गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 July, 2014 - 04:02

मध्यंतरी माझ्या वाचनात एक चर्चा आली होती की पालकांनी मुलांचे मोबाईल चेक करावेत का?
एक मतप्रवाह होता की आपला मुलगा / मुलगी काय गुण उधळतोय यावर लक्ष ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
दुसरा मतप्रवाह होता की मग सज्ञान झालेल्या मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचे काय?

असाच एक प्रश्न गेले काही दिवस मला अनुभवांतून छळतोय.
गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का?

नवरा-बायको नाते एकवेळ समजू शकतो, तुम्ही एकमेकांचे मोबाईल चेक करा किंवा चुलीत घाला, पण आयुष्यभर एकमेकांनाच झेलायचे आहे.
मात्र प्रेमप्रकरणात आपल्या गर्लफ्रेंडला हा अधिकार देण्यात यावा का?

होते काय, एखादी जस्ट फ्रेंड मैत्रीण सकाळी सकाळीच गूड मॊर्निंग करते. हल्ली त्या वॉटस्सपवर निघालेल्या सुंदर सुंदर स्माईलींचा वापरही त्यात (फ्री असल्याने) सढळ हस्ते असतो. असे तिने आपल्या फ्रेंडलिस्टमधील दहा जणांना पाठवून झाल्यावर अकरावा नंबर आपला लावला असतो. पण तरीही आपली "हि" मात्र तिने तुला (च) का गूडमॉर्निंग केले म्हणून आपली तासून काढते. अश्यावेळी उगाच ‘खायापिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा’ अशी स्थिती होते.

बरं हे कधीतरीच नाही, तर वारंवार होते. फक्त समोरची "ती" बदलत राहते. त्या तिलाही अगं बाई असे करू नकोस म्हणून सांगायची सोय नसते, कारण यात पुन्हा आपणच वाईट ठरतो. नुसते वाईटच नाही तर जुनाट बुरसटलेल्या विचारांचे किंवा मैत्रीचा घाणेरडा अर्थ घेणारेही ठरतो. भले हा घाणेरडा(?) अर्थ आपल्या हिने काढला का असेना.

एण्ड ऑफ द डे, यातून चांगले काही घडत तर नाहीच. पण ‘तेलही गेले आणि तूपही गेले’ या म्हणीचा अनुभव येतो की काय, अश्या भितीची टांगती तलवार डोक्यावर ठेऊन प्रेमप्रकरण निभवावे लागते.

हे एक उदाहरण झाले, अशी अनेक आणि विविध उदाहरणे देता येतील. स्मार्टफोन, ईंटरनेट, फेसबूक, व्हॉटस्सप वगैरे वापरणार्‍या सर्वांना याची कल्पना न सांगताच येऊ शकेल.

सध्या हेच भोगतोय, अन यावर सुवर्णमध्य शोधतोय. जिस से ‘साप भी बचे और लाठी भी ना तुटे’. जाणकार आणि अनुभवींचे सल्ले अपेक्षित. वैयक्तिक अनुभवांची प्रशंसा करण्यात येईल.

तळटीप - या प्रश्नाला व्हायसे वर्सा देखील करता येईल पण बॉयफ्रेंड हि जमात अश्या जासूसी प्रकारांबाबत पुरेशी निरुत्साही असते (हे.मा.वै.म.) ,, तरीही स्त्री-पुरुष समानता राखायला या अंगानेही भाष्य केल्यास माझी किंवा कोणाचीही काही हरकत नसावी.

आभारी आहे,
ऋन्मेssष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का? >>>>>>>>>>>>>
एकच म्हणावेसे वाटते .... 'ग्रो अप ड्यूड'
आयुष्यात एवढे शेंबडे निर्णयही घेता येत नसतील तर आत्मपरिक्षण करणे जरूरी आहे.
शेंडा ना बुडखा असलेला काहीच्या काही विषय आणि भरकटलेली, अनावश्यक, दिशाहीन, असंबंध चर्चा.

स्वाती,
प्रश्नकर्त्याला हे नाते टिकवण्यात खरेच इंटरेस्ट आहे असे दिसत आहे.
>>>>
अर्थातच, मलाच नाही तर दोघांनाही. ट्रस्ट मी अजून आमच्या नात्यात काहीही प्रॉब्लेमेटीक नाहीये. हे सुद्धा सध्या गंमतीच्या लेव्हलवरच घडतेय. फक्त चर्चेच्या ओघात इथे त्याची गंभीर लेव्हलही चर्चिली गेली. अर्थात आसपास अशी उदाहरणे खोर्‍याने दिसतात ते प्रत्येकाला आठवून कुठे ना कुठे ओळखीचे उदाहरण रिलेट झाल्याने असे झाले.

टोच्या,
आपल्या मताचा / सल्ल्याचा आदर आहे, पण माझ्याच पोस्टला अनुसरून सांगतो, कोणतीही मुलगी मला सकाळ संध्याकाळ गुडमॉर्निंग गूडनाईट करत नाही. जर दहा मुलींनी महिन्यातून एकदा केले तरी माझ्या मोबाईलवर दहा मेसेज जमा झाले ना, हे तसे बघा. (इथेही आकडे उदाहरणादाखल घेतले आहेत)
"माझ्या व्यभिचाराचे समर्थन करायला मला मदत करा" अश्या आशयाचा धागा सोशलसाईटवर मी कसा काढेन हो Happy

डूड की ड्यूड कसंही वाचलं तरी जी स्टूपिडिटी तुमच्या आत असते ती बाहेर सुद्धा स्ट्यूपिडिटी म्हणूनच दिसते, तुम्ही थोडी मचुरिटी दाखवली तर लोक तुम्हाला मॅच्युअर झाला असे म्हणतील.

तात्पर्य हे की तुम्हाला ब्रिटिश कीडा चावला आहे की अमेरिकन ह्याने काही फरक पडत नाही, तुम्ही रोज
सा माम पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्या पहा। स्पष्टं आणि मोठ्याने सकाळी किमान ११ वेळा तरी म्हणा, गरज आहे तुम्हाला.

मागच्या पोस्टवर स्वाती२ म्हणाल्या त्याच्याशी सहमत. एकमेकांची स्पेस, प्रायवसी जपावी. दुसर्‍याच्या (नवरा/बायको, मित्र्/मैत्रिणी) फोन, पर्स्/वॉलेट वगैरे तपासू नये. बेसिक मॅनर्सही आहेतच.

हुप्पाहुय्या,
अगेन लव्ह यू डूड,
हा माझा माबोवरचा पहिलाच धागा होता आणि त्याचे शतक तुमच्या पोस्टने झालेले मला आवडेल, भले ती पोस्ट चर्चेशी संबंध राखून असो वा नसो Happy

मुलिना हँडल करणे एक कौशल्य असते, ते जर तुमच्यात असेल तर बिनधास्त मोबाईल द्या की अजून काय द्या. काही सापडणार नाही. आणि तुमच्यात ते कौशल्य नसेल तर मग ग.फे.चा मूड येईल तेंव्हा अरोपी बनायची तयारी ठेवा. त्या कशावरुनही तुम्हाला अरोपी ठरवू शकतात.

हो .. Proud
शीर्षकात ग'फ्रेंड असलेला माझा पहिलाच धागा असा ९८ ला अडकलेला बघून खरेच जीव तळमळत होता..

पण धाग्याला अनुसरून बोलायचे झाल्यास हल्ली मोबाईलचेकींगचे भूत तिच्या मानगुटीवरून उतरल्याने हा प्रॉब्लेम तितकासा छळत नाही..

कदाचित नात्यातील वाढलेला विश्वास याला जबाबदार असावा..

<< गर्लफ्रेंड्सना आपला मोबाईल चेक करायची परवानगी द्यावी का? >>

गर्लफ्रेंड्सना - अनेकवचनी ? ?

असे असेल तर एकीच्या हातात मोबाईल दिला तर तिला दुसरीचा नंबर दिसणारच की.

परवानगी - ??
गर्ल्फ्रेंड मोबाईल तपासण्याआधी परवानगी मागते? विश्वास नसणारी परवानगी वगैरे न मागता सरळ मोबाईल काढून घेते आणि तपासते. विश्वास ठेवणारी मोबाईल तपासत बसतच नाही.

गर्लफ्रेंड्सना - अनेकवचनी ? ? >>> येस्स यु आर्र कर्रेक्ट्ट !, एककवचनी हवे तिथे. हा माझा माबोवरचा पैलाच धागा असल्याने शुद्धलेखन फारच कच्चे होते आणि पैलाच धागा असल्याने उत्साहही अमाप होता, त्या भरात चूक झाली.

परवानगी?? >>
गफ्रेंड-बॉफ्रेंड हे नाते राखून असलेल्या प्रत्येक जोडीत काही गोष्टी ठरवल्या जातात. एकमेकांच्या कुठल्या बाबीत हस्तक्षेप करायचा वा एकमेकांच्या कोणत्या पर्सनल बाबींमध्ये समोरच्याला आपली प्रायव्हसी जपायची मुभा द्यायची हे ठरवले जातेच.

इथे जर माझ्या मोबाईलला मी पासवर्ड घातला असेल, तर तो मी तिला सांगणे हे एकप्रकारची माझा मोबाईल चेक करायची परवानगी देण्यासारखेच झाले. हे मेल आयडी बाबतही लागू.

मी सगळ्या पोस्टी वाचल्या नाहीयेत.
तिने मोबाईल मागितला की तुम्हीपण तिचा मोबाईल मागायचा, लगेच दिला तर आपण ही द्यायचा मोबाईल नाहीतर होऊन जाऊ देत राडा एकदाचा.
माझ्या पुर्वाश्रमीच्या प्रियकराने जो आता माझाच नवरा आहे त्याने अमलात आणलेला उपाय.:)

तिने मोबाईल मागितला की तुम्हीपण तिचा मोबाईल मागायचा >>>> हायला हे पण बरेय.. खरे तर मुलगी आपल्याला कुठल्याही बाबतीत फसवू शकते वा आपल्यापासून काही लपवू शकते हे बरीच मुले गृहीतच नाही धरत.. आणखी एक म्हणजे मुलीच्या मोबाईलवर कोणत्या मुलाचा मेसेज बघितल्यास तोच माझ्या मागे लागलाय असे बोलून मुलगी सहज सुटू शकते, मात्र मुलाकडे असा युक्तीवाद करायचा स्कोप नसतो, कारण, ती कशी तुझ्या मागे लागेल., तूच सिग्नल दिला असणार.. असा पलटवार होतो... भले या दोन्ही केसेस मध्ये सत्य काहीही असो..

गफ्रेला मोबाईल चेकायला देऊच नये खरं तर. एकदा हुशारीने तिनेच माझा मोबाईल चेकला त्यानंतर परत कधी तिने तस केलं नाही कारण बीके झालं. आता दुसरी गफ्रेचा इतका विश्वास आहे की तीने आजपर्यंत कधीच मोबाईल मागितलेला नाही. आता तिच्यापासुन मोबाईल कधीपर्यंत सुरक्षीत राहील देवच जाने.

Pages