रवा (भाजलेला असल्यास उत्तम, नाहितर साधा पण चालेल) - १ वाटी
किसलेला गुळ - १ वाटी (कमी गोड आवडत असेल तर एक वाटी पेक्षा थोडा कमी घ्यावा)
खवलेलं ओलं खोबरं - १ वाटी
पिकलेलं केळं - १ (कुस्करून)
मीठ - चिमूटभर
खाण्याचा सोडा - चिमूटभर
दूध - हवे असल्यास
१.खाण्याचा सोडा वगळून सर्व जिन्नस एका भांड्यात एकत्र करावे.
२.मिश्रणात दूध किंवा पाणी घालून साधारण ढोकळ्याच्या पिठाईतके सरसरीत भिजवावे.
३.नंतर यात सोडा घालून नीट ढवळून घ्यावे.
४.कूकर ची शिट्टी काढून, भांड्यावर झा़कण ठेवून २५ - ३० मि. वाफवून घ्यावे.
५.सुरी किंवा लोकरीच्या सुईने पदार्थ चि़कटत नाही याची खात्री झाल्यावर गॅस बंद करून भांडे थोडा वेळ कूकर मधेच ठेवावे.
६.गार झाल्यावर ढोकळ्याप्रमाणे वड्या पाडून सर्व्ह करावे.
प्रकाशचित्र आत्ता नाहीये पुढच्या वेळी नक्कि.
१. पिकलेल्या केळ्याचा वास असल्यामुळे वेलची इ. नाही घातली तरी चालते.
२. याच प्रमाणे तांदूळाचा रवा आणि फणस गर्याचा आटवलेला रस घालून फणसाचे सांदण सुद्धा करतात.
३. खांडवी पेक्षा करायला सोपा आणि सुटसुटीत पदार्थ.
छान प्रकार. शीर्षकात केळ्याचे
छान प्रकार. शीर्षकात केळ्याचे सांदण.. असा बदल करणार का प्लीज ?
@ दिनेश दा- केला बदल. पण
@ दिनेश दा-
केला बदल. पण केळ्याचं प्रमाण पाहून कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून आधी ते नाव लिहिलं नव्हतं.
छानेय पदार्थ. एका वाटीचा करुन
छानेय पदार्थ. एका वाटीचा करुन पहायला हरकत नाही.
छानच लागते हे राजेळ्या
छानच लागते
हे राजेळ्या केळ्यांचे करतात ना?
राजेळ्या केळ्यांचे करतात का
राजेळ्या केळ्यांचे करतात का माहित नाही. मी साधं केळं च घेतलं होतं.
व्वा! मस्तच लागत असणार..
व्वा! मस्तच लागत असणार..
हा प्रकार शिरयासारखा लागत
हा प्रकार शिरयासारखा लागत असणार ना? वाफवलेला शिरा बहुधा..!! try करुन पाहिल नक्कि!!
हा प्रकार मस्तच
हा प्रकार मस्तच लागतो....
केळ्याचा स्वाद .. आहाहा....
मस्त लागते ही डिश ! फणसाचे
मस्त लागते ही डिश ! फणसाचे सांदणही खूपच आवडतं !
(No subject)
कालच फणसाचे सांदण खाल्ले आणि
कालच फणसाचे सांदण खाल्ले आणि हा लेख आज वाचतोय. आता केळ्याचे सांदण पण नक्कीच होणार.
आत्ताच केल , मस्त सोडा नाही
आत्ताच केल , मस्त
सोडा नाही घातला
(No subject)