कैरीच्या लोणच्याचा घरगुती मसाला [सचित्र ]

Submitted by प्रभा on 13 June, 2014 - 07:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कैरीच्या फोडी १ किलो , मिठ दीड वाटी -, मोहरीची दाळ १ वाटी , लाल तिखट १ वाटी ,हळद पाव वाटी, मेथ्या २ चमचे , हिंग १ चमचा, तेल १ वाटी, कलोंजी [कांद्याच बी ]

क्रमवार पाककृती: 

कैरीच्या फोडी १ किलो [मोजुन] मिठ दीड वाटी थोड भाजुन घ्याव. थोड मिठ व हळद कैरीच्या फोडींना लावुन अर्धा ते १ तास ठेवाव. नंतर त्या फोडींना सुटलेल पाणी काढुन घ्याव. म्हणजे अतिरिक्त आम्लता , तेलकटपणा कमी होइल. एका थाळीत प्रथम मिठ घ्याव. त्याच आळ करुन मोहरीची दाळ नंतर हळद पाव वाटी , तिखट [अर्धी वाटी लाल +अर्धी वाटी काश्मीरी ] १ वाटी , मेथ्या भाजुन पावडर करुन घ्यावी [२ चमचे] . १ वाटी तेल गरम करुन मोहरी घालावी मोहरी तडतडली कि गॅस बंद करुन मेथ्या पावडर व हिंग घालावा [ मी खडा हिंग बारीक करुन वापरते .] व मसाल्यात ते तेल घालुन मिसळुन घ्याव . लोणच्याचा मसाला तयार . मसाला चांगला थंड झाल्यावर बरणीत थोडा घालावा नंतर फोडींना लावुन बरणीत भराव वर परत थोडा मसाला घालावा..

वाढणी/प्रमाण: 
आवडीनुसार
अधिक टिपा: 

आवडत असल्यास कलोंजी घालावी मी घालते थोड्या लोणच्यात.
मनीमोहोरचा लेख वाचला वाचता वाचताच मी माहेरच्या आमराइत पोहोचले [मनाने ] फारच सुरेख लिहला होता. त्यावरुनच मला हे लिहावस वाटल. देवकीने विचारलहि होत झाली तर तिलाही मदत होइल. म्हणुन काल मी लोणच घातल आणि हा लेखण प्रपंच. धन्यवाद मनीमोहर..

माहितीचा स्रोत: 
वडीलधारे.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवकीने विचारलहि होत झाली तर तिलाही मदत होइल>>>>>>>>>>>> धन्यवाद प्रभाताई! यावेळेस नाही तरी पुढल्या वेळेस नक्की करून पाहेन.

तुम्हाला माझी कहाणी बेगमीच्या लोणच्याची हा लेख आवडला. धन्यवाद प्रभाताई.