शब्दार्थ

Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11

एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.

या आधिचे संभाषण या दुव्यावर सापडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नंदिनी, शब्द समान आहेत ह्यात शंकाच नाही. पण मला असलेल्या माहितीप्रमाने तमिळम्ध्ये संस्कृतमधून गेल्येत शब्द. उलट झाले असल्याची शक्यता फारच कमी आहे. ह्या दोनही भाषांच्या वयावरुन म्हणतोय मी हे. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावाच.

अश्वे, यगझॅक्टलीच.

tameeL hee saMskRutapaasoon nighaalelee bhaaShaa naahee. tee draveeD kuLaatalee aahe. saMskRut Indo-iranian maanalee jaate.
saMskRutane anek deshee (draveed) shabda aatmasaat kele aahet ase bhaaShaatajjna saaMgataat.

तमिळ संस्कृतमधून नक्कीच निघालेली नाही. तिची जातकुळी वेगळी आहे. (द्राविड)

चिन्मय, वरदा, फ आणि इतर भाषाप्रभू. जरा इथे सविस्तर लिहाल का?

जरत्कारू ह्य शब्दाचा अर्थ काय?

आज हे वाक्य वाचले.

काँग्रेस हा सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष देशभर जरत्कारू झाला असून भाजपने राष्ट्रीय पक्ष म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.

अशक्त. मला वाटत जराजर्जर चा नातेवाईक असावा हा शब्द. पण जराजर्जर म्हणजे म्हातारपणामुळे जेरीस आलेला. जरत्कारु हा शब्द "पाप्याचं पितर" ह्या अर्थाने ऐकलाय.

'खाप्रे' आणि 'खांडबहाले' शब्दकोशावर किती भरोसा ठेवायचा?

उत्तरलक्षी हा शब्द मी तिथे प्रथमच वाचला.

being proactive.. - म्हणजे 'सावध ऐका पुढल्या हाका' सारखे. Proud

उत्तरलक्षी हा शब्द अजूनही बरोबर वाटत नाही आहे. स्वतः होऊन , पुढाकार घेऊन असा त्याचा अर्थ आहे. दुसरे कोणी न सांगता. प्रोअ‍ॅक्टीव्ह डिक्लेरेशन ऑफ इन्फॉर्मेशन इत्यदि.

proactive
prəʊˈaktɪv/Submit
adjective
(of a person or action) creating or controlling a situation rather than just responding to it after it has happened.
"employers must take a proactive approach to equal pay"

खरोखर. उत्तरलक्षी वरुन काहीही अर्थबोध होत नाही. त्यापेक्षा माधव यांनी सुचवलेला दूरदर्शी शब्द अर्थाच्या जास्त जवळ जातोय.

भाषेचा लहेजा Happy एखादवेळेस नाही सापडत अगदी चपखल शब्द. मलातरी असं नेहेमी होतं. मग त्या अर्थाजवळ चा शब्द घेऊन काम करायचं...

"उत्तरलक्षी" पण अर्थाच्या जवळ आहे असं वाटतं. इथे 'उत्तर' चा अर्थ "उत्तररात्र" मधल्या उत्तरचा घ्यायचा. म्हण्जेच पुढचा, नंतरचा, next या अर्थी.

हं शुगोल. उत्तर म्हणजे पुढील्/नंतरच्या काळ/भागावर लक्ष ठेवून असणारा/री, या अर्थाने आता पटतोय हा शब्द. धन्यवाद.

उत्तरलक्षी हा शब्द पूर्वलक्षी च्या विरुद्धार्थी म्हणून वापरलेला ऐकला आहे.
उदा. अमुक कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल. म्हणजे मागील अमुक तारखे पासून.
प्रोअ‍ॅक्टिव्ह मधे विशिष्ट घटना आपोआप घडायची वाट न पहाता, स्वतःच हस्तक्षेप करून आपल्याला हवे ते घडवून आणणे (तसे करण्याचा प्रयत्न करणे) अभिप्रेत आहे. ( म्हणजे सुमुहूर्तावर बाळंत होण्याचा चान्स घेण्यापेक्षा मूहूर्त पाहून सिझर करून टाकण्यासारखे Wink )
याच्याशी चपखल बसेल असा शब्द सापडायला हवा. 'स्वयंप्रेरित' त्यातल्यात्यात बरा वाटतो आहे.

कपाला कप म्हणतो,टेब्लाला टेबल म्हणतो तसं प्रोअ‍ॅक्टीव्हला प्रोअ‍ॅक्टीव्ह्च रुढ करा की शब्द. Wink
उगा सगळे एकदम मागं लागले त्याच्या..(प्रोअ‍ॅक्टिव्हच्या) Happy

मला खालील शब्दांचे अर्थ कृपया सांगा -

नामवंत भिषग्वर्य
अनिर्वचनीय अनुभूती
तपःपूत कला

पुलंच मैत्र वाचतोय सध्या, बरेच दिवसांनी पुन्हा. पण जेव्हा वाचलं होत तेव्हा या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. आता नेमका अर्थ कळाला तर जास्त आकळेल पुस्तक Happy

Pages