मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुकान्या, सगळी झाडे एकदम लाबायची नाहीत.

एकच झाड लाव.

ते मेलं की मग दुसरं.

10509708_755533814499251_7426509928586649217_n.jpgआज शेवटचा दिवस...... पास काढण्यासाठी ....... चर्चगेट वरची लांब रांगा.........

रस्त्यच्या मधे (डिव्हायडर ) आणि दोन्ही बाजुला झाड लावणार असतिल आणि झाड म्हण्जे वृ़क्षच नव्हेत. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे याच साहेबांनी बंधला आहे. हायवेवर झाड लावलेली आहेत वृक्ष लावलेले नाहीत. घोषणांचे फाईन प्रिंट वाचायला शिका. >>>>>

युरो, मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे कोणत्या योजने अंतर्गत बांधला आहे ?

@ युरो

मोठी झाडं नाहीत तर छोटी झाडं हे कशाच्या आधारावर म्हणताय ? घोषणेचे फाईन प्रिण्ट्स वाचून कळाले असेल तर समजावून सांगणार का ?

एफबी वर एक प्रतिक्रिया वाचली:
इस बड़े-बड़े नेताओं से छोटी-छोटी गलतियाँ होती रहतीं है दरअसल मोदी चीन के खिलाफ कड़े कदम उठाने वाले थे मगर गलती से चीनी के खिलाफ कदम उठा लिए

बाकी चालू द्या....

Atree1.jpgatree2.jpgatree2.jpgatree3.jpgatree4.jpg

बोन्साय लावणार असतील .........बोन्साय ते ही नारळाच्या झाडाचे .......ती बसतील एका मीटरमधे ४-६ Biggrin

हा पुणे हायवे आहे काय ? Wink

अणि त्यात एकाही फोटोत १ मीटर मधे ४-५ झाडे दिसत नाही हो ... १०-१५ मीटर मधे एक झाड दिसत आहेत ...

atree5.jpgatree6.jpg

उदय, झाडे दुतर्फा आणि मधे लावायची आहेत मग एका मीटर मधे बसतील. एका ओळीत झाडे लावायची नाहीयेत. गझलेत सुद्धा मीटर मधे बसायला दोन ओळी लागतात Proud

नावातच जगावर सूड असेल तर दोन झाडात किती अंतर ठेवावं लागतं, एका मोठ्या झाडाला किती जागा लागते हे कसं समजायचं ? आयुष्यभर टीका करून सत्तेत आल्यावर आता नवं नाटक कसंबसं वठवून जायचंच आहे, पण गंमत अशी , झाडावर एक माकड ची ची करू लागलं की सगळी माकडं ची ची करतात तसं चाललंय. आपण डकवतोय ते चूक की बरोबर याची पण शुद्ध नाही उरलीय.

वरच्या चित्रात तरी एका मीटर मधे ५ - ६ झाडं असतील असं वाटतं का १००% स्केलला ?

atree7.jpg

तुमच्या आडनावातच सूड आहे त्याला कोण काय करणार. परत परत सांगत आहेत लोक्स तरी समजत नाहीये.

एका ओळीत नव्हे हो लावायची झाडे, कसं समजायचं यांना.

कानतोडेंचं गणित एका मीटर मधे २० झाडं सांगतंय. म्हणजे तीन रांगा केल्या तर एका ओळीत पाच ते सहा झाडं यापेक्षा सूट नाही घेता येणार.. Lol

चित्रातला एक मीटर समजतो का ? त्या गाडीची साईझ पाहून त्यावरून ठरवा.

एक मिटर मधे कुठल झाड अस्त जे ६ - ७ नग लाव्ययला जम्त ?>>
कोथिंबीर, वांगी, टोमॅटो असली 'झाडं' लावतील बहुतेक..

ओये... टेंडर झाडे ओळीतच लावण्यासाठी निघते ..... कुठे ही कितीही झाडे नाही लावली जात..

मी घेतलेले होते असे टेंडर ... १ किमी रस्त्यावर कोणती झाडे आणि किती मीटर लावायची असे टेंडर निघते.. उद्या वडाचे नाव सांगुन नारळाचे लावलेले चालत नाही. ( भ्रष्टाचार झाला तर अपवाद) एका नारळाच्या झाडाचे रोपटे लावल्यावर त्याच्या भोवती संरक्षण कुंपन देखील घालावे लागते .. तेच २-३ मीटर असते.. सरासरी १० फुटावर एक रोपटे असा हिशोब पकडुन एका किमीवर किती राहतील त्याचे गणित करतात ..

बरेच असते त्यात..

या भक्तांच्या डोक्यात लवकर काही शिरत नाही. साठ महीन्यात यांना समजावून समजावून समजावून वेड लागणार बहुतेक...

मनरेगा मधे कुठली कामं करतात ते बघा आधी. मुंबई पुणेचं बीओटी काम आहे का ते सुशोभीकरणाचं ?
ट्री म्हणजे काय, प्लाण्ट म्हणजे काय, बुश म्हणजे काय हे बघा आणि नारळाची झाडं कुठं लावतात याचीही माहीती घ्या.

कसं काय निवडणूक लढवाविशी वाटली ? चेष्टा आहे का देश चालवणं म्हणजे ? अजून एका मीटर मधे किती झाडं लावतात ते ठरत नाही.

टाईम प्लीज.

ओ ज्ञानकिरण वाले, सांगताना किंवा पेपरवाल्यांनी छापताना चूक केली म्हणून योजनाच चूक ठरवता येत नाही.

तेच २-३ मीटर असते.. सरासरी १० फुटावर एक रोपटे असा हिशोब पकडुन एका किमीवर किती राहतील त्याचे गणित करतात ..

तसे असेल तर मग सांगताना नक्कीच चूक झालेली आहे. मिडियाला सांगताना काळजी घ्यायला हवी.

http://www.thehindu.com/sci-tech/energy-and-environment/200-cr-trees-to-...

या बातमीत कुठेही झाडे कशी लावली जाणार आहेत याचा उल्लेख नाही. म्हणजे तीन ओळीतच नव्हे तर मधला भाग सोडला तर बाकीच्या दोन बाजूंनी झाडे लावली जातील त्याच्या मागेही झाडे लावता येतील असं म्हणता येईल.
तीनच ओळीत लावणे अपेक्षित असेल तर मात्र सांगताना गफलत झालेली आहे.

खरोखर जगावर सूड असा आयडी आहे. एका भक्ताने इथं बातमी चिकटवलीय. दुसरा भक्त इकडचा तिकडचा कचरा गोळा करतोय. डोक्यात असताना आणखीन कशाला गोळा करत बसायचं ? एक महामूर्ख आयडी सारखा डोळ्यांसमोर येतोय Lol

रस्ता बनवताना त्याची रुंदी ठरलेली असते. आताच्या रस्त्यांना मुष्किलीने झाडाही एक रांग लावता येईल. एकाच बाजूला समांतर दुसरी रांग लावायला कुणाच्या तरी जमिनीत घुसून अतिक्रमणच करायला लागणार. आधीच रस्त्यात जमीने गेलेली असल्यानं शेतकरी बोंब मारणार नाहीत का ?

एक लाख किलोमीटर मधे २०० कोटी झाडं हे जाहीर झालेलं आहे. दुरुस्ती करतात का ते बघू. पण काहीही न पाहता समर्थन करणारे सतत तोंडावर आपटतात तरी पुढच्या वेळेला शहाणे होत नाहीत ही मौज ६० महीने अनुभवायला मिळणार बहुतेक.

>>एक महामूर्ख आयडी सारखा डोळ्यांसमोर येतोय >>

एक कशाला, स्वत:चेच आधीचे असंख्य आयडी येत असतील डोळ्यांसमोर Proud Biggrin Lol

Pages