गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासंदर्भात शंका

Submitted by मी अमि on 27 June, 2014 - 00:45

गणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का?
समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंबुभाऊ - धन्यवाद मी मैत्रिणीला नक्की विचारेन ह्यामागे काही नवस अथवा असे काही होते का? आणि तुम्ही दिलेली माहिती तिला देईन.

समुद्रात आणि उथळ नदीत काय होते याची कल्पना आहे. पण बादली नाही पटत.
आपल्याला पटत नाही किवा मनाला बरोबर वाटत नाही हि गोष्ट वेगळी आहे . मी धार्मिक दृष्टीने सांगितलं कि प्राणप्रतिष्ठा काढून टाकल्यानंतर ती फक्त १ मातीची मूर्ती असते .

जुने पितळी मुखवटे जरा उग्र दिसतात. विद्या ताईंना बहुतेक शाडूच्या सुंदर सुबक मुखवट्यांची भुरळ पडलेली दिसते आहे. काय बरोबर ना?>>>>> खरे आहे

मृत्तिकापात्राबद्दल लिंबूदांची विधाने भारीच आहेत. Happy
हे खरेच आहे की मातीची मुर्ती करून ती विसर्जन करण्यामागे साधे लॉजिक असे आहे की

माणसाने सजीव सृष्टीचा नियम लक्षात ठेवावा यासाठी निर्माण केली गेलेली प्रतिके आहेत ही.
अस्तित्वात येणे, सुखोपभोग घेऊन, नंतर अस्तित्व नष्ट होणे हे चक्रच दर्शविले गेले आहे अशा प्रथांमधुन.

ऋषी, मुनी, संतसज्जन, ज्ञानी लोक यांनी मानवाच्या सायकॉलॉजीचा खोलवर विचार करून अनेक प्रथा चालू केल्या असाव्यात असे वाटते. काय लिंबूदा बरोबर ना ?

मी धार्मिक दृष्टीने सांगितलं कि प्राणप्रतिष्ठा काढून टाकल्यानंतर ती फक्त १ मातीची मूर्ती असते . जरी मुर्तीचे विसर्जन झालेले असले तरी आपल्या डोळ्यांच्या आड यामुर्तीचे विघटन होणे जास्त चांगले.

मुंबईत समुद्रात मुर्ती विसर्जनाला पर्याय नाही. पण ह्या अर्धवट विघटीत मुर्ती पाहुन मनाला त्रास होतो हे निश्चित.

अनेकांनी मुर्ती दान करा आणि बादलीत विसर्जन करा असे आवाहान केले आहे पण सश्रध्द हिंदुसमाज याला प्रतिसाद देत नाही. याच कारण त्यांच्या मनाला हे पटत नाही.

Pages