केळ्याचे सांदण

Submitted by आनंदिता on 16 June, 2014 - 08:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

रवा (भाजलेला असल्यास उत्तम, नाहितर साधा पण चालेल) - १ वाटी
किसलेला गुळ - १ वाटी (कमी गोड आवडत असेल तर एक वाटी पेक्षा थोडा कमी घ्यावा)
खवलेलं ओलं खोबरं - १ वाटी
पिकलेलं केळं - १ (कुस्करून)
मीठ - चिमूटभर
खाण्याचा सोडा - चिमूटभर
दूध - हवे असल्यास

क्रमवार पाककृती: 

१.खाण्याचा सोडा वगळून सर्व जिन्नस एका भांड्यात एकत्र करावे.
२.मिश्रणात दूध किंवा पाणी घालून साधारण ढोकळ्याच्या पिठाईतके सरसरीत भिजवावे.
३.नंतर यात सोडा घालून नीट ढवळून घ्यावे.
४.कूकर ची शिट्टी काढून, भांड्यावर झा़कण ठेवून २५ - ३० मि. वाफवून घ्यावे.
५.सुरी किंवा लोकरीच्या सुईने पदार्थ चि़कटत नाही याची खात्री झाल्यावर गॅस बंद करून भांडे थोडा वेळ कूकर मधेच ठेवावे.
६.गार झाल्यावर ढोकळ्याप्रमाणे वड्या पाडून सर्व्ह करावे.

प्रकाशचित्र आत्ता नाहीये Sad पुढच्या वेळी नक्कि.

वाढणी/प्रमाण: 
साधारण ४ जणांसठी
अधिक टिपा: 

१. पिकलेल्या केळ्याचा वास असल्यामुळे वेलची इ. नाही घातली तरी चालते.
२. याच प्रमाणे तांदूळाचा रवा आणि फणस गर्‍याचा आटवलेला रस घालून फणसाचे सांदण सुद्धा करतात.
३. खांडवी पेक्षा करायला सोपा आणि सुटसुटीत पदार्थ.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ दिनेश दा-
केला बदल. पण केळ्याचं प्रमाण पाहून कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून आधी ते नाव लिहिलं नव्हतं. Lol Lol