येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
@ साती या धाग्यावर भक्त एकतर
@ साती
या धाग्यावर भक्त एकतर पुन्हा पुन्हा निराकरण झालेल्या मुद्यांवर येतात किंवा ज्या वेळी सरकार विरोधी कुणी लिहीतं त्या वेळी धागा भरकटवण्याचा प्रयत्न करतात. या पोस्टी आणि त्यांना उत्तर म्हणून दिल्या गेलेल्या पोस्टी काढून टाकल्या तर दुसरा भाग काढण्याची गरज पडणार नाही. यातला एक आयडी प्रत्येक धाग्यावर चार चार आयडी सोबत घेऊन पिरतो, स्वतःशीच बोलतो, नॉर्मल माणसाच्या जवळ जाणार नाही असं लॉजिक पाजळतो आणि याला कुणी उत्तर दिलं की तो आयडी एकाच पोस्टीत ब्लॉक होताना पाहीलाय.
मी पण आणखी एक आयडी घ्यावा म्हणून प्रयत्न केला तर ते शक्य होत नाही. आपोआप ड्युआय ब्लॉक होतोय. या महाशयांवर कृपा होत असेल तर मग याला उत्तर देताना आपला आयडी ब्लॉक होईल हे सांगण्याची गरज नसावी.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
1982 Born
1982
Born
ब्र आ, इथे धागा काढणारीला
ब्र आ,
इथे धागा काढणारीला इतरांचे प्रतिसाद संपादित करायची सोय नाही जशी फेसबुकवर असते .
त्यामुळे उगाच भारंभार प्रतिसाद सहन करावे लागत आहेत.
सव्वीस तारखेला एक महिना पूर्ण होईल तेव्हा नविन धागा काढण्यात येईल.

प्रत्येक महिन्याचा नविन धागा काढायची वेळ नंतर बहुदा येणार नाही कारण सगळ्यांचाच उत्साह (मोदीकाकांसकट) थंडावेल.
मला पाच वर्षांत दहा धागे अपेक्षित आहेत.
फेकींग न्यूज वर ढवळपुरीकर
फेकींग न्यूज वर ढवळपुरीकर काकूंची मुलाखत दाखवली म्हणे. त्या आडनावाला जागल्यात. त्यांचं म्हणणं आह की आता पाच वर्षे विरोधकांची मळमळ वाचायला लागणार. काकू देखील भक्तांसारख्याच निघाल्या !
त्या जरी नम्र होऊ शकत नसल्या तरी आम्ही विनम्रतेने सांगू इच्छितो की हेच बीजेपीवाले विरोधात असताना किती तात्विक मुद्दे मांडतात. आज लवासा का हवासा या चर्चेत गिरीश बापत किती तर्कशुद्ध विरोध करत होते. पण प्रॉब्लेम हा आहे की जर हे सत्तेत आले की यू टर्न मारून म्हणतील की लवासासारखी आणखी २६ शहरं होणं ही काळाची गरज आहे. म्हणजे यांची मतं ऐकून ज्यांनी मतं दिली त्यांनी काय करायचं ? त्याला तुम्ही मळमळ म्हणणार असाल तर एक विनंती आहे.
ज्या कामासाठी (तंत्रविद्या काळीजादू शिकणे) तुम्ही दूरदेशी गेलेला आहात त्यावर आपले लक्ष द्या. इथे जे काही होतंय ते इथले लोक पाहून घेतील. आपण तिथल्या प्रश्नांमधे आपले द्न्यान उपयोगी पडेल हे पाहण्याचे करावे.
कळावे
आपला अत्यंत अभूतपूर्व नम्र
चंद्रकांत
(नावात काय आहे ? भापो )
मुझे भी आज हिंदी बोलने का शौक
मुझे भी आज हिंदी बोलने का शौक हुआ, घर से निकला और एक ऑटो वाले से पूछा, "त्री चक्रीय चालक पूरे जयपुर नगर के परिभ्रमण में कितनी मुद्रायें व्यय होंगी"? ऑटो वाले ने कहा, "अबे हिंदी में बोल न" मैंने कहा, "श्रीमान मै हिंदी में ही वार्तालाप कर रहा हूँ।" ऑटो वाले ने कहा, "पागल करके ही मानोगे" चलो बैठो कहाँ चलोगे? मैंने कहा, "परिसदन चलो।" ऑटो वाला फिर चकराया! "अब ये परिसदन क्या है? बगल वाले श्रीमान ने कहा, "अरे सर्किट हाउस जाएगा।" ऑटो वाले ने सर खुजाया बोला, "बैठिये प्रभु।।" रास्ते में मैंने पूछा, "इस नगर में कितने छवि गृह हैं??" ऑटो वाले ने कहा, "छवि गृह मतलब??" मैंने कहा, "चलचित्र मंदिर।" उसने कहा, "यहाँ बहुत मंदिर हैं राम मंदिर, हनुमान मंदिर, जग्गनाथ मंदिर, शिव मंदिर।।" मैंने कहा, "मै तो चलचित्र मंदिर की बात कर रहा हूँ जिसमें नायक तथा नायिका प्रेमालाप करते हैं।।" ऑटो वाला फिर चकराया, "ये चलचित्र मंदिर क्या होता है??" यही सोचते सोचते उसने सामने वाली गाडी में टक्कर मार दी। ऑटो का अगला चक्का टेढ़ा हो गया। मैंने कहा, "त्री चक्रीय चालक तुम्हारा अग्र चक्र तो वक्र हो गया।" ऑटो वाले ने मुझे घूर कर देखा और कहा, "उतर जल्दी उतर! चल भाग यहाँ से।" तब से यही सोच रहा हूँ अब और हिंदी बोलूं या नहीं ?????
>>तर चाचणीत मोदी भरपूर
>>तर चाचणीत मोदी भरपूर मार्कांनी राजकारणी ठरले आहेत.>>
अहो ते राजकारणीच आहेत.
ते काय आपवाले आहेत का शपथेवर सांगायला की मी राजकारणात उतरणार नाही.
प्रत्येक महिन्याचा नविन धागा
प्रत्येक महिन्याचा नविन धागा काढायची वेळ नंतर बहुदा येणार नाही कारण सगळ्यांचाच उत्साह (मोदीकाकांसकट) थंडावेल.
चर्चा करणारी विद्वान मन्डळी जरुर बदलतील पण उत्साह आणि चर्चा थन्डावणार नाही...
----- असहमत
बदलाचा हव्यास असणारे काही मायबोलीकर जुने झालेले आय डी त्यागुन नवे आय डी घेतील पण कमी जास्त प्रमाणात तेच ते दळण दळतील...
सौदी अरेबियाने भारताच्या हज
सौदी अरेबियाने भारताच्या हज यात्रेकरूंच्या कोट्यात कपात केली आहे ती रद्द करावी अशी विनंती सुषमा स्वराज यांनी केली आहे. हज सबसिडी रद्द करावी अशी विनंती कित्येक मुस्लिम नेत्यांनी केली आहे. ही सबसिडी मुस्लिमांना नसून एअर इंडियाला दिली जाते.
पुढिल दोन वर्षांत ४००००
पुढिल दोन वर्षांत ४०००० कोटींचे नवे रस्ते बांधणार- नितीन गडकरी.
मुंबईत यांचीच सत्ता असून काय
मुंबईत यांचीच सत्ता असून काय दिवे लावले रस्त्यांचे
आहे ते सुधारा आधी
विकु, सबसिडी एअर इंडियाला ती
विकु, सबसिडी एअर इंडियाला ती त्यांनी यात्रेकरूंना स्वस्तात्/फुकटात जाऊ द्यावे म्हणूनच दिली जाते ना? एअर इंडियाचे त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून?
हाज यात्रेकरूंना ज्या सुविधा सरकारतर्फे दिल्या जातात त्याला मी विरोध करत नाहीये येथे. अनेक गरीब मुस्लिमंना त्यातून जायला मिळत असेल तर चांगलेच आहे. फक्त तुमच्या पोस्टमधून ही काहीतरी न्यूट्रल सबसिडी आहे असे ध्वनित होते आहे म्हणून विचारतोय.
सबसिडी एअर इंडियाला ती
सबसिडी एअर इंडियाला ती त्यांनी यात्रेकरूंना स्वस्तात्/फुकटात जाऊ द्यावे म्हणूनच दिली जाते ना? एअर इंडियाचे त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून?<< <+१. सबसिडी कुणालाही दिली तरी त्यातून हज यात्रेकरूंचाच फायदा होतो.
अनेक गरीब मुस्लिमंना त्यातून जायला मिळत असेल तर चांगलेच आहे. <<<सदध्या प्रॉब्लेम हाच आहे. जे लोकं अॅफॉर्ड करू शकतात ते दोनदोनदा हज करतात आणि ज्यांना खरंच जायची इच्छा आहे त्यांना जाण्याचे फायदे मिळत नाहीत. त्यावर कित्येक मुस्लिम नेत्यांनी हजवरची सरसकट सबसिडी रद्द करून केवळ ज्यांना आर्थिक दृष्ट्या गरज आहे अशांनाच सबसिडी द्यावी असे मत मांडले आहे.
हाज यात्रेकरू पूर्वी
हाज यात्रेकरू पूर्वी समुद्रमार्गे जात असत. तो पर्याय बंद करून हवाई यात्रा अनिवार्य करण्यात आली. त्याबद्दल एअर इंडियाला ही सबसिडी दिली जाऊ लागली.
सुप्रीम कोर्टानेही ही सबसिडी बंद करायचा आदेश दिला होता, तेव्हा मुस्लिम संघटनांनीही त्याचे स्वागत केले होते.
हाज सबसिडीमुळे फक्त एअर इंडियाचेच भले होते असा सूर हाज यात्रेकरूंकडून उमटलेला दिसतोय. वानगीदाखल : http://indianmuslims.in/haj-subsidy-anyone/
http://kafila.org/2011/02/28/the-myth-of-indias-hajj-subsidy-muhammad-fa...
आधीच्या चर्चेवरून आठवलेला
आधीच्या चर्चेवरून आठवलेला (लक्षात आलेला असा अर्थ ब्र आ नव्हे) किस्सा.
एकदा रस्त्याच्या कडेला २ सरकारी कामगार काम करत असतात, एकजण खड्डा खणत असतो, आणि दुसरा त्याच्या मागे मागे त्याने केलेले खड्डे बुजवत असतो.
रस्त्याने जाणारा एकजण कुतुहलाने थांबुन त्यांना विचारतो की हे काय चालू आहे ?
ते उत्तरतात, आमची ३ जणांची टीम आहे,
एकाने खड्डा खणायचा, दुसर्याने वृक्षारोपण करायचे, आणि तिसर्याने खड्डा बुजवायचा.
आमच्यातला वृक्षारोपण वाला मेंबर आज सुट्टीवर आहे,
पण तरी आम्ही आमचे काम इमानेइतबारे करत आहोत.
http://epaper.loksatta.com/c/
http://epaper.loksatta.com/c/3047456
भाजपाची आण्विक
भाजपाची आण्विक कोलांटीउडी
http://epaper.loksatta.com/c/3047456
या विषयावर २००८ मधे येथे
या विषयावर २००८ मधे येथे विस्तृत चर्चा झाली आहे... कम्युनिस्टान्नी आणि भाजपा ने त्याकाळी तेव्हा कडकडुन विरोध दर्षवला होता...
त्यावेळी मनमोहन सिन्ग एकटे एकटे पडले होते... आणि वेळप्रसन्गी त्यान्नी राजिनामा देण्याची धमकी दिली होती तेव्हा कुठे कॉन्ग्रेस पक्ष सर्व शक्तीनिशी त्यान्च्या निर्णयाच्या मागे ठामपणे उभा राहिला.
पक्षिय राजकारण आणि राष्ट्र हित या मधे महत्वाचे काय आहे?
लाज नसली की असे कोलांटी उडी
लाज नसली की असे कोलांटी उडी सुचते
http://maharashtratimes.india
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Gas-Kerosene/articleshow/3...
केंद्रात सत्तेत येऊन एक महिना पूर्ण करण्यापूर्वीच नरेंद्र मोदी सरकारने एकापाठोपाठ एक दरवाढीच्या निर्णयांचा सपाटा लावला असून रेल्वे आणि साखरेच्या दरवाढीपाठोपाठ आता घरगुती गॅस आणि रॉकेलच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्याची तयारी चालविली आहे. यामुळे गॅसच्या दरात ५ ते १० रु. तर रॉकेलच्या दरात प्रति लिटर ५० पैसे ते १ रु.पर्यंत वाढ होण्याची चिन्हे आहेत.
----------- जय हो
२०००
२०००
मोदी म्हणत आहेत आधीच्या
मोदी म्हणत आहेत आधीच्या सरकारने तिजोरी रिकामी ठेवली. चिदंबरम म्हणत आहेत भाजपाने आता प्रचार-मोड मधून बाहेर यावं आणि सांगावं तिजोरी नेमकी कुणी रिकामी ठेवली होती.
“The opening cash balance on June 1, 2004 just after the NDA government demitted office was negative Rs. 2,730 crore,” he said, pointing out that the opening cash balance on June 1, 2014 just after the UPA demitted office was Rs. 26,510 crore."
कोण खरं बोलत असावं?
(मोदी बेमालूम खोटं बोलतात ह्यावर माझ्यासहित अनेकांचा विश्वास आहे. अटक होऊ शकते का ह्या वाक्यामुळे? काही सांगता येत नाही. अच्छे दिन आलेत सध्या :अओ:)
मुलांनो आजचा दिवस दमाने घेऊ
मुलांनो आजचा दिवस दमाने घेऊ या असा विचार होता पण राहूदे.
थोड्या वेळाने नविन धागा काढते.
तोपर्यंत जरा हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवा.
मुलांनो म्हटल्यावर सगळेच लहान
मुलांनो म्हटल्यावर सगळेच लहान होऊन साती काकूंच्या मागे बागडत आहेत, दंगा करत आहेत, साती काकू फडताळावरचा डब्बा काढून ओट्यावर ठेवतात आणि उघडायचं नाटक करतात. मुलं आशेने बघू लागतात तर काकू म्हणतात आत काय खाऊ आहे ते सांगेन पण आधी शांत बसा. मुलांची चुळबूळ काही थांबत नाही मग काकू म्हणतात , खाऊ पण देईन पण आधी हाताची घडी, तोंडावर बोट एकदम, मला धागा विणू द्या आधी !
आता नाईलाज आहे.....
(No subject)
(No subject)
२कि प्रतिसाद झाले, स्वाहा
२कि प्रतिसाद झाले, स्वाहा होणार का हा धागा आता?
मोदी सरकार- एन डी ए २०१४ :
मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग २
मोदी बॅशिंग पार्ट २ मधे
मोदी बॅशिंग पार्ट २ मधे सर्वांचे स्वागत असो.
साती दोन्ही धाग्यावर जमतेय
साती दोन्ही धाग्यावर जमतेय माझी पोस्ट
समस्त माबोकर वाविमध्ये गुंतलेले पाहून मोदीनी MYGOV.NIC.IN लॉञ्च केली नि ती उघडत नाही
धागा सुरु झाला का ?
धागा सुरु झाला का ?
Pages