रीतीरीवाज

Submitted by admin on 12 January, 2009 - 23:47

धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज

या अगोदरचं हितगुज इथे पहा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला देवघरातल्या शंकराच्या पिंडीच्या पूजेबद्दल शंका आहे एक. मी बंगाली लोकांकडे पूजेत पिंड कायम पाण्यात, म्हणजे एखाद्या वाटीत पाणी ठेवुन त्यात ठेवलेली बघितलेली आहे. आणि रोजच्या पूजेच्या वेळेला पळीने पाणी घालतात. त्याचे काही specific कारण माहिती आहे का कुणाला?

नक्की कारण माहीत नाही पण खालिल समज कदाचित काही मदत करु शकतील!!!

१. शंकराच्या पिंडी चा आकार आणि अणुभट्टी चा आकार सारखा असतो. अणुभट्टी ला स्पेशल कूलिंग सिस्टिम असते.
२. आपल्याकडेही शंकराच्या पिंडी च्या वर सतत पाण्याची धार पडेल अशी सोय केलेली असते.
३. भारतात कुठेही शंकराचे मंदिर पाहिले तर असे दिसुन येते की सर्व मंदिरे ही नदीकाठी किंवा पाण्याजवळ आहेत.

सो सगळे points असे दर्शवतात की शंकराची पिंड आणि आजुबाजुचा परिसर थंड असावा.

बर अजुन एक,
कोणत्याही जुन्या काळच्या शंकराच्या मंदिरात गाभारर्‍यात गेले असता, मोबाईल ला रेन्ज येत नाही. तपासुन पहावे.

अरेच्चा, interesting fact आहेत ह्या तर! नक्की निरीक्षण करुन बघीन मी देवळात गेले की...

पण एकदा देवासमोर गेले की त्याच्याशी direct contact असताना तुम्हाला मोबाइल हवाच कशाला ?

हं बरोबर आहे!!!
contact साठी नाही, एकदा कुठल्यातरी पुस्तकात वाचले होते हे म्हणुन मुद्दाम पाहिले होते की खरच रेंज असते की नाही!!!

आषाढात एकदातरी तळण करावे म्हणतात ..बरोबर का? का दुसरा कुठला महिना असतो... आनि असे का करायचे..कुणी सांगु शकेल क?

नागपंचमीला तळणे, कापणे वर्ज्य असते, असे का? Uhoh
फक्त उकडीचं दिंडं चालतं ते कसं काय?

नागपंचमीला तळणे, कापणे वर्ज्य असते

अरे म्हणुन तर त्या दिवशी पातोळ्या, पानगे, धोंडास वगैरे मस्त वाफवलेले पदार्थ बनतात Happy

लहानपणी असले प्रश्न पडले की आई सांगायची, आपण तळले, भाजले की नागाला त्या वेदना होतात म्हणुन...

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

वा ! अतिशय छान बीबी आहे. उत्तम.

आपल्याकडच्या प्रत्येक चालीरितीला वैज्ञानिक आधार आहे. फक्त तेव्हाच्या लोकांच्या गळी उतरवण्यासाठी त्याला धर्माची जोड द्यावी लागली त्यामुळे त्याचे 'पंथ' आणि 'प्रथा' झाल्या.

The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.

आमच्याकडे नागपंचमीला खीरीचा नैवेद्य वर्ज्य आहे. आजी सांगते की तिच्या लहानपणी गावी नागपंचमीला गावकर्‍यांनी एकत्र येऊन खीर केली होती. त्या गावात येऊन नैवेद्य खायला नाग यायचा. सर्व गावकर्‍यांनी खीरीचं गरम पातेलं चुलीवरुन उतरवलं आणी ते ठेवायला कपड्याची चुंबळ बनवुन ठेवली होती त्यावर ठेवलं. सगळे गावकरी त्या नागाची वाट पहात होते आता येईल मग येईल म्हणून. तरी त्याचा पत्ताच नाही. थोड्या वेळाने काही बायकांनी थोडीशी खीर थंड करुन ठेवायला पातेलं उघडलं तर सगळी खीर रक्तासारखी लाल झालेली. सगळेजण घाबरले. ते पातेलं बाजुला काढुन पहातात तो काय त्या पातेल्याखाली तो नाग मरुन पडला होता. चुंबळ समजुन त्यांनी त्या नागाच्या वेटोळ्यावरच ते खीरीचं पातेलं ठेवलं होतं. Sad
ह्या कारणासाठी खीरीचा नैवेद्य दाखवत नाहीत.
-------------------------
एकतारी संगे एकरुप झालो,
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो.

काय कारण असेल? कुणाला महित्ये का>> बरीचशी शंकराची देवळं ही अगदी खंडहर झालेल्या ठिकाणी किंवा शहर वस्तीपासुन लांब अशी असतात. त्यामुळे रेंजचा प्रॉब्लेम होत असावा असं मला तरी वाटतं.
-------------------------
एकतारी संगे एकरुप झालो,
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो.

नमस्कार
शंकराच्या पिंडीजवळ रेंज येत नाही
काय कारण असेल? कुणाला महित्ये का?
यात यो म्हणते ते कारण असू शकत पण माझ्यामते त्यात स्थापत्यशास्त्राचा नक्की काहितरी भाग असावा...
आणि खरच हे करुन बघितल पाहिजे..
----------------------------------
पंढरीसी जा जा कुणी..माझी विनवणी
जाउनी कुणी सां$$गा
हरी निजला असेल तरी करावा जा$$गा

हं.................
काहीतरी असणार. असं साधं नसेल ते.

The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा. आभारी आहे.

दोन कारणं आहेत.
(१) ज्या प्रकारचा पींडीचा आकार असतो त्यामुळे आजुबाजुच्या आयोनाईज्ड अणुरेणुंचे असे कनफिगरेशन बनते की सेलफोन इलेक्ट्रॉन्स ते वलय क्रॉस करु शकत नाहीत.

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

माझ्या मते दुसरे कारण बरोबर आहे Proud

--------------
नंदिनी
--------------

दुसरं कारण?
कुठे दिलंय?

*****************************************
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा.

महदेवाची पिंड खोल भागात आसते आणि तेथे हवा खेळती रहत नाही पण त्याचबरोबर उंचठिकाणच्या मन्दिरात जा जेथे महादेवची पिंड आसते तेथे मोबईला रेज येते हा माझा स्वः अनुभव आहे.

मला एक सांगा, मंदिराच्या गाभार्‍यात तुम्हाला मोबाईल लागतो कशाला? Angry

तो मुद्दा नाहीये.... Happy खरंच असं असेल तर ते इंटरेस्टिंग नाही का !

*****************************************
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा.

मृगनयनींचा मुद्दा पटतो... बर्‍याच वेळा जुन्या मंदीरात पिंड ही खोल गाभार्‍यात असते आणि आजुबाजुने सर्व बंदिस्त असते...त्यामुळे तसे होत असेल.. (बर्‍याच वेळेला आप्ल्या मोबाइल ला बेसमेंट मधे गेल्यावर रेंज येत नाही.....तसाच हा प्रकार झाला)

०-------------------------------------------०
दुनिया मे है जंग क्यो...बेहेता लाल रंग क्यो..
सरहदे है क्यो हर कही ... सोचा है..ये तुमने क्या कभी ?

एका देवघरात दोन पिंडी ठेवलेल्या चालत नाहीत असे म्हणतात. असे का? माझ्याकडे एक पिंड आहे. पण मला माझ्या आजोळची एक पिंड आणायची आहे. सा.बा. म्हणाल्या एका देवघरात दोन पिंडी ठेवायच्या नाहीत. यामागचं कारण त्यांना सांगता नाही आलं. कोणाला माहीत आहे का?
- सुरुचि

दोन असल्या की स्विचऑफच होत असावा बहुदा :ड
*****************************************
The Great Driving Challenge मधे जिंकण्यासाठी मला तुमच्या मतांची गरज आहे. www.greatdrivingchallenge.com/application/Apurva/ क्रुपया आपल्या संगणकाच्या माऊसच्या एका अमूल्य क्लिकने आमच्या विजयात 'मत'भार लावा.

नमस्कार,

नवजात अर्भकाला पहिल्यांदा देवळात (४० दिवसानी) नेल्यावर थेट घरी जात नाहीत..कोणा दुसर्‍याच्या घरी जाउन त्याच्या डोक्यावर थोडे तेल घालतात.
या मागे काही कारण असते का?

धन्यवाद.

Never use one Hydrogen bomb when two are sufficient.
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

>>एका देवघरात दोन पिंडी ठेवलेल्या चालत नाहीत असे म्हणतात. असे का? >>
एका म्यानात दोन तलवारी रहात नाहीत, तसंच आहे हे... Lol

विनोदासाठी माफ करा, पण शंकराची पिंडी हे कशाचं प्रतिक आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे,
बहुतेक तेच कारण असेल, एका घरी एकच पिंडी ठेवण्याचं.

मी मागच्या वर्षी पासुन गणपती बसवायला लागली आहे.. मला गणपती प्रतिष्ठापना कशी करायची ह्याची नीट माहिती नाही.. कुणी सांगु शकेल का प्लीज .. मागच्या वर्षी अमेरिकेत बसवला होता..त्यामुळे काही गोश्टी होत्या काही नव्हत्या... पण ह्या वर्षी देशात आहे तर सर्व नीट व्हावे असे वाटते Happy

किट्टू, गणपती शास्त्रोक्त पद्धतीने बसवायचा सल्यास ब्राह्मण बोलाव, ते शक्य नसेल तर गणेश प्रतिष्ठापनेच्या सीडी मिळतात (पूजा विधीच्या) त्यामधे पूजा सांगितलेली अस्ते त्याप्रमाणे करायचं पुस्तकं पण उपलब्ध आहेत्.

Namaskar!!

I am not able to use marathi font on iBook...

So - Question is 'Ganapati Bappa Moraya!' - here what is the meaning of Moraya? : Shabdik+Adhyatmic??

Dhanyavad!

Pages