मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सातीतै,

ईथे नमो सरकारने केलेल्या चांगल्या गोष्टी लिहील्या तर चालतील का ??

दुसरा मुद्दा...अनुत्तरीत आहे.

जर वीजेचा तुटवडा आहे म्हणून भूतानला पैसे देताय तर कच्छमधे निर्माण होणारी वीज पाकला देण्याचं घाटतंय या विरोधाभासाला कसं डिफेण्ड करणार ? ( महीनाच झालाय असं वाटत असेल तर पाच वर्षे थांबतो Lol )

गेल्या दहा वर्षांमधे मनमोहन सिंग यांचा उल्लेख चांगल्या रितीने, आदराने केलेल्या नमोभक्तांच्या पोस्टी इथे कुणी दाखवल्या तर एकेक कॅण्डी फ्री Wink

ईथे नमो सरकारने केलेल्या चांगल्या गोष्टी लिहील्या तर चालतील का ?? >>>>>>>>>>>>
काहीतरीच काय विचारताय. हा धागा मोदी, भाजप, संघ ह्यांना शिव्या देण्यासाठी चालू केला आहे.

चांगले निर्णय घेतले असेल तर नक्कीच लिहायचे आहेत.......

.. (पण त्यासाठी आधी त्यांना घ्यावे लागतील हे वेगळे)

उदा. शास्त्रीय संशोधनाच्या मिटींग्सना फक्त संशोधक आणि शास्त्रज्ञा जातील असा निर्णय जो अत्यंत सुत्य आहे ( ही गोष्ट वेगळी की त्यांचे मंत्री ५ वी पास, बारावी पास वगैरे आहेत म्हणुन जगात नाचक्की होउ नये म्हणुन असेल Wink )

आणि निर्णय हे चांगलेच आहे असे सांगायचे असेल तर मग ....................................... असो Biggrin

या धाग्यावर सुरुवातीला लोकांनी तेच केलेलं आहे. पण एका महीन्याच्या आत भूतानला वीज पिकवण्यासाठी पैसे द्यायचा निर्णय घेण्याचं ज्या सरकारला जमतं आणि त्याबद्दल एका महीन्याच्या आत प्रशंसाच हवी असते त्याची दु(ख)सरी बाजू दाखवली की ठसठसण्याचं कारण समजत नाही !

हा धागा मोदी, भाजप, संघ ह्यांना शिव्या देण्यासाठी चालू केला आहे >>> काय बात करतात राव.. हे गुपित तर ठाउकच नव्हते ... धन्यवाद आमचे डोळे उघडल्याबद्दल

ज्या माणसाला प्रधानमंत्री म्हणून प्रोजेक्ट करताय, तो जाहीर सभेत पैसा क्या मामा घर से आयेगा अशी भाषा वापरतो त्याबद्दल कुणी काही बोलणार का ? जसा राजा तशी प्रजा म्हटल्यावर अपेक्षा ठेवत नाही.. पण असलाच कुणी स्वत:च्या बुद्धीने विचार करणारा तर... Wink
सकारात्मक विचार करायला हरकत नसावी. Lol

काय धागा आहे ?? मज्जाच मज्जा चालली आहे,

आता आमच लीगलाच देश चालवायला पाहीजे तर, तुमच्याने होणार नाही

Wink Wink Wink

हे इथेच थांबत नाही, त्या गाडी पुसणार्‍यावर माबो वर लेख पण लिहायचा आणि लोकांचे कौतुक मिळवायचे. >> मला म्हणताय ? मी तरी नाही लिहीलेला).>>>>>>>> ब्र. आ. - तुम्ही हा धागा सोडुन माबो वाचत च नाही असे दिसते.
बेफीजीं चे नविन व्यक्तीचित्र वाचा. सुंदर आहे.

Cheap sugar imports will only further hit the struggling domestic sugar mills, which are already making huge losses on account of high cost of production of sugar.
<<
शेखर नंदू,
उर्फ जोशी,
नवी डू आयडी काढल्याबद्दल अभिनंदन.

अन डोमेस्टिक मिल्स जाऊ द्या ना खड्ड्यात? बरं होइल बनियांचा हा प्रायवेट बिझिनेस मरेल तर! यांना किस खुशीमें मोनोपली तयार करून हवी आहे?
इम्पोर्ट करूनही बाहेरची साखर जर स्वस्त पडते आहे, तर कशाला ऊस पिकवून आपल्या जमीनीचा कस मारायचा? या महागड्या कॅश क्रॉपऐवजी अन्नधान्य तरी पिकवतील शेतकरी.
शेतकर्‍याच्या उसाला भाव नाही.
अन यांना साखरेचा वाढवून हवा, म्हणून पब्लिकची सालटी काढायची??
वा रे वा!
चांगलं चाल्लंय! लै नाचत होती लोकं नमोनमो करत.
सालटी निघालीत महागाई वाढून, की मग येईल अक्कल आपोआप.

India won’t export 500MW electricity to Pakistan
http://www.nation.com.pk/business/21-Aug-2013/india-won-t-export-500mw-e...

ISLAMABAD - Looks like some obvious hands in the security establishment have finally succeeded in sabotaging the cordially contemplated peace process between the two historical neighbours India and Pakistan with the former having been literally compelled to discard a remarkable energy project Pakistan was to benefit from.

It is worth mentioning that Pakistan was facing severe energy shortages and had sought as much as 500 MW of electricity from India through laying a transmission line from Punjab into Lahore. The incumbent Nawaz Sharif government is very keen on entering into an agreement with India to supply of 500MW of power in the first phase and expand the relationship later on. Pakistan, which already purchases electricity from Iran, had sought to purchase power to alleviate some of the acute energy crisis it is currently facing and has sought the supply of 500 megawatt of power from its Eastern neighbour.

ही झाली २०१ २ २०१३ सालची बातमी , त्या वेळेला भारत सरकार तयार होत वीज द्यायला

to block cheap sugar imports into the country.<<<,माझं म्हणणं बरोबर होतं म्हणायचं.देशात साखर असताना ही लोकं निर्यात करतात राव... बाहेरून साखर येताना यांचे धंदे बंद पडले.लुटा अजून-कारखानदार + नेतेलोक.

या सगळ्यापासून अनभिज्ञ अशी जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासोबत फार मोठी खेळी खेळली जातेय. विशेषतः शेतकरी..

थोड्या आक्रस्ताळ्या भाषेबद्दल आधीच माफी. फेसबुक वर कुठेतरी वाचलंय हे वाक्य..

जो बात लोगों को समझा समझा कर... समझा समझा कर... समझा समझा कर...भी नही समझती, वो अक्सर लत्ताप्रहार से समझ मे आती है Lol
हॅपी लत्तींग !

@ टोच्याजी
माझा एकट्याचा कंपू आहे:खोखो: आणि मी सर्वांना अनुल्लेखाने मारलेले आहे Proud त्यामुळे कुणाचं काही वाचण्याचा प्रश्नच येत नाही. अपवाद : कौतुक शिरोडकर

अवांतर गप्पांमधे भूतान (हल्लीचे नाव नेपाळ) ला वीजेसाठी पैसे देणे आणि कच्छमधून वीज निर्यात करणे या निर्णयांची संगत कशी लावायची हा मुद्दा अनुत्तरीत आहे, आणि जागतिक निविदेचा उपमुद्दाही...

पुढील पाच वर्षात कधीतरी उत्तर मिळावे. नही तो शेवटके रीळ मे पता चलेगा की अरे हिरोच खुनी है !

<अन डोमेस्टिक मिल्स जाऊ द्या ना खड्ड्यात? बरं होइल बनियांचा हा प्रायवेट बिझिनेस मरेल तर! यांना किस खुशीमें मोनोपली तयार करून हवी आहे? इम्पोर्ट करूनही बाहेरची साखर जर स्वस्त पडते आहे, तर कशाला ऊस पिकवून आपल्या जमीनीचा कस मारायचा? या महागड्या कॅश क्रॉपऐवजी अन्नधान्य तरी पिकवतील शेतकरी. शेतकर्‍याच्या उसाला भाव नाही. अन यांना साखरेचा वाढवून हवा, म्हणून पब्लिकची सालटी काढायची??>
इब्लिस +१.

ग्राहकासाठी स्वस्त साखरेचा पर्याय बंद. आणि फरक तरी किती? जी साखर १०० रुपयांना मिळू शकली असती तिच्यासाठी १४० रुपये मोजायचे.

Government looks at industry’s higher import duty demand on sugar
http://www.indiansugar.com/NewsDetails.aspx?nid=3324

NEW DELHI: Food minister Ram Vilas Paswan said on Thursday that the government is examining sugar industry's demand to increase the import duty on the politically-sensitive commodity to 40% from 15%. And, the petroleum ministry will also examine the issue of increase the percentage of ethanol blending in petrol to revive the sugar industry, the minister added.

The demand to raise the duty comes ahead of the Budget with Paswan scheduled to meet commerce & industry minister Nirmala Sitharaman, who is also the minister of state for finance. A package of sorts is being readied for the sector as Maharashtra goes to polls later this year. Higher import duty will act as a further buffer to the shipments of the sweetener into the country during a bumper cane harvest, resulting in lower price of sugar.

Paswan said the government is looking to provide additional interest-free loans to cash-starved sugar mills for clearing arrears to sugarcane growers so that both industries don't die and farmers get their arrears. "We have to keep farmers' interest in mind and have to ensure that sugar mills are in good financial health to clear Rs 11,000 crore arrear to cane growers."

लोकसत्ता बातमी;--
मोदी सरकारचा मंत्र...'डिले इज आऊट, डिसिजन इज इन'
मोदी सरकारचे सूत्र सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्र्यांना विलंब (डिले) हा शब्द त्यांच्या डिक्शनरीतून काढून टाकण्याची सूचना केली असून, वेगाने निर्णय घेण्याचे सांगितले असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी एका कार्यक्रमात स्पष्ट केले.
पुर्ण माहीती साठी वाचा ही बातमी,
http://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-govts-mantra-delay-out-dec...

लोकसत्तेतील आणखी एक बातमी,
आमिरच्या 'सत्यमेव जयते'मुळे पंतप्रधान प्रभावित

पंतप्रधानाबरोबच्या आपल्या या भेटीचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करत आमिरने म्हटले की, आताच भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला.

पुर्ण माहिती साठी ही बातमी वाचा,
http://www.loksatta.com/manoranja-news/bollywood-star-aamir-khan-met-pri...

अहो, नंद्या शेखर, उर्फ जोशी क्र. २,
कशाला शुगर लॉबीवाल्यांची साईट कोट करीत आहात?
या शुगर मिलवाल्यांनाच खड्ड्यात घातलं पाहिजे असं मत आहे आमचं. काय घंटा भेटत नाही शेतकर्‍याला त्या पॅकेजमधून.
पण निवडणूक खर्चा वसूलनेका है ना! मग बरोबर आहे.
पब्लिकची सालटी काढून यांना शुगर मिल वाल्यांसाठी चपला बनवायच्या आहेत असं दिसतंय एकंदरीत.

गापै,
उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

युरो,
<<मी विचारलेल्या प्रश्नाना तुम्ही सुंदर बगल दिलीत.>>
पुन्हा तुमची पोस्ट उघडून बघितली. कुठले प्रश्न ? Uhoh

१. Iron ore exporters cheat Railways of 50,000 crore
२. CAG unearths Rs 17,000 crore scam in railways

हे करोडो रूपये वाचले असते तर रेल्वेत झालेली भाडेवाढ थांबवता आली असती का? जस्ट वंडरिंग...

इब्लिसभौ

तुमच्या मित्राला सांगा की लिंक देताना स्वतः वाचून त्याचा अर्थ काय होतो हे समजून घेत चला. मनमोहनसिंग सरकारने वीज पाकिस्तानला देण्याबाबतच्या प्रपोझलला केराची टोपली दाखवली होती. नवाज शरीफ यांच्याबरोबर संबंध सुधारण्यालाही प्राधान्य दिलं नव्हतं हा सगळा इतिहास आद्यमित्र नवाझाचार्य शरीफशास्त्री यांच्या भेटीच्या वेळी सगळीकडे मुद्रीत आणि वितरीत झालेला आहे.

Adani Power wants Narendra Modi govt nod for export of electricity to Pakistan

"According to a source, Adani Power has discussed the proposal of the Kutch project with the UPA-II government, but there was not much progress. The company hopes implement the proposal during the incoming NDA regime as a coal-based project in phases beginning with 3,300 MW and ramp it up to 10,000 MW within the next five years, he said".

इम्पोर्ट करूनही बाहेरची साखर जर स्वस्त पडते आहे, तर कशाला ऊस पिकवून आपल्या जमीनीचा कस मारायचा? या महागड्या कॅश क्रॉपऐवजी अन्नधान्य तरी पिकवतील शेतकरी. शेतकर्‍याच्या उसाला भाव नाही. अन यांना साखरेचा वाढवून हवा, म्हणून पब्लिकची सालटी काढायची??<<< +१

मंत्रालयात पुन्हा आगीमुळे घबराट
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Fire-breaks-ou...

मंत्रालय आणि आग हे दृष्टचक्र गेल्या काही वर्षांपासून सूरूच असल्याने तेथील कर्मचारी नेहमीच दहशतीखाली काम करताना दिसत आहेत. जून २०१२ मध्ये लागलेल्या आगीत मंत्रालयातील ५ कर्मचाऱ्यांचा बळी गेला होता. तसेच या आगीत अनेक महत्वाच्या फाइल्स जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर मार्च २०१३ मध्येही मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर आग लागून मोठे नुकसान झाले होते.

ह्या मंत्रालयातच ईतक्या आगी का लागतात ? बर लागतात त्या लागतात महत्वाच्या फाईलींनाच कश्या काय
भस्मसात करतात ?

च्या-मारी!
या बातमीचा मोदी सर्कारशी काय संबंद भो?
त्यांनी तात्काळ बेसिसवर गव्हर्नन्न्स करून आग लावली असं म्हनायचंय का काय तुमाला?

पंतप्रधानाबरोबच्या आपल्या या भेटीचे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करत आमिरने म्हटले की, आताच भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी त्यांचा अमूल्य वेळ मला दिला.
<<

आमीर नामक धंदेवाईक माणूस पंतप्रधानांना आदरणीय म्हणणार नाही असे वाटते का तुम्हाला? अहो, इथे मी तुमच्यासारख्यांना अहो जाहो म्हणतोय Wink

अन रच्याकने, भासन देताना गल्लीतल्या महिलामंडळाच्या बांगड्याभरण समारोहाच्या चीपगेस्टाचा वेळ देखिल अमूल्यच असतो Wink

***

आमीर खान यांनी 'आदरणीय' अन 'अमूल्य' शब्द वापरल्याने उर बडवत पोस्टी टाकायची गरजच का भासावी? त्यापेक्षा सरळ गोल टोपी घालून घेतली असती ना!

कुनाले येडी घालून र्‍हायले भो? सोताले??

Pages