गणपती विसर्जन आणि प्रदूषण

Submitted by जागोमोहनप्यारे on 6 September, 2011 - 07:13

गणपती विसर्जन आणि प्रदूषण

आज गणपती विसर्जनाला दरवर्षीप्रमाणे नदीवर गेलो तर तिथे पोलिस आणि नगरपालिकेचे कर्मचारी उभे होते. त्यानी मूर्ती विसर्जनास प्रतिबंध केला. त्याऐवजी जवळच्या एका हिरवेगार घाण पाणी असलेल्या खंदकाचा पर्याय दिला किंवा नदीजवळ एक छोटी काहिल होती त्यात गणपती सोडायला सांगितला. निर्माल्य टाकायला वेगळी ट्रॉली होती.

हरताळका विसर्जनाच्या वेळी नदीकाठी भात, निर्माल्य, फुले आणि मूर्ती यांचा राडा-चिखल झालेला होता, म्हणून असे केले असे साम्गण्यात आले.

१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?

२. हेच शासन कारखान्यांची प्रदूषिते नदीत जाऊ नये म्हणून काय उपाय करते?

३. हे शासनाने लोकांच्या धार्मिक प्रथेवर केलेले आक्रमण नाही काय?

४. याबाबत इतर शहरे/ गावे यात आपला काय अनुभव आहे?

५. याबाबत अनिस वाल्याना मूर्ती दान करणे योग्य होईल का?

६. याबाबतचे आणखी काही विचार असल्यास इथे मांडावेत

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सालाबादप्रमाणे यन्दाही हा विषय निघाला आहे सबब यन्दाही बोटे दुखवुन घ्यावी लागणार असे दिस्तय! Proud
तर....
१. घरगुती गणपती आणि निर्माल्य विसर्जनाने फार मोठे प्रदूष्ण खरेच होते का?
= अजिबात नाही. उलट निर्माल्य व अन्नकणान्मुळे पाण्यातील जीवान्चे पोषणच होऊ शकते. या ऐवजी अक्षरषः कोट्यावधी लिटर्सचे सान्डपाणी/मैलापाणी यच्चयावत सर्व नद्यान्मधे मिसळले जाते त्याबाबत शासनाने खरोखरच काहीतरी करावे. विचार करा की खडकवासला पानशेत धरणाचे निम्मे पाणी शेतीसाठी वळवले व बारामतीइन्द्रापुरकरान्नी पळविले असे धरले तरी उरलेले निम्मे पाणी पुन्हा नदीत येते ते मधल्या लाखोन्च्या लोकसन्ख्येच्या मलमूत्रातुनदेखिल येते. त्याची काय वाट लावता ते आधी सान्गा अन मग हे किरकोळ गौरीगणपती वगैरेवर घाला घाला.

२. हेच शासन कारखान्यांची प्रदूषिते नदीत जाऊ नये म्हणून काय उपाय करते?
कागदोपत्री बरेच उपाय करते, त्यामुळे बरेच कागदी वजनाची हलवाहलवही होते, प्रत्यक्षात काहीही नाही. भरल्या तर दन्डात्मक कारवाई करु शकणार्‍या अधिकार्‍यान्च्या तुम्बड्या तेवढ्या भरतात.

३. हे शासनाने लोकांच्या धार्मिक प्रथेवर केलेले आक्रमण नाही काय?
अजुनही शन्काच आहे का?

४. याबाबत इतर शहरे/ गावे यात आपला काय अनुभव आहे?
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर (कारण गणेशोत्सव विसर्जनाचा प्रश्न येथेच जास्त उमटतो), चान्द्यापासून बान्द्यापर्यन्त सर्वदूर शासन एकच आहे! Proud

५. याबाबत अनिस वाल्याना मूर्ती दान करणे योग्य होईल का?
अयोग्य होईल. अशी धार्मिक प्रथा नाही, परम्परा नाही, शास्त्र नाही. एक तर मूर्ति पाण्यात विसर्जित करा अथवा पाण्यात विसर्जनाचा उपचार करवुन ती मुर्ति पुन्हा बाहेर काढून सन्ग्रही ठेवी (गेली पाच वर्षे मी तेच करतो)
या ठिकाणी खरेतर अंनिसवाल्यान्ना लुडबुडायचे कारण नाही पण पर्यावरणाच्या नावाखाली त्या निमित्ताने हिन्दू धर्मियान्च्या या क्षेत्रात हस्तक्षेप करुन सवन्ग प्रसिद्धी मिळविण्याची सन्धी का बरे नाही सोडणार? Wink

६. याबाबतचे आणखी काही विचार असल्यास इथे मांडावेत
गेली पाच वर्षे, पर्यावरणाच्या कारणाने नव्हे, तर येथिल नादान सरकार/प्रशासनाने, साधी मूर्ति विसर्जनाच्या आमच्या नदी/तळे इत्यादिक सोईच्या ठिकाणीदेखिल वर्षानुवर्षे जे राडे करुन ठेवलेत त्यामुळे अत्यन्त घाण झालेल्या गटारी पाण्यात विसर्जन करणे प्रशस्त वाटत नसल्यानेच घरी स्वःच्छ बादलीभर पाण्यात विसर्जन करुन मग दहा मिनिटान्नी ती मूर्ति पुन्हा बाहेर काढून घरातच झाकुन ठेवतो आहे. Happy पुढे मागे कधी पुर आल्यावर दहावीस मूर्ति गाडीत घालुन नेऊन पाण्यात विसर्जन करीन Happy
आता बादली भर पाणी वाया घालवतो, म्हणजे एकुण लोकसन्ख्येच्या प्रमाणात अशा किती बादल्या पाणी वाया जाईल असे म्हणून धाय मोकलुन रडणारे रडतीलही! Proud पण त्याबाबत मी काही करु शकत नाही

गणपती विसर्जनाने बहुदा प्रदुषण होत नसेल.. ( इथले प्रतिसाद पहाता तसा निश्कर्ष काढायला हरकत नसावी.)

गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी वेगळे कृत्रिम तलाव उभारून त्यात विसर्जन झाले आणि निर्माल्य पाण्यात विसर्जित न करता त्याचा उपयोग खतनिर्मितीसाठी झाला तर काय वाईट आहे?
शासन म्हणजे कुणी परग्रहावरून आलेला प्राणी आहे का?

धर्म वगैरे ठीक आहे. करा काय करायचे ते. एव्हढी धर्माची हौस असेल तर विसर्जनाला पैसे द्या, नि त्यातून पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती शोधून काढा! एव्हढी अक्कल दिली गणपती बाप्पाने ती वापरून काही उपयुक्त कामे करा की!! फुक्कट धर्म, धर्म म्हणून ओरडायचे पण काम काही करायचे नाही!

असे काम केले पाहिजे की धर्म आचरताना कोणत्याहि बाबतीत कुण्णालाहि टीका करायला वाव देणार नाही. तेव्हढी अक्कल जरूर आहे.

ब्राह्मणांनी खरे तर ज्ञान साधना, ज्ञानसंपादन करावे नि फक्त माधुकरी मागून त्यावर निर्वाह करावा. मग का नाही काही ज्ञान संपादन करत नि वापरत? नुसता स्वार्थीपणा, लाचलुचपत करून पैसे मिळवायचे, चिकन खायची, दारू प्यायची, नि फुक्कट बोंबलायचे आम्ही हिंदू!! उगाच नाही कुणीहि यावे नि हिंदू धर्माला लाथा माराव्या. सगळे नुसते फुक्कटचा गर्व करत म्हशी रेड्यासारखे चिखलात बसले आहेत!! करत काही नाहीत, नुसतेच रडतात.

मराठी भाषेचीहि तीच रड! 'आम्हाला मराठीचा अभिमान वाटतो' हे साधे वाक्य सुद्धा इंग्रजीची कुबडी घेतल्याशिवाय धड मराठीत बोलता येत नाही! असल्या दुर्बळ भाषेचा कसला डोंबलाचा अभिमान?

मला माहित आहे आता अनेक लोकांना 'सात्विक संताप' येईल, 'असे लिहू नये, (खरे असले तरी)', असे म्हणतील. अ‍ॅडमिनकडे तक्रार करतील! मी काही दिवस गप राहीन. या वेळी मात्र माफी मागणार नाही. पण तुम्ही फदेच रहाणार. नुसते रडतच बसणार!! मी नाही तर इतर कुणि हेच लिहीतील. दुसरे काय लिहीणार तुमच्या बद्दल??
Angry Angry Angry

ब्राह्मणांनी खरे तर ज्ञान साधना, ज्ञानसंपादन करावे नि फक्त माधुकरी मागून त्यावर निर्वाह करावा. मग का नाही काही ज्ञान संपादन करत नि वापरत?

आता हे ब्राह्मण कुठून मध्येच आले? भारतात फक्त ३ टक्के ब्राह्मण आहेत. याचा अर्थ ९७ टक्के गणपती ब्राह्मणेतरांचे असतात.. Happy

@झक्की
वा वा वा. पोस्ट आवडली.

माझे काही प्रश्नः

१. प्लास्टर ऑफ पॅरिस ची मूर्ती करावी असं कोणत्या शास्त्रात लिहीलं आहे? ती विषारी रंगांनी रंगवावी असे कोणता धर्म सांगतो?
२. किती मूर्तींची विधिवत प्राण-प्रतिष्ठापना इ. झालेली असते, की नदीत विसर्जन न केल्याने धर्म बुडेल?
३. रंग धुवून बाहेर झाकून ठेवल्याने मूर्तीची विटंबना होत नाही का? ज्यांच्याकडे यासाठी जागा नाही त्यांनी ती मूर्ती अंधश्रद्धा वाल्यांना देण्यात वावगे काय?
४. समुद्र / नद्यांत विसर्जित केलेल्या मूर्तींची विटंबना पाहवत नाही. त्याला चांगला पर्याय काढणे याला धर्मसुधारणा म्हणावे, की धर्मभ्रष्ट झाला असे म्हणावे?

पूर्वी चार/सहा मूर्ती विसर्जन केल्याने काही फारसा फरक पडत नसे. पण आता घरगुती मूर्ती पण लाखाच्या संख्येत असतात. आणि मूर्ती, नैवेद्य, निर्माल्य याचा खरोखरच कचरा होतो आणि दुसर्‍या दिवशी ते बघवत नाही याकडे डोळेझाक करून चालणार नाही.
सुदैवाने हिंदूधर्मात सगळ्याच प्रथाना पर्याय आहेत, आणि गणपती आणि आपण यांच्यामधे तिसरा कुणी एजंट नसल्याने आपण चांगले पर्याय शोधून नवीन प्रघात पाडू शकतो.

.गणपतीची प्रतिष्ठापना एक सुपारी ठेऊनही होते. सुपारीचे विसर्जन करणं सोप्पं जाईल.
.उत्सव मुर्ती वेगळी ठेऊन, तीच बरीच वर्षे रंगवून परत वापरली तर प्रदुषण नक्कीच कमी होईल.
.निर्माल्य खताला वापरलं तर तेही उपयोगात आणता येईल.
.नैवेद्य (भात, दही, पेढे) इत्यादी पाण्यात टाकण्यापेक्षा पशूपक्ष्याना खाता येतील. किंवा अजून चांगले पर्याय असतील याला.
.रंग नैसर्गिक वापरले तर पाण्याचे प्रदुषण टळेल.

माणूस पॄथ्वीची वाट लावतोच आहे. थोडी टाळता आली तर बरं नाही का? त्यात शासनाने खरं तर येऊ नये. पण ते आले नाही तर लोक ऐकणार नाहीत. ज्या गणपतीची भक्ती करतो त्याच्याच मूर्तीची दुसर्‍या दिवशी झालेली विटंबना टळली तर वाईट आहे का?

@ परदेसाई
काय हे?
अगदीच अंधश्रद्धा निर्मूलन वादी दिसता तुम्ही?
>>>.नैवेद्य (भात, दही, पेढे) इत्यादी पाण्यात टाकण्यापेक्षा पशूपक्ष्याना खाता येतील. किंवा अजून चांगले पर्याय असतील याला.
काहीतरीच काय? देवाचा नैवेद्य सरळ कुणा उपाशी गरीबाला द्यायचा??? त्याची योग्यता काय? भले असेल भुकेला तो? नक्की मागील जन्मीच्या पापाची फळं भोगत असणारे तो. उपाशीच मरू देत. कदाचित पुढील जन्मी तरी चांगले भोग भोगेल....
मी पाण्यातच टाकणार! जलचरांना अन्न नको? उदा. salmonella typhi... (बाकी कोणते जलच्रर शिल्लक असतील असं वाटत नाही.)

@इब्लिस... तुम्ही माझ्यावर अंधश्रध्दा निर्मुलनवादी असल्याचा आरोप करता आहात. हे मी अजिबात सहन करणार नाही मी 'साक्षरता निर्मुलन' वाला आहे.. Proud
Light 1

परदेसाई, गणेशोत्सव याला धर्माचे केवळ निमित्त आहे. खर्‍या धर्माप्रमाणे करायचे तर सुपारी चालेल.

पण गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश हा दंगल करणे, गाणी बजावणी, दारू पिऊन बायकांची छेडछाड, जमल्यास मुसलमानांबरोबर भांडणाच्या नावाखाली दोघांनी मिळून एक राडा, लुटालूट करणे, हा आहे. त्या दृष्टीने माझी खालील कल्पना वाचा.

एकदम इलेक्ट्रॉनिक युगाला साजेशी.
मोठ्ठा पडदा, त्यावर एच डी, डिजिटल असे सगळे वापरून गणपतीची एक मोठी प्रतिमा!
मागे एकदा असे काहीतरी पीसी वर पाहिले होते की गणपतीचे चित्र, त्याच्याभोवती पूजेची जय्यत तयारी, क्लिक केले की दूर्वा, क्लिक केले की फुले, क्लिक केले की नैवैद्य. इथल्याच कुणितरी एक अ‍ॅप लिहीले आहे, गणपतीच्या पूजेचे मंत्र असलेले. ते वापरावे. हे सगळे मोठ्या पडद्यावर करायचे, म्हणजे सर्वांना बघता येईल. नंतर विसर्जन सुद्धा असेच पडद्यावर नदी दाखवून अ‍ॅनिमेशनने!

फार तर होलोग्राम करा मूर्तीचा.

म्हणजे काय, अज्जिबात प्रदूषण नको. फार तर गाण्या बजावण्याचे, नाचाचे कार्यक्रम ठेवावे. मुन्नी बदनाम हुई, किंवा चोली के पीछे क्या है, किंवा शीला की जवानी ही गाणी गणपतीला आवडतात म्हणे. (मराठी गाणी नकोत. बिहार्‍यांना समजणार नाहीत!) सध्या बारबाला लपून छपून प्रायव्हेट क्लबमधे काम करतात, त्यांनाहि उघड्यावर आपली कला सादर करता येईल. एकदम लाईव्ह! थोडे ध्वनि प्रदूषण होइल, पण पोलीसला पुरेसे पैसे दिले की भारतात काही पण चालतेच!

आता काय राहिले? दारू पिऊन, गर्दीचा फायदा घेऊन बायकांची छेडछाड. ते करायला तर काहीच प्रॉब्लेम नाहीत ना! गणपतीचा एक फोटो गाडीत ठेवून मिरवणूक काढायची! की पूर्ववत् धर्मपालन होईल.
असा हा इलेक्ट्रॉनिक गणेशोत्सव केला की ब्राह्मण, हिंदूच काय, मुसलमान, ख्रिश्चन असे हि सगळे 'भक्तिभावाने' गणपतीचे भक्त बनतील. मग दंगली होणार नाहीत.

@ झक्की :
>>>झक्की | 8 September, 2011 - 04:23

परदेसाई, गणेशोत्सव याला धर्माचे केवळ निमित्त आहे. खर्‍या धर्माप्रमाणे करायचे तर सुपारी चालेल.

पण गणेशोत्सवाचा मुख्य उद्देश हा दंगल करणे, गाणी बजावणी, दारू पिऊन बायकांची छेडछाड, जमल्यास मुसलमानांबरोबर भांडणाच्या नावाखाली दोघांनी मिळून एक राडा, लुटालूट करणे, हा आहे.
>>>

नंदूरबार येथे गणपती विसर्जनाची दंगल

शुभ बोल रे नार्‍या....

LOL भरत, ती लिन्क वाचून हसू आले.
>>> The bench directed the Kolkata Port Trust, police authorities and the puja organisers to decide on the issue.It directed that the community Durga puja organisers would have to bear a part of the cost of cleaning up the river after the immersions.Environment activist Subhash Dutta had filed a PIL in the high court seeking measures to control pollution of the river Hooghly. <<<
त्रोटक बातमी नुसार याचिकाकर्त्याने हुगळी नदीच्या "प्रदुषण नियन्त्रणासाठी" काही "मेझर्स" अर्थात मोजमापे वा नियम ठरवायला विचारले होते, (बहुधा सूप्त किन्वा मूळ याचिकेत उघडही असेल, [मूळ विनन्ती वाचायला मिळाली पाहिजे], अपेक्षा ही की अमुक इतकीच अमुक पद्धतीनेच विसर्जने वा अजिबातच विसर्जन नाही/बन्दी वगैरे.... )
न्यायदेवता मात्र भारीच्चे Happy मस्त निर्णय दिलाय. म्हणून खुषीचे हसू आले

गणेश मुर्ती विसर्जनामुळे प्रदुषण होत नाही

श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची जी ओरड या तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून केली जात आहे, ती निरर्थक असल्याचे महाराष्ट्र शासन, तसेच पर्यावरणतज्ञ यांच्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे, तर मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्यातील प्रदूषित घटक कमी होत असल्याची माहिती सामोरी आली आहे, विसर्जनापूर्वीचा पाण्याची प्रत, विसर्जनाच्या वेळची पाण्याची प्रत व विसर्जनानंतरची प्रत यांत प्रदूषणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर बदल झाला नसल्याचे या माहितीद्वारे उघड झाले आहे. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर प्रदूषित पाण्यातील प्रदूषणाचे घटक कमी झाल्याचे या माहितीतून सामोरे आले आहे.`सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट' या संस्थेचे पर्यावरण अधिकारी श्री. अमित नरेगलकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी वैज्ञानिक श्री. जयेश रमेश वर्तक, पुणे येथील `ओअँसिस एन्व्हायर्न्मेंटल कन्स्ल्टंट्स'चे अध्यक्ष डॉ. विश्‍वंभर चौधरी व जलप्रदूषणाच्या विरोधात लढा देणारे पर्यावरणवादी श्री. अजय वैशंपायन यांनी मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचा निष्कर्ष अभ्यासाद्वारे मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्लास्टर ऑफ पॅरीस हे`कॅल्शियम सल्फेट'पासून बनवले जाते. ते `अल्कलिक' वा `अँसीडिक' नसून `न्युट्रल' असल्यामुळे पाण्यात विरघळल्याने कोणतीही हानीकारक प्रक्रिया घडत नाही, तसेच एकदा पाण्यात विरघळल्यानंतर त्याचा घट्टपणा व चिकटपणा उरत नाही. त्याची माती होते. त्यामुळे नदीच्या पात्रातील झर्‍यांची छिद्रे बुजण्याचाही प्रश्‍न येत नाही. उलट पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत त्याचा वापर केला जातो, असे श्री. वर्तक यांनी स्पष्ट केले. श्री. वर्तक यांनी कारखान्यांतून होणार्‍या प्रदूषणाच्या बाबत माहिती देतांना सांगितले, ``देशातील एकूण कारखान्यांतील २२ टक्के कारखाने, म्हणजे ५३ हजारांपेक्षा अधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. यांतील ८ हजार कारखान्यांतून तीव्र स्वरूपाचे अतीदूषित पाणी, ८ हजारांमधून मध्यम दूषित पाणी, तर उर्वरित कारखान्यांतून कमी प्रमाणात दूषित पाणी, असे एकूण दररोज ८ लाख घनमीटरपेक्षा अधिक दूषित पाणी नदी व समुद्र यांत सोडले जाते. यामुळे वारंवार मोठे मासे व जलचर पाण्यात मरून पडल्याची सचित्र वृत्ते प्रसिद्ध होत असतात, तसेच नद्यांची गटारे झाल्याचेही निदर्शनास येते.

या वर्षभर होणार्‍या जलप्रदूषणाच्या विरोधात हे पर्यावरणवादी कधी आवाज उठवतांना दिसत नाहीत. शासनाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या प्रदूषणासंदर्भात काहीच कारवाई करत नाही; मात्र गणेशोत्सवातील मूर्तींमुळे न होणार्‍या प्रदूषणाबाबत सर्व जण बोलतात.या मोहिमेला सर्वांनी कडाडून विरोध करून आपल्या प्रथेनुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्यातच करावे.

पी ओ पी मूर्तींचे विसर्जन पाण्यात करू नये असा समज निर्माण करण्यात आला होता तो शास्त्रीय पुराव्यांनिशी सिद्ध झालेला आहे. सर्व संशोधकांचे अभिनंदन.

Uhoh ऐकावे ते नवलच.
माझी या लोकांना एक मस्त ऑफर आहे. एका मोठ्या बॅरेल मध्ये एखादी मुर्ती विसर्जित करुन त्यातले काय काय आणि किती विरघळते ते पहावे. आणि प्रदुषण होतच नाही / किंवा असलेले प्रदुषण कमी होते इतकाच कॉन्फिडन्स असेल तर ते पाणी चिक्कार डायल्युट करुन (म्हणजे रोजच्या वापरात अगदी लिटरभर / अर्धा लिटर किंवा त्यापेक्षा कमी) पिण्यासाठी वापरावे.

पिओपी पाण्यात विरघळत नाही. एका लिटर पाण्यात २ ते २.५ ग्रॅम विरघळु शकते. पिओपीची माती होते हे काही समजले नाही. अधिक माहिती साठी नेट आहेच. कारखाने प्रदुषण करतात म्हणुन आपण पण त्याला हात भार लावावा हे काही समजले नाही.

आणि हो वेळ मिळाला तर रंगाबद्दल वाचाच. त्यातले किती % कॅरसिनोजेनिक आहेत ते पण बघा.

सगळ्या मुर्ती एका आर्टीफिशल पॉण्ड मध्ये विसर्जित करुन, ते पाणी शुध्द करणे हा देखिल चांगला पर्याय होउ शकतो. पिओपि परत हिट ट्रीटमेंट (हे बरेच खर्चिक आहे) करुन रिसायकल् करता येइल. पण याला पैसे द्यायला कोणी तयार होइल असे वाटत नाही. चालु देत....

ध्वनी प्रदूषणाचे काय? तो ही त्रास फार आहे. आणि ट्रॅफिक जॅम्स? इतक्या आवाजाची खरेच गरज आहे का?

ईब्लिस, नुसते खोटे बोलत आहेत असा आरडाओरडा करुन काही होत नाही. सबळ आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे वरच्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. जमल्यास तशाच सबळ आणि शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे खोडून काढावे. जमलंच तर हां Wink

बाकी बोलण्यात रस नाही.

हा जो प्रदुषण होत नाही म्हणून काही रिसर्च केलाय, त्याची काही लिंक /रिसर्च पेपर /डॉक्युमेंट मिळेल का हो वाचायला?

कोणती संस्था? सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट की ओअँसिस एन्व्हायर्न्मेंटल कन्स्ल्टंट्स?

दोन्ही संस्थांच्या संकेतस्थळांवर पहा की. बाकी इतर संस्थाही आहेत. तिथे जाऊन आपण शहानिशा करु शकता.

नाहीये कोणताही रिपोर्ट अशा प्रकारचा त्यांच्या संकेतस्थळांवर.

कसलाही व्यवस्थित रिसर्च न करता नुसतेच बोलणारे खूप असतात. हे पण त्यापैकीच एक दिसताहेत.

आणि बाकी बर्‍याच संस्थांचे विसर्जनाने प्रदुर्षण होते याला दुजोरा देणारे रिपोर्ट पूर्वी अभ्यासले होते. म्हणूनच कुतूहल वाटलं की असा कोणता नविन अभ्यास केला गेला आहे.

तुम्ही जे रिपोर्ट अभ्यासले होते त्यांचे दुवे आहेत का? जमवून ठेवा. यांचा रिपोर्ट मिळाला की तूलना करा.
आणि व्यवस्थितच रिसर्च केलेला आहे. मला जमले तर प्रत्यक्षच जाऊन रिपोर्ट घेऊन येईन. तुम्हाला जमल्यास तुम्ही जाऊन चौ़कशी करा. सगळं नेटवर फुकट मिळत नाही ना. Proud

मी दिल्लीत रहाते हो. मी इथे पूर्वी सीईई मध्ये काम केलं आहे, तिथल्या लायब्ररीमध्ये बघितले होते रिपोर्ट.
मी अभ्यासलेल्या रिपोर्ट्सचे दुवे नाही मिळाले तरी सीईईच्या लायब्ररीमधून रिपोर्ट्स आणणं काही अवघड नाहीये मला. हे नवे रिपोर्ट किंवा अभ्यास कुठे छापून आला ना की कळवा मी करेन तुलना नक्कीच.
अहो माझं व्यावसायिक कामचं आहे ते.

Pages