लेख सातवा - ग्रामिण भागाची लँड्स्केप्स

Submitted by पाटील on 13 April, 2014 - 08:46

आता पर्यंत आपण वेगवेगळी टेक्निक्स , थिअरी , रंग यांचा अभ्यास केला. यापुढे येक येक विषय घेउन त्यावरील लँड्स्केप्स चा आपण सराव करुया. मी गेले दोन दिवस माझ्या गावी होतो. तीथे आमच्या शेतावर , गावात केलेली दोन चित्र इथे पोस्ट्करुन ग्रामिण भागाची लँड्स्केप्स अर्थात ruralscapes बद्दल लिहतो.
ऑन लोकेशन काम करताना आपल्या कामाला १ ते २ तास लागतील या दृष्टीने विचार करुन स्पॉट तसेच बसण्यासाठी सावलीतील जागा शोधुन बसावे. प्रकाश येव्ह्ढ्या वेळात बदलतो म्हणुन सुरुवातीला दुसर्‍या स्केच बुक मधे छोटे व्ह्य्ल्यु स्केच करुन घ्यावे. हल्ली सग्ळ्यांकडे मोबाईल असतात. व्ह्यॅल्यु स्केच करायचे नसेल त त्या स्पॉट्चा फोटो काढुन ठेवावा. जरी त्यावरुन रंगवायचे नसले तरी चित्राच्या सुरुवातीला प्रकाश योजना कशी होती यासाठी हा रेफरंस ठरतो.

आमची भात शेतीत उन्हाळ्यात ओसाड असते. त्यात दुर दुर पर्यंत झाडं नाहीत मात्र असे येखादे झाडं ढोरांसाठी विसाव्याची जागा असते. मी तेव्हढेच स्केच पटकन करुन पहिला वॉश मारुन घेतला.
s1_2.jpgs2_0.jpg

त्यानंतर झाडा चा भाग ब्लॉक करुन घेतला, दुरच डोंगर आणि झाडं काहीही डीटेल्स न टाकता केली.
s3.jpg
म्हशी सावलीत अस्लयाने फार डीटेल्स न दाखवताच अल्ट्रामरीन ब्लु+ बर्न्ट सिएना अशा रंगवल्या, झाड हा या चित्रा चा मुख्य घटक असल्याने यावेळी थॉडे डीटेल्स /पानं सजेस्ट केली मात्र प्र्तयेक पान न करताना खुप डेरेदार झाड असल्याचे इम्प्रेशन तयार केले.
s4.jpg

शेवटी डार्क सावली, झाडाचे खोड , त्यावर रिफ्लेक्ट्ड लाईट असे टाकुन चित्र पुर्ण केले.
s5.jpg

हे दुसरे चित्र गावतल्या घरांचे. क्विक स्केच , कलर ब्लॉकींग ते डेप्थ याच क्रमाने रंगवले. हे चित्र अगेंस्ट लाईट असलयाने भिंती कडचा भाग सावलीत असल्याने थोडा सावली साठी गडद रंगाच्या पातळ शेडने ग्लेझ केले
m drawing.jpgm1_0.jpgm2_0.jpgmf.jpg

या वीषयावरची अजुन काही चित्र करायची असल्यास आपंण करुया, त्या साठी कुणाकडे काही रेफरंस फोटो असतील तर मला पाठवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कंसराज, अंतरा....धन्यवाद Happy

खास करुन चित्राच्या दुसर्‍या टप्प्यात जेव्हा डीटेल्स करायला सुरुवात करता तेव्हा >>> खरे शिक्षक आहात! मलाही त्याच टप्प्याला हे खूप जाणवलं. अगदी मेंगळट दिसत होतं चित्र. सही विसरले. आता घरी गेल्यावर करुन टाकते परत फोटो. धन्यवाद Happy

गजानन मस्त आहे चित्र!!
अश्विनी कमाल आले आहे चित्र. अमेझिंग. ते रंग जरा ब्राइट , अजुन फ्रेश आणू शकलीस तर बेस्टच होईल.
अंतरा छान आले आहे हे चित्र..

गजा, मस्तं आलंय! गायी तर खूपच छान आल्यात. सावली जर्रा कमी पसरलेली हवी होती का? माध्यान्हीची वेळ असावी असं वाटतंय सावलीच्या गडदपणावरुन.

अंतरा, चांगलं आलं आहे. एक म्हैस तर काढलीच आहेस की. जमेल अजूनही काढायला.

मला गजाच्या गायी वाटतायत आणि अजयच्या म्हशी Uhoh

धन्यवाद अश्विनी के....मला म्हणायचे होते की नीट नाही जमली म्हैस....मानवाकृती,प्राणी अजून तरी नाही जमत..अर्थात प्रयत्न सुरू ठेवेन..

अंतरा, माधव, अश्चिनी, धन्यवाद.

गायींची/बैलांची शिंगं जमिनीशी काहीशी काटकोनात असतात. तर म्हशींची मानेलगत असतात.

अंतरा चांगले आहे चित्र

गजा आणि अंतरा दोघांच्याही चित्रात ते झाड आणि ते प्राणी एका बेटावर आहेत असा फील येतोय. अजयच्या चित्रात मात्र एकसंध जमीन जाणवते आहे. नीट बबघितल्यावर जाणवले की अजयच्या चित्रात जे वाळलेल्या गवताकरता वापरलेले स्ट्रोक्स आहेत त्यामुळे तिथे जमीन आहे हे ठसवलं जातय. गजा आणि अंतरा दोघांच्याही चित्रात ते स्ट्रोक्स नाहीयेत. आणि त्या मोकळ्या पांढर्‍या जागेमुळे तिथे पाण्याचा भास होतोय.

अजय, धन्यवाद Happy आधीची चित्रं फिक्कट येत होती म्हणून ह्यावेळेस तुम्ही म्हटल्याप्रमाणे रंग जास्त घेतला. पण माझा अंदाज चुकलाय का रंगाचा? जास्तच रंगिबेरंगी दिसतंय का?

धागा चालू ठेवायलाच हवाय. आमच्याकडूनच चुकारपणा होतोय.

ला थोडा शाऊट होतोय ,त्यात पिवळा रंग घालुन किंवा बर्न्ट सिएना घालुन नैसर्गीक केला असता तर चालले असते. बाकी तुमचा आधिचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय.

मी फक्त बर्न्ट सिएना वापरला. लाल नाही वापरलाय. त्यात पिवळा घालायला हवा होता किंवा किंचीत पातळ करायला हवा होता. नवी कोरी कौलं घातलीत Proud

P1010757i.jpg
चित्रकार विलास कुलकर्णी यांचे एक चित्र तसच पाहून काढण्याचा प्रयत्न केलाय. पुढच चित्र हे देवळाचे काढेन Happy

>>नवी कोरी कौलं घातलीत >>> Lol जरा जास्त भाजलीयत का Proud

वॉव! नीलू, भारी एकदम! थंडगार वाटणारी झाडी किती सुंदर चितारली आहेस. आणि खालच्या बाजूचे, तेवढाच भाग कोरा सोडून रंगवलेले दगडगोटे/खडी पण मस्त आहेत. Happy

नीलू - सुंदर , निगेटीव्ह पेंटीगचा आणि रंगाचा म्स्त वापर, स्तेप बाय स्टेप फोटो काढले असतील तर टाका

अश्विनी के, नीलु खूपच सुन्दर आहेत तुमची चित्रे...
खरेच हा धागा चालू रहायलाच हवा.. सध्या घरी खूप काम आहे त्यामुळे आणखी काही दिवस तरी सरावात खंड पडेल असे वाटते आहे ...पण वेळ मिळाला की पुन्हा सुरुवात करेन...

धन्यवाद!! Happy
अश्विनी Proud कैच्या कै.. पेशन्सचे काम आहे खरे..

अजय, स्टेप बाय स्टेप नाही काढलेत फोटो. खरं म्हणजे अर्धे चित्र झाल्यावर पेशन्स संपतोच. मग पटापट संपवले जाते. मला चित्र पूर्ण करायला जरा जास्त वेळ लागतो असं वाटतंय. पुढच्या वेळेला प्रयत्न करते.

अश्विनी, नीलू दोघीही ग्रॅज्युएट पातळीवरच्या विद्यार्थिनी आहेत. खूपच मस्त आहेत दोघींची चित्रे.

Pages