्रत्यक्षात "followurdream" असा ठेवाय्चा. तिच्याचसमोर टाईपदेखील करून दाखवायचा. तुमच्यापस्चात तिने कितीही ट्राय केलं तरी मोबाईल "उसकी पहंच से दूर रहेगा"

मग थोडे दिवस एक आयडीया करा, ती आली कि स्वत:च तिला मोबाइल देउन टाका, घे बाई चेक कर माझं व्हॉटस अप आणि झाप मला अशा आविर्भावात

पहा काय होतंय, पॅनिक होउ नका, थोडं पेशन्सने काम घ्या.

सत्य हे कधी न कधी बाहेर येतंच. त्यापेक्षा सगळं खरं खरं एकदाच काय ते सांगून टाकावं.

नवरा काय नि बॉफे (प्रि) काय....
नेहमी ट्रान्सपरण्ट असावं. दिवसात कुणाकुणाला भेटतो, कुठल्या रस्त्याने जातो-येतो, पैसे कुणाकुणावर खर्च करतो, सवयी, आवडी निवडी हे सगळं सगळं तिला माहीत असायला पाहीजे. मोबाईल तर एक छोटीशी चीज आहे. कधीही खोटं बोलू नये, कारण चेह-यावरचे भाव किंवा डोळे पाहून ती लगेच ओळखू शकते. तुमच्या कपड्याला कुठला वास येतो हे ही बायकांना कळतं. अर्ध फॉरेन्सिक सायन्स त्यांना जन्मजात ठाऊक असतं. याउप्पर मर्जी तुमची..

काही बायकांना काही काळ फसवत येतं.
काही बायकांना सर्व काळ फसवता येतं.
सर्वच बायकांना सर्व काळ फसवता येत नाही.

अगदी सोपं म्हणजे गर्लफ्रेंडला सांगा की व्हॉटस अ‍ॅप जाम बोअर असल्याने मी ते वापरणं बंद केलंय.
मग गर्लफ्रेंडला 'जय हिंद' म्हणून संपूर्ण भारतीय अश्या हाईकवर अ‍ॅड करा.
बाकी कुण्णाकुण्णाला अ‍ॅड करू नका.

मग जर आयफोन असेल तर
http://m.wikihow.com/Hide-Apps-on-an-iPhone

ही ट्रीक वापरून नाहीतर सिमिलर अ‍ॅड्रॉईडसाठी अश्याप्रकारची ट्रिक वापरून व्हॉटसअ‍ॅप दडवून ठेवा.

हाकानाका

वर दिलेले सल्ले हे दुकान बुडाल्यानंतर धंदा कसा करावा याची व्याख्याने देण्याच्या प्रकारातले आहेत हे नमूद करायचं राहून गेलं....

पश्चात्ताप होण्याआधी हे वाचावं. पुठेमाश.

आणि खरं खरं सागितलं तरी कपाळमोक्ष हा ठरलेलाच.

त्यापेक्षा
गेला माधव कुणीकडे हे नाटक एकदा पाहून घ्यावे.

त्रिशंकू अशाच द्विधा मनःस्थितीत वर गेला होता.

नंदिनी, आपण स्टोअर करताना नाव बदलून ठेवले तरी व्हॉटस अ‍ॅपवर आपोआप फोटो येतो ना?
आणि जनरली जस्ट फ्रेंड आणि गफ्रे बाफ्रे एकमेकांच्या ओळखीतलेच असतात.

आणि दोन सिम असली तरी अ‍ॅप्स सिमनिरपेक्ष असतात म्हणजे एक सिम बंद आहे म्हणून वॉटस अ‍ॅप दिसायचं रहात नाही.

गर्लफ्रेंडला फोनवर पाहीजे ते बघुद्या , समजावुन सांगा , तरीही जास्तच संशय घ्यायला लागली , तर सरळ तिला ' जय महाराष्ट्र' करा. संशयी गफ्रे पेक्षा नसलेली परवडली .

गर्लफ्रेंडबरोबर जर लग्न करणार असाल तर लपवालपवी करण्यापेक्षा तिला तुमच्या मित्र मैत्रिणींना भेटवा, ओळख करुन द्या.. कॉल लिस्ट, मेसेज बॉक्स एम्प्टी करणं, व्हॉट्स अ‍ॅप चॅट क्लिअर करणं इ. प्रकाराने संशय अजुन दाट होतो.. करु देत तिला मोबाईल चेक, खोटं बोलु नका. खरं काय ते सांगा पण त्याच्वेळी ती (तुमची गर्लफ्रेंड) तुमच्याकरता किती स्पेशल आहे अन बाकीचे फक्त फ्रेन्ड्सच आहेत हेही दरवेळी सांगाच.. एकदा का तिचा विश्वास बसला की तुमच्या इतर मैत्रिणींवर ती आक्षेप घेणार नाही. अर्थात याला भरपुर वेळ द्यावा लागेल अन भरपुर एफर्ट्स घ्यावे लागतील. चुकुनही तुमचे फ्रेन्ड्स हे गर्लफ्रेंड पेक्षा महत्वाचे आहेत हे तिला जाणवु देउ नका.. मेक हर युअर प्रायॉरिटी.. पण त्याचवेळी तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कललाही वेळ देणार अन द्यायला हवा याचिही तिला सौम्यपणे जाणीव करुन देत जा... दोन्हीकडे प्रॉपर बॅलन्स साधलात तर खोटं बोलावं लागणार नाही अन सुखी रहाल.. अन इतकं करुनही गर्लफ्रेंड ओव्हरपझेसिव्ह होत असेल तर नातं पुढे नेण्याबाबत विचार करा...

ऑल द बेस्ट

नंदिनी, आपण स्टोअर करताना नाव बदलून ठेवले तरी व्हॉटस अ‍ॅपवर आपोआप फोटो येतो ना?
>>>>>>
एक्झाक्टली हेच,
आणि हे फोटो प्रकरण तर इतके भारी आणि खतरनाक आहे की त्यामुळे समोरची व्यक्ती ना मुलगी आहे हे लपवता येते ना ती किती सुंदर आहे हे लपवता येत. Sad

खरे तर मुलगी जितकी सुंदर तितके ती स्वताहून गूडमॉर्निंग बोलायची शक्यता कमी कमी होत जाते, पण तरीही जास्त कसून छाननी याचीच होते. माझ्या कोण्या मैत्रीणीने सुंदरसा फोटो लावताक्षणीच मी तिचे माझे जुने सारे कन्वरसेशन (चॅट रेकॉर्ड) डिलीट करून टाकतो. काय माहीत कुठल्या शब्दाचा काय अर्थ निघेल. नाईस डीपी हि कॉमेंटपण मग धोकादायक ठरते.

साधी गोष्टय ...गर्लफ्रेंडचा मोबाईल तुमी चेक करायला सुरवात करा, ती परत तुमचा मोबाईल मागणार नाही...

चिमुरी, छान सल्ला, प्रयत्न हाच असतो, नेहमी राहतो. पण हल्ली सोशलसाइटसच्या जमान्यात फ्रेंडसर्कल आणि ओळखी सातत्याने वाढतच असतात, नवनवीन मैत्रमैत्रीण जमतच असतात. बरेचदा आपल्या मनात काही नसले तरी समोरच्या मैत्रीणीच्या मनात काही खास फीलींग असल्यास तिचे बोलणे वेगळ्याच लेवलवर चालू असते. अर्थात कधीकधी तसेही नसते बस एखादीचा स्वभाव फ्रँक असतो. शेवटी मी कमिटेड आहे, विवाहीत नाही, म्हणून बरेचदा समोरून त्या द्रुष्टीने काळजी न घेता फ्री ली बोलले जाते. अर्थात हे सारे आपण समजू शकतो, तुम्हीही समजू शकाल, पण प्रेमात असलेल्या मुलींना समजवणे भारी पडते Sad

Pages