मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नै हो उदयन, ते पै वेगळे आणि हे विचारवांती वेगळे.

विचारवंताना मा. ईब्लिस यान्नी विचारवांती अशी पदवी दिलेली होती.

या त्रिकुटात एक मास्तुरेही होते.

थोडेसे अवांतर
वरती घरांमधल्या ब्लॅक मनीविषयी लिहिले आहे. पुनर्विकासासाठी इमारत रिकामी करावी लागली की नवीन सदनिका शोधताना आलेले अनुभव ऐकले आहेत. एका विशिष्ट समाजातील व्यक्तींकडे अनेक फ्लॅट्सची मालकी असून त्यातले अनेक फ्लॅट्स रिकामे आहेत. भाड्याने देण्यासाठी अनेक अटी ठेवल्याने ते बहुधा रिकामे रहातात. अटी शिथिल केल्यास फ्लॅट्स लगेच भाड्याने जातील असे सुचवल्यास ते सांगतात की इथे कुणाला भाडे पाहिजे आहे. काही वर्षांनी विकून टाकायचा किंवा असाच ठेवून द्यायचा.
खरोखर सिंगापुर पद्धतीने असे फ्लॅट्स सक्तीने वापरात आणावे.

आयडी ओळखा स्पर्धा चालू झालेली दिसते. कृपया ती या धाग्यावर नको. नाही तर लोकांना वाटेल की हे देखील नविन सरकारचेच एक काम आहे. Wink

कृपया ती या धाग्यावर नको. नाही तर लोकांना वाटेल की हे देखील नविन सरकारचेच एक काम आहे.
----- हे खोटे आहे. शिवराज पाटिल गृहमन्त्री असताना त्यान्नी सर्वात प्रथम असा (माय्बोलीवरचे ड्यु आय डी शोधण्याचा) प्रस्ताव पुढे ठेवला होता, पुढे श्री चिदम्बरम यानी पाठपुरावा केला. आता मोदी सरकारात गृहमन्त्री असलेले राजनाथ सिह यानी केवळ अमल केला आहे पण खरे श्रेय हे आधीच्या सरकार कडेच जाते.

तेजा, तुम भूल गये लेकिन मै नही भूला.
तुम्हे जाने से पहले दो बाते कहना चाहता हूं ये बोला था. तो सोने से पहले एकही बात क्युं ?
तो दुसरी बात ये है की..

मैने एक फिल्म देखी थी । उसमे हिरो जिसको भौत मानता है, आखरी रीळ मे वहीच व्हिलन निकलता है, तो उसको भौतच धक्का बसता है । फिर द एण्ड होता है । उसके बात फिर हिरो स्क्रीन पे आके कहता है की माफ करना पब्लीक, मै बहुत इफू था । अगर मै पैलेच रीळ मे पहचान लेता तो आपका पैसा और वेळ बर्बाद नही होता, मेरा भी बीपी, शुगर कंट्रोल मे रहता ।

तेजा, समझ गये हो तो फिर मत पूछना की महल महीने मे क्युं ? वर्ना पाच साल के बाद ऐसा झटका बसेगा की चल बसोगे । इसलिए आदत डालो । अगर अच्छे दिन आ ही गये, तो मानसिक तयारी हो जायेगी ।

उदय, पण त्यापूर्वीच वाजपेयी सरकारने अगदी तेरा दिवसांच्या कार्यकाळातही हा (ड्यू आयचा)महत्त्वाचा मुद्दा सर्वप्रथम चर्चेला घेतला होता हे आम्ही कट्टर भाजपेयी विसरलेलो नाही.
तेव्हा यू पी ए चे गुणगान थांबवा.
Happy

ब्र. आ.
तुम्हारी भाषा मेरेकू आवडी , लेकीन ये मराठी संस्थळ है रे बाबा, इधर मराठी में हीच बातां करो, हिंदी नक्को रे बाबा.

(ता. क. - घाईघाईमे ब्र. आ. लिखनेमें कोई गलती नही होती ना ये प्रतिसाद सेवने के पहिले प्रत्येक बार पाहणा पडता है रे बाबा, उग्गाच अर्थका अनर्थ हो जाताय)

मी पण मागे एकदोनदा हा विचार केला होता.<<<

मी तर केव्हाचा घाबरून बसलेलो होतो कोणीतरी चुकते की काय ह्या विचाराने!

अब तिसरी बात जो पहले नही थी

मायबोली वर भक्तांचा पराभव झाला तर सरकारला राजीनामा द्यावा लागणार - संयुक्त राष्ट्रे, जीनिव्हा करारातले नवे कलम.

गुडनाईट फायनली.
विकारवंत जोशीबुवा
ढूंधते रह जाओगे Rofl

उदय अरेरे
हे काय आहे ? अ ओ, आता काय करायचं
---- महेश कृपया प्रतिसाद पुर्ण वाचा... मी गमतीने Happy लिहीले आहे. सध्या काही चान्गल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी आणि अप्रिय कामचे श्रेय वाटण्यासाठी (न घेण्यासाठी) मारामारी सुरु आहे त्या अनुषन्घाने.

६० कोटी रुपयान्चे नॅशनल मिडीआ सेन्टरचे उद्घाटन २०१३ मधे तत्कालीन पन्तप्रधान श्री. मनमोहन सिन्ग यान्नी केले होते. त्या ठिकाणची पन्तप्रधान श्री. मनमोहन सिन्ग यान्च्या नावाची पाटी काल परवा बदलली. आता तेथे श्री अटल बिहारी वाजपेयी यान्चे नावाची पाटी लागली. भाजपाच्या म्हणण्यानुसार अटलजीन्नी पण २००३ मधे उद्घाटन केले होते...

उदय, पण त्यापूर्वीच वाजपेयी सरकारने अगदी तेरा दिवसांच्या कार्यकाळातही हा (ड्यू आयचा)महत्त्वाचा मुद्दा सर्वप्रथम चर्चेला घेतला होता हे आम्ही कट्टर भाजपेयी विसरलेलो नाही. तेव्हा यू पी ए चे गुणगान थांबवा.
----- मी कुणाचेही कारण नसताना गुणगान गात नाही आणि म्हणुन सर्व पक्षीयान्साठी परका आहे... Sad
तिसर्‍या आघाडीत खुप गोन्धळ आहे म्हणुन माझी चौथी आघाडी आहे... आपल्या मर्यादेत होता होईल तेव्ह्ढी निष्पक्षपाती पणे टिका करण्याचा प्रयन्त करतो.

ब्र. आ. तुम्ही कोण ते जाणून घेण्यात मला इंट्रएस्ट आहे असा तुमचा गैरसमज दिसतो. मी तुम्हाला तेवढेही महत्व देत नाही. मात्र ज्ञानकिरण म्हटल्यावर तुम्ही ज्याप्रकारे चिडलात ते मात्र मजेशीर होते Wink

आ.अ.उ.
- विचारवंत.

दोन्हि भान्डनार्या पार्त्या मि दिसलो कि एक होतात आनि झापतात शुध्ध लिहिन्यावरुण. म्हनुण इकदं येनं बन्द केल तर कुनि विचारल पन नाहि.
मला इक्तच वीचारायच होत की
जलि को आग कहते है , हां ?
बुझि को राख कहत है, हां ?
तो फीर फेकु को फेकु क्यु नहि कहने देते ?

विचारवंत, तुम्ही या धाग्यावर चर्चा भरकट जावी या उद्देशाने लिहीत आहात. बेफीही फार मोठी तात्विक चर्चा केल्याचे दाखवून भाववाढिच्या मुद्द्यावरुन चर्चेचा फोकस शिफ्ट करत आहेत .
जर खरे मोदीभक्त असाल तर भाववाढ ,निहालचंद, पाकिस्तानची तळवेचाटुगिरी,महत्वाच्या प्रश्नांवर नरेंद्र मोदींचे मौन यावर सडेतोड प्रतिवाद करा.

धिरज काटकर, मी सटरफटर पोष्टींना उत्तरे द्यायचे सोडून दिले आहे याची कृपया नोंद घ्यावी.

१७००

जर खरे मोदीभक्त असाल तर <<<

आपण प्रतिसादात माझे उपनाम गोवलेत म्हणूनः

मी खरा मोदीभक्त नाही. माझे वडील व त्यांचे सर्व सहा भाऊ संघात जात असत. त्यामुळे आम्हा चुलत भावंडांवर संघ व भाजप म्हणजे चांगले लोक असे संस्कार लहानपणापासून झालेले होते. त्यामुळे आपसूकच आम्ही भाजपचे मतदार झालो. पण आता त्यावेळेसपेक्षा थोडे अधिक समजते, त्यामुळे गेली काही वर्षे मला व्यक्तिशः कोणत्याच पक्षाबाबत काही विशेष आस्था राहिलेली नाही. इतके खरे की काँग्रेस व त्याच्या उपपक्षांबाबत व सहकारी पक्षांबाबत मनात राग तेवढा आहे. Happy

बेफिकीर, संघ म्हणजे चांगले लोक हे खरेच आहे सार्वकालिक सत्य.
मात्र भाजपबद्दल प्रत्येक वेळी हे खरे असेलच असे नाही, कारण शेवटी तो राजकीय पक्ष आहे.

तर ते असो.

आ.न.
- विचारवंत.

उगाच कोण जोशी, देशपांडे, इ. नावे लिहून आपण कसे डुआय वगैरे शोधण्यात उस्ताद आहोत हे दाखविणार्‍या लोकांनी स्वतःचे एक/अनेक आयडी कसल्या कसल्या चित्र विचित्र नावांचे काढून स्वतःची खरी ओळख लपवून ठेवण्याचा लबाडपणा अव्याहत चालू ठेवलेला असल्याने. या असल्या आयडी ओळखा टाईप पोस्टींना वाचकांनी जास्त महत्व देऊ नये.

असो, मुळ विषय आहे सरकार आणि त्यांच्या कार्याचा.
खरेतर रेल्वे भाडेवाढ जी काही दणकन केली गेली, ती व्यक्तिशः मला तरी पटलेली नाही. अगदी मी प्रवास करत नसलो तरी. Sad

रेल्वेचा पास आगाउ काढुन देखील काहीही उपयोग नाही बहुतेक ... काल आयबीएन लोकमत वर सेंट्रल रेल्वेचे अधीकारी पाटील म्हणाले की नंतर डिफ्रंन्स ची रक्कम वसुल करण्यात येईल म्हणजे २५ जुन नंतर..

महेश
तुमचे प्रतिसाद मी सिरीयसली वाचतो. जज्ज बनून कुणा एकाची कड घेणं तुमच्याकडून का बरं घडावं ?

तुम्ही ज्याला लबाडी म्हणता ती लबाडी इथं कित्येक वर्षे इमाने इतबारे चालू आहे. माझ्या मते चर्चा चालू असताना मुद्दाम ती भरकटवण्याचा प्रयत्न करणे, पाठीराखे जमवणे, ते सगळेच ड्यु असणे याला म्हणता येईल.
हे लोक बिनडोक असल्यासारख्या पोस्टी टाकत असतात. अतिशय मूर्ख पोस्ट्समुळे ओळखणे फार अवघड नसते. त्यात हुषारी काहीच नाही. तुम्ही जज्ज झालाच आहात तर नीट पहा. विचारवंत आधी मिर्ची ला उद्देशून त्या कुणीतरी आहेत असा संशय घेत होते. त्यानंतर माझे नाव घेऊन तीच पोस्ट टाकली. तेव्हांच त्यांना नम्रपणे सांगितलं. त्यानंतर पण जेव्हां जेव्हां त्यांचा पक्ष अडचणीत येतो तेव्हां ते चिडतात आणि येऊन ते आचरटपणा करतात. त्यांची कड घेणारे आणि त्यांना लाथा घालणारेही लोक इथे भरपूर असतील, तुमची भर कशाला ? उगाच बदनाम व्हाल. Lol मूर्खांच्या नादी लागणार नाही हे आधीच क्लिअर केलेले आहे. चेक करून पहा. त्यावेळी तुम्ही जज्ज असतात तर ? Wink तुम्मची पोस्ट वाचून आश्चर्य वाटल्याने हा खुलासा.

झोपेत पण या बाफचंच स्वप्न पडलं आणि जाग आली तर हा गोंधळ !! Proud
टेक केअर, लॉगआउट, शटडाऊन, लाईट्स ऑफ , गुडनाईट !

Pages