मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिकामी जागा भरा
_____________________ teaches you to take PRIDE in SHIT you haven't done

and HATE people you have never met.

बी बी सी न्युज तर्फे ;--

Indian media: Railway fare hike 'inevitable'

"It is estimated that the monthly loss to the railways on account of passenger fares is about 9bn rupees (£88m; $149m). As a result, the freight rates were subsidising or diverting profits to the passenger segment, and this was not sustainable. The increase was considered inevitable," The Hindu says

The Indian Express agreed that the hike was "long overdue" and the previous government had resisted the decision due to "political-electoral considerations".

The Business Standard says without the hike "Indian Railways' already precarious finances would have gone even more off-track - indeed, might have become irretrievable".

http://www.bbc.com/news/world-asia-india-27970812

बाकी भुंकणारे भुंकणारच म्हणा

ही चाटू लोकं आता सायबाच्या देशात कशी बिगर साखरेची काफी अन च्या पितात त्याची भजनं लावतील भौतेक.

<<"मी स्वस्ताई साठी मोदींना मत दिलच नाही......भाडेवाढ होणार हे जगाच्या आटत्या तेल विहिरी ओरडून सांगत आहेत ...मी मत दिले ते भानगडी शिवाय भाडे वाढी साठी ....भाडेवाढी सोबत घोटाळे ऐकून कंटाळलो होतो ....मीज्या गोष्टीसाठी मोदींना मत दिले ते उघड घडते आहे..कुठल्याही मंत्र्याची घरची मंडळी याच्या मुळाशी नाहीत ...मोदिनी 7 प्रकल्प नुकतेच पास केलेत ...(सगळे गावाकडची आहेत ...शहरी नाहीत ) ... हेच आम्हाला ऐकायचे होते..
मंत्री वेळेवर १४ १४ तास काम करतायत ..हेच आम्हाला ऐकायचे होते....पंतप्रधानाला स्वत: ची मत अआहेत.. हे आम्हाला बघायचं होत..
मूर्ख बालिश पंतप्रधान किंवा बाहुला दोन्ही नको होता...
स्वस्ताई साठी मतदान केलच नव्हत ....कर्तुत्व आणि धडाडी साठी केल होत... आणि ते नक्कीच सार्थकी लागतय ....

अच्चे दिन म्हणजे फक्त स्व्स्ताई नव्हे ...तो बालीश विचार फक्त हातवाल्यांचा... म्हणून कोणालाही काहेही वाटत फिरण्याचा घातकीपणा त्यांनी ६० वर्षे केला.">>

बिगर साखरेचीच अन बिना पक्वान्नांचीच नव्हे तर बिगर अन्नाची दिवाळी येणारे यंदा अशी लक्षणं दिसताहेत सध्या. यूपीच्या सट्टेबाजांनी मुंबईत पाऊस पडणार नाही म्हणून चार हजार कोटींचा सट्टा लावल्याची बातमी होती आज पेप्रात.. मज्जा चालू आहे. हवाला अन सट्ट्यांत कोण सापडलं होतं ते लोकांना ठाऊक आहे.

ते बनिये मज्जा करून र्‍हायलेत आन हितं विचारजंत पट्टी पढवून र्‍हाय्लेत बा! कडू घास घ्या घालून नल्ड्याखाली, माझ्या मर्‍हाटी भाऊहो..

७ प्रकल्प? कोन्ते भो?? सांगा की जरा?

करत्रुत्व!? धडाडी??? वा वा वा!!!

स्वस्ताई म्हणजे अच्चे दिन नव्हे??
बालीशपणा?

काय विचार करण्यासाठी आवश्यक ती सामुग्री चोरबाजारात खरीदली की काय या निर्बुद्धपणे फेसबुक फॉर्वर्ड करणार्‍या विचारवांत्यांनी?

कोनाले येडी घालून र्‍हायले बा?

...?

"आरे" हो!
आरे वरून आठवलं.
दूध र्‍हायलंय अजून. बिगर साखर आन बिगर दूध. चा म्हनून मिळेल ती पत्ती उकळून घ्यावी लोकान्नी. चा च्या किमती आदुगरच आभाळी भिडल्यात. ७ रुपये लागतात किमान एक कटिंग चा साठी.
अमूल चाल्लंय ना वाराणसीला?
जै चा वालं!!

भारत अमेरिका सहकार्य धोरण :

Narendra Modi-Barack Obama Summit to Reset India-US Ties

The US is looking forward to the first summit meeting between President Barack Obama and Prime Minister Narendra Modi to reset India-US ties that had gone adrift in the last days of the previous government.

Analysts have also appreciated Modi's quick response to the Obama invitation as quite in line with his move to reach out to India's South Asian neighbours with an invitation to his swearing-in.
http://www.newindianexpress.com/nation/Narendra-Modi-Barack-Obama-Summit...

बाकी भुंकणारे भुंकणारच म्हणा
<<
नै हो!
तुमच्या भाषेत समजवून सांगतोय. तुम्हाला कसं समजावं नैतर माणसाचं बोलणं?? Wink

घंट्याचे अमेरिका टाईज.
अणुधोरणाच्यावेळी थयथयाट कोण करत होतं?

Narendra Modi finds a new fan in Congress’s Shashi Tharoor

http://timesofindia.indiatimes.com/india/Narendra-Modi-finds-a-new-fan-i...

Congress leader Sashi Tharoor said the development-centric approach of PM Narendra Modi suggested that he had evolved into "Modi 2.0", even stating that the NDA government steering clear of hardline rhetoric was a welcome step.

In glowing praise of the NDA leadership and agenda that marks a break from the past when the PM was targeted for communalism, Tharoor said, "We appreciate the inclusive and positive language from the high echelons of this government. The opposition should not be churlish to ignore that."

How Narendra Modi May Have Evolved into 'Modi 2.0'
http://www.huffingtonpost.com/shashi-tharoor/narendra-modi-shashi-tharoo...

When Narendra Modi swept to a dramatic victory in India's general elections, becoming the first prime minister in three decades to command an absolute majority in the lower house of India's fractious Parliament, many in India worried about what his victory would portend. To political opponents and members of India's liberal intelligentsia, Modi was a divisive, sectarian, authoritarian figure who had presided over the massacre of some 1200 innocents, mainly Muslim, as chief minister of the state of Gujarat in 2002. The thought of such a figure leading a diverse and multi-religious polity that had long been built on the "Nehruvian consensus" developed by the Congress Party, was anathema to many.

In the event, Modi overcame this negative perception, re-branding himself as an apostle of development and pointing to his successful record in Gujarat, a state of high growth rates that under his leadership has been a magnet for investors. His brilliantly-organized, lavishly-funded election campaign saw "Hindutva", the ideology of Hindu chauvinism with which he and his Bharatiya Janata Party (BJP) have long been identified, relegated to the back burner, while Modi promised voters he would remake India in the model of prosperous Gujarat. The electorate rewarded the BJP - which had never previously won more than 186 seats in India's 543-member Lower House - with 282 seats, as the National Democratic Alliance led by the BJP claimed 333. The ruling Congress Party, of which I am a member, was relegated to its worst showing in history, winning a mere 44 seats.

शेखर-नंद्या,

मला वाटतं की थारूड्या सुनंदाच्या भानगडीतून सुटण्यासाठी मोदींचं गुणगान करतोय.

आ.न.,
-गा.पै.

लगो तुम्ही तुलना केलेले उदाहरण पटले नाही, आणि अशी तुलना करणे अयोग्य वाटते. तुलना नावडण्याचे कारण मोदी किवा त्यान्च्या चहात्या वर्गासाठी नाही तर बापू/स्वामी/बाबा यान्च्या जाळ्यात अडकलेल्या आणि अत्याचार झालेल्या महिला/ स्त्री वर्गाला त्या जाळ्यातुन बाहेर पडण्यासाठी "केवळ दोनच मार्ग" आहेत ह्या तुमच्या सुचवण्याला.

तिसरा सशक्त पर्याय देखील उपलब्द आहे हे समाजाला सान्गणे अत्यावश्यक आहे. बापूने मनाविरुद्ध काही केले असेल तर खुशाल जगाला सान्गायचे.

आयुष्याच्या कुठल्यातरी वळणावर ढोन्गी बाबाच्या (येथे नाव कुठलेही चालेल) नादी लागण्याची चुक भोळ्या जनते कडुन होणे सहज शक्य आहे, पण त्यातुन बाहेर येण्याचे अनेक मार्गही उपलब्द आहेत हे ठसवणे महत्वाचे आहे.

आसाराम प्रकरणात महत्वाच्या साक्षीदाराची गोळ्या घालून अज्ञात व्यक्तीन्नी राजकोट मधे (२३ मे) हत्या करवली... या मह्त्वाच्या केस मधिल साक्षीदाराला अपेक्षित मुबलक सरक्षण नव्हते? आरोपीचा या हत्येशी काही सम्बन्ध? केन्द्रात मन्त्री असलेल्या एका मन्त्र्यान्नी आसाराम प्रकरणाला राजकारणाचा रन्ग देण्याचा प्रयन्त केला आहे जो निषेधार्य आहे.

मोदीसमर्थकांची अवस्था फारच वाईट आहे. आधीच्या सरकारने यंव केलं म्हणून आम्ही त्यंव केलं यातच त्यांची पाच वर्षे जाणार आहेत. सगळ्यात गंमत म्हणजे मी अमूक अमूक साठी मत नाही दिलं तर तमूकतमूक साठी मत दिलं होतं हा युक्तीवाद अतिशय केविलवाणा वाटू लागलाय. यांच्या मताने ना २००४ मधे काही झालं, ना २००९ मधे. बरं, जी कामं आधीच्या सरकारने केली तीच आता हे सरकार करणार असेल तर आधीच्या सरकारची किमान तारीफ केल्याचं ऐकीवात नाही. त्यांना मत देण्याचं तर दूरच. आधीची चाळीस वर्षेही भाजप सोडून कुणाला मत दिलेलं नाही. तेव्हां काय उजेड पडला होता. ज्या लोकांच्या मताने आता सत्ता आलेली आहे त्यांचं मत काय आहे हे महत्वाचं. त्यांनी मत द्यावं यासाठी ज्या काही थापा मारल्या, त्यांचं पोस्टमार्टेम होणारच. ते होऊ नये म्हणून कितीही आकांडतांडव केलं तरी ते होणारच. नाहीतर इथे गळे काढायचे आणि मिर्चीच्या धाग्यावर केजरीवालांची टिंगल करायची, हे पाच मिनिटातल्या पल्टींचं उदाहरण आहे, तर २०१२ मधे काय लिहीलं होतं हे कसं आठवणार ? त्यांच्या देवालाच आठवत नाही तर भक्तांना काय आठवणार ?

बीजगणित सोडवतांना कसं फॉर्म्युले एका कागदावर लिहून समोर भिंतीला चिकटवतो, तसं आधी काय काय मुक्ताफळं उधळली होती ती पीएमओमधे टेबलावर लावली तर खूप सोपं होईल. असो.

प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो. वीजेचा तुटवडा होता हे कारण देऊन परक्या राष्ट्राला पैसे दिलेत तर क्च्छच्या रणातून दुस-या राष्ट्राला वीज का निर्यात करायची ?

आधीच्या सरकारने पहिली सबब सांगितलेली नव्हती हे पण नीट लक्षात घ्या. विरोधाभास तुमच्या धोरणात आहे, ज्याबद्दल पहील्या महीन्यातच पाठ थो(धो)पटून घेतली आहे.

तिसरा सशक्त पर्याय देखील उपलब्द आहे हे समाजाला सान्गणे अत्यावश्यक आहे. बापूने मनाविरुद्ध काही केले असेल तर खुशाल जगाला सान्गायच

.....................

आंधळे भक्त आणि आंधळे समर्थक हा मार्ग स्वीकारत नाहित.

नुकत्याच हाती आलेल्या केबलवरून धक्कादायक माहीती मिळालेली आहे. पुणे मुंबई जुन्या नव्या महामार्गावरील कार्ले या गावातल्या जादूटोणा, तंत्र-मंत्र शिकण्यास दूरदेशी गेलेल्या अमेरीकन महाविद्यालयातल्या काही देशी विदुषींनी या बाफवरच्या पोष्टी वाचून पोटात ढवळत असल्याची तक्रार केलेली आहे. अर्थात, इथे लिहीणारे काही निर्भीड, निर्भय आणि नीडर सदस्य नास्तिक असल्याने अशा विद्येच्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास नाही, तर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी झिन्टॅकादी मंत्रांचे प्रतिबंधक उपाय योजलेले असल्याने ढवळपुरीकर मडमांना फारसं महत्व हल्ली उरलेलं नाही अशी सर्वत्र चर्चा आहे असे समजते.

आठवले, तुम्ही येथे एक सवाल केला होता मला, त्याचे उत्तर विपुमधे डकवले आहे. Happy

मला तरी नविन सरकार हातात इंजेक्शन घेऊन पेशंटमागे पळणार्‍या एखाद्या नर्सप्रमाणे वाटत आहे सद्ध्या.
पेशंट = जनता Happy त्यामुळे बी पेशंट असेच म्हणावे लागेल काही काळ तरी. Sad

मी तर असे ऐकले की दर महिन्याला ग्यास १० रु महागणार आहे

तिसरा पर्याय !!

विरोधीपक्ष नेता आजुन निवडला नाही, आणि हे देशाला तिसरा पर्याय देणार म्हणे !!

Rofl

मिर्ची ताई हा प्रश्न

केजरीवाल यानी जनलोकपाल बिल पास झाले नाही हे कारण देवुन राजीनामा दिला. खरे तर लोकसभेत एक लोकपाल बिल आधीच पेंडीग होते. लोकपाल कायदा करणे हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते की रज्य सरकारच्या? केंद्राचा एक लोकपाल आणि दिल्ली रज्याचा एक लोकपाल असे काही असु शकते का? मी घटना तज्ञ नाही त्यामुळे मला तरी यात काही समजले नाही.

समजा महारष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना वाटले; महाराष्ट्र रज्य इतर रज्यांपेक्षा जास्त कर देते तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने केंद्राने ठरवलेल्या उत्पन्न कर कमी भरला पाहिजे त्यांना यात सुट मिळाली पाहीजे म्हणुन इनकम टॅक्स अ‍ॅक्ट मधे स्वतः विधान सभेत बदल करून घेतला व महरषट्रासाठी कर कमी केला तर हे वैध ठरेल का? या मुद्द्या वरुन ते सरकार विसर्जीत करु शकतात का? सरकार विसर्जीत केल्या नंतर होणार्‍या निवडणुकांचा खर्च करदत्याच्या करातुन होतो की मुख्य मंत्र्यांच्या?

देवकी,

जो स्वता:च्या ड्यु-आयडीला सुद्धा एका स्त्रीच नाव घेतो त्याच्या कडुन आणखी काय अपेक्षा ठेवणार,

तिकडे मोदी ऐश मध्ये आहेत.

रागां आणि सोगां मस्त आहेत.
त्यांचे समर्थक मात्र इकडे उगाच बीपी वाढवत बसलेत.

लोकहो चिडु नका असे एकमेकांवर.

Pages