अमानवीय...? - १

Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34

अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

http://www.maayboli.com/node/12295

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो ब्रो, आपल्या एअरपोर्ट च्या MLCP वेहिकल पार्किंग मधे 9th फ्लोर वर काल दुपारी मी ड्यूटी संपवून घरी निघताना ,एका हाउस कीपिंग वाल्या बाई ला लेडी भुताने झपाटले आणि ती चक्क इंग्लिश (एक्सेंट) मधे बोलू लागली ,की मी लंदन ला राहते आणि माझी दोन मुल आहेत वैगेरे वैगेरे ......
सर्व लोक उभे राहून तिला बघत होते .... मी तो प्रकार बघून खुपच घाबरले आणि माझी गाडी घेउन घरी निघाले.

मला वाटले की बेशुद्ध पडले आणि नंतर मैं कहाँ हूँ ?
>>>>>>

हे वाचून एक प्रश्न पडला, कोणी भुताला पाहून बेशुद्ध पडले की भूत त्याला मारून टाकते, काही ईजा पोहोचवून जाते, त्याच्या अंगात शिरते, की श्या मस्त घाबरवलेला मजा येत होती पण आता बेशुद्ध पडल्याने खेळ संपला म्हणून निघून जाते ..

कोणाला काही अनुभव?

अहो जाइ तुम्ही वीडियो शूट करायला हवा होता ! बर्याचदा अस होत एखाद्या व्यक्ति ला झपाटल असता तो परभाषेत बोलतो !

आता अस का होत याच उत्तर फक्त विज्ञानंदास देऊ शकतात Lol

-

Happy

मी तो प्रकार बघून खुपच घाबरले आणि माझी गाडी घेउन घरी निघाले.>>
एक भा.प्र. असं हाफिसातुन लगेच (कधिही) निघुन जाता येतं ? (असेल तर नशिबवान आहात ब्वॉ!)

एक ना एक दिवस तुझी भुताशी गाठ पडेल आणि तो दिवस तू आयुष्यात कधीही विसरणार नाहीस. असे मला एका पिंगळ्याने सांगितलेले. आणि ते खरे ठरले त्यामुळे मी या विषयावर गमतीने फारसा बोलत नाही.

ह.बा = तुझी भुताशी गाठ पडेल आणि तो दिवस तू
आयुष्यात कधीही विसरणार नाहीस. असे मला एका पिंगळ्याने
सांगितलेले. आणि ते खरे ठरले >>>>>>>>>

ते कसे ठरले ते सांगाल का? ◑︿◐े

ते कसे ठरले ते सांगाल का? ◑︿◐े >>> नाही. त्यामुळे अंधश्रध्दा पसरेल. ती एकदा पसरली की कायप्पण क्येलं तरी उटत नाय.

अग्निपंख , तुम्ही नीट वाचले नाही

आपल्या एअरपोर्ट च्या MLCP वेहिकल पार्किंग मधे 9th फ्लोर वर काल दुपारी मी ड्यूटी संपवून घरी निघताना ,एका हाउस कीपिंग वाल्या बाई ला लेडी भुताने झपाटले >>>>>>

माझे आजोबा (वडीलांचे वडील) माझ्या मोठ्या काकांकडे राहत असत. ते मला कऊ म्हणुन हाक मारत असत.मी ७ वीत असताना ते वारले , ४ थ्या दिवशी घरी टी.वी. लावायचा नाही म्हणुन आम्ही ४-५ घरे सोडुन आमच्या एका नातेवाईकांकडे पिक्चर पाहायला गेलो होतो. रात्री १२.१५ वाजता परतलो जसे अंगणात आलो तसे आजोबांनी 'कऊ' म्हणुन मला हाक मारली. माझ्याबरोबर माझा मोठा भाउ आणी मोठी बहीण होती त्यांनाही हाक ऐकु आली होती, तिघे खुप घाबरलो आणी दरवाजा जोरजोरात ठोठावु लागलो वडीलांनी दरवाजा उघडला आणी आम्ही आतमधे जाउन झोपुन गेलो. विशेष म्हणजे त्यांनी मारलेली हाक ही स्पष्ट आणी खुप लांबुन आलेली वाटली. आजोबा हयात असताना त्यांना दिसत नसल्याने ते काठी घेउन चालत , बर्‍याचदा काठी घासत घासत चालत असत; ७-८ व्या दिवशी त्यांच्या पिंडदानासाठी घरातली सर्व पुरुष मंडळी त्र्यंबकेश्वरला गेली होती म्हणुन आम्ही सर्व काकांकडे राहायला गेलो होतो. रात्री काठी टेकत आणी घासत चालण्याचा खुप आवाज येत होता. सर्वजण जागे होतो पण कुणाचीही उठुन पाहण्याची हिंमत नव्हती , सगळे अगदी निपचित पडले होते, सकाळी उठुन मात्र सर्व एकमेकांना रात्री आलेल्या आवाजाबद्द्ल सांगत होतो.

बापरे कविता! तुमचे आजोबा कदाचित तुम्हाला काही सांगायचा प्रयत्न करत असतील.

इथे वर प्लँचेटचा विषय निघाला आहे त्यावरुन आठवले. काही वर्षांपूर्वी कॉलेजात असताना एका सुट्टीत आते-चुलत भावडांबरोबर मोठया चुलतभावाने सांगितल्याप्रमाणे दोन-तीनदा प्लँचेट केले होते. त्यावेळी त्याने पांढरे ड्रॉईंगशीट घेऊन त्यावर ए ते झेड अक्षरे , १ ते ९ अंक आणि येस, नो , गुडबाय इ. लिहिले होते. मग कोणालातरी येण्याचे आवाहन केले आणि प्रश्न विचारले. त्यावेळी वाटी उत्तराप्रमाणे अक्षरांवरून फिरायची. करून झाल्यावर धन्यवाद आणि परत जाण्याचे आवाहन केले. मग वाटी स्थिर झाली. आधी, मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे खरच बोलावलेले "ते" देतात ह्यावर विश्वास नव्हता, आमच्यापैकीच कोणीतरी वाटी हलवेल अशी शंका वाटत होती. मी हे बोलून दाखवल्यावर चुलतभाऊ म्हणाला कि ठिक आहे मग तु तुझे प्रश्न तुझ्या मनातच विचारून बघ, मोठ्याने विचारू नकोस.मी मग प्लँचेट सुरू झाल्यावर मनातच माझे प्रश्न विचारले आणि खरच त्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मला मिळाली, त्यामुळे निदान ह्या क्रियेवर विश्वास बसला , कारण मी काय प्रश्न विचारणार आहे हे बाकी कोणालाच माहीत नव्हते. आता ह्यामागे नक्की काय कारण असते ते मला माहित नाही.

वर एक शंका उपस्थित केली गेली आहे की बर्‍याच वर्षांपूर्वी गेलेल्यांचा पुनर्जन्म झाला असेल तर त्यांचा आत्मा कसा येऊ शकेल, ह्याचे उत्तर मात्र प्लँचेट करणारे पण सांगू शकत नाहित.तरीहि मला वाटते कि खरच काही अनाकलनीय प्रश्नांची उत्तरे मिळणे किंवा ह्या जगात नसलेल्या आप्तांशी संवाद साधणे गरजेचे असेल तर प्लँचेट करून बघायला हरकत नाही.

कविता बापरे.. Uhoh
आपल्याच लोकांचे असे आवाज वगैरे येणं असं भितीदायकच वाटतं ना?
माझ्या बाबांना जाऊन पण १ वर्ष झालंय पण कधीतरी स्वप्नात त्यांचा स्पर्श, वास जाणवला की घाबरून ऊठते.

आज अमावस्या आहे .... ......╰_╯
╰_╯

◑﹏◐ किस्से येउदयात

ghostexps.blogspot.in/2010/07/ghost-experience-aarey-colony-mumbai.html?m=1

खालील कथा मी लिहिलेली नाही… हे खर आहे कि नाही याची मला माहिती आणि खात्रीही नाही, तरी वाचायला छान वाटली म्हणून पोस्टतेय… (कथा व्हाटस अप वरून साभार)

कणकवली पासुन सुमारे ३२ व देवगड पासून ३५ किलोमीटर अंतरावर मालवण तालुक्यात चिंदर म्हणून गाव आहे. तेथे प्रत्येक ३ वर्षांनी डिसेंबर महिन्यात एक विचित्र घटना होते. त्या घटनेला लोक गाव पळ असे म्हणतात.जेव्हा गाव पळ असते तेव्हा गावातले सगळे लोक स्वताच गाव सोडून जातात ३ दिवसा साठी. ३ दिवस गाव पूर्ण ओसाड असत कोणीही राहत नाही गावात एवढाच काय तर त्या ३ दिवसात गावात एस . टि बस सुधा येत नाही. कणकवली बस डेपोत आधीच सूचना दिलेली असते कि ३ दिवस चिंदर मध्ये एस.टि सेवा बंद आहे. हे ऐकून मला कुतूहल वाटले म्हणून मी विचारले कि मग ३ दिवस काय होत कोण राहत तिथे आणि गाव सोडून सगळे का पळतात . तेव्हा त्या म्हणाल्या हे गाव त्या ३ दिवसात भूतानी झपाटलेल असत . ३ दिवस या गावावर फक्त भूतांच राज्य असत. मग मला अजून जाणून घेण्याची इच्छा झाली. त्यांनी पुढे सांगायला सुरवात केली. त्याचं घर गावातील लब्दे वाडीत आहे . गाव खूप सुंदर आहे घरापासून २ मिनटांच्या अंतरावर एक नदी सुधा आहे. जेव्हा गाव पळ असते तेव्हा वाडीतले सगळे लोक नदीच्या पलीकडे जाऊन छोट्या छोट्या झोपड्या बांधून राहतात. गावात फक्त सकाळी ८ ते १२ या वेळेत न आवाज करता काही पुरुष मंडळी जी धीट आहेत तीच पिण्यासाठी लागणार पाणी किवा इतर वस्तू आणायला जातात.आणि १ २ वाजण्याच्या आत पुन्हा परत येतात. आता मुख्य गोष्टीला सुरवात करतो. तर झाल अस कि गाव पळ होती सकाळचे १० वाजले होते काही लोक जेवण बनवत होते. त्यातल्या काही तरुण हौशी मुंबई वरून खास त्या सोहळ्यसाठी आलेली मंडळी होती त्यांनी मटण बनवायचे ठरवले. पण त्या साठी लागणारा मसाला वाटण्याचे साधन त्यांच्या कडे नव्हते. मग त्यातले दोघे आणि एक गावकरी माणूस असे ३ लोक छोट्या होडीने पलीकडे आले गावात एक दम स्मशान शांतता पसरली होती. त्यांना सतत असा वाटत होत कि कोणीतरी त्यांच्यावर लांबून लक्ष ठेवत आहे. जो गावकरी होता त्याने त्या दोघांना घरात जाऊन मसाला वाटायचा पाटा आणि वरवंटा आणायला सांगितला तो पर्यंत मी पाणी भरून घेतो असे बोलून तो विहरीवर गेला. हे दोघ घरात आले. पण त्यांना पाटा आणि वरवंटा काही केल्या सापडेना. तेवड्यात एकाला समोरच ठेवलेला मिक्सर दिसला त्याने दुसर्या मित्राला सांगितले कि अरे हे बघ आता तर आपल कामच झाल २ मिनटात मसाला वाटूया आणि इथून निघून जावूया. त्याने पण होकार दिला आणि हे लोक हे विसरले कि गावात आवाज करायचा नसतो म्हणून आणि यांनी मिक्सर सुरु केला तशी मिक्सर च्या आवाजाने ती समशान शांतता भंग झाली. आवाज ऐकून जो माणूस पाणी भरण्यासाठी गेला होता तो धावत घराजवळ आला आणि त्याने जे पहिले ते भयानक होते. त्याने पहिले कि समोरच्या टेकडी वरून ३ विद्रूप म्हातार्या बायका किंचाळत धावत त्याच्या दिशेने येत होत्या. त्याला कळून चुकल कि हे काही तरी भलतच आहे. त्याने लगेच दरवाजा ठोठावला आणि त्यांना बाहेर यायला सांगितले. ते सुधा घाबरले आणि बाहेर आले तेवढ्यात त्या बायका अजून जवळ आल्या त्यांची उंची सुमारे ८ ते १० फूट होती एक विचित्र वास पसरला होता. हे तिघे हि जीवाच्या आकांताने पळू लागले नदी बाजूलाच असल्या कारणाने लगेच त्यात बसून ते पलीकडे जाऊ लागले. नदी जवळ येवून त्या बायका थांबल्या आणि किंचाळू लागल्या त्यांचा आवाज इतका होता कि पलीकडे बसलेल्या पूर्ण गावाला तो ऐकू आला आणि थोड्याच वेळात त्या ज्या टेकडीवरून धावत येत होत्या तेथे आग लागली धुराचे लोट उठले. या तिघांनी पलीकडे येवून झालेली सगळी हकीकत गावातील लोकांना सांगितली तेव्हा त्यांनी देवी कडे धावा केला आणि झालेल्या प्रकारची क्षमा मागितली तेव्हा अचानक ती आग शांत झाली आणि परत कोणी त्या गावात गेले नाही ३ दिवस।

तर मंडळी अस होत या गावात ३ दिवस ते गाव भुताच्या छाये खाली असते ३
दिवसानंतर देवीला कौल लावला जातो आणि देवीने कौल दिल्या नंतरच गावात प्रवेश करतात आणि जत्रेला सुरवात सुधा होते . या डिसेंबर महिन्यात पुन्हा ती पर्वणी येणार आहे… येवा सिंधुदुर्ग आपलोच असा ।।

शेजारची वच्ची काकू पहाटे चारला मामाला रडत रडत हाका मारीत होती. आम्हाला वाटलं नवर्‍याचा कार्यक्रम उरकला का काय. सगळे बाहेर गेलो. तर तिचा आवतार. मामानं तिला शांत केली.
'काय झालं सांग?'
'माजी राणी आत्ता सपनात आल्याली मला भ्या वाटतया'
तिची थोरली पोरगी राणी आजोळी शिकायला होती. तिसरीला. ती स्वप्नात आली म्हणून हिनं हंबरडा फोडलेला. सगळ्यांना राग आला तिचा. पण आज्जीनं तिला जवळ घेतली.
'काय म्हणली का सपनात?'
'व्हय आत्त्या, अंगावर नवी कापडं व्हती आणि सगळ्या कापडावर, डोक्यावर गुलाल टाकल्याला. मला म्हणली जाते गं आय. आता पुना भेटायचे नाय.'
'बरं आसुदे नगो मनाव घिव. पडत्याती आसं दडपं कवा कवा. सकाळी लवकर जा तिज्याकडं'
ती कशीतरी शांत झाली. आम्ही येडछाप बाई म्हणून पुन्हा लवंडलो. वच्ची काकू सहाला घरातून बाहेर पडली. दुसर्‍या दिवशी बाराच्या दरम्यान पोरीचं प्रेत घेऊन गाडी गावात आली.
पोरीच्या मामानं देवरश्याच्या सांगण्यावरून आमावस्येच्या रात्री नवी कपडे घालून गुलालाची अंघोळ घालून कुमारिका भाचिचा बळी दिलेला. त्याला पोलिसानी अटक केली वगैरे नंतर झालेच.

(नाव आणि ठिकाणात बदल. बाकी सत्यकथा. वर्तमानपत्रात २००१ च्या दरम्यान फ्रंट पेज न्युज. यावर लिहीलेली कथा प्रकाशीत)

ha.ba Sad

Pages